आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी उत्पादने (प्रॉडक्टस्) वापरतो परंतु सगळी उत्पादने सगळेच वापरतात असे नाही म्हणजे जी उत्पादने तुम्ही सध्या वापरत नाही परंतु वापरायची इच्छा आहे अशा लोकांनां ती उत्पादने वापरणाऱ्या लोकांच्या अनुभवाचा फायदा व्हावा ह्या हेतूने ह्या धाग्याचे प्रयोजन. तुम्ही तुम्हाला हव्या त्या उत्पादनाबद्दल येथे लिहा किंवा त्या उत्पादनाची इतरांनी केलेली समीक्षा वाचा आणि तुमच्या शंकांचे समाधान करून, अधिक माहिती मिळवून ठरवा ते उत्पादन विकत घ्याचे कि नाही ते.
सध्याच्या आधुनिक जगात समाजातील मोठ्या वर्गाला झोपे संबंधीच्या समस्येने, निद्रानाशाच्या तक्रारीने ग्रासले आहे. त्याची कारणे विविध आहेत आणि बहुधा ह्या तक्रारींचे मूळ आधुनिक जीवनशैली मध्ये आहे. परंतु आजच्या धाग्याचा विषय तो नाही. निद्रानाशावर उपाय शोधण्या साठी अंजात्खनन करताना वेटेड ब्लँकेट नावाच्या प्रॉडक्टची ओळख झाली. काय आहे हे वेटेड म्हणजेच वजनदार ब्लँकेट? ते आधी बघूया.
ब्लँकेट मध्ये आकाराने छोट्या गोळ्या, चकत्या (डिस्क्स) किंवा मण्यांसदृश वजनदार वस्तू (ऑब्जेक्टस) भरतात. ह्या वस्तू सहसा पॉलीप्रोपेलिन किंवा काचेच्या असतात आणि ब्लँकेट मध्ये सगळीकडे सारख्याप्रमाणात भरून शिवलेल्या असतात. त्यामुळे ह्या वस्तू ब्लँकेट मध्ये एकाच ठिकाणी गोळा होत नाहीत आणि ब्लँकेटचे वजन सर्वत्र सारख्या प्रमाणात विभागले जाऊन झोपताना अंगावर घेतल्यावर सर्व अंगावर सगळीकडे सारखा परंतु हळुवार दाब पडतो. ह्या ब्लँकेटचे बाह्यावरण हे खादीचे व तलम कापडाचे असते जेणेकरून त्याचा स्पर्श सुखद होईल. ब्लँकेटचे वजन ५ ते १५ किलो असते. तुम्ही तुमच्या वजनाच्या साधारणतः १०% वजनाचे ब्लँकेट घ्यायचे असते. आणि त्याच बरोबर प्रत्येकासाठी वेगवेगळे घ्यावे म्हणजे ते झोपलेल्याच्या सर्वांगाला स्पर्श करून सगळीकडे समान आणि सुखद दाब देऊन जास्त परिणामकारक ठरते.
ज्या लोकांची झोप खूपच सावध असते व त्यामुळे ज्यांना रात्री वारंवार जाग येते त्यांना ह्या वजनदार ब्लँकेटचा खूप फायदा होतो. सर्वांगावरील हळुवार व सुखद दाबाने cortisol हे तणाव निर्माण करणारे मुख्य संप्रेरक कमी होऊन serotonin हे आनंद आणि स्वास्थ्यपूर्ण अनुभूती देणारे संप्रेरक तयार होते त्यामुळे सुरक्षतेची भावना निर्माण होऊन शांत आणि आरामदायी झोप येते व सकाळी झोपेतून उठल्यावर ताजेतवाने वाटते.
निद्रानाश, लवकर झोप न येणे, अपुरी झोप येणे, मधेच जाग येऊन परत झोप न येणे, चिंता, अनावश्यक काळजी, नैराश्य इत्यादी विकारांवर वजनदार ब्लँकेट मुळे मात करता येते आणि सर्वसाधारणपणे चांगला फायदा होतो.
हे वजनदार ब्लँकेट कोणी वापरले आहे का? याचा खरंच फायदा होतो का? भारतासारख्या उष्ण देशात ह्या ब्लँकेट मुळे जास्तच गरम होईल का? ब्लँकेटची किंमत बरीच जास्त असल्याने विकत घ्यायच्या आधी हे जाणून घ्यायची इच्छा आहे.
कृपया ह्या ब्लँकेटचा रिव्ह्यू लिहावा जेणे करून सर्वांनां फायदा होईल.
वाचने
11049
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाम महाग आहे हो.. ३०००-४०००?
आम्ही जन्मापासून सोलापुरी
INR ५०,००० ला एक वजनदार ब्लॅंकेट त्याच्या खोळीसकट
In reply to आम्ही जन्मापासून सोलापुरी by चौथा कोनाडा
अशाने धंदा बुडेल प्रथम
In reply to INR ५०,००० ला एक वजनदार ब्लॅंकेट त्याच्या खोळीसकट by चामुंडराय
हा ..... हा ...... हा ....... !
In reply to अशाने धंदा बुडेल प्रथम by गवि
दिवस असे येणार आहेत की
In reply to हा ..... हा ...... हा ....... ! by चौथा कोनाडा
अगदी खरं आहे गगनविहारी सर...
In reply to दिवस असे येणार आहेत की by गवि
अगदी अगदी
In reply to अगदी खरं आहे गगनविहारी सर... by चामुंडराय
https://www.indiatoday.in
In reply to अगदी अगदी by गवि
जुनी संस्क्रृती नवी पद्धती
ओळख आवडली.
ऊचलायचे कसे ?
वापरून पाहायला हवे. धन्यवाद
आपल्याला सापडलेली आयडीयेची कल्पना.....
"पैसे वसूल" असे उपकरण
महाराजा पॅन
In reply to "पैसे वसूल" असे उपकरण by चौकस२१२
फोटो / लिंक मिळू शकेल का ?
In reply to महाराजा पॅन by चौकटराजा
चागली माहीती