भाग १ प्रतापगडाची उलटवलेली बाजी - विषय प्रवेश -

शशिकांत ओक's picture
शशिकांत ओक in काथ्याकूट
10 Mar 2020 - 2:12 am
गाभा: 

भाग १ प्रतापगडाची उलटवलेली बाजी -

विषय प्रवेश

शिवाजी महाराजांनी अफ़झलखानाला मारले. या लढ्यातील अफ़झलखानाच्या बाजूने लष्करी चालींच्या मांडणीतून त्याचे ध्येय धोरणावर, केलेल्या खेळींवर प्रकाश टाकायचा प्रयत्न…
इतिहास जेत्यांच्या बाजूने लिहिला जातो असे म्हणतात.
जे हारतात त्यांची बाजू काय असेल? त्यांच्या हातून काही गफलत झाल्या त्यामुळे जिंकलेली बाजी हरायची वेळ आली? याचा ओहापोह करायला हवा असतो.
तो केला जातोच असे नाही. शिवाय केला तर आपल्या चुका इतरांना कळून येऊ नयेत म्हणून असे *अहवाल दाबून ठेवले जातात. काही काळानंतर हार झालेल्या संग्रामातील मनुष्य, धन, वैभव, प्रतिष्ठा यांची हानी झाली तरी ती लढाई खरे तर आम्हीच जिंकली होती असे स्वतःची पाठ थोपटून म्हणण्याचा प्रघात पडतो. असो.

इतिहासाच्या पानांवर बरेच काही लिहीलेले नसते. कारण तसे पुरावे अनुपलब्ध असतात. पण ते समजावून घेणारे डोळे आणि कान असतील तर छोट्या टिंबाना जोडून काही शोधता येईल का असा प्रयत्न करायला काय हरकत आहे?

शिवाजी महाराजांना सुपर मॅन बनवले जाऊ नये. कल्पकता, चातुर्य, साहस, मिळालेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करणारे, विपरीत परिस्थितीत मानसिक संतुलन ठेवण्याची कला प्राप्त थोर सेनानी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जावे. दरवेळी नव्या युक्त्या वापरून समोरच्या व्यक्तीला, सेनेला नामोहरम करण्याचे कसब त्यांना जागतिक कीर्तीचे महान सेनापती, जनसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करायला सदैव तत्पर चारित्र्यवान राज्यकर्ता म्हणून प्रतिष्ठा प्राप्त करून देते.

त्यांचे विरोधक अशा सद् गुणांचे नसतील तर काय होते ते आपणास माहित आहे. म्हणून त्यांनी तयार केलेल्या संकल्पना, युद्ध नेतृत्वाची दखल घेतली पाहिजे. पुढच्या काही भागात अफझलखानाच्या मोहिमेच्या संदर्भात असाच एक शोध.
….

*अलिकडच्या काळात पाकिस्तानने सन १९७१ च्या पराजयाची कारणे शोधायचा अहवाल, सन १९९९ कारगिल युद्धातील घटना व हानी यांचा अहवाल प्रकाशित केले नाहीत. २५ /११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा शोध अहवाल पाकिस्तानात का उघड केला जात नाही? असा प्रश्न खुद्द नवाज़ शरीफ पंतप्रधानपदावरून काढून टाकल्यावर मुद्दाम प्रेस कॉन्फरन्स बोलावून विचारत होते!
१९६२ च्या चीन आक्रमणानंतर भारतीय लष्कराने तयार केलेला टॉप सिक्रेट अहवाल फक्त 'फॉर युवर आईज ओन्ली' असा शिक्का मारून एका अर्थाने लपवला जातो. लेफ्टनंट जनरल शेकटकरांनी तो प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगताना, तो अहवाल सेनेतील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील पहायला अशक्य असल्याचे नोंदवले आहे.

शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

सध्याच्या काळात दिसणाऱ्या नकाशात जुन्या वास्तूंची ओळख

पुढे चालू...

प्रतिक्रिया

Nitin Palkar's picture

10 Mar 2020 - 12:07 pm | Nitin Palkar

उत्कंठा वाढलीये..... पुढील भाग लवकर येऊ द्या......

खटपट्या's picture

10 Mar 2020 - 12:23 pm | खटपट्या

पुढचा भाग लवकर लिहावा

शशिकांत ओक's picture

10 Mar 2020 - 12:36 pm | शशिकांत ओक

खटपट चालू आहे!

उत्कंठावर्धक मालिका वाचायला मिळणार याचा आनंद झाला आहे. लवकर पुढचा भाग लिहावा. पहिला फोटो, किंवा व्हिडीओ जे काही आहे ते दिसत नाही. शिवाय प्रतापगडाच्या नकाशामध्ये दोन बदल करता येतील.
१ ) दक्षिण बुरुजाला "रेडे बुरुज" असे नाव आहे, तो बदल करता येईल.
२ ) अफझल बुरुजाच्या एवजी "जिवा महाल बुरुज" असे नाव दिले तर अधिक योग्य असे वैयक्तिक मत आहे.
शिवाय त्याच्या खाली जिथे शिवाजी महाराजांची आणि अफझलखानाची भेट झाली त्या जागेला "जनीचा टेम्भा" म्हणतात. तेही नकाशामध्ये समाविष्ट करता येईल.

शशिकांत ओक's picture

10 Mar 2020 - 4:46 pm | शशिकांत ओक

पहिले दोन शीर्षकाचे फोटो आहेत. नंतर महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे.
जे फोटो दिसत नाहीत ते कळवा. कारण या नंतर फोटो नकाशे दिसले नाहीत तर मग विरस होईल सर्वांचा ...

जिवा महाल बुरुजाचे ऐतिहासिक महात्म्य सांगाल का थोडे प्लीज?

शशिकांत ओक's picture

10 Mar 2020 - 4:52 pm | शशिकांत ओक

रस्त्यावरील स्वागत प्रवेशद्वाराचे चित्र आहे.
दिसत नसेल तर पुन्हा पुन्हा सादर करीन.

शशिकांत ओक's picture

10 Mar 2020 - 6:28 pm | शशिकांत ओक

शशिकांत ओक's picture

10 Mar 2020 - 6:33 pm | शशिकांत ओक

नव्याने सादर प्रतापगड दर्शन

दीपक११७७'s picture

23 Mar 2020 - 10:37 pm | दीपक११७७

शुभेच्छा! पुढिल भागाच्या प्रतिक्षेत

शशिकांत ओक's picture

24 Mar 2020 - 9:51 am | शशिकांत ओक

आजकाल करोनामुळे आकडेवारीला महत्त्व आले आहे!
पुढील भाग सादर झाले कि आधीच्या भागांकडे लक्ष कमी वेधले जाते. त्या मानाने आधीचेही पाहिले जात आहेत. याचे समाधान वाटते.