असे दिसते की काही धागे सर्वांना बघायची मुभा नसते. मुख्यपानावरून धाग्यावर टीचकी मारली की कळते हा धागा बघायची आपल्याला मुभा नाही... मिपा सारख्या लोकाभिमुख संकेतस्थळावर हा प्रकार बरोबर वाटत नाही. कुठलाही लेख, काव्य, कौल हे वाचायला सर्वांना मुभा हवी.
काही लेख लिहीलेला आहे आणि आपल्याला तो बघायची परवानगी नाही, हे पाहून काही निवडक लोकांची कंपूबाजी चालू आहे ही भावना दृढ होते.
-
अफाट जगातील एक अडाणि.
>>ती संपादकांची कंपूबाजी असते . असे लेख संपादकांद्वारे अप्रकाशित करण्यात आलेले असतात.
=)) =)) =))
खल्लास ऽऽऽ , जहबहर्या हो भटोबा ...!!!
अडाणीसाहेब, त्याचे असे आहे काही काही वेळा धाग्यात काहितरी "सणसणीत, जळजळीत आणि आक्षेपार्ह्य" गोष्टी लिहलेल्या असतात की ज्या एकतर मिपाच्या धोरणात बसत नाहीत अथवा त्यामुळे एखाद्या समुदायाची ( कंपुची नव्हे ;) ) भावना दुखावली जाते अथवा तो वैयक्तीक मजकुर असतो अथवा कुणाला तरी हाणायचेच म्हणुन आणि भांडणे पेटवावीत म्हणुन लिहलेले लिखाण असते ...
मग अनावश्यक वाद टाळुन मिपाच्या धोरणाचे पालन करत मिपावरील शांतता कायम ठेवण्यासाठी "संपादक" लोक हे धागे "अप्रकाशित" करतात ...
त्यात ते ठराविक लोकांनाच वाचता येतात असे काही नाही ...
इथे "प्रायव्हेट" नावाची गोष्ट अस्तित्वात नाही तेव्हा गैरसमज नसावा ...
पण त्या धाग्याची लिंक मात्र "मुखपॄष्ठावर" काही कारणाने रहात आहे, नीलकांत बघ रे बाबा लोक काय म्हणतात ते ;)
अवांतर :
१. मी संपादक नाही अथवा संपादकांच्या कंपुत ( असल्यास ! ) नाही ...
२. भटोबा बहुदा आमच्या कंपुत असावेत असा अंदाज आहे.
३. आमचा कसलाही आणि कोणताही कंपु नाही ;)
------
( संपादकांच्या (नसलेल्या) कंपुतला) छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
आम्ही सुध्दा आहोत
फक्त एक सुचना जर तो धागा अप्रकाशित झाला असेल तर त्याची सर्व ठिकाणा वरुन हकालपट्टी व्हावी तो कोठुन ही
नजरेस पडु नये
**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??
५० पेक्षा जास्त प्रतिसाद झाल्यावर दुसर्या पानावर जातात. तेव्हा पुढील पानांवर जायची लिंक प्रतिसादांच्या वरही असली तर उत्तम अशी सूचना व्य. नि. ने केली होती. येथे परत करीत आहे.
खराटा
(रंग माझा वेगळा)
आपली व्यक्तिगत ओळख असली (अगदी एका ग्लासातले असलात तरी), तरी ती इथे प्रतिक्रिया लिहिताना दाखवू नये. अशी अतिसलगीयुक्त भाषा वापरल्यामुळेच कित्येकांना कंपूबाजीचा संशय येतो.
अहो हेरंबकाका, कॉलेजच्या कट्ट्यावर अशीच सलगी होणार, गप्पा होणार आणि ते लपवता येणार नाही. सलगी आणि कंपूबाजी यांच्यात प्रचंड फरक आहे; आणि कोणालातरी तो समजत नाही म्हणून लोकांनी आपली सलगी बासनात गुंडाळून ठेवावी हे कसं जमणार?
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
(मी हि एका सन्स्थळाचा सन्चालक आहे, म्हणुन अनुभवावरुन)(It is an international forum( www.edulix.com ) for prospective grad students-feel free to remove link if any objections)
1. I am guessing, the activation system is manual? For my account took 4 days to get activated. Looking at a future, with a huge no. of registered users we can go for automatic registration. (It will save lot of time of our admins and won't frustrate people who are registering.
2. We should put some "contact us" link for non registered users. I wanted to contact but couldn't. (Thanks to MuktaSunit I could forward my message to admins. )
3. I feel we should disable 'comment on comments' tab, and introduce, popularize quote feature. It is very difficult to track who has replied where.
Regards,
Nile.
ए फॉर ऍपल हा शब्द आपण मराठीत अ वर चंद्र काढून लिहितो. तसा लिहिता येत नाही. कदाचित ड्रूपलचा किंवा युनिकोडचा प्रॉब्लेम असेल. पण ते जरा विचित्र दिसते. तसेच जोडाक्षरातले दुसरे अक्षर ल असेल तर ते जोडाक्षर एकावर एक असे जुन्या मराठी पद्धतीने उमटते. काही करता येईल का?
(शुद्धलेखनाला फाट्यावर न मारणारा) खराटा
प्रतिक्रिया
वाचकराव, मि
अजून एक सुचना
कंपूबाजी
हा हा हा ...
खल्लास ऽऽऽ
+२
+३
+४
मौलीक माहिती बद्दल धन्यवाद..
संपादकांच्या कंपूला
पुढील पान
ओळख
अहो
पन्नास
माझे दोन आणे!(२ सेन्ट्स)
नीलराव, आपल
ऍपल
मायबोलीवर