पश्चिमेकडे शकुनी, गांधारीच्या कंदाहार पासून ते पूर्वेकडे चित्रांगदेच्या माणिपूरच्या पल्याड असलेल्या ब्रह्मदेशापर्यंत आणि उत्तरेत तिबेट, हिमालया पासून ते दक्षिण टोक असलेल्या कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या तत्कालीन खंडप्राय भारत देशावर बाहेरून आलेल्या मूठभर ब्रिटिशांनी एतदद्देशीय लोकांच्या मदतीने तब्बल दीडशे वर्षे राज्य केले.
असंख्य प्रचलित भाषा आणि अगणित बोली भाषा असलेल्या भारतात ब्रिटिशांनी सगळ्यांची मोट एकत्र बांधून त्यांना सोईस्कर अशा आवश्यक त्या सुधारणा, बदल करीत राज्यशकट कसा हाकला असेल कोण जाणे. ब्रिटिश स्थानिक भाषा शिकले असतील काय? आणि समजा शिकले तर त्याच भागामध्ये / प्रांतामध्ये राहिले असतील की फक्त दुभाषांवर अवलंबून राहून राज्य कारभार केला असेल? एक मात्र खरे, ब्रिटिशांनी तत्कालीन शिक्षण पद्धती मोडीत काढून मॅकले प्रणित शिक्षण पद्धतीचा स्वीकार केला आणि राज्य कारभारसाठी लागणारे शिक्षित व इंग्रजी बोलणारे स्थानिक मनुष्यबळ तयार करायला सुरुवात केली. शारीरिक कष्टातून सुटलेल्या आणि ज्यांना दैनंदिन जीवनकलह नव्हता अशा अभिजन वर्गाने ह्या संधीचा फायदा उठवला आणि भारतामध्ये "ब्राऊन साहिब" हा नवीन वर्ग उदयास आला.
आणि भारतीय उपखंडातील लोकांनी आपापल्या मातृभाषेतील ढंगाला अनुसरून इंग्रजी बोलणे सुरू केले. उत्तर भारतीय व्हॉट इज युअर गुड नेम? अशी प्राठेवाली हिंग्लिश किंवा हाताची दोन बोटे इंग्रजी V प्रमाणे उंचावून बी फॉर बीक्टरी अशी राशोगुल्ला बिंग्लिश अथवा येस्स साSSर्र अशी इडली-डोसा टिंग्लीश बोलायला सुरुवात केली. त्यात शुद्ध तुपातल्या तर्रखडकरी वरण-भात मिंग्लिशची भर पडली. हळूहळू ब्रिटिश इंग्रजी पासून फारकत घेत भारतीय उपखंडात बोलणाऱ्या "भारतीय इंग्रजी" चा उदय झाला. अर्थात काही हुच्चभ्रू अभिजन हे तुपातील (किंवा बटर, मार्गारींन, लार्ड मधली म्हणू हवे तर) ब्रिटिश इंग्रजी बोलत परंतु इतरेतर भारतीयांनी ब्रिटिशांच्या इंग्रजीवर त्यांच्या मातृभाषेचे संस्कार केले. इतके की, जणू बदला घेण्यासाठीच भारतीयांनी "मेस अप विथ इंग्लिश" चालू केले. यातील काही शब्दांना तर साहेबाच्या भाषेने अधिकृत मान्यता देखील दिली याचे प्रसिद्ध उदाहरण म्हणजे "prepone". आणि सध्याच्या डॉलरच्या प्रभावाने लवकरच पेट्रोल हे गॅस वर जाण्याची शक्यता आहे. ब्रिटिशांच्या English चा भारतीयांच्या Inglish पर्यंतचा असा हा प्रवास मोठा मजेशीर आहे.
आता काही मजेदार उदाहरणे बघू. वर उल्लेख केलेले "गुड नेम" हे तर सरळ सरळ हिंदीतल्या शुभ नाम चे शब्दशः भाषांतर आहे तर "आईज हॅव कम" हे मराठीचे. एखाद्या ब्रिटिश गृहस्थाला तात्काळ उत्तराच्या अपेक्षेने प्लिज रिव्हर्ट बॅक इमेजीएटली लिहिले तर ते मला फिजीकली अशक्य असल्याचे उत्तर येईल. :) असाच घोळ पास आऊटचा आहे (passed out from so and so college). बाहेर जर आय पास्ड आऊट म्हणालात तर कदाचित मेडिकल इमर्जन्सी साठी धावाधाव व्हायची.
Do ची तऱ्हा आणखी निराळी. Do ने सुरू होणारी वाक्ये प्रश्नार्थक न राहता आज्ञार्थक झाली. "Do one thing" "Do the needful" अशी आणि प्लिज वगैरे भारतीयांच्या सौजन्याच्या व्याख्येत बसत नसल्याने आणि मोघम बोलण्याच्या प्रवृत्तीमुळे one thing किंवा needful, बस्स एव्हढेच. एखादा सौजन्याच्या पुतळा असेल तर kindly do the needful पण needful म्हणजे काय ते सांगणे नोहे.
एखाद्या वाक्यात "only" चा वापर only भारतीयच करू जाणे ! Like that only म्हटले की झाले, समोरच्याने ओळखून घ्यायचे म्हणजे काय ते ! आणि also च्या जागी only चा वापर ही तर आपली खासियत. आय एम फ्रॉम इचलकरंजी ओन्ली. :)
भारतीयांच्या शंकेखोर मनाला प्रश्न कधी पडत नाहीत येतो तो doubt च. त्यामुळे समोरच्याला स्वतःबद्दलच doubt येणार.
आज सकाळी ला आपण "today morning" म्हणणार "this morning" नाही आणि काल रात्री ला "yesterday night" म्हणणार "last night" नाही. स्वतःची ओळख करून देताना एकतर myself आणि वर Mr. किंवा Mrs. काय असेल ते so and so.
Uncle, auntie ह्या इंग्रजी शब्दांना नात्याचा बाहेर काढले ते भारतीयांनीच. मित्राचे पालक, शेजारचे, आजूबाजूचे, कोणीही वयस्कर अंकल, आंटी झाले. बट बी केअरफुल, सगळ्यांनाच अंकल, आंटी म्हणू नका बरका.
स्टेशनच्या बाहेर जायचा राजमार्ग म्हणजे जिथे तिकीट तपासनीस उभा राहून तिकिटे तपासत असतो तो. तुम्ही तिकीट दाखवून स्टेशनच्या बाहेर (आउट) आला म्हणजे गावात (in town) आला पण नाही आउट ऑफ स्टेशन म्हणजे गावाच्या बाहेर म्हणे, हे कसे काय बुवा?
भारतीयांनी घातलेले आणखी मोठे घोळ म्हणजे हॉटेल, टॉयलेट वगैरे वगैरे. हॉटेल आणि रेस्तराँ मधला फरक भारतीयांनी मिटवून टाकला आणि त्याच्याही पुढे जाऊन हॉटेलिंग ह्या शब्दाला नवीन संदर्भ दिला. हॉटेलिंगचा मूळ अर्थ बघता भारतीय अर्थ समजल्यावर ब्रिटिश माणसाला चक्कर येईल. तीच गोष्ट टॉयलेट आणि कमोडची. आता हे मान्य की रेस्ट रूम म्हटल्यावर आतमध्ये मस्त पलंगावर झोप काढायची सोय असेल असे तुम्हाला वाटणे साहजिकच आहे किंवा वॉश रूम न म्हणता वाईप रूम म्हणायला पाहिजे म्हणजे रेस्ट न घेता रेस्ट रूम, वॉश न करता वॉश रूम तर मग आम्ही टॉयलेट मध्ये शॉवर घेतला तर तुमची काय हरकत आहे? उभारलेल्या विनोदी वाचळवीरांचे ( म्हणजे मराठीत स्टँड अप कॉमेडियन) या संदर्भातील बाष्कळ विनोद प्रसिद्ध आहेत.
आता भारतीय स्लॅन्गचा ब्रिटिश इंग्रजीमध्ये समावेश होणे फक्त बाकी आहे. उद्या एखादा ब्रिटीश अरे यार किंवा ओये, अबे करत बोलायला लागला तर आश्चर्य वाटायला नको. तुमच्याकडे देखील असा भाइं शब्द खजिना असेल तर शेअर करा, वाचायला आवडेल.
वाचने
22941
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
दुकानावरच्या आणि आतल्या
ह्या पाट्या आणि त्यावरील सुद्दलेकन हा खरं तर स्वतंत्र लिहायचाच
In reply to दुकानावरच्या आणि आतल्या by मनो
भारी नेमक्या नोंदी आहेत.
ब्रिटीशांचे एतद्देशीय भाषेत
एक नंबर.
....
कुमार सर, anyways तुमची टिप्पणी अगदी बरोबर आहे. :)
In reply to .... by हेमंतकुमार
वेटेज
ride vs drive
टू व्हीलरला हॅन्डल असते तर
In reply to ride vs drive by आवडाबाई
प्रश्नार्थक वाक्यात are you?,
अजून काही उदाहरणे .
अगदी अगदी..
In reply to अजून काही उदाहरणे . by बबन ताम्बे
लेख नसतंच आहे. पण हे
लेख "नसतंच" आहे हे काही नीटसं कळलं नाही.
In reply to लेख नसतंच आहे. पण हे by आनन्दा
ब्रिटीशांनी
काहींनी तर आपली नावेच बदलली, जस्ट टू सूट द टंग ऑफ देअर मास्टर्स!
In reply to ब्रिटीशांनी by शेखर
हे कसे विसरता येईल ?
बीपीओ
माझी पण थोडीशी भर
लाईक आणि एक्चुली
In reply to माझी पण थोडीशी भर by सर टोबी
हल्ली "बेसिकली" हा शब्द
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Teri Meri Dori... ;) - Sonali Vajpayee | Tera Mera PyarActually मी बर्याचदा
In reply to हल्ली "बेसिकली" हा शब्द by मदनबाण
मराठी इंग्लिश
न ची बाराखडी
हो.
In reply to न ची बाराखडी by गामा पैलवान
सौदिन्डीयन अजुनच वेगळं
लिंक असल्यास डकवा
In reply to सौदिन्डीयन अजुनच वेगळं by पहाटवारा
परवा एका ग्रुपमध्ये अमेरिकन
मिसळपाव हा शब्द तरी "मराठी"
माझ्या अल्प माहिती प्रमाणे पाव हा शब्द पोर्तुगीज आहे.
In reply to मिसळपाव हा शब्द तरी "मराठी" by बापू मामा
बरोबर
In reply to माझ्या अल्प माहिती प्रमाणे पाव हा शब्द पोर्तुगीज आहे. by चामुंडराय
बॉलिवूड कॉलिंग या अतीव सुंदर
वाचनेबल धागा.
आवडेबल प्रतिसाद.
In reply to वाचनेबल धागा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लेख आवडला. आपल्या देशात अनेकजण type आणि kind मधे घोळ
उत्तर भारतीयांच्या ड आणि र
SINGLISH
३
आय डोन्ट नो नथिंग / आय एम गुड
माझ्या एका सहकाऱ्याने जेव्हा