Skip to main content

पसारा

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 27/03/2009 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा पुलस्ती यांची सुंदर रचना शहारा किती पाळणे हलून गेले अता थांबबा... थकून गेले रंगामध्ये आले मी अन- कुठे अचानक उठून गेले? घरात डोकावले; दचकले कुणी कडे मी चुकून गेले! अजून खाटेवरी पसारा कुणी इथे बागडून गेले जमेलसे वाटलेच नव्हते हळूहळू मग जमून गेले... काल मला ती काय म्हणाली? "काम तुझ्यावीन घडून गेले" सदर्‍याला का गंध निराळा कोण पाखरू बसून गेले? पती जरासा सुंभ निघाला लग्ना दिवशी पळून गेले! श्वासांची येरझार "केश्या"- खरे काय ते कळून गेले?
लेखनविषय:

वाचने 2001
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

धन्य केशवा, कमाल केली मस्त विडंबन जमून गेले! =)) क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

सुंदर विडंबन. केशवसुमारांचे अभिनंदन. अवांतरः विडंबनाचा विषय दारू नसल्याने विडंबन अजूनच आवडले. अतिअवांतरः दारूचे वावडे नाही पण बहुतांश विडंबने त्याभोवतीच घोटाळतात त्यामुळे अंमळ कंटाळा आला होता. खराटा (रंग माझा वेगळा)

।हॅ हॅ हॅ हॅ ह ह पु वा ! =)) =)) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© फिटावीत जरा तरी जगण्याची देणी एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी... आमचे राज्य

वा वा वा ... धन्य आहात. प्रत्येक शेर मजेदार :) -- लिखाळ.

गुढी लईच उभारलीयेत!! :) __||__ (शिष्य)चतुरंग

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार

हा.हा.हा... सॉलिड्ड्ड्ड... :) मदनबाण..... जाहिरातीवाचून धंदा करणे म्हणजे एखाद्या सुंदर स्त्रीने अंधारात डोळा मारण्यासारखे आहे. जालावरुन सभार...