मेरा कुछ सामान...
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
1 कविता वाचून तू म्हणालास, पण त्या संध्याकाळची तिरपी किरणं राहिली की लिहायची!
राहणारच ना रे??
मुठीत घट्ट पकडून ठेवलीत मी ती!
2 तिरपी किरणं राहिली,
तुझ्या चित्रामधली तिरपी रेघ राहिली..
अन् ती छोट्टीशी तिरपी काच पण राहिली..
अश्या तिरक्या कल्पना कुणाला सुचतात का?
तिरपागडीच तू...
3 जगजीतची गझलसुद्धा राहिली..
कुठली होती रे ती??
आयला, अशी कशी विसरले??
वय झालं बघ माझं!!
4 काचेचं बाऊल राहिलं..
चाफ्याची फुलं राहिली..
ती बांधून आणलेला कागद राहिला....
त्यावरचा पुडीचा दोरा राहिला..
(तू तो नीट गुंडाळून ठेवलास आणि कागद घडी करून..
पक्का पुणेरी तू!!!)
5 btw त्या दो-याचं नि कागदाचं काय करणार तू???
आठवणी वगैरे बांधायला तो दोरा वापरू नकोस हं..;)
कारण दोरा भिजून जाईल, अन् आठवणी वाळून.
त्यापेक्षा त्या नीट घडी करून ठेवलेल्या कागदावर चित्र काढ,
कुठलंही......
6 काय राहिलं काय घेऊन आले,
याचा हिशोबही राहिलाच.
तूच कर तो कधीतरी..
काही बाकी उरलंच तर जपून ठेव.
पुन्हा येईन तेव्हा घेऊन जाईन मी...
(आता तू याला cliche म्हणणार, माहितीये..;))
7 फक्त एक संध्याकाळ
आणि गुलझारची नज्म कशी अचानक
आपली बनून जाते नाही??
मेरा कुछ सामान...
प्रतिक्रिया
नेहमीप्रमाणेच सुरेख
मस्त लिहिलंय
मेरा कुछ वाणसामान तुम्हारे
गोष्ट सात भागांची
साता भागांची कहाणी
:):)
दंडवत घ्या बुआ
मस्त
जियो!!