नमस्कार मिपाकरांनो,
माझे वडील ऑक्टोबर महिन्यात सरकारी सेवेतून सेवानिवृत्त झालेत. त्या संदर्भात मला काही प्रश्न आहेत. आशा करतो की मिपाकरांचे मार्गदर्शन उपयोगी पडेल.
आत्ता तरी त्यांना कुठलाच मोठा आजार नाहीए, वयोमानाप्रमाणे होणारे छोटे मोठे आजार झालेले आहेत. काही कारणामुळे ते गाडी चालू शकत नाहीत. तरी पार्श्वभूमी लक्षात घेऊन मदत व्हावी.
१) गुंतवणूक :
जी काही रक्कम आली असेल त्याची विभागणी कशी करावी? आणि कशा प्रकारे गुंतवणूक करावी? उदाहरणासाठी म्हणून मी एक लाख रुपये मिळाले असं गृहीत धरतो. मला असं वाटतंय की त्यापैकी 70000 हे पोस्ट वा बँकेत फिक्स डिपॉझिट म्हणून ठेवावेत. 20000 हे मध्यम धोका असलेल्या गुंतवणूक पर्यायात गुंतवावेत. व 10000 जास्त धोका असलेल्या पण जास्त रिटर्न्स मिळू शकत असलेल्या गुंतवणूक पर्यायात गुंतवावेत. हा 70 20 10 फॉर्मुला तुम्हाला योग्य वाटतो का ? 20% मध्ये नेमके कोणते पर्याय येतील ? 10% नेमकी कुठे गुंतवावेत. त्यांना दरमहा जवळपास तीस हजार रुपये पेन्शनच्या रूपात मिळतील त्यामुळे दैनंदिन खर्च चालवण्यासाठी गुंतवणूक नाही केली तरी चालेल. पुण्यात नसलं तरी परभणी हिंगोली सारख्या छोट्या गावात घर आहेत. त्यामुळे रहाण्याचा खर्च नाही. त्यांची राहणी पण अतिशय साधी आहे. म्हणजे तो पण खर्च खुप कमी आहे.
२) वेळेचा सदुपयोग :
यानंतरचा मोठा प्रश्न येतो तो म्हणजे वेळेचा उपयोग कसा करावा ?
पुण्यामध्ये अशा काही संस्था आहेत का, जिथे स्वयंप्रेरणेने काही काम करता येईल ? त्यापासून उत्पन्न मिळावे अशी अपेक्षा नाही.पण कामाचा ताण नसेल असा काही पर्याय सुचतो का ? मला एक पर्याय असा पण सुचतो की घराच्या जवळपास एक छोटसं दुकान टाकून द्यावे. खूप जास्त अर्थार्जन व्हावं असं नाही पण वेळ आनंदात जावा. खूप जास्त मेहनत नसलेले अजून काही पर्याय सुचतात का?
३) आरोग्य विमा :
आरोग्य विमा बाबत काय विचार करावा आत्ता आई-वडिलांचा मिळून फक्त दोन लाखाचा आरोग्य विमा आहे ज्याचे पैसे माझ्या पगारातून जातात. यावर वार्षीक जास्तित जास्त किती खर्च करावा ?
याशिवाय अजुन काही गोष्टींचे स्वागतच आहे.
मिसळपाव
चांगला धागा आहे.
क्रमांक २ साठी त्यांचा पिंड
कंजूस यांचा आरोग्य विमा धागा
उका साहेब, २) वेळेचा सदुपयोग :
दुकानाची कमाई -
लेखाच्या मुद्दा क्रमांक ३ च्या अनुषंगाने
माझा स्वतःचा star चा
In reply to माझा स्वतःचा star चा by कंजूस
साठ/पास/+ वयाच्या लोकांसाठीचा
https://www.insurancedekho
70 20 10 फॉर्मुला -- एक
नमस्कार, मलाही मार्गदर्शन हवे
In reply to नमस्कार, मलाही मार्गदर्शन हवे by बापू मामा
हे दहा लाख कुठे गुंतवावे जेणे
काही वर्षांनी इतर देशाप्रमाणे
In reply to काही वर्षांनी इतर देशाप्रमाणे by कंजूस
ती टी टूम बीम काही नाही