Skip to main content

मस्त असे दोन प्रकारचे टोस्ट

लेखक चौकस२१२ यांनी सोमवार, 09/03/2020 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
झटपट आणि चवीला मस्त असे दोन प्रकारचे टोस्ट - पावावर चेदार किंवा टेस्टी जातीचे चीज पसरावे + हिरवी मिरची / कोथम्बीर चटणी, आणि ग्रिल खाली भाजावे, चीज तांबूस होऊन त्याला कडक पापुद्रा येईपर्यंत असे भाजलेले चीज मस्त लागते - वरील प्रमाणेच परंतु भारतीय हिरव्या चटणी ऐवजी पेस्तो नावाची इटालियन चटणी घालता येईल ( खायची तुळस , काजू , मीठ, ऑलिव्ह तेल यांची चटणी ) IMG_6001[1]

वाचने 4940
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

ही पाकृ अंडे घालून करता येईल का? पैजारबुवा,

In reply to by असंका

लै हस्लो. का हो? कारण? मला बरेचदा कळत नाही, मिपावर लोक असा काही प्रतिसाद देतात कि१) उगाचच वेळ जात नाही म्हणून फालतू काहीतरी लिहिलंय, २) कोपरखळी मारलीय कि ३) तुसडे पण? कौतुक वैगरे राहूद्या त्याची अपेक्षा नाही , टीका पण चालेल, उलट सकारात्मक टीका हवी पण हे काय? म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचंय. अगदीच फालतू नेहमीची पाकक्रिया लिहिली आणि वेळ घालवला असे म्हणायचे तर सरळ तसे म्हणा ना ?

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

यात अंडे नको कारण १) खुसखुशीत पणा जाईल , मऊ होऊन जाईल २) भाजके पणाची खास करून त्या चीज च्या खरपूस पापुद्र्याची जी चव राहणार नाही करून बघा पाहिजे तर