Skip to main content

वृक्षतोड...

लेखक गणेशा यांनी शुक्रवार, 27/12/2019 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
दिसतील ती झाडे, कापीत चाललो मी होऊन मेघ काळा, शापित चाललो मी श्रुंगार झडून गेला, गर्भगळीत निस्तेज वृक्ष पानगळीत श्वास गुंतलेला शोधीत चाललो मी झाले उन्हाळे अनेक, ओसाड उदास राने ओले अधीर अश्रू, कुरवाळीत चाललो मी पसरला गहिरा अंधार, झाकोळला आसमंत दिशाहीन प्रवासात, ऐटीत चाललो मी डागाळला चंद्र उरी, नभास का खंत आहे आपुलेच खोटे नाणे, घाशीत चाललो मी -------- शब्दमेघ (Edited)
लेखनविषय:

वाचने 5985
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

दूर्दैवाने ही सत्य परीस्थिती आहे. पैजारबुवा,

बोलले ते शोल्लीड राम का बाण ... ================================ आजकाल चंद्र खूप खूप मोठा दिसतो सूर्य तर अगदी जवळ आल्यासारखा वाटतो डोगर दर्या खोर्यात हे सर्व दूर दूर भासायचे आता कुणीच वाली नाही गड्या,, सर्व गेले उडून हळूहळू आपणपण उडायचे

उत्तम कविता