✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

वो शाम...

प
प्राची अश्विनी यांनी
Mon, 03/02/2020 - 09:02  ·  लेख
लेख
1 तू म्हणालास, खुर्चीपेक्षा खालीच बसू आरामात.. मी आपली बसले, तुझ्याशी काटकोन करून कोप-यात! पण तो काटकोन सांभाळताना मन कित्ती आवरावं लागलं माहितीय तुला?? आणि म्हणे "आरामात बसू"! 2 पाणीचं होतं की अजून काही? अख्खा जग संपवला मी हावरटासारखा. तुला वाटलं असेल वाळवंटातून आलीये ही... पण एखाद्याच्या हातचं पाणी किती ते गोड लागावं?? शप्पथ! 3 तू दरवाजा बंद केलास आणि माऊ तुझ्या पायात.. इतकं अलगद उचलंलस तू तिला.. तिच्यावर नाक घासलंस, तिला गालापाशी नेलंस.. बरं झालं तुझे डोळे बंद होते तेव्हा.. नाहीतर दिसलंच असतं माझ्या डोळ्यात.. किती माऊ बनायचं होतं मला ते.. 4 स्कूटरवर बसल्यावर तुला कॉफी आठवली.. अन् मला अमृता..* कॉफी तर संपून गेली इकडंचतिकडंच बोलता बोलता... पण ते वीतभर अंतभर ठेवायच्या नादात, राहून गेल्या नं तुझ्या पाठीवरच्या रेघोट्या? 5 इतकं चांगलं कुणी असू नये इतकं देखणं कुणी हसू नये इतकं लाघवी कुणी बोलू नये इतकं जवळ कुणी बसू नये.. नाही बुवा झेपत आपल्याला मग शहाण्यासारखं वागणं.. 6बरं झालं बारावीनंतर गणित सुटलं.. नाहीतर त्या संध्याकाळच्या अशा infinite probabilities मध्ये मी नक्कीच हरवून गेले असते.. 7 किसी शहर की किसी गली के किसी कोने में खड़ी.. किसी इमारत के किसी दफ्तर के किसी कोने में गुजरी किसी इतवार की कोई शाम.... किसी मन के किसी कोने से गुजरने का नाम ही नहीं लेती.... (* अमृता प्रीतम स्कूटरवर साहीरच्या मागे बसून त्याच्या पाठीवर बोटांनी लिहित असे. तो reference आहे.)
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
मुक्तक
लेखनप्रकार (Writing Type)
प्रकटन

प्रतिक्रिया द्या
10019 वाचन

💬 प्रतिसाद (17)

प्रतिक्रिया

सुरेख

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 03/02/2020 - 09:36 नवीन
मस्त लिहिली आहे. प्राचीताईंचा कवितेगणिक बेंजामिन बटन होतो आहे..... बहुतेक... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

म्हंजे????

प्राची अश्विनी
Mon, 03/02/2020 - 09:50 नवीन
म्हंजे????
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

बेंजामिन भाईको नही जानती....???

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 03/02/2020 - 11:15 नवीन
तो पण असाच दिवसागणिक तरुण होत होता... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राची अश्विनी

गुगललं

प्राची अश्विनी
Mon, 03/02/2020 - 12:51 नवीन
गुगललं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

ओहो.......... जबरदस्त

श्वेता२४
Mon, 03/02/2020 - 10:02 नवीन
किती माऊ बनायचं होतं मला ते.. माऊ बनायला कुणाला आवडणार नाही? ;))....... हे खूपच छान.....
  • Log in or register to post comments

:)

प्राची अश्विनी
Mon, 03/02/2020 - 12:51 नवीन
:)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्वेता२४

इतकं चांगलं कुणी असू नये

चौथा कोनाडा
Mon, 03/02/2020 - 13:05 नवीन
इतकं चांगलं कुणी असू नये इतकं देखणं कुणी हसू नये इतकं लाघवी कुणी बोलू नये इतकं जवळ कुणी बसू नये.. नाही बुवा झेपत आपल्याला मग शहाण्यासारखं वागणं.. वाह, क्या बात है, किती लोभस आवाका ! सर्वच कविता सुंदर आहेत !
  • Log in or register to post comments

क्या बात..! खूपच सुरेख

प्रचेतस
Mon, 03/02/2020 - 18:07 नवीन
क्या बात..! खूपच सुरेख
  • Log in or register to post comments

सुरेख.. खूप आवडली.

शलभ
Mon, 03/02/2020 - 19:19 नवीन
सुरेख.. खूप आवडली.
  • Log in or register to post comments

छान!

राघव
Mon, 03/02/2020 - 20:29 नवीन
आवडली.
  • Log in or register to post comments

मस्त

निओ
Mon, 03/02/2020 - 23:24 नवीन
खूप छान
  • Log in or register to post comments

वा.. बहोत खूब!

तुषार काळभोर
Tue, 03/03/2020 - 05:58 नवीन
किती तरल.. किती साधं..
  • Log in or register to post comments

सर्वांंना मनापासून धन्यवाद.__

प्राची अश्विनी
Tue, 03/03/2020 - 09:04 नवीन
सर्वांंना मनापासून धन्यवाद.__/\__
  • Log in or register to post comments

फार सुंदर! आवडलीच! :)

पलाश
Wed, 03/04/2020 - 08:09 नवीन
फार सुंदर! आवडलीच! :)
  • Log in or register to post comments

;)

प्राची अश्विनी
Mon, 03/09/2020 - 17:31 नवीन
धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पलाश

क्या बात है.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 03/08/2020 - 13:22 नवीन
आवडली कविता. तुम्ही तुमच्या निवडक कवितांचं पुस्तक करा. शुभेच्छा आहेतच. लिखते रहो. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

:)

प्राची अश्विनी
Mon, 03/09/2020 - 17:31 नवीन
:) तुम्ही असं म्हटलंत यात सगळं आलं!_/\_
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा