Skip to main content

करोना विषाणू COVID-19 (Coronavirus disease 2019)

लेखक सुबोध खरे यांनी बुधवार, 04/03/2020 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
करोना विषाणू हा एक साध्या सर्दीपासून मर्स आणि सार्स (Middle East Respiratory Syndrome (MERS) and Severe Acute Respiratory Syndrome (SARS) सारख्या श्वसनसंस्थेला सूज आणणाऱ्या विषाणूंच्या गटातील एक विषाणू आहे. COVID-19 (Coronavirus disease 2019) हे या विषाणूंचे नाव आहे आणि याचा आपल्याला शोध हा आता हि साथ आल्यामुळे लागला आहे. यामुळे होणाऱ्या रोगाची लक्षणे -- ताप, कोरडा खोकला आणि थकवा येणे. काही रुग्णांना सर्दी, अंग मोडून येणे, नाक बंद होणे, घसा दुखणे आणि काही रुग्णांना डायरिया पण होतो. हि सर्व लक्षणे हळूहळू दिसू लागतात. बऱ्याच लोकांना या विषाणूचा प्रादुर्भाव झाला तरी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत कि कोणताही त्रास होत नाही. ८५ टक्के रुग्ण कोणताही इलाज न करता स्वतःहून बरे होतात. १५ % रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि १ ते २% रुग्ण यात दगावतात. गंभीर आजार आणि मृत्यू हा साधारणपणे वृद्ध, प्रतिकारशक्ती कमी असणारे किंवा मधुमेह, रक्तदाब हृदयविकाराचे रुग्ण यांमध्ये दिसून येतो. रोग प्रसार -- या रोगाने आजारी रुग्ण जेंव्हा खोकतो किंवा शिंकतो तेंव्हा त्यातुन जो फवारा उडतो त्यात असलेल्या सूक्ष्म थेंबातुन हे विषाणू आजूबाजूच्या वस्तूंवर जाऊन बसतात. या वस्तुंना हात लावल्यावर जेंव्हा निरोगी माणूस आपल्या चेहऱ्याला डोळ्यांना नाकाला हात लावतो तेंव्हा हा विषाणू त्याच्या शरीरात शिरतो. यासाठीच आपण बाहेर जाऊन आल्यावर आपले हात साबणाने आणि भरपूर पाण्याने धुतले पाहिजेत आणि सारखा चेहऱ्याला हात लावणे बंद केले पाहिजे. आणि ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे आवश्यक आहे. अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर हा साबणासारखेच काम करतो. (खरं तर साबण जास्त चांगला आहे). कोणताही साबण चालतो. डेटॉल किँवा सॅवलॉन सध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक असतो असा कोणताही पुरावा आढळलेला नाही. बहुसंख्य लोकांना हा रोग अतिशय कमी प्रमाणात होतो परंतु हे विषाणू त्यांच्या श्वसन मार्गात असल्यामुळे कोणीही( वारंवार निरोगी दिसणाऱ्या माणसानेही) खोकताना किंवा शिंकताना हातरुमालातच शिंकणे आवश्यक आहे. करोना विषाणू पासून आपला बचाव-- १) बाहेर जाऊन आलयावर प्रत्येक वेळेस आपण आणि आपल्या घरच्यांना साबण आणि पाण्याने हात धुण्याची सवय लावणे २) खोकला किंवा सर्दी असलेल्या माणसापासून १ मीटर दूर उभे राहणे ३) ज्याला खोकला किंवा सर्दी आहे त्याने मोठा हातरुमाल जवळ बाळगून त्यातच आपले खोकणे किंवा शिकणे नियंत्रित करणे. हि गोष्ट आपल्या माहितीतील सर्व लोकांना सांगणे आपल्याला हा रोग होण्याची शक्यता --आपण चीन इटली किंवा तशा रोगप्रसार झालेल्या देशात जाऊन आला नसाल तर हा रोग होण्याची शक्यता सध्या तरी फारच कमी आहे. हा विषाणू जन्य रोग असल्यामुळे या रोगावर प्रतिजैविके ( Antibiotics) काम करत नाहीत. अजून तरी यावर लास तयार झालेली नाही परंतु लवकरच ती उपलब्ध होईल अशी आशा आहे. आरोग्य कर्मचारी आणि ज्यांना खोकला किंवा सर्दी आहे अशानीच तोंडावर मुखवटा घेणे आवश्यक आहे. सामान्य माणसांनी मुखवटा घेणे हे अगोदरच कमी असलेल्या साधनसामग्रीचा अपव्यय आहे. चीन मधून आलेल्या पॅकेटमधून हा विषाणू येण्याची शक्यता फारच कमी आहे कारण शरीराच्या बाहेर हा विषाणू फार तर ४८-७२ तास जिवंत राहू शकतो ते सुद्धा थंड तापमानात अत्यंत महत्त्वाची गोष्ट --या रोगापासून काळजी घेणे हे योग्य आहे परंतु याबद्दल चिंता करणे(ANXIETY) किंवा घबराट पसरवणे ( PANIC) हे चूक ठरेल सार्स(२००३) मध्ये मृत्यूची शक्यता १० % होती . स्वाईन फ्लू( २००९) मध्ये मृत्यूची शक्यता ४.५ % होती इबोला(२०१४) मध्ये मध्ये मृत्यूची शक्यता २५ % होती तर करोना मध्ये हि १-२ % आहे मग आज इतकी भीती का पसरली आहे ? सार्स स्वाईन फ्लू किंवा इबोलाच्या वेळेस सोशल मीडियाचा ( आणि त्यामुळे गैरसमज आणि अफवांचा) प्रसार इतका झालेला नव्हता. आज जगात सोशल मीडिया ३०० कोटी लोक वापरतात. त्यामुळे अफवा दोन दिवसात जगभर पसरल्यामुळे या बद्दल अफवा आणि त्यामुळे घबराट फार लवकर पसरली आहे. भारतात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता खूपच कमी आहे कारण हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही. यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी असलेली राज्ये ( हिमाचल काश्मीर, उत्तराखंड सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश) सोडल्यास इतर राज्यात याचा प्रादुर्भाव होण्याची आणि पसरण्याची शक्यता फारच कमी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जसे तापमान वाढते तसे लोक अतिथंडीमुळे घरात बसून राहतात त्याऐवजी बाहेर पडतात जेथे तापमान जास्त असते यामुळे विषाणूची वाढ कमी होते. वरील लेखातील बहुतेक साहित्य हे जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकातून घेतलेले आहे. यावर अजून संशीधन चालू आहे आणि अजून बरीच माहिती मिळणे बाकी आहे. हा लेख माझ्या नावासाहित किंवा नावा शिवाय पाठवले तरी चालेल. ही माहिती मी जागतिक आरोग्य संघटनेच्या अद्ययावत पत्रकावरूनच घेतलेली आहे. त्यात माझे कर्तृत्व काही नाही. पण जर लोकांना माहितीच्या स्रोता बद्दल खात्री वाटत नसेल तर खाली डॉ सुबोध खरे एम डी असे लिहिले तरी चालेल. लोकांमध्ये निर्माण होणारा "भयगंड"दूर करणे आणि आरोग्याची योग्य काळजी घेणे एवढाच माझा हेतू आहे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 148341
प्रतिक्रिया 253

प्रतिक्रिया

विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.
हि मह्त्वाची माहिती आहे. महाराष्ट्रात किमान उन्हाळ्यात प्रसार कमी राहील असे म्हणता येईल का पण १) एकदा शरीरात आल्या नंतर बाह्य तापमानाचे नेमके काय + - परिणाम असतील, २) वीषाणू बाधीत व्यक्तींचे रात्रीचे प्रवास (खासकरून विमान प्रवास) आणि त्यांनी रात्रीच्या प्रवासानंतर आजारी नातेवाईकांना भेटण्याचे टाळावे का ? ३) पावसाळा आणि हिवाळा या काळात महाराष्ट्रा सारख्या प्रदेशात अंशतः प्रसार होऊ शकत असावा असे दिसते. * विषाणू (व्हायरस) जन्य आजार, काही प्रश्न हा एक शंका धागा मागच्या महिन्यात काढला होता त्यात आपल्या या लेखाचा दुवा जोडला आहे.

In reply to by माहितगार

२) वीषाणू बाधीत व्यक्तींचे रात्रीचे प्रवास (खासकरून विमान प्रवास) आणि त्यांनी रात्रीच्या प्रवासानंतर आजारी नातेवाईकांना भेटण्याचे टाळावे का ? -> नक्कीच! विषाणू बाधीत लोकांना self isolation करण्याचा म्हणजेच स्वतःला इतरांपासून दूर ठेवण्याचा सल्ला सर्व आरोग्य तज्ञांकडून दिला जातोय.

In reply to by माहितगार

फक्त तापमानच नाही, तर हवेतील आर्द्रतेचा खूप परिणाम होतो. थंड आणि कोरड्या हवेत हा विषाणू जास्त काळ जिवंत राहू शकतो. पाश्चात्य देशात ऑक्टोबर ते मार्च (डिसेंबर आणि फेब्रुवारी महिने सर्वात जास्त) हा म्हणून फ्लू-सिझन समजला जातो. भारतासाठी पाऊस पडून गेल्यावर हवा थंड आणि कोरडी असू शकते, त्या वेळी या विषाणूचा प्रसार जास्त होऊ शकतो. http://sitn.hms.harvard.edu/flash/2014/the-reason-for-the-season-why-fl…

डॉक्टरसाहेब, माहितीपूर्ण लेखनाबद्दल आभार...!!! -दिलीप बिरुटे

धन्यवाद !!! यातील काही कारणे माहित होती, त्यामुळे थोडा निवांत होतो. आता काही assumptions ना पुष्टी मिळाली.

करोना व्हायरस्च्या भितीमुळे माझ्या काही मैत्रिणी पोहायचा क्लास बंद करायचा म्हणत आहेत. इनडोअर पुल आहे आणि तिथले तापमान कायम २५ डिग्री सेल्सियस च्या वरती ठेवतात. तर आपला सल्ला काय आहे?

पोहायचे तलावात क्लोरीन असते त्यामुळे तेथे विषाणू वाढण्याची शक्यता फारशी नाहीच. त्यातून आपल्या शहरात या रोगाचा एक तरी रुग्ण आढळला आहे का? तसे नसेल तर आपल्याला हा रोग होण्याची शक्यता किती?

आज असे वाचनात आले की थुंकी जर काही कारणाने वाळली नाही तर हां विषाणु १७ दिवस पर्यंत घातक अवस्थेत राहू शकतो ! अर्थात अशी शक्यता उष्ण प्रदेशात ख़ास करून जिथे आता उन्हाळा येऊ घातला आहे तिथे अशक्यच आहे !

रीत सरकार केंद्र सरकार नी जाणकार लोकांची समिती बनवून त्या द्वारे व्हायरस विषयी खरी सत्य माहिती जनतेला दिली पाहिजे. त्या मध्ये कशी काळजी घ्यावी,उपचार काय आहेत,कशा मुळे रोग पसरतो ही माहिती हवी . ज्या देशात हा रोग पसरला आहे त्या देशातील (भारतीय किंवा विदेशी)नागरिकांना देशात सरळ प्रवेश देवू नये. विमान सुविधा बंद करावी. मीडिया उथळ माहिती देवून लोकांमध्ये गोंधळ उडवून देत आहे. तेव्हा अशी माहिती प्रसारित करण्यास सक्त मनाई करावी. फक्त सरकारी यंत्रणाच माहिती देईल .

उष्णतेचा करोना व्हायरसवर कसा परिणाम होतो हे अजून सिद्ध झालेला नसावे. हा दुवा हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या School of Public Health चा आहे - https://ccdd.hsph.harvard.edu/will-covid-19-go-away-on-its-own-in-warme… हा Centers for Disease Control and Prevention वरुनः https://www.cdc.gov/coronavirus/2019-ncov/faq.html Will warm weather stop the outbreak of COVID-19? - It is not yet known whether weather and temperature impact the spread of COVID-19. Some other viruses, like the common cold and flu, spread more during cold weather months but that does not mean it is impossible to become sick with these viruses during other months. At this time, it is not known whether the spread of COVID-19 will decrease when weather becomes warmer. There is much more to learn about the transmissibility, severity, and other features associated with COVID-19 and investigations are ongoing. ह्याव्यतिरिक्त https://time.com/5790880/coronavirus-warm-weather-summer/ https://www.snopes.com/fact-check/coronavirus-warm-weather/ https://www.npr.org/sections/goatsandsoda/2020/02/12/805256402/can-coro… मला WHOच्या वेबसाईटवर याविषयि काही महिती मिळाली नाही. जर लिन्क असेल तर इथे देउ शकाल का?

नेमकं. आता चानेलवाले मुंबईत इथे आणि तिथे दुकानंत वायरससाठीचे (अटकवण्याचे) फडके ,मास्क मिळत नाहीत हे सांगतात म्हणजे काही लोक धडपड करून ते मिळवणारच.

ऊत्तम माहिती.

हा विषाणू ४-८ 'सेल्सियस ला जास्त वाढतो आणि ३५ अंश सेल्सियस च्या वर २-४ मिनिटांपेक्षा जास्त तग धरू शकत नाही.>>>> डॉ. खरे सर, माणसाच्या शरीराचे तापमान ३७ अंश सेल्सियस असते तर हा विषाणू शरीराच्या आत प्रवेश केल्यावर जिवंत कसा राहतो?

थोडी चूक झाली.क्षमस्व विषाणू शरीराच्या बाहेर फारसा टिकू शकत नाही असे हवे होते. विषाणू शरीरात पेशींच्या आत राहतो आणि वाढतो चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

In reply to by सुबोध खरे

इराण मध्ये देखील हा व्हायरस पसरतोय. तिकडे तर तापमान जास्त असते, मग तिथे देखील हा व्हायरस कसा काय पसरतोय???

The report says that regular coronavirus which is one of the causes of common cold survives 30 times longer in places with temperature of 6 degree Celsius as compared to places with temperature of 20 degree Celsius and high humidity. Similarly, a report in the peer-reviewed medical publication Journal of Hospital Infection, points out that human coronavirus can remain potent on inanimate surfaces at room temperature for up to 9 days but if the temperature is more than 30 degree Celsius then the duration of its potency remains shorter.

सर्वसाधारण इन्फ्लुएझा आणि याची लक्षणे जर सारखी असतील तर ओळखायचे कसे?

In reply to by चौकस२१२

असे सांगण्यात येते की कोणतीही अशी भयानक विषाणूजन्य आजाराची साथ असेल तर त्यात " ताप' हे लक्षण समान असते. सबब 98.4फॅ च्या पुढे तापमान गेले रे गेले की तीन दिवस क जीवनसत्व युक्त फळे व फळांचे रस ,तापवून गार केलेले भरपूर पाणी याचा आहर घेतला की विषाणू हवालदिल होतात. बाकी रूमालाचा वापर , हात धूणे ,तोंडात नाकात बोटे न घालणे हे सक्तीचे असतेच ! यात साथ असलेला आजार सामील असेल वा नसेल तरीही !

सर्व आधुनिक साधनं सामुग्री असताना. आधुनिक विज्ञान सेवेला हजर असताना. ब्रह्मांड कवेत घेण्याची ताकत असलेल्या माणसाला एका विषाणू समोर हतबल होताना बघून दुःख होत आहे. परत मलेरिया, पटकी च्या साथीच्या रोगांनी माजवलेला हाहाकार डोळ्या समोर येतो.

In reply to by Rajesh188

मानवाला ज्ञान असले तरी मानवी शरीराची उत्क्रांत व क्रांत होण्याची ताकद फार कमी आहे. सबब मानवापेक्शा परिसरानुसार स्वत:त बदल जीवाणू व त्यापेक्शा ही विषाणू जास्त त्वरेने करू शकतात .मला वाटते जितकी रचना साधी तितकी क्रांत होण्याची ताकद जास्त . विषाणू हे फक्त एक साधे " जेनेटिक " युनिट " असल्याने असे होत असावे !

इन्फ्लुएंझा किंवा सर्दी सारखे असंख्य विषाणू पृथ्वीच्या वातावरणात जीवित आणि मृत यांच्या सीमारेषेवर आहेत. जसे माणसात आणि इतर प्राण्यात उत्परिवर्तन( mutation) होते तसे विषाणूमध्ये सुद्धा होते. असे हजारो (किंवा लाखो) विषाणू जे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाहीत असे पृथ्वीवर असतील. त्यांच्यामुळे आपल्याला साथीचे आजार होण्याची शक्यता कायम असेलच. अशा साथी पसरल्या तरी त्यातून होणारी जीवितहानी आणि वित्तहानी कमीत कमी असेल हे पाहण्याचा जागतिक तज्ज्ञांचा हेतू असतो. १९१८ मध्ये जगभर पसरलेल्या इन्फ्लुएंझाच्या साथी मध्ये जगातील एक चतुर्थांशापेक्षा जास्त लोकसंख्येला (१८०-१९० कोटी) प्रादुर्भाव झाला होता. आणि यात दीड ते पाच कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळेस कुपोषण, अनारोग्य, अस्वच्छता आणि अतिशय गर्दी या कारणांमुळे होणाऱ्या जिवाणूप्रादुर्भावाने लोकांचा मृत्यू झाला होता असे संशोधन दाखवते. https://en.wikipedia.org/wiki/Spanish_flu त्यामुळे आता हि सर्व करणे नाहीशी करून जीवितहानी आणि वित्तहानी कमी कशी होईल याकडे तज्ज्ञ लक्ष देत आहेत. यासाठीच आरोग्याबद्दल जास्तीत जास्त माहितीचा जनतेत प्रसार करून हि हानी कमी कशी करता येईल याकडे सर्व सरकारांचा कल आहे.

अत्यंत उपयुक्त धागा. धन्यवाद डॉक्टर

१५ % रुग्णांमध्ये हा रोग गंभीर होतो आणि १ ते २% रुग्ण यात दगावतात.
आता मृत्यु दर काहीसा कमी झाला स्थिरावला आहे, पण तरी तो ३.४ % आहे असे WHO चे म्हणणे आहे. शिवाय सुरवातीचे काही दिवस मृत्यु दर जास्त का होता ? https://www.worldometers.info/coronavirus/coronavirus-cases/#case-outco… या विषाणूचे नेमके सत्य काय आहे ? हा मानवनिर्मित आहे का ? हा पसरवणे एखाद्या कारस्थानाचा भाग असेल का ?

होय, सुरुवातीला जागतिक आरोग्य संघटनेच्याच साईट वर हा मृत्यू दर कमी होता( १-२ %). नंतर काल हाच दर ३.४% आहे असे जागतिक आरोग्य संघटनेचे म्हणणे आहे. जशी जास्त माहिती उपलब्ध होते तसे ते आपली साईट अपडेट करत राहतात. त्यामुळे हि आकडेवारी बदलत राहते. https://www.reddit.com/r/China_Flu/comments/fbt49e/the_who_sent_25_inte… वरील दुव्यातील महत्त्वाच्या गोष्टी ( When a cluster of several infected people occurred in China, it was most often (78-85%) caused by an infection within the family by droplets and other carriers of infection in close contact with an infected person. यासाठी हात आणि चेहरा धुणे आणि खोकताना शिंकताना रूमालाने तोंड झाकणे आवश्यक आहे Transmission by fine aerosols in the air over long distances is not one of the main causes of spread. म्हणजेच केवळ गर्दीच्या ठिकाणी गेलात तर तेथील लोकांच्या उच्छवासामुळे आपल्याला हा रोग होण्याची शक्यता फारच कमी आहे. If you have direct personal contact with an infected person, the probability of infection is between 1% and 5%. Pre-existing conditions: The fatality rate for those infected with pre-existing cardiovascular disease in China was 13.2%. It was 9.2% for those infected with high blood sugar levels (uncontrolled diabetes), 8.4% for high blood pressure, 8% for chronic respiratory diseases and 7.6% for cancer. Infected persons without a relevant previous illness died in 1.4% of cases. Age: The younger you are, the less likely you are to be infected and the less likely you are to fall seriously ill if you do get infected: Age % of population % of infected Fatality 0-9 12.0% 0,9% 0 as of now 10-19 11.6% 1.2% 0.1% 20-29 13.5% 8.1% 0.2% 30-39 15.6% 17.0% 0.2% 40-49 15.6% 19.2% 0.4% 50-59 15.0% 22.4% 1.3% 60-69 10.4% 19.2% 3.6% 70-79 4.7% 8.8% 8.0% 80+ 1.8% 3.2% 14.8% आपण निरोगी असाल आणि आपले वय ६० पेक्षा कमी असेल तर आपली मरण्याची शक्यता १ % पेक्षा कमी आहे.

फार महत्वाचा धागा. हैदराबाद मधे एक केस पॉझिटिव्ह आल्यावर प्रचंड भितीचे वातावरण होते. दोन केस सुरवातीला जरी सारी लक्षणे तीच असली आणि इटलीच्या प्रवासाच संदर्भ असला तरी शेवटी निगेटिव्ह आली. ज्याने कुठेतरी विश्वास आला. तसेच राजस्थान मधे ज्या इटालियन जोडप्याच्या संपर्कात २४७ व्यक्ती आल्या होत्या त्यातल्या २३९ निगेटिव्ह आल्या, आठ केसचा रिपोर्ट यायचा आहे. कुठेतरी विश्वास वाटतो की आपल्या इथे तितका सहज पसरत नाही आहे. कुठेतरी गरम वातावरणाचा परिणाम होत आहे हे जाणवत आहे. असे असले तरी हैदराबादची केस दुबईच्या प्रवासाशी संबंधित होती. तिथे वातावरण तितके थंड नाही त्यामुळे भिती ही आहेच. सध्यातरी या व्हायरसचा प्रसार अति थंड प्रदेशात जास्त आहे. काही डॉक्टरांचे मत आहे की भारतातल्या वाढत्या न्यूमोनियाच्या केसचा अभ्यास करायला हवा. त्याचा कुठे संबंध आहे का?

मास्क हे रोगापासून बचाव करण्यासाठी आहेत की रोगाचा प्रसार होवू नये म्हणून आहेत.. व्हायरस हे अतिशय सूक्ष्म आकाराचे असल्यामुळे मास्क मधून श्वास द्वारे शरीरात जाण्यापासून मास्क प्रतिबंध करू शकतील हा ह्याची शंका आहे.. मास्क ची गाळणी व्हायरस वेगळा करू शकेल का? मला वाटतं मास्क हे बाधित व्यक्ती साठी असावेत जेणेकरून व्हायरस चा प्रसार कमी प्रमाणात होईल.

सर , कोरोना वायरस सम्बन्धित बातमी बीबीसी वर वाचतान , काही मुद्दे अधोरेखित केलेत . Coronavirus: Is India prepared for an outbreak? https://www.bbc.com/news/world-asia-india-51747932 १. The quality of its public health system is vastly uneven. Existing hospitals can be easily overwhelmed by a sudden spike in admissions. It is not clear whether there are ample supplies of masks, gloves, gowns, drugs and ventilators. Virologist Jacob John says India will struggle to handle an outbreak. २. There are also concerns about the country's scanty healthcare data: India has a shoddy record in even recording deaths and disease - only 77% of deaths are registered, and doctors are more likely to get the cause of death wrong than right, according to a study the Toronto-based Centre for Global Research. There's patchy data for flu-related deaths. ३. That means many people who test negative at air and seaports may be carrying the infection into India's teeming cities and villages. "Airport entry screening is good and should be continued, but that's not going to be sufficient now. We have to put in place other surveillance mechanisms through systems India already has," Soumya Swaminathan, chief scientist at the WHO, says.

आज परत एक केस आली ज्यात ओमानला प्रवास होता. तिथे गरम वातावरण आहे. थायलंडची केस आहे. इथल्या गरम वातावरणात विषाणू टिकाव धरू शकतो तेव्हा आपण किती सुरक्षित आहोत

अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझर हा साबणासारखेच काम करतो. (खरं तर साबण जास्त चांगला आहे). कोणताही साबण चालतो. डेटॉल किँवा सॅवलॉन सध्या साबणापेक्षा जास्त परिणामकारक असतो असा कोणताही पुरावा आढळलेला नाही. बाहेरून घरी किंवा कार्यालयात आल्यावर आपण आपले हात आणि तोंड साबणाने स्वच्छ धुणे आणि खोकताना किंवा शिंकताना तोंडासमोर रुमाल किंवा टिशू पेपर धरणे या दोन साध्या गोष्टी आपण घरात आणि कार्यालयात लागू केल्या तर या साथीला आळा घालण्यात आपण बऱ्यापैकी यशस्वी होऊ.

advice-for-public/when-and-how-to-use-masks If you are healthy, you only need to wear a mask if you are taking care of a person with suspected 2019-nCoV infection. Wear a mask if you are coughing or sneezing. Masks are effective only when used in combination with frequent hand-cleaning with alcohol-based hand rub or soap and water. If you wear a mask, then you must know how to use it and dispose of it properly. Before putting on a mask, clean hands with alcohol-based hand rub or soap and water. Cover mouth and nose with mask and make sure there are no gaps between your face and the mask. Avoid touching the mask while using it; if you do, clean your hands with alcohol-based hand rub or soap and water. Replace the mask with a new one as soon as it is damp and do not re-use single-use masks. To remove the mask: remove it from behind (do not touch the front of mask); discard immediately in a closed bin; clean hands with alcohol-based hand rub or soap and water. https://www.who.int/emergencies/diseases/novel-coronavirus-2019/advice-f...

Should I wear a mask to protect myself? Only wear a mask if you are ill with COVID-19 symptoms (especially coughing) or looking after someone who may have COVID-19. Disposable face mask can only be used once. If you are not ill or looking after someone who is ill then you are wasting a mask. There is a world-wide shortage of masks, so WHO urges people to use masks wisely. https://www.who.int/news-room/q-a-detail/q-a-coronaviruses

साधा सर्जिकल मुखवटा तोंडाला लावण्याचा मुखवटा आपल्याला कोरोना विषाणूपासून संरक्षण देणार नाही. हे मुखवटे सर्जनच्या नाकातोंडातील जंतू(जिवाणू) शल्यक्रिया करताना रुग्णापर्यंत पोहोचू नयेत म्हणून असतात. हा मुखवटा ज्याला रोग झाला आहे त्याने वापरणे आवश्यक आहे कारण त्याच्या खोकण्या किंवा शिकण्यातून जे सूक्ष्म थेम्ब बाहेर टाकले जातात (ज्यातून या विषाणूचा प्रसार होतो) ते या मुखवट्यामुळे अडकून राहतील. आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येणारे N ९५ हे मुखवटे हे एक तर सूक्ष्म छिद्रांचे असतात याशिवाय ते आपल्या नाका तोंडाभोवती एकदम फिट बसतात. त्यामुळे त्याच्या बाजूने विषाणूंचा प्रादुर्भाव होत नाही. शिवाय हे आरोग्य कर्मचारी रुग्णांच्या अतिशय जवळ काम करत असतात जेंव्हा तो रुग्ण खोकला किंवा शिंकला तर हे विषाणू त्याला संसर्ग करू शकतात. परंतु N ९५हे मुखवटे वापरणे फार कटकटीचे आहे आणि त्यातून श्वास घेण्यास बऱ्यापैकी त्रास होतो. त्यामुळे ते केवळ आरोग्य कर्मचारी ज्यांना तो कसा वापरायचा हे प्रशिक्षण दिलेले आहे त्यांनी वापरावा असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. https://www.livescience.com/face-mask-new-coronavirus.html

अगदी वेळेत विश्वसनीय माणसाकडून आलेली माहिती. _/\_

Earlier in the outbreak, U.S. health officials said there was a hypothesis among mathematical modelers that the outbreak “could potentially be seasonal” and relent in warmer conditions. “We hope it does. That would be a godsend,” said WHO’s Dr. Mike Ryan. “But we can’t make that assumption. And there is no evidence.” Other viral respiratory diseases are seasonal, including influenza and therefore in many viral respiratory diseases we do see a decrease in disease in spring and summer,” Dr. Nancy Messonnier, director of the CDC’s National Center for Immunization and Respiratory Diseases, said on a Feb. 25 conference call. “And so we can certainly be optimistic that this disease will follow suit.” https://www.msn.com/en-us/health/health-news/its-a-false-hope-coronavir… Angela Rasmussen, a virologist who serves on the faculty at the Center for Infection and Immunity at Columbia University’s school of public health. https://www.rollingstone.com/politics/politics-news/containment-failed-c...

जगात अब्जावधी विषाणू आहेत त्याना जगण्यासाठी दुसऱ्या जीवाची गरज पडते. त्यामुळे ते वेगवेगळ्या प्राण्यांच्या किंवा वनस्पतींच्या पेशीमध्ये घुसून आपले पुनरुत्पादन करत असतात. याला विरोध म्हणून ते सजीवसुद्धा आपल्या शरीरात प्रतिजैविके (antibodies) आणि इंटर फेरोन्स तयार करत असतात ज्यामुळे शरीरात शिरलेल्या विषाणूंना निष्प्रभ करता येते. एकदा एका विष्णुविरुद्ध प्रतिजैविके तयार झाली की सहसा तो विषाणू परत त्या सजीवाच्या शरीरात घुसू शकत नाही. हा चोर पोलिसांचा खेळ सजीवांच्या आयुष्यभर चालूच असतो. दरवेळेस आपल्याला नव्या विषाणूमुळे रोग होतो. जर आपली प्रतिकार शक्ती कोणत्याही कारणामुळे कमी झाली तर ही प्रतिजैविक तयार करण्याची प्रक्रिया मंद होते. उदा केमोथेरपी, एड्स, वार्धक्य, मधुमेह हृदयविकार यामुळे या लोकांना होणारे विषाणूजन्य रोग जास्त तीव्र असतात. नैसर्गिक प्रक्रियेने विषाणूंच्या शरीरात उत्परिवर्तन(mutation) होते. हे उत्परीवर्तन मूळ विष्णुपासून वेगळे असेल तर पूर्वीच्या प्रतिजैविकांचा त्यावर परिणाम होत नाही आणि मग त्या सजीवाला त्या विषाणू मुळे रोग होतो. हे उत्परीवर्तन जर थोडेसेच असले तर तुला सजीवांमध्ये आंशिक(partial) प्रतिकारशक्ती असते त्यामुळे होणारा रोग हा तेवढा तीव्र नसतो. तसेच त्या गटातील दुसऱ्या विषाणूमुळे रोग झाला असेल तर काही प्रमाणात प्रतिकारशक्ती असते(cross immunity). ज्या माणसांचा पूर्वी कोरोना विषाणूशी संबंध आला असेल त्याच्या शरीरात अशी आंशिक प्रतिकारशक्ती तयार झालेली असू शकते त्यामुळे बहुसंख्य विषाणू तज्ज्ञांचे असे मत आहे की प्रत्येक माणसाला होणारा रोग हा तितकाच तीव्र नसतो. काही विषाणू तज्ज्ञांचे मत असे आहे की 40 ते 50 टक्के लोकांना हा रोग अत्यंत कमी प्रमाणात होईल ज्यामुळे आपल्याला covid 19 मुळे रोग झाला आहे हे समजणारच नाही. जसे एखादा गट धबधब्यात भिजतो त्यापैकी 2-4 लोकांनाच सर्दी होते बाकीच्यांना होत नाही. यामुळे त्या तज्ज्ञांचे मत असे आहे की जागतिक आरोग्य संघटना जो मृत्युदर सध्या सांगते आहे त्यापेक्षा तो बराच कमी असू शकतो. जे रूग्ण शरीरात थोडीशी कणकण आहे किंवा थोडासा खोकला किंवा सर्दी आहे आणि आपोआप बरे झाले आहेत त्यांची तपासणी होणारच नाही. ज्यांना रोग बरुयापैकी होतो तेवढ्यांचीच तपासणी होईल आणि त्यांचा मृत्युदर जास्त आढळेल.

In reply to by सुबोध खरे

अ‍ॅन्टी बॉडी व अ‍ॅन्टी बायोटिक वेगळे विषय आहेत ना ? माझ्या महितीप्रमाणे अ‍ॅन्टी बॉडी ला प्रतिपिंड हा शब्द वापरतात !

In reply to by सुबोध खरे

की 40 ते 50 टक्के लोकांना हा रोग अत्यंत कमी प्रमाणात होईल ज्यामुळे आपल्याला covid 19 मुळे रोग झाला आहे हे समजणारच नाही.काही विषाणू तज्ज्ञांचे मत असे आहे मागे स्वाईन फ्लू ची साथ आली असताना ती गेल्यावर उत्सुकता म्हणून आमच्या डॉ नी स्वत: ची टेस्ट करून घेतली होती तेम्व्हा त्याना असे आढलून आले की त्याना होस्पिटल बॉर्न स्वाईन फ्लू लक्शणाशिवाय होउन गेला होता.

In reply to by चौकटराजा

40 ते 50 टक्के लोकांना हा रोग अत्यंत कमी प्रमाणात होईल ज्यामुळे आपल्याला covid 19 मुळे रोग झाला आहे हे समजणारच नाही. हे ही एक कारण असावे हा रोग पसरण्यामागचे. या विषाणुंमध्ये दोन प्रकार आहेत व त्यातला एक प्रकार जास्त आक्रमक आहे अशी ही माहिती समोर आली आहे.

In reply to by सुबोध खरे

करोना चा आता पर्यंत कोणी healthy carrier सापडलाय का? काविळ च्या healthy carrier बद्दल वाचलेलं इथंच. तसा करोना चा पण निघाला तर अवघड आहे. कारण आजारी पडेल तो दवाखाना गाठणार, पण जो विषाणू घेऊन निरोगी फिरत असेल तो सगळ्यांना आजारी पाडणार

हँड सॅनिटायझर च्या किमती अफाट वाढवून काळा बाजार होत असल्यास आपण कोणतेही स्वस्त आफ्टर शेव्ह लोशन वापरू शकता. कोरोना विषाणूच्या बाहेर सूर्याच्या पृष्ठभागावर असतो तसा चरबीचा मुकुट असतो या मुळे त्याचे नाव कोरोना विषाणू असे ठेवले आहे. साबण (आणि पाणी) किंवा अल्कोहोल वापरल्यामुळे हा बाहेरचा चरबीचा मुकुट विरघळतो आणि विषाणू हतप्रभ होतो आणि धुतला जातो. यास्तव आपण जास्तीत जास्त वेळेस साबण आणि पाण्याने हात धुणे आवश्यक आहे. याच कारणासाठी साबण अंगाचा नसेल तर कपड्याचा अगदी निरमा किंवा पतंजलीचा भांडी धुवायचा साबण सुद्धा इमर्जन्सी मध्ये चालेल.

एक चांगली बातमी - ही उपाय-योजना COVID-१९ व्हायरसविरुद्ध आत्तापर्यंत तरी लागू पडताना दिसते आहे. https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7029759/#!po=0.490196 Dr. Kruse is developing an extremely promising therapeutic, ACE2-fc, which will both neutralize the virus and treat the symptoms of the disease. It has been shown to work in vitro; variants have been tested in animals models; and its been through Phase II human trials for a different indication. A variant of the therapy, soluble ACE2, is being trialed in humans now in China. या औषधाचे उत्पादन आणि चीनमध्ये काही रोग्यांवर trial सुरू आहे. ते रोगी जर बरे झाले तर या विषाणूविरुद्ध एक उपयोगी औषध सापडेल. आत्तापर्यंतचे निष्कर्ष चांगले आहेत. अधिक ताजी माहिती इथे - https://mobile.twitter.com/RobertLKruse दुसरी बातमी - बिल गेट्स फाउंडेशनने १२५ मिलियन डॉलर प्रभावी औषधाच्या संशोधनासाठी देण्याचे जाहीर केले आहे. https://www.gatesfoundation.org/TheOptimist/Articles/coronavirus-mark-s…

तुमचा हा लेख जवळ जवळ सर्व व्हाट्सएप ग्रुप वर येतो आहे.

In reply to by दिपस्तंभ

डॉक्टरांच्या नावाने ही माहिती मीही अनेकांना फॉरवर्ड केली आहे. -दिलीप बिरुटे

सोप्या भाषेत आणि भीती कमी करणारी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. अर्थातच बऱ्याच ग्रुप मध्ये फॉरवर्ड होतोय. अशी नेमकी माहिती लोकांपर्यंत पोचायला हवी.