मिसेस मुख्यमन्त्रि

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in काथ्याकूट
14 Feb 2020 - 12:32 pm
गाभा: 

v

नागपूर च्या RTO कार्यालयात एक महिला चालत आली..तिच्या वाहनचालक परवान्याची मुदत संपत आली होती व त्याचे नुतनी करण करायचे होते...
त्या महिलेने अर्ज घेतला तो व्यवस्थित स्वहस्ते भरला कागदपत्रे घेउन ती अनुज्ञाप्ती मिळवण्याच्या रांगेत उभी राहीली..हळुहळू क्रमांक पुढे सरकत होते..त्या महिलेची कागदपत्रे घेतली गेली..तिने पैसे भरले.अनुज्ञाप्राप्ती साठी फोटोही काढून घेतला..सर्व प्रक्रिया आटोपून ती महीला RTO बाहेर पडणार तोच क्लार्क ने कागदपत्र वाचली नाव अमृता देवेंद्र फडणवीस ..

तो उडालाच..म्हणजे महाराष्ट्र च्या मुख्यमंत्र्याच्या पत्नी रांगेत उभी होती इतका वेळ..मग पळापळ सुरु झाली मु RTO .ARTO कार्यालय नव्हते ..तिसऱ्या क्रमांकाचे अधीकारी पारकींग पर्यत पळतआले नमस्कार चमत्कार झाले सौ.मुख्यमंत्रीना विनंती केली की त्यांनी कार्यालयात यावे.त्याच्या परवाण्याचे त्वरीत नुतनी करण करुन देण्यात येईल ..

सौ.मुख्यमंत्रीयांनी गोड शब्दांत नकार दिला.मी अर्ज भरलाआहे पैसेही भरले आहे आणि माझा फोटो ही काढला आहे.आता तुमच्या नियमानुसार मला स्पिड पोस्टने परवाना पाठवा..गाडी सुरुकरुन बाय म्हणत त्या निघुनदेखील गेल्या ..एव्हाना अधीकार्- याचे कपाळ घामाने थबथबले होते..मुख्यमंत्र्यांची पत्नी अन रांगेत RTO कार्यालयात उभी राहाते यावर विश्वास बसत नव्हता

प्रतिक्रिया

"गाडी सुरुकरुन बाय म्हणत त्या निघुनदेखील गेल्या.."

म्हणजे परवाना नसतांना गाडी चालवलीच ना?

नरेश_'s picture

14 Feb 2020 - 2:30 pm | नरेश_

गंडलो लोक्स.

चौकस२१२'s picture

14 Feb 2020 - 3:16 pm | चौकस२१२

वाहनचालक परवान्याची मुदत "संपत आली होती" .. संपली नवती

ज्योति अळवणी's picture

24 Feb 2020 - 9:07 am | ज्योति अळवणी

परवान्याची मुदत संपत आली होती हो

संपली नव्हती

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

14 Feb 2020 - 4:28 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

".मग पळापळ सुरु झाली.. एव्हाना अधीकार्- याचे कपाळ घामाने थबथबले होते"
का बरे? असा काय गुन्हा केला होता त्या अधिकार्याने? सलाम ठोकायला हवा होता?
संरजामी थाटाची ती कॉन्ग्रेसी संस्कृती भाजपाच्या अनेक नेत्यानी संपवली ह्याबद्दल त्यांचे कौतुक करायला हवे रे अवि.

सतिश पाटील's picture

15 Feb 2020 - 11:18 am | सतिश पाटील

कमाल आहे, म्युसिक अल्बम काढणे, अतिशय खालच्या भाषेत टिवटिवाट करणे, जाता जाता बंगल्याच्या भिंती रंगवणे, आणि आता RTO मध्ये हजेरी...
मुलांची काळजी घेणे, नवऱ्याला राजकारणात मदत करणे, घर सांभाळणे .....
वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य किती छान मॅनेज करतात.

या बाई ब्यांकेत काम तरी कधी करतात...असा प्रश्न पडतो आम्हा भाबड्यांना ...

जाता जाता - कालच यांचे एक इंग्रजी गाणे युट्युबवर प्रदर्शित झाले पाहीले का कुणी?
अजून एक - आता त्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सौ. आहेत. लेखात तेवढी सुधारणा करा.

दुर्गविहारी's picture

16 Feb 2020 - 1:40 pm | दुर्गविहारी

भक्तगण केव्हा चालून येतात याची वाट बघतोय. अजून या धाग्याचा वास लागलेला दिसत नाही. :-)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

16 Feb 2020 - 2:02 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

दिल्लिकरानी 'झाडू'ने दिल्ली स्वच्छ केली व 'दहशतवादी' केजरीवाल मुख्यमंत्री झाले. त्या धक्क्यातुन सावरायला थोडा वेळ लागेल.

अनिरुद्ध.वैद्य's picture

17 Feb 2020 - 8:34 pm | अनिरुद्ध.वैद्य

ऑर्डरी सोडतात ओ!! ते काय कारकून काशीयर थोडीच हाय कामं कराया?

ज्योति अळवणी's picture

24 Feb 2020 - 9:09 am | ज्योति अळवणी

कमाल तर तुमची आहे. त्या ट्विट्स ना फक्त उत्तर देतात. Original ट्विट तर बघत जा राव

आणि भिंती रंगवलेल्या तुम्ही बघितल्यात का?

एखाद्याने किती खालची पातळी गाठावी दुसरं काही कारण न मिळाल्याने बदनामी करायचं ते दिसत यातून

धर्मराजमुटके's picture

15 Feb 2020 - 11:22 am | धर्मराजमुटके

सरकारी अधिकार्‍यांचं असचं असतं ! डोळे उघडे ठेऊन पाच वर्ष बातम्या नीट वाचल्या असत्या तर अमृताचा दिनू केव्हाच उजाडला असता पण नाही.
"कॉमन सेन्स इज नॉट आल्वेज कॉमन" म्हणतात ते उगाच नाही. असो.

महासंग्राम's picture

15 Feb 2020 - 11:45 am | महासंग्राम

अवघडे सगळं कायप्पा फॉरवर्ड पोष्टि म्हणून यायला लागल्या आहेत आता

पाषाणभेद's picture

15 Feb 2020 - 4:09 pm | पाषाणभेद

आरटीओ कार्यालयावर आपला भलता राग आहे. या लोकांनी जर व्यवस्थीत काम केले तर शेकडा ३०% तरी अपघात कमी होतील हे नक्की.

आणि मुख्य म्हणजे हे आरटीओ अधिकारी जन्मताच अधिकारी झाले होते काय की त्यांना लहाणपणापासून एकदाही अपघात झाला नाही की दुसर्‍या ड्रायव्हरने त्रास दिला नाही की प्रखर अप्पर लाईटने रात्री डोळे दिपले नाहीत? बहूदा ८०% अधिकारी खेड्यातून आलेले आहेत. तरीदेखील एकाचीही नागरीकांचे उद्बोधन करण्याची इच्छा नाही.
अन मलई तर किती खात असतील याचा थांगपत्ता नाही. ( उगाचच अपवाद असतात हे वाक्य लिहीत नाही)

सतिश पाटील's picture

15 Feb 2020 - 5:47 pm | सतिश पाटील

मलाई इतकी मिळत असेल आणि ती मोजण्यात आणि मॅनेज करण्यात बराच वेळ जात असल्याने मग असल्या शुल्लक गोष्टींकडे ते दुर्लक्ष्य करीत असतील.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2020 - 12:08 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

काका, आर्टीयो वगैरे ते जाऊ द्या, जोडी मस्तय त्यांची.
संसार सुखाचा चालू दे रे देवा असा आशिर्वाद द्या त्यांना.

-दिलीप बिरुटे

अमरेंद्र बाहुबली's picture

16 Feb 2020 - 10:46 pm | अमरेंद्र बाहुबली

काय अपेक्षित आहे?? अधिकाऱ्याने काय करणं अपेक्षित होतं?? रेड कार्पेट अंथरून बाजूला उभे राहून वाकून मुजरा करायला हवा होता का?? मुख्यमंत्री (माजी कि आजी टेबही लेखकाला माहीत नाही अजून) हा जनतेचा सेवक. मग काय अपेक्षा होती नेमकी?

नरेश माने's picture

17 Feb 2020 - 12:12 pm | नरेश माने

मला वाटलं त्या शिरेलीवर काही-बाही लेख असेल आणि लेखक नावाला जागून चुंबनांचा वर्षाव-बिर्षाव घडवेल.