हिंदू अंत्यसंस्कार
नुकतेच एका आप्तांचे अंत्यसंस्कार होताना हजर होतो आणि काही मुद्दे मांडावेसे वाटले. ह्यावर काही उहापोह व्हावा आणि ह्या विषयातील अभ्यासकांनी / जाणकारांनी/ माहितगारांनी काही चर्चा करावी हा उद्देश.
अंत्यसंस्कार आयोजकांना जर फार माहिती नसेल तर ज्याला जे सुचेल ते तो करत सुटतो आणि एकूण प्रसंगाचे गांभीर्य जपताना त्रास होऊ शकतो
१ ) त्यामुळे सर्व साधारण हिंदू अंत्यसंस्कार करताना काय काय अभिप्रेत आहे ? त्यातील कोणते विधी किमान आवश्यक/ वैकल्पिक आहेत?
२) मूळ शोकग्रस्त कुटुंबियांना मृतदेहाच्या सजावटीचा त्रास होत असावा का? एकूणच ते हार बुक्का वगैरेंनी एक भेसूर पणा येतो असे वाटते
३) पुढे दहनपूर्व उपचारांमध्ये पिठाचे गोळे, काळे तीळ वगैरे वापरून एकूण दृश्य अजूनच भयानक दिसू लागते. अर्थात ह्या मागे मन गुंतवणे आणि मृतदेह दहनाला पूरक द्रव्य म्हणून तूप वगैरे वापरणे हे उद्देश समजू शकतात परंतु ह्या एकूणच प्रक्रियेत थोडा सोपेपणा / सौंदर्य (होय मला सौंदर्यच म्हणायचे आहे ) आणता येणार नाही का? (मी ज्ञानप्रबोधिनी विषयी ऐकून आहे त्यात नेमके काय करतात??)
४) पुढे अस्थी राख विसर्जन करणे ह्यात "युझर मॅन्युअल" काय सांगते?
५) हिंदू लोक दफन करतात का आणि हो असेल तर कसे केव्हा ??
अन्य धर्मीयांमध्ये सर्वसाधारण पणे हे विधी ठोस आणि एकही फाटा न फोडता जसे च्या तसे, म्हणजे धर्मगुरू म्हणेल ते आणि तसे, करतात असा माझा समज आहे तो खरा कि खोटा?
बाकी मुद्दे चर्चा जशी पुढे जाईल तसे मांडीनच
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अंत्यसंस्कार याविषयी माझं मतः
प्रचंड सहमत
विधी काय कशाला असतात हे जाणून
किंचित मुद्दा
+१११
माझेही दोन पैसे
अंत्यसंस्कार हे जरी मृत्यू
शास्त्रविहित पद्धती
धन्स !!
एक आठवण
प्रोब्लेम
मृताला कोणताच प्रॉब्लेम नसतो
माझ्या मते ....
त्याच्या गतिची नाही ..
भीतीयुक्त भावना म्हणजेच गतीरोध
तुम्ही आतापावेतो जसे वागत आला
आमच्या डोंबिवलीत एक नविन प्रथा सुरू झाली आहे.
अंधश्रद्धा वगैरे होती पूर्वी
एक वेगळा विचार--