नास्तिक चळवळ : काळाची गरज ?
राम राम मंडळी...! मंडळी, काल एक बातमी वाचनात आली. ”नास्तिक कुणालाच नको असतात” बातमी वाचत गेलो आणि मग नास्तिक चळवळ चालवणा-या मंडळींबद्दल मिपावर काथ्या कुटला पाहिजे असं वाटलं. नासिक मधे नुकताच नास्तिक मेळावा आयोजित करण्यात आला होता, पुण्यातही नास्तिकांनी एकत्र येऊन ट्रीप आयोजित केली होती. पुण्यातली मंडळी दर पंधरा दिवसाला भेटतात आणि काल शनिवारी मुंबईत नास्तिक परिषद झाली. नास्तिक चळवळ ही काही नवीन नाही. आपल्याकडे प्राचीन काळापासून ते आतापर्यंत अनेकांनी बुद्धीप्रामाण्याची चळवळ पुढे नेण्याचे काम केले आहे. युरोपातही सॉक्रेटीस, प्लेटो, अॅरीष्टॉटल ही नावं आपल्याला माहिती आहेतच, तरीही रोजच्या जीवनात बुद्धीप्रामाण्य राहीलं नाही. '' आपल्याकडे तर्कशुद्ध उत्तर नाही हे कळत असूनही आस्तिक माणसं निरर्थक वाद वाढवतात. या सततच्या वादाचा एक मानसिक थकवा येतो. अरे, म्हणजे मी काय म्हणतोय, तुम्ही काय उत्तर देत आहात. कशाचाच पायपोस कशात नाही'' असे नास्तिक चळवळीचे कार्यकर्ते सांगतात.
मंडळी, या लोकांचं म्हणनं आहे की आम्हाला निरीश्वरवादाचा पंथही करायचा नाही. बुद्धीप्रामाण्यवादी लोकांची आणि ईश्वर या कल्पनेशी काहीही देणंघेणं नसणार्या लोकांची संख्या खूप आहे, आणि ती भविष्यात वाढणार असं या चळवळ चालविणार्या लोकांची मतं आहेत. त्याचबरोबर धर्माच्या बदनामीच्या कायद्याला विरोध हाही या चळवळींचा उद्देश आहे. कुठे काही धर्मविषयक बोलल्या गेलं की कायदेशीर प्रक्रिया सुरु होते आणि त्याचा त्रास चळवळीतल्या लोकांना होतो त्याबाबतही त्यांची एक भूमिका आहे. नास्तिकांसाठी सपोर्ट सिस्टीम तयार करणे त्यांच्या नास्तिक मेळाव्यांचा उद्देश असतो. नास्तिक चळवळ चालविणार्या मंडळींचे वॉट्सॅप गृप आहेत. अनेक गोष्टींचे ते आदानप्रदान करतात. भेटतात. एकमेकांच्या विचारांना सपोर्ट करतात.
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
मंडळी, व्यक्तीगत मला ही चळवळ आणि त्यांचा उद्देश चांगला वाटला आहे. नास्तिकांना आपली एक विचारांची बैठक असलीच पाहिजे. समाजाचं प्रबोधन आपापल्या परीने करता आले तरी ठीक आहे, नाहीच जमलं तरी आजूबाजूचा प्रचंड गोंगाट पाहता जगण्याकडे पाहण्याचा एक आधुनिक द्रुष्टीकोण आला तरी पुष्कळ आहे, असे म्हणावे वाटते. मी या चळवळीतल्या युवकांना मनःपूर्वक शुभेच्छा देतो. मिपावरही अशा दृष्टीकोणाचे स्वागत करणारे अनेक आहेत, त्यांची या चळवळीबद्दल काय मतं आहेत तेही वाचायला आवडेलच. कोणाला या चळवळीबद्दल अधिक काही माहिती असेल तरीही या काथ्याकुटात स्वागत आहे.
(मूळ बातमी- छायाचित्र जालावरुन )
वर्गीकरण
प्रतिक्रिया
३०० प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
धूसर रेषा
@ चौकस २१२, मी आपल्या
विरोधाभास
नास्तिक ता पण selective
इतिहास साक्षी आहे
सहमत
एक फेबू मित्र संजय सरांची पोष्ट आठवली म्हणून पाठवली.
शेपूट नको त्या
आणि गंभीर आजारातून बरे झाले
सहमत पण
असे कार्य चालू आहे जगभर चालू
असा कृतीला "वास "येतो
अनिसला समांतर अशी संघटना
आपापल्या धर्मातील अनिष्ट
"वन कान्ट बी सिलेक्टिव्ह "
समान्तर कशाला?
तुमचा बराच वैचारिक गोंधळ
शंका घेण्याची
विचारांची स्पष्टता
बहुसंख्य फुरोगामी हे दांभिक
पुरोगामी = दांभिक
हेच अंतिम सत्य आहे.अचुक निदान
हेच अंतिम सत्य आहे.
इतकी खराब परिस्थिती ? :-)
प्रतिगामी=अंतिम सत्य.
पुरोगामीत्वात अंधश्रद्धा
gossip
सहमत ९०%
'देव नाही' या गोष्टीवर
आपण सर्वांना एकाच झोळीत टाकू नये
भगवंताची उपासना मुळात करायचीच
देवांनी मैदान सोडले.
लेखन सर्वानाचा आवडले पाहिजे असे काही नाही.
देव माणसाचा कोण?
काही देव अजुनही भक्तांचे रक्षण करण्यास समर्थ आहेत बरं !
मैदान सोडलेले देव