या पिशव्यांच करायचं काय?

vcdatrange's picture
vcdatrange in काथ्याकूट
17 Feb 2020 - 9:08 pm
गाभा: 

जैविक अन् विघटनशील कचर्याच्या व्यवस्थापनाच्या पर्यायी उपाययोजना आता समाजात मुळ धरु पाहतायेत. पण प्लास्टिकच्या बाबत मात्र आपण बरेचसे परावलंबी आहोत. रोज राज्यात एक कोटी दुधाच्या पिशव्यांची विक्री होते. रोज दुधाच्या पिशव्यांमधून मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा कचरा रस्त्यावर येत असतो. हा कचरा विविध नाले गटारे आणि इतर ठिकाणी साचून राहिल्याने बर्‍याच परिणामांना सामोरे जावे लागते. जसे की या पिशव्या केरातून त्यांच्या पोटात गेल्याने भटक्या प्राण्यांच्या जीवितास धोका निर्माण होतो, केरातून काही महाभाग या पिशव्या गटारी मध्ये टाकतात ,गटारी ,ड्रेनेज तुंबतात,अनारोग्य उद्धभवते. काही ठिकाणी एकीकडून कचरा गोळा करायचा आणि दुसरीकडे ओतायचा हे धोरण आहे. याने समस्या फक्त नजरेआड होते.

दुधाची पिशवी फाडतांना त्यांचा कोपरा काढायच्या ऐवजी फक्त कट मारला पाहिजे. छोटे प्लास्टिक चे कोपरे कचर्यात सापडले त्याचा पुन:र्वापर करता येत नाही व सागरी जीवनही धोक्यात येते.

मागच्या वर्षापासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू झाली आहे. तत्कालीन पर्यावरण मंत्र्यांनी "दुधाच्या प्लास्टिक पिशव्यांवर बंदी घालण्याची तसेच ग्राहकांनी दुधाची रिकामी पिशवी परत केली तर, प्रत्येक पिशवी मागे त्यांना ५० पैसे देण्यात येतील" अशी घोषणा केली.

माझ्याकडे साचलेल्या तब्बल सहा महिने कालावधीतील दुधाच्या पिशव्या स्वच्छ धुवुन जमा करुन ठेवल्यात. स्थानिक दुकानात चौकशी केली पण नाही परत घेतल्या त्यांनी, प्रत्येक पिशवी ५० पैसे परत करणे ही गोष्ट तर दूरच राहिली, आमच्याकडे अद्यापि तशी काही व्यवस्था नाही म्हणाले. व्यावसायिक पातळीवर राज्यभरातील बहुसंख्य डेअरी चालकांशी संपर्क आहे, पण तेथेही अंधारच आहे.

कचरा व्यवस्थापनाच्या *3R* पैकी वापर कमी करणे (Reduce), पुनर्वापर करणे (Reuse) या आपल्यापुरत्या स्वांत्यसुखाय विकल्पांसोबत *Recycle* म्हणजे प्रक्रिया करण्याची यंत्रणा कोणाची, कुठे, कशी कार्यान्वित आहे याबाबत सर्वच पातळ्यांवर उदासीनता आहे. प्रदुषण नियंत्रण मंडळ, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्य शासन अगर खाजगी पातळीवर कुठे काही प्रकल्प सुरु असल्यास सोबत दिलेल्या संपर्कमाध्यमाद्वारे अवगत करावे, ही विनंती.‍‍‌

डाॅ. वैभव कीर्ति चंद्रकांत दातरंगे, नाशिक
सामाजिक आरोग्य सल्लागार,
सचिव- नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन
vcdatrange@live.com
942 229 2335

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

18 Feb 2020 - 2:29 pm | चौथा कोनाडा

हे ठीक आहे, पण इतर बारक्या आणि पातळ प्लास्टिक कचऱ्याचे काय करणार ?
शाळेच्या स्टेशनरी पासून ते वैद्यकीय क्षेत्रात बारीक/पातळ प्लॅस्टिक मोठया प्रमाणात वापरले ( सजावटीसाठीच्या वस्तूंमध्ये तर महापूर आहे)
त्या पार्श्वभूमीवर ही कल्पना जरा भाबडेपणाची वाटतेय.

नमकिन's picture

21 Mar 2020 - 5:51 pm | नमकिन

अहो ५०पैसे प्रती पिशवी मिळणार असं लिहिलं आहे पिशवी घेऊन परत दिले तर पण कूठे दिली तर घेत नाहीत.
शुद्ध फसवणूक आहे आमची व पर्यावरण विषयक गुन्हा.
काही मार्गदर्शनपर लेखन असेल तर ते पाठवा.

ऋतुराज चित्रे's picture

21 Mar 2020 - 6:23 pm | ऋतुराज चित्रे

कमीतकमी १ किलो की ५ किलो अशी काहीतरी अट आहे असं एका पिशवीवर वाचल्याचे आठवते.

नमकिन's picture

23 Mar 2020 - 2:49 pm | नमकिन

मागेल त्या प्रमाणात देऊ रोज ५०पै किंवा एकदम ५०रू घेऊ. ५०पै/नग याप्रमाणे किलो हिशोब इतर बाजार पिशवी व बाटली साठी.

चौथा कोनाडा's picture

23 Mar 2020 - 1:12 pm | चौथा कोनाडा

काल शीतपेयाच्या प्लॅस्टिकच्या रिकाम्या बाटलीवर रू १५ प्रति किग्रॅ परत असं लिहिलेलं आढळलं, लोक बाटल्या रिकाम्या केलेल्या कचरा पेटीत टाकत होते, बहुधा कचरावेचकाला त्याचे पैसे मिळत असतील !
कुणाला अनुभव आहे का दुकानदारच अश्या रिकाम्या बाटल्या / दूधपिशव्या विकत घेऊन पुढे पाठवतो ?