सिन्गापूर, थाईलन्ड ला फिरण्यासाठी माहिती हवी आहे

रामदास२९'s picture
रामदास२९ in काथ्याकूट
19 Feb 2020 - 5:45 pm
गाभा: 

मला सिन्गापूर, थाईलन्ड ला एकट्याने/कुटुम्बासकट फिरण्यासाठी माहिती हवी आहे. काय काय तयारी करावी लागेल. क्रुपया तज्ञान्नी माहिती द्यावी

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

19 Feb 2020 - 7:24 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

ह्या विषयातील तज्ञ म्हणजे केसरी टूर्स आणी वीणा वर्ल्डच रे रामदासा.

https://www.kesari.in/Tailor-Made/ASIA/THAILAND

https://www.veenaworld.com/world/thailand-tour-packages/c

चौथा कोनाडा's picture

20 Feb 2020 - 1:04 pm | चौथा कोनाडा

माईसाहेब, हे नुसते रामदासा नाहीत तर रामदास२९ आहेत !

टवाळ कार्टा's picture

19 Feb 2020 - 8:00 pm | टवाळ कार्टा
चौकस२१२'s picture

20 Feb 2020 - 6:19 am | चौकस२१२

आपण जर खालील माहिती दिलीत तर सल्ला देणार्याला पण सोप्पं जाईल
- किती दिवस
- खर्च तयारी ( स्वस्तात मस्त कि भारी? )
- तरुण वृनद्ध
- नेहमीचेच कि विशेष पाहणे फिरणे आहे? ( म्हणजे खादाडी, जंगल भ्रमंती , मनुष्यनिर्मित)
- याआधी काय पहिले आहे
हि दोन्ही ठिकाणी म्हणजे सर्वश्रुत आहेत त्यामुळे विशेषश काही कारण नसेल आणि अनवट काही नसेल तर सरळ केसरी वीण इत्यादींची यात्रा काय करते ते पहा , आणि एक तर त्यांचं बरोबर जा किंवा स्वतःची तशीच किंवा फेरबदल करून आखा

रामदास२९'s picture

20 Feb 2020 - 11:19 am | रामदास२९

आपण जर खालील माहिती दिलीत तर सल्ला देणार्याला पण सोप्पं जाईल - नक्की, खर आहे तुमचा
- किती दिवस - १ आठवडा
- खर्च तयारी ( स्वस्तात मस्त कि भारी? ) स्वस्तात मस्त
- तरुण वृनद्ध - दोन्ही
- नेहमीचेच कि विशेष पाहणे फिरणे आहे? ( म्हणजे खादाडी, जंगल भ्रमंती , मनुष्यनिर्मित) - असा काही नाही
- याआधी काय पहिले आहे - नाही
हि दोन्ही ठिकाणी म्हणजे सर्वश्रुत आहेत त्यामुळे विशेषश काही कारण नसेल आणि अनवट काही नसेल तर सरळ केसरी वीण इत्यादींची यात्रा काय करते ते पहा , आणि एक तर त्यांचं बरोबर जा किंवा स्वतःची तशीच किंवा फेरबदल करून आखा - बर

खिलजि's picture

20 Feb 2020 - 1:04 pm | खिलजि

सिंगापूर तसे फार छोटे आहे .. एका साईडला टेम्पनी ( राहणाऱ्यांसाठी ) आणि दुसऱ्या बाजूला इंडस्ट्रियल एरिया .. मध्ये एका बाजूला सेंटोसा आयलंड आहे .. बघण्यासाठी आणि करमणुकीसाठी उत्कृष्ट .. नक्की जाऊन या तिथे .. खरेदी करायची असेल तर तिकडून गरम मसाले थोडे विकत घ्या आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू .. इथून त्यांची किंमत काढूनच तिकडे जा .. म्हणजे भाव करायला सोप्पे जाते .. आणि तिकडे भाव होतो बरं का .. इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी स्लिमलिंग स्क्वेअर म्हणून एक इमारत आहे .. प्रसिध्ध है .. खाण्यापिण्याची आबाळ होऊ शकते जर स्वतःहून गेलात तर .. अगदीच पांचट चव आहे .. मी तीनवेळा जाऊन आलो है .. ब्येस्ट पर्याय खाण्यासाठी .. मॅक डी असू शकतो ... पैसेही वाचतील आणि पोटही भरेल .. पिण्याच्या पाण्यासाठी पंचाईत होऊ नये म्हणून शक्य झाल्यास नारळ पाणी प्या .. पोटही भरेल आणि पाणीही भरपूर . तिथले एक नारळ , म्हणजे आपल्याइकडचे किमान तीन ते चार तरी .. हे झालं सिंगापूर ..

थायलंड मध्ये शक्यतो एकट्याने फिरू नका .. टूर्सने गेला तर उत्तम

तिथे बघण्यासारखं १) नॉनगनूच व्हिलेज :: रंगबिरंगी फुलांची झाड .. हरवून जाल तिथे .. नक्की जाऊन या ..
२) डॉल्फिन शो बघायला विसरु नका .. अवश्य पहा ..
३) विस्तीर्ण आणि सुंदर अश्या भगवान बुद्धांच्या मुर्त्या बघायला मिळतील ..
४) काही ठिकाणी लेट नाईट शो असतात ते अवश्य बघावे .. सुंदर आहेत .. तिथली प्राणिसंग्रहालये बघण्यासारखी आहेत .. येणाऱ्या नागरिकांकडून देशाला परकीय चलन कसे मिळवून देता येईल याचे उत्तम उदाहरण म्हणजे थायलंड असे मी म्हणेन .. पर्यटन क्रांतीचे उत्कृष्ट उदाहरण
५ ) तिथे मसाज उतृष्ट आणि माफक दारात केला जातो .. तो करा आणि नंतर बघा , कसे हलके हलके वाटू लागेल ते ..

चौथा कोनाडा's picture

20 Feb 2020 - 1:15 pm | चौथा कोनाडा

या धाग्यावर थोडीफार माहिती मिळेल :

ट्रॅव्हलॉग : मनमोहक थायलंड

IndianTravelStore's picture

23 Apr 2021 - 5:16 pm | IndianTravelStore