हिपोक्रसी 1 - हुंडा
स्थळ - कॅफेटेरिया
ती - काय रे लग्नासाठी मुली बघतोयस ना. काही प्रगती होतेय का?
तो - नाही ना. अजून काही नाही.
ती (हसून) - हुंडा वगैरे मागत नाहींयस ना?
तो - नाही. का विचारले असे?
ती - मी हुंड्याच्या अगदी विरूद्ध आहे. मुलांकडचे लोकांना पैसा सोडून काही दिसत नाही का. माझे एथिक्स आहेत, त्यामुळे मी खूप स्थळे नाकारली.
तो- बरोबर आहे. तुझे याच वर्षी लग्न झाले, तू नवरा कसा निवडलास?
ती- माझे निकष आधीच स्पष्ट होते. मुलाचा पगार माझ्या दुप्पट असला पाहिजे आणि स्वतःचा फ्लॅट हवा 2 bhk.
तो - हाच फक्त criteria होता?
ती - हो.
तो( shocked आणि मनातल्या मनात) - तू मोरल एथिक्स च्या गोष्टी करते आणि नवरा फक्त पगार च्या criteria वर निवडते?
मी हुंड्या च्या विरोधात आहे पण आयुष्यभराचा जोडीदार केवळ पैश्याच्या बेसिस वर निवडणे हे देखील चूकच आहे या मताचा आहे !!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पैसा हा मुख्य मद्दा असतोच.
:D
हीपोक्रसी आंतरजालीय संस्थलावराही असते
नवरा श्रीमंत निवडणे आणि हुंडा मागणे
हुन्डा
हुन्डा हा नालायकपणा आहे आनि