शेगाव दर्शन व माहूर यात्रा भाग १

AKSHAY NAIK's picture
AKSHAY NAIK in भटकंती
8 Feb 2020 - 1:58 pm

नमस्कार मिपाकर मंडळी
नुकतेच खूप वर्षांनी शेगावला जाण्याचा अचानक योग आला तो अनुभव आपल्यासोबत share करीत आहे. प्रवास वर्णनाचा पहिलाच प्रयत्न असल्यामुळे जाणकार मिपाकरांनी चूकभूल दुरुस्त करावी.
३१/०१ /२०२० रोजी लातूर हून पहाटे ६ वाजता औरंगाबाद ला एका लग्नसमारंभात उपस्थित राहण्यासाठी निघालो. लातूर ते औरंगाबाद रस्ता ठीकठाक असल्यामुळे प्रवासाचा काही विशेष थकवा जाणवला नाही. ११ वाजण्याच्या दरम्यान औरंगाबाद ला पोहचलो. औरंगाबाद ला गारखेडा परिसरातून गाडी जात असताना रस्त्यात संत गजानन महाराज मंदिर लागले, लग्नाची वेळ दुपारी एक वाजता ची असल्यामुळे दर्शन घेवून पुढे मार्गस्थ व्हावे असा विचार करून गाडी मंदिरा बाहेर पार्क केली आणि मंदिरात शिरलो. मंदिरात दर्शन घेवून बाहेर आलो आणि गाडीत वडिलांसोबत चर्चा सुरु झाली, बोलता बोलता शेगाव ला जाऊन खूप वर्षे झाली केव्हा योग येणार काय माहित हे वडिल सहज बोलून गेले, मग काय मनोमन विचार करून उद्या शेगाव गाठून वडिलाना surprise द्यायचा विचार केला, लग्न समारंभ आटपून रात्री औरंगाबाद मधील आमच्या काकांकडे रात्री मुक्कामास गेलो रात्री गप्पा टप्पा मारत झोपी गेलो.

दिवस ०१/०२/२०२० शेगाव कडे मार्गक्रमण

सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास गाडी पुसण्याच्या बहाण्याने घराबाहेर आलो आणी गुगल वाल्या बाई ला शेगाव कडे जाणाऱ्या रस्त्याची विचारणा केली. आणि प्लानिंग केले. सर्व सामानाची आवराआवर करून सकाळी ७.३० च्या सुमारास गाडी मार्गस्थ झाली. गाडी लातूर च्या दिशेने न जाता जालन्याच्या दिशेने जात आहे हे पाहून घरच्यांनी विचारणा केली. त्यात गंमत अशी की जालना माझी सासुरवाडी, त्यामुळे जालन्याला खास सासुरवाडीत भेटायला जात आहोत हे बायकोला सांगितल्यामुळे ती जाम खुश झाली, सासुरवाडीत पोहचून त्यांचा पाहुणचार घेवून जालना सोडायला दुपारचे साडेबारा वाजले. त्यात अंधार पडायच्या आत लातूर ला पोहचले पाहिजे असा तगादा वडिलांनी लावून धरला त्यामुळे साडेबारा वाजता जालना सोडले. जालना सोडले तरी सुद्धा लातूर च्या दिशेने आपली गाडी जात नाहीये हे वडिलांच्या लक्षात आले. त्यामुळे आता त्यांना खरे सांगावे लागले. आपण शेगाव ला जात आहोत हे ऐकून वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता, त्यांचा तो उत्साह पाहून मी देखील भारावून गेलो होतो. जालना ते शेगाव अंतर साधारण २०० किमी., रस्त्याने थांबत मध्येच कधी उसाचा रस घेत तर कधी लहान मुलीकरिता कुरकुरे, बिस्कीट घेत तर सायंकाळी चहा घेत प्रवासाचा आनंद घेत सायंकाळी सात च्या सुमारास शेगावी पोहचलो. मंदिराजवळील भक्त निवासामध्ये रूम साठी चौकशी केली मात्र तेथे waiting होती, त्यामुळे मंदिरापासून साधारण २ किमी अंतरावरील संस्थानच्या आनंद विहार भक्त निवास मध्ये रात्री मुक्क्मासाठी रूम मिळविली.
दिवसभर प्रवास केल्यामुळे थोडा थकवा जाणवत होता, त्यात रात्रीचे साधारण ८ वाजत आले होते, आनंद विहार परिसरात असलेल्या भोजनालयात जेवणाचा आस्वाद घेतला आणि रूम मध्ये येवून निद्रादेवीच्या आधीन झालो.

क्रमशः

प्रतिक्रिया

कंजूस's picture

8 Feb 2020 - 8:43 pm | कंजूस

बरंच ड्राईविंग झालं की!
पुढे काय उत्सुकता लाढली.

AKSHAY NAIK's picture

8 Feb 2020 - 8:57 pm | AKSHAY NAIK

धन्यवाद !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 Feb 2020 - 7:40 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रवास वाचतोय. फोटो टाका.
पुढील लेखनासाठी शुभेच्छा...!

-दिलीप बिरुटे

AKSHAY NAIK's picture

9 Feb 2020 - 11:16 am | AKSHAY NAIK

नक्की, धन्यवाद !

पाषाणभेद's picture

11 Feb 2020 - 2:51 pm | पाषाणभेद

तेच म्हणतो.

Nitin Palkar's picture

12 Feb 2020 - 6:42 pm | Nitin Palkar

सुंदर वर्णन करताय. पुढल्या भागाची वाट पाहतो...