शह काटशह
सध्याचे जे राजकारण / खुर्चीखेच चालू आहे ते पाहता , मी स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घ्यायची लाज वाटू लागली आहे .. निषेध व्यक्त करण्यापलीकडे माझ्या हातात काहीच नाही आहे ..
१) कितीही झालं तरी महारष्ट्रातील सत्ता , पवार या नवभावतीच फिरते , हे पुन्हा सिद्ध झालंय . मग ते श्री अजित पवार असो किंवा श्री शरद पवार ..
२) उद्धव ठाकरेंनी , बाकी असेल तर ठाकरी बाणा दाखवून , शिवसेना हि सत्तेसाठी कधीच नव्हती , ती मुळात जन्माला आली होती ती सामान्य माणसाच्या हक्काच्या लढाईसाठी . हे दाखवून द्यावं .. तरच त्यांची उरलेली सुरलेली ( जर काही बाकी असेल तर आणि तरच ..) लाज राहू शकते .. खुर्ची नाही मिळाली तरी हरकत नाही , पण मुंबईकरांच्या लढ्यासाठी , शिवसेना मुंबईत असणे , गरजेचे आहे .. विरोधात राहूनही , चांगले काम करू शकतो . त्यासाठी सत्ताच कशाला हवी ? पण हे अजून तरी त्यांना जमले नाही आहे , आणि पुढे जमेल याची शक्यताही वाटत नाही आहे ..
३) आमदार राखण्यात काय हशील आहे ? ज्याला जायचे आहे तो जाईल आणि राहायचे आहे तो राहील .. उगाच कोंबडीवानी सर्व पिल्लं पंखाखाली हैत कि नाही याची काळजी घेणं , हा ठाकरी बाणा नव्हे .. अहो जागवा त्या आठवणी गतकाळातल्या .. त्यातून शिकण्यासारखं बरंच आहे ...
४) श्री शरद पवारांच्या ताब्यात एव्हढी सारी आमदार मंडळी असणे , हे कधीही धोकादायक असू शकते .. त्या माणसाला ब्रम्हदेवही ओळखू शकणार नाही तर तुमची आमची काय भिशाद.. सर्वात चाणाक्ष नेता / लोकनेता सध्याच्या घडीला महाराष्ट्रात शरद पवारच आहेत ..
तेव्हा जरा सांभाळून पावले टाका .. नाहीतर पुढे तेलही गेले तूपही गेले , हाती आले धुपाटणे .. अशी अवस्था होऊ शकते .. हे झाले माझे मत , जे मी पाहिल्यान्दाच या धुळवडीच्या भाग घेऊन चर्चा करत आहे , पण तुमची मतेही वेगळी असू शकतात . ती इथे मांडली तर उत्तम .. पण एक मात्र नक्की , पुढील मतदानात आवर्जून भाग घेणार आणि नकाराधिकार वापरणार .. हे लेकाचे समजतात काय आपल्याला ..
प्रतिक्रिया
सध्या सगळे विश्वासमत पारित
शपथविधीनंतर "मावळते
मी गेल्या गुरुवारी मातोश्रीवर
मी सेनेचा पंखा नाही , मोदींचा थोडा प्रभाव आहे माझ्यावर
उठा सेना ही सेटलमेंट सेना आहे
निरीक्षण रोचक आहे
१९९९ सालचा युती सरकारवरील आरोप
आघाडीचा मुखवटा ठाकरे सरकार म्हणूनच तर आहे
काँग्रेस व राकॉन हे निवडणुकीत विरोधक होते
भारी लिहिले आहे.
Pagination