करोना आणि मिपाचे कल्पक बॅनर !
करोना विषाणूच्या लागणीची साथ आली, आणि आपले दैनंदिन जीवन ढवळून निघाले, अन मग मिपाकर ही या ताज्या विषयावर चर्चा करायला मागे का राहातील ?
डॉ सुबोध खरे यांचा कोविड-१९ विषयीचा लेख म्हणजे शास्त्रीय माहिती, जैविक तपशील यांचा आरसाच, बऱ्याच लोकांनी तिथं चर्चा केली, शंका विचारल्या, उत्तरं मिळून प्रबोधनही झालं.
कुमार१ यांचा हात, जंतू, पाणी आणि साबण हा देखील स्वच्छतेच्या अंगाने चर्चला गेलेला सुरेख लेख.
संदीप चांदणे यांची मास्कमधून ही जिद्द आणि जगवणं सांगणारी कविता.
ही काही वानगी दाखल उदाहरणे.
आणि या पार्शवभूमीवर मिपाचे कलाकार तरी का मागे का राहतील ?
आणि मग, मिपा सजलं आकर्षक समयोचित बॅनरनं !
आपण करोना विरुद्धची लढाई लढायला सज्ज आहोत हे आश्वस्त करणारी टॉपलाईन.
करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी प्रमुख उपायांची आटोपशीर ग्राफिक्स मांडणी.
मास्क लावला तरी तुम्हाला कुणी डुआयडी म्हणणार नाहीत ही जबरी कोपरखळी !
आणि त्यावर कळस म्हणजे मिपाच्या लोगोला चक्क " गो करोना, करोना गो " अशी सिग्नेचर लाईन असलेला मास्क ! क्या बात हैं !!!
हॅट्स ऑफ फॉर बॅनर ! सलाम !
मास्क लावला तरी तुम्हाला कुणी डुआयडी म्हणणार नाहीत ही जबरी कोपरखळी !
आणि त्यावर कळस म्हणजे मिपाच्या लोगोला चक्क " गो करोना, करोना गो " अशी सिग्नेचर लाईन असलेला मास्क ! क्या बात हैं !!!
हॅट्स ऑफ फॉर बॅनर ! सलाम !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
+१
+१
+१
प्रा.डॉ.दिलीप बिरुटेसाहेब ! खरंच, अभ्याशेठनं केलेलं बॅनर एकदम भारी झालेय ! हे बॅनर नक्की कुणी केलंय हे माहित नव्हतं, नाही तर धाग्यात देखील उल्लेख केला असता ! हॅट्स ऑफ अभ्याशेठ ! अभ्याचे आम्ही देखिल फॅन आहोत हे या ठिकाणी सांगायला आनंद होतोय ! भेटायची इच्छा आहे या कलावंताला एकदा !अभ्याशेठनं केलेलं बॅनर एकदम
मिपाच्या लोगोला मास्क लावण्याची कल्पना भारीच आवडली...
वा !
अभ्या हाडाचा कलाकार आहे.
अभिनंदन!!!
??
कोविद चाचणी संच निर्मितीसाठी
अभिनंदन.
लैच भारी...
सुंदर बॅनर, शैलेंद्र कवाडे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- On the floor baby Hit it hard baby Rock the party baby Pattoolengil podi... :- Love Action Dramaश्री शैलेंद्र कवाडे
आताच झी मराठी वर श्री. शैलेंद्र कवाडे