Skip to main content

महाराष्ट्र विधानसभा २०१९, मतदान टक्केवारी

लेखक शाम भागवत यांनी मंगळवार, 19/11/2019 19:28 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक टक्केवारीच्या साहाय्याने मी काही मते बनवायचा विचार करतोय. मात्र "हा म्हणाला", "तो म्हणाला" वगैरे सारखी राजकारणी लोकांची मते मी आधार म्हणून घेणार नाहीये. तर्क करताना कोणतेतरी सांख्यकीय गणित त्यामागे असावे असा उद्देश आहे. राजकीय धाग्यांवर बरीच हुशार लोक भरपूर लिखाण करतात. पण त्यासाठी टिव्ही, वर्तमानपत्रे यातील बातम्या यांचा आधार घेतात. मला वाटते हा आधार घ्यावाच पण तो कोणत्यातरी सांख्यकीय विश्लेषणाच्या साहाय्याने तपासून घ्यायला हवा. आपोआपच बिटवीन द लाईन्स वाचायची कला साध्य होऊ शकेल. तसेच ही माध्यमे आपल्याला शेंडी लावायची शक्यता कमी होऊ शकेल. विधानसभा निवडणूकी बरोबरच टक्केवारीच्या आधारे आपली लोकशाही कुढे चालली आहे त्याबाबत माझे मत मांडायचाही विचार आहे. पण ते कधी जमेल माहीत नाही. किंवा प्रतिसादामध्येच मी त्याबाबत लिहीन. मी एका धाग्यावर माझी मते मांडली होती. तीच परत देत आहे. त्यानंतर काही मतदारसंघांची उदाहरणे देत आहे. यासाठी अल्फाबेटीकली पहिल्या १० मतदारसंघांचा नमुना म्हणून मी अभ्यास केला व त्यातून वेगळे काहीतरी घडत असल्याचे जाणवणारे चार मतदार संघ निवडून त्याचे तक्ते जोडत आहे. याच पध्दतीने इतर जणं पण यात भर घालू शकतील. पण मतदान टक्केवारी व त्यातून निघणारा अन्वयार्थ असे त्याचे स्वरूप असेल तर बर होईल. सगळ्यांनाच एका वेगळया पध्दतीने विचार करायला किंवा शिकायला मिळू शकेल. इतकेच नव्हे तर बातम्यांवर विसंबून न राहता आपणही थोडेफार विश्लेषण करू शकू. राजकारणावरील धागा म्हणजे निव्वळ लाथाळ्या, हे मत बदलले तर अशा प्रकारच्या धाग्यावर अनेक हुशार लोकं भाग घ्यायला लागावीत हा या धाग्या मागचा मुख्य उद्देश आहे. --------------------------------------------- मी 13 Nov 2019 - 11:55 am ला मांडलेली मते पुढे देत आहे. १. मला तरी असेच वाटतेय की, राकाँ व काँग्रेसच्या साहाय्याने मुख्यमंत्री पद मिळवायचे शिवसेनेने अगोदरच ठरवलेले असावे. अन्यथा निवडणूक निकाल लागण्याची प्रक्रिया चालू असतानाच, सर्व पर्याय खुले असण्याची घोषणा झाली नसती. ती घोषणा, एका प्रदीर्घ घटनेतील एक टप्पा असावी असेच माझे मत बनले. शिवसेनेच्या हातात कोणतीच हुकमाची पाने नव्हती हे आता कळल्यावर, शिवसेनेचा आक्रमकपणा पाहून माझे हे मत जास्त पक्का झालंय. मनसे शिवसेनेचा कट्टर शत्रू. त्यालापण शिवसेनेची मते जाताहेत हे जाणवल्यावर माझा हा संशय जास्तच बळावला. हे तपासायला पुण्याचे उदाहरण पुरेसे आहे. अजून लढवलेल्या जागांवरची टक्केवारी जाहीर झाली नाहीये. ती मिळाली असती तर जास्त पुराव्यानिशी माझे मत मांडता आले असते. असो. २. त्यामुळे जिथे भाजपाचा उमेदवार उभा होता तिथे शिवसेनेची बरीच मते राकाँ व काँग्रेसला गेली आहेत. कारण या दोघांचा निवडणूक निकालानंतर पाठिंबा मिळवायचा असेल तर त्यांचे आमदार निवडून आले पाहिजेत ही तर शिवसेनेचीच गरज बनते व भाजपाचे १४४ आमदार होऊ नयेत ही जबाबदारी ठरते. ह्या दोन्ही गोष्टी पवारसाहेबांच्या फायद्याच्या असल्याने त्यांनीही तोंडभरून आश्वासने दिली असणे शक्य आहे. ३. १९६७ पर्यंत काँग्रेसला विरोधकांची भिती वाटत नव्हती. पण लोहियांची विरोधी पक्षांची युती बनवून काँग्रेस विरोधात एकास एक उमेदवार देण्याची नीती यशस्वी होते म्हणाल्यावर, विरोधकांची एकजूट होऊ नये यासाठी डावपेच आखणे हे काँग्रेसचे मुख्य धोरण बनले. त्यानुसारच पवारसाहेब राजकारण करतात व त्यात ते सद्या तरी सर्वात पाराविना आहेत असे वाटते. यावरून महाराष्ट्रात युती भारी पडतेय म्हणाल्यावर त्यात फूट पाडणे हेच आघाडीचे दिर्घकालीनधोरण असणार यात काही संशय नाही. थोडक्यात महाराष्ट्रातील निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादीने एकत्रित लढणे व शिवसेना व भाजपाने वेगवेगळे लढणे हा एक मार्ग आहे जो आघाडीला सत्तेपर्यंत नेऊ शकतो. जर युती तुटली असेल तर ती फक्त ताणली जात राहील एवढेच फक्त पाहावयाचे आहे व परत जोडली जाऊ नये यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत. त्यासाठी शिवसेनेचे सरकार यावयाची जरूरी नाही. ४. परत निवडणुका झाल्या तर त्या शिवसेना व भाजपाने एकत्रित लढवू नयेत एवढीच आघाडीची इच्छा किंवा ध्येय असावे असे वाटतेय. यासाठी प्रथम राज्य यांना बाजूला केले. या राज्यच त्रासातून शिवसेना खूप मागे खेचली गेली. बाळासाहेबांची पुण्याईही कामी येऊ शकली नाही. त्याचा फायदा त्यांना २०१४ पर्यंत झाला. फोडा व झोडा पध्दतीत नेहमी रागीट माणसाला हाताशी धरले जाते. कारण रागाच्या भरात त्याच्यावर कब्जा मिळवणे सोपे असते. त्यामुळे यावेळी राऊतांद्वारे शिवसेनेला जाळ्यात पकडण्यात आलेय. राऊतांवरचा ऊध्वजींचा विश्वास हे हत्यार वापरले गेलंय. ५. पण मोदी उदयानंतर सगळंच गणित फिसकटायला लागलेय. शिवसेनेच्या बळावर मोठे होण्याची अगतिकता भाजपाची राहिलेली नाही. भाजपचे वाढते बळ त्याचा पुरावा आहे. त्यामुळे परत निवडणुका झाल्या व शिवसेना वेगळी लढली तर त्यांची आघाडीला गेलेली मते परत फिरतील. भाजपकडे या वेळेस इच्छुक जास्त झाले होते व जागा २०१४ पेक्षा कमी झाल्या होत्या. पण परत निवडणुका झाल्यास, लढायच्या जागा १५६ वरून २८८ झाल्यामुळे बंडखोरांचा प्रश्न सुटेल. भाजपातील लाॅयल कार्यकर्ते त्यामुळे खूश झाल्याने पुढच्या निवडणुकीत मतदान टक्केवारी वाढेल, जी शहांची नेहमीचीच रणनीती आहे. ६. जर शिवसेनेने पुढील निवडणुकीत आघाडीशी हात मिळवणी केली तर भाजपाला ते हवेच असेल. धृवीकरण भाजपाला नेहमीच फायद्याचे ठरत आले आहे. काँग्रेस विरोधातील आपला अवकाश शिवसेना आपणहून सोडून देत असेल तर भाजपा नक्कीच खूश होईल. भाजपा यापध्दतीनेच मोठी होत आली आहे. मात्र यासाठी संधीची वाट बघत बसायला लागते व त्यासाठी खूप पेशन्स लागतो. तो मोदी शहांकडे नक्कीच आहे असे वाटते. ७. थोडक्यात, भाजपा, काँग्रेस व राकाँ यांचे पुढील धोरण निव्वळ वेळकाढूपणाचे असेल असे वाटते. यासाठी एखादी कोर्टकेस वगैरे सारखा उपाय योजणे हा मार्ग मस्त. जो काँग्रेस नेहमीच अवलंबते. फक्त कोणाकडे तरी बोट दाखवता आले की झाले. राऊतांनी बोलणी पवारांशी केली. ते आता पवारांकडे बोट दाखवत असतील. पवार बोट दाखवताहेत काँग्रेसकडे. काँग्रेस बोट दाखवतीय केरळ काँग्रेसकडे. ८. पण जास्तीचं काहीही न देता शिवसेना जवळ येत असेल तर भाजपा ही संधी साधेल असं वाटते. दीड दोन महिने फडवणीस संपले संपले असं वाटत असताना परत उभे राहतात, असं बऱ्याच वेळेस झालंय. या वेळेसही हे होऊ शकते. या वेळेसही फडणवीस यांनी समारोपाच्या वेळी युतीच सरकार बनवेल असं म्हणूनच ते थांबले आहेत. ९. असंच होणं योग्य असेल. कारण राजकारणात डाव ओळखून प्रतिडाव टाकावा लागतो. बाकी सगळे गौण याचे भान राखावे लागते. जर युती तुटावी हा डाव असेल तर युती टिकवणे हाच प्रतिडाव असतो. शिवसेना कशी वागली याबाबत सर्वसामान्य भाजपा कार्यकर्त्यांना येणारा राग नेत्यांना पोटात ठेवावा लागतो. भाजप पुढेमागे युती तोडेलही. पण ती सोयीची वेळ ते ठरवतील. पवार साहेबांनी त्यांच्या सोयीने निवडलेली वेळ भाजपाने साधणे शहाणपणाचे ठरणार नाही. अर्थात हे सर्व राजकारणी माझ्यापेक्षा नक्कीच हुशार असणार म्हणा. :) --------------------------------------------------- २०१९ विधानसभेच्या टक्केवारीच्या गमतीजमती १. अक्कलकुवा (1) आघाडी
पक्ष २०१४ २०१९
राष्ट्रवादी २७.७८
काँग्रेस ३६.७९ ४१.२६
एकूण ६४.५७ ४१.२६
युती
पक्ष २०१४ २०१९
शिवसेना ५.९१ ४०.२१
भाजप १८.६८
एकूण २४.५९
इतर दखलपात्र पक्ष
पक्ष २०१४ २०१९
अपक्ष ४.५१ १२.६९
आप २.०२
एकूण ४.५१ १४.७१
२०१४ ला नागेश पडवी यांनी भाजपातर्फे उभे राहून १८.६८% मते मिळवली होती. तर आमश्या पडवी यांना ५.९१% मते मिळाली होती. खरं तर या जागेवर भाजपाने जास्त मते मिळवली असूनही ही जागा शिवसेनेला सोडायला लागली. मागच्या वेळेचा भाजपा उमेदवाराला ऐनवेळी माघार घ्यायला लावल्यावर त्याने चिडून जाऊन बंडखोरी केली. तरीही या वेळेस शिवसेनेला ४०.२१ टक्के मते मिळाली. मतांची ही वाढ आश्चर्यकारकच आहे. खरे तर २०१४ ला राष्ट्रवादी काँग्रेस२७.७८ टक्के व काँग्रेसला ३६.७९ टक्के मते मिळाली होती. म्हणजे आघाडीला एकूण ६४.५७ टक्के मते मिळाली होती. ही जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती व काँग्रेस जिंकणार हे नक्की होते. त्यात परत युतीमध्ये बंडखोरी झालेली. म्हणजे अगदीच एकतर्फी अशी ही लढत होती. पण या वेळेस काँग्रेसला ६४.५७ टक्क्यांच्या ऐवजी फक्त ४१.२६ टक्केच मते मिळाली. म्हणजे युतीकरूनही मागच्या वेळेपेक्षा फक्त ४.४७ टक्के एवढीच वाढ? मग राष्ट्रवादीची २७.७८ टक्कें पैकी ४.४७ काँग्रेसला मिळाली असतील तर राष्ट्रवादीची उरलेली २३.३१ कुढे गेली ????? २०१४ साली शिवसेना व भाजप यांना एकत्रित २४.५९ टक्के मते मिळाली होती. त्यात परत भाजपाचा बंडखोर उभा होता. म्हणजे मते मागल्यावेळेपेक्षा कमी व्ह्यायला पाहिजे होती. पण शिवसेनेला मिळाली चक्क ४०.२१ टक्के. काँग्रेसपेक्षा फक्त १.०५ टक्के कमी. अगदी नशीब बलवत्तर म्हणून ही जागा कॉग्रेसला मिळालेली आहे. निवडणूक निकालानंतरच शिवसेना राष्ट्रवादीजवळ आली असं का समजायचे? ----------------------------------------------------------------------- २. अहमदनगर शहर (225) आघाडी
पक्ष २०१४ २०१९
राष्ट्रवादी २९.७९ ४७.३३
काँग्रेस १६.३३
एकूण ४६.१२ ४७.३३
युती
पक्ष २०१४ २०१९
शिवसेना २७.७९ ४१.१९
भाजप २४.०८
एकूण ५१.८७ ४१.१९
इतर पक्ष
पक्ष २०१४ २०१९
aimim ४.०४
वंचित १.६९
बसप ०.३५ १.७२
एकूण ०.३५ ७.४६
इथे राष्ट्रवादीचा उमेदवार उभा होता. २०१४ ला आघाडीला एकत्रित ४६.१२ टक्के मते होती या वेळेस ती ४७.३३ टक्के झाली. म्हणजे आघाडीचा धर्म काँग्रेसने पाळला असे म्हणावे लागेल. मात्र २०१४ ला युतीला एकत्रित मते ५१.८७ टक्के असताना शिवसेनेला ४१.१९ टक्के मतेच मिळाली आहेत. शिवसेनेला अपेक्षेपेक्षा१०.६८ टक्के मते कमी मिळालेली आहेत. याचा अर्थ भाजपाची २४.०८ टक्के पैकी १०.६८ टक्के मते फुटली आहेत. पण त्याचा दुसरा अर्थ असा की, भाजपाच्या अंदाजे १४ टक्के लोकांनी युती धर्म पाळलेला असावा. २०१४ साली चारही प्रमुख पक्ष एकत्र लढल्यामुळे या चौघांनीच ९७.९९ टक्के मते मिळवली होती. बाकीचे सगळे मिळून २ टक्के होते. त्यात बसपा ५व्या क्रमांकावर होती व तिला ०.३५ टक्के मते होती. मात्र २०१९ साली या सर्व पक्षांना पालवी फुटलेली दिसून येते. याला कारण भाजपाची फुटलेली मते आहेत हे निश्चित होते. याचाच दुसरा अर्थ असा की, भाजपाची मते राष्ट्रवादीकडे गेलेली नाहीत. ------------------------------------------------ ३. अकोला पश्चिम (३०) इथे प्रथमदर्शनी असं वाटतं की काँग्रेसने वंचितशी आघाडी केली असती तर काँग्रेस जिंकली असती. त्यामुळे वंचितचा फायदा भाजपाला झाला अशीच सर्वसाधारण समजूत असते. पण २०१४ ची टक्केवारी पाहिली तर चित्र वेगळेच दिसते. युती
पक्ष २०१४ २०१९ वध/घट
भाजपा ४६.७७ ४३.२३
शिवसेना ७.३९
एकूण ५४.१६ ४३.२३ -१०.९३
आघाडी
पक्ष २०१४ २०१९ वध/घट
काँग्रेस ६.४० ४१.७०
राष्ट्रवादी १८.८५
एकूण ५४.१६ ४३.२३ +१६.४१
बीबीएम व वंचित
पक्ष २०१४ २०१९ वध/घट
बीबीएम १६.७२
वंचीत १२.२१
एकूण १६.७२ १२.२१ -४.४९
शिवसेनेची मते भाजपाला मिळालेली नाहीत तर ती चक्क काँग्रेसला गेलेली दिसत आहेत. (काँग्रेसचा पण पाठिंबा मिळेल असे तोंडी आश्वासन राष्ट्रवादीकडून शिवसेनेला मिळाले होते की काय?) तसेच भाजपाची मतेही ३ टक्के कमी झालेली दिसत आहेत. ही का कमी झाली याचा विचार भाजपाला करावाच लागेल. तर वंचितच्या समावेशामुळे पूर्वीच्या बीबीएमची काही मते (मुख्यत्वेकरून मुस्लिम मते असावीत) काँग्रेसकडे वळलेली दिसत आहेत. याचा अर्थ वंचितमुळे काँग्रेसच फायदाच झालेला दिसून येतो. अन्यथा काँग्रेसची मते ४.४९ टक्क्याने कमी झाली असती. त्यामुळे वंचीत व ओवेसी एकत्र आले तर भाजपाचा फायदा होतो तर वंचीतने ओवेसींची साथ सोडली तर काँग्रेस व राष्ट्रवादीचा फायदा होतो. असाही अर्थ काढता येऊ शकतो. २०१९ ला तरी वंचितमुळे लोकसभेला भाजपाचा व विधानसभेला काँग्रेसचा फायदा झालेला दिसून येतो. काँग्रेसच्या वाढलेल्या १६.४१ टक्के मतांचा असा हिशोब लावता येतो. ------------------------------------- टक्केवारीच्या आधारावरील हायपोथेसीसची उभारणी येथे आणखी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. याच टक्केवारीच्या आधारे बातम्यांचा अर्थ लावता येऊ शकतो. उदाहरणासाठी एका बातमीचा अर्थ लावायचा प्रयत्न करू. लोकसभा निवडणुकांचा निकाल आल्यावर वंचितची आघाडीशी बोलणी चालू असल्याची बातमी आली होती. तसेच वंचितनी ओवेसींचा संबंध सोडल्याचे पण जाहीर केले होते. वंचितने ओवेसींशी संबंध तोडले तरच जागावाटपाबद्दल बोलणी करता येतील अशी एखादी अट आघाडीने वंचितला घातली होती की काय अशी दाट शंका येतीय. त्यानुसार वंचितने ओवेसींशी संबंध तोडल्यावर आघाडीचे काम झाले होते. आता वंचितशी आघाडी करायची जरूरी नव्हती यास्तव त्यानंतर वंचितला फक्त आशेवर ठेवण्यात आले, जेणेकरून वंचितने परत ओवेसींशी संगनमत करू नये. ही फक्त शंका आहे. पण तशीच एखादी गोष्ट परत घडली की दाट शंका येणारच ना? एनडीएशी संबंध तोडले तरच पुढची बोलणी करता येतील अशी अट शिवसेनेला घातली गेली होती. शिवसेनेने पण ती अट पाळण्यासाठी सावंतांना परत बोलावून घेतले. त्यानंतर चर्चेचा घोळ चालू ठेवून शिवसेनेला आशेवर ठेवले. आता भाजपानेच युती तुटली असल्याच जाहीर केल्यावर मात्र सगळंच बदललं आहे. शरद पवारांनी तर स्पष्टच सांगून टाकलंय की, शिवसेनेला सरकार बनवायला पाठिंबा देण्याबाबत त्यांची व सोनियांची अजून चर्चाच झालेली नाही. एक अंदाज असाही आहे की, राष्ट्रवादीला सरकार व्हावं असं वाटतंय. तसे झाले तर राष्ट्रवादी पुढील निवडणुकीपर्यंत आपली ताकद आणखी वाढवू शकेल. तर काँग्रेसला राष्ट्रवादीचा संशय येतोय. निवडणुकी अगोदरच शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये काहीतरी संगनमत झालेले आहे. संगनमत असायला हरकत नाही पण ते संगनमत काँग्रेसच्या मुळावर येत असेल तर काँग्रेसला कसे चालेल. तसे पुरावे मतदान टक्केवारीतून काँग्रेसला मिळाले असावेत. सरकार स्थापन झाले तर आणखी काय काय होईल काय माहीत? मला वाटते यामुळेच युती तुटेपर्यंत सोनियाजी शरदरावांच्या नाटकात काम करत राहिल्या. नंतर मात्र त्यांनी त्यांच्याबाजूने नाटकावर पडदा टाकला. टक्केवारीच्या आधारावरील हायपोथेसीस समाप्त. :)

वाचने 76570
प्रतिक्रिया 176

प्रतिक्रिया

छान विश्लेषण केलेत.. ईथेच परवा कोणीतरी म्हणलं होतं की भाजपाला ८०च्या आत ठेवायचे डावपेच खेळले गेले आहेत. तरीसुद्धा भाजपा १०० च्या पुढे गेला हा मोठा धक्काच आहे. आर्थात तसे असणारच, भाजपा जर ८०मध्ये अडकला असता आणि शिवसेना जर ८० पर्यंत पोचली असती तर एव्हाना शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार स्थापन झाले असते. काँग्रेसला फरफटत त्यांच्यामागे जावे लागले असते. त्यामुळे कदाचित कोंग्रेस आणि भाजपाने संगनमत करुन प्रतिडाव टाकला असेल. परंतु यामध्ये शिवसेनेचे कच्चेपण अधोरेखित होत आहे. एक तर त्यांनी राष्ट्रवादीची कास धरली, परंतु आपल्याला जे हवे आहे ते मिळत नाही म्हणल्यावर तत्काळ मागे परतायचा रस्ता उघडुन ठेवायला हवा होता. पण त्यांनी तर दोर कापून टाकले. कदाचित भाजपाला तेच हवे होते म्हणूनच दिवाळी पहाटला ते वादग्रस्त विधान केले गेले. सामान्यपणे प्रत्येक पक्षात वाचाळवीर ठेवलेले असतात, दिग्विजयसिंघ, उमा भारती, जितेंद्र आव्हाड असे लोक प्रत्येक पक्ष मुद्दाम शत्रूंना अंगावर घ्यायला पोसतो. तसे शिवसेनेने राउतांना पोसणे यात काही गैर वाटत नाही. पण शिवसेना प्रमु़ख त्याच्या सल्ल्याने राजकारण करायला लागले आहेत असा जो संदेश लोकांमध्ये गेला आहे ते शिवसेनेसाठी फार धोकादायक आहे. अवांतर - सद्य परिस्थिती राज यांच्यासाठी फारच अनुकुल ठरणार आहे असे वाटत नाही का? पवार राज यांच्या सभांचे बिल चुकते करत आहेत असे वाटत नाही का?

In reply to by आनन्दा

राज यांनी फार चुका केल्या आहेत. उतावीळपणा फार नडतो आहे. पण याबाबत नंतर लिहीन. टक्केवारीवरून जास्त अभ्यास करायला लागेल असे वाटते. ते एवढे सोपे नसावे. :)

In reply to by आनन्दा

ईथेच परवा कोणीतरी म्हणलं होतं की भाजपाला ८०च्या आत ठेवायचे डावपेच खेळले गेले आहेत. तरीसुद्धा भाजपा १०० च्या पुढे गेला हा मोठा धक्काच आहे. आर्थात तसे असणारच,
कोणीतरी काहीतरी बोलले याला सच्चा मिपाकर कधीच गांभीर्याने घेत नाही असे निरीक्षण होतं. काय बोलतो यापेक्षा कोण बोलले याला जुन्या सदस्यांमधे कमालीचे महत्व असताना आपला प्रतिसाद एक वाऱ्याची सुखद झुळूक आहे असे नम्रपणे नमूद करतो. _/\_

In reply to by आनन्दा

भाजपाला ८०च्या आत ठेवायचे डावपेच खेळले गेले आहेत. तरीसुद्धा भाजपा १०० च्या पुढे गेला हा मोठा धक्काच आहे.?? ?? मेगाभरती ,शिव सेनेला मुद्दाम पुण्यात जागा न देणे

भाजपा निवडणुकीत गफिल राहिली हे वास्तव आहे. पण राजकारण आणी क्रिकेट काहीही घडू शकते.

मायबोलीवरील माझी पोस्ट इथे चिकटवतोय. त्यात धुळे शहराबद्दचे टक्केवारीबाबत लिहिले आहे. @पुरोगामी, १.भाजप व शिवसेना या दोघांनीही एकमेकांचे पाय खेचले या तुमच्या मताशी मी सहमत आहे. २. शिवसेनेने निवडणुक निकालानंतर लागलीच राष्ट्रवादीशी जी जवळीक दाखवायला सुरवात केली त्याचे प्रतिबिंब मतदानात पडले आहे का? ते सध्या तपासत आहे. यासाठी मी वापरत असलेली पध्दत स्पष्ट करतो. अ) २०१४ च्या मतदानाचे प्रतिबिंब २०१९ च्या निवडणुकांत पडलेले असेल तर युतीधर्म अथवा आघाडीधर्म पाळला गेला असे समजायचे ब) जर २०१९ मधे आपल्या जोडीदाराला मते गेली नसतील तर पाडापाडीचा खेळ झाला असे मानायचे. म्हणजे युतीधर्म पाळला गेला नाही असे मानायचे. क) जर २०१९ मधे आघडीची मते युतीकडे किंवा युतीची मते आघाडी कडे गेली असल्यास त्याला नवीन समीकरणे जुळवायचे प्रयत्न समजायचे. याला मी युतीविरोधी अथवा आघाडीविरोधी मतदान एवढेच म्हणणार आहे. आत्तापर्यंत १३ मतदार संघ तपासले. अजून तरी काँग्रेसने आघाडी विरोधी किंवा भाजपाने युतीविरोधी भुमिका घेतल्याचे आढळून आलेले नाही. याउलट ५ मतदारसंघात, राष्ट्रवादीने आघाडीविरोधात किंवा शिवसेनेने युतीविरोधात भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. जेथे युतीधर्म पाळला गेलाय ते मतदारसंघ विचारात घेत नाहीये तसेच जेथे पाडापाडीचीचा खेळ झालाय पण युती अथवा आघाडी विरोधात भूमिका घेतली नाहीये तेही मतदार संघ वगळत आहे. थोडक्यात "क" हा मुद्दाच तपासणार आहे. आता धुळे शहर या मतदानासंबंधात बोलू. २००९ साली श्री. गोट लोकसंग्रामकडून लढले होते व विजयी झाले होते. त्यांना ४३.६७ टक्के मिळाली होती. हा मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने तेथे भाजपाचा उमेवारच नव्हता. शिवसेनेला १३.०३ टक्के मते मिळाली होती. भाजपाची इथली मतपेढी गुलदस्तातच राहिलेली होती. २०१४ साली, भाजपाला इथे चेहराच नसल्याने भाजपाने श्री. गोटे यांना भाजपात घेऊन तिकीट दिले. त्यात श्री.गोटे विजयीही झाले. पण लोकांना त्यांचा पक्षबदल आवडलेला नव्हता. त्यांची टक्केवारी ३७.१४ इतकी कमी झाली होती. २०१९ साली त्यांना भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने ते परत लोकसंग्राममधे गेले. पण लोकांना त्यांचे पक्षबदल आवडलेला नव्हता. खरेतर हे अगोदरच्याच निवडणुकीत लक्षात आले होते. ती नाराजी अजूनच वाढली. त्यांची मते २६.३० टक्के इतकी घसरून ते चक्क तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. २०१४ साली देवरे हे शिवसेनेकडून लढत होते. त्यांना १७.६० टक्के मते होती. पण २०१९ साली सेनेने उमेदवार बदलला. हा बदल शिवसैनिकानाही आवडलेला दिसून येत नाही. शिवसेनेला २०१४ सालात मिळालेली मतेही टिकवता आली नाहीत. शिवसेनेचा उमेदवाराला १३.९ टक्के मते मिळून तो चौथ्या क्रमांकावर फेकला गेला. इथे भाजपाने युती धर्म पाळला नाही असे म्हणता येते पण युतीविरोधात भूमिका घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे वरील "क" मुद्दा इथे लागू होत नाही. परत निवडणुका झाल्यातर? वगैरेच्या तुमच्या इतर मतप्रदर्शनाला टक्केवारीचा आधार तुम्ही दिलेला नसल्यामुले माझ्याकडून पास.

तुमचे विष्लेषण आणि त्यामगिल अभ्यास छान आहे. ( मला २०१४ चा % वाईज डेटा मिळाला नाही, त्यामुळे मला काही असे विश्लेषण देता येइना) तरीही आकडे बोलतात असे जे आपण म्हणतो, ते सगळे तंतोतंत बरोबर चित्र दाखवत असतीलच असे नाही. असे मला वाटते. उमेदवार, बंडखोर उमेदवार, दुसर्‍या पक्शात गेल्यावेळेस असताना पडलेली मते, आणि यावेळी तिसर्‍याच पक्शांकडुन लढताना पडलेली मते ही त्या पक्शाचीच मते आहेत हे म्हणता येणार नाहीच, मागच्या वेळेस पक्ष म्हणुन न पाहता व्यक्ती म्हणुन पडलेली मते या वेळेस ही पडतातच. त्यामुळे पक्षनिहाय % हा उमेदवारावरती पण डिपेंड राहतोच. तसेच खाली मी देतो आहे तशी शक्यता पण त्यातुन दिसतेच.. उदा. साठी तुम्ही दिलेला अहमदनगर शहर हा मतदार संघ घेवुयात. अहमदनगर मतदार संघः(% राउंड फिगर मध्ये घेतलेत) तुमची आकडेवारी खरेच बोलती, पण विश्लेषण मात्र तेच असेल असे ही नाही. आकडेवारी नुसार २०१४ आणि २०१९ मध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला कॉन्ग्रेस आणि राष्ट्रवादी च्या २०१४ च्या ४६ % टक्केवारीयेव्हडी, नव्हे त्यापेक्शा १ % एक्स्ट्रा मते मिळाली . आणि त्यावेळेस शिवसेने ला गेल्यावेळेस पेक्षा जवळ जवळ १० % मते कमी मिळाली, त्यात तुमचे विश्लेषण असे म्हणते की, भाजपा च्या २०१४ च्या २४ % लोकांपैकी १४ % लोकांनी युती धर्म पाळला, आणि राहिलेली भाजपाची मते फुटुन इतर पक्षांना(वएम.आय.एम, वंचित आणि इतर) फायदा झाला. जसे तुम्ही अक्कलकुवा चे उदाहरण देताना, राष्ट्रवादी ने आघाडी धर्म पाळला नाही असे म्हणता आहात , त्याच पद्धतीने भाजपा ने ही युती धर्म पाळला नाही असे खालील विश्लेषणा वरुन का म्हंटले जावु नये ?. असे ही होउ शकतेच विष्लेषण : शिवसेने ला २०१४ च्या वेळेस च्या भाजपा आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना पडलेल्या मतांपेक्षा १० % मते कमे मिळाली, पण भाजपाचीच १४ % मते आता शिवसेनेला मिळाळेत आणि इतर पक्षांना ही भाजपाच्याच फुटलेल्या मतांचा सहारा मिळाळा असे आपण ठोस म्हणु शकत नाही. मला तर असे वाटते कॉन्ग्रेस ची जी १६ % मते होती, त्यातील ७ % मते ही एम.आय.एम. , वंचीत , आणि बसप ला गेली, आणि (वंचीत आणि एम.आय. एम.सोडुन) राहिलेली ९ % मते ही शिवसेनेला गेली. आणि भाजपा ची २४ % पैकी १७ % मते ही राष्ट्रवादीला गेली आणि राहिलेल्या ८ % लोकांनीच फक्त शिवसेनेला मत दिले. ते ही अहमदनगर च्या कटटर हिंदुत्व विरुद्ध मुस्लिम भावनेने जे मत देतात त्यांची. या विश्लेषणाचे कारण असे की. लोकसभेला भाजपाचा गड असणारा अहमदनगर , त्यावेळेस लोकसभेला कॉन्ग्रेस च्या सुजय विखे यांना देवुन तेथील भाजपाचे लोक नाराज केले गेले. त्यामुळे मुळ कॉन्ग्रेस चे असे जे आपण म्हणतो, ते विखे पाटील यांचे मतदार होते आणि त्यांनी यावेळेस राष्ट्रावादीला मदत न करता भाजपा-शिवसेने ला मदत केली कारण राष्ट्र्वादीच्या सर्वे सर्वा शरद पवार यांनी, लोकसभेला, सुजय विखेंबद्दल - दुसर्‍याच्या पोराचा लाड मी का करु असे म्हणुन त्यांना राष्ट्रवादी पक्षात न घेता त्यांच्या विरोधात संग्राम जगताप यांना लोकसभेला उभे केले होते. त्याच संग्राम जगताप यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिल्याने, जे २०१४ ला विखेंना माननारे कॉन्ग्रेस चे मतदार होते त्यांनी युती किंवा वंचित किंवा एम.आय.एम ला मदतान केले. आणि भाजपा च्या मतदारांनी ज्या विद्यमान खासदार असणार्‍या दिलिप गांधी ना नाकारुन कॉन्ग्रेसी असलेल्या विखेंना लोकसभेला उमेदवारी दिली त्यामुळे त्यांच्या विरोधात जो संग्राम जगताप उभा होता त्या व्यक्तीला विधानसभेला म्हणजेच राष्ट्रवादीला वोट दिले ना की युती किंवा शिवसेनेला. (शिवाय २००९ ला शिवसेनेचे जे उमेदवार युती असताना विजयी झाले होते(४०,००० + मतांनी) तेच उमेदवार पुन्हा २०१९ ला युती असताना १०००० पेक्शा जास्त मतांनी पराभुत झाले आहेत.) शिवाजी कर्डिले या भाजपा च्या राहुरी आमदाराचा नगर शहरात दबदबा आहे (गुगल करा), संग्राम जगताप हे त्यांचे जावई. त्यामुळे त्यांच्या संपर्काने भाजपाचे मतदार संग्राम जगतापांकडे वळवले गेल्याची शक्यता आहेच. त्यात विखेंचे प्राबल्य असलेल्या या नगर जिल्ह्यात , भाजपाचे आमदार निवडुन न येण्या साठी शरद पवारांनी सभा घेतल्या, पण संग्राम जगताप यांच्या साठी त्यांनी एकही सभा घेतली नाही, यातुनच ते निवडुन कसे आणि का येतील हे त्यांनी आधीच हेरलेले होते हे सुद्ध दिसतेच. त्यामुळे माझे हेच म्हणणे आहे की, % वर सगळे विश्लेषण बरोबरच करता येत नाही, त्यात तुम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादी हे आधीच मिळालेले आहेत हे गृहितक धरल्याने तुमचे विश्लेषण त्या अनुशंघानेच येत राहणार असे मला वाटते.

In reply to by गणेशा

शिवसेना के दो नेताओं की हत्या मामले में NCP विधायक संग्राम जगताप गिरफ्तार https://www.divyahimachal.com/2018/04/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4…

In reply to by गणेशा

अहो, मी केलेलं विश्लेषणच बरोबर असं मी कुठे म्हणतोय. :) राजकारण एवढ सोपं नसतं हे मलाही मान्य आहे. मी माझं मत मांडलं, तुम्ही तुमचं मत मांडलं. वाचणारे त्यांना जे पटेल ते घेतील. :)

In reply to by शाम भागवत

मुळात नवा आणि जरा भरोस्याचा चेहरा म्हणून सुजय जिंकला ,गुजरात मध्ये हार्दिक पटेल वेळी तेच झाले किंवा राज ठाकरे नवीन होते म्हणून देऊ एक चान्स असे वाटते संग्राम जगताप नंतर ची निवडणूक जिंकले लगेच ,बरोबर?

म्हणून मला इथे सामान्य मिपाकर जो राजकारणापासून लांब असेलही त्यांचीही मते ऐकून घ्यायला आवडतील, संतुलित व सकारात्मक लिखाण करणाऱ्या यशोधरा जी यांनीं इथे व्यक्त होऊन जनमानसाच्या मनाचा अंदाज द्यायला पुढाकार घ्यावा अशी विनंती आहे.

मायबोलीवर टाईप केलेला हा आणखी एक प्रतिसाद विक्रोळी : २००९ साली राज ठाकरेंचा त्रास शिवसेनेला भरपूर झाला. बाळासाहेब हयात असूनही भाऊबंदकीचा प्रश्न सोडवू शकले नाहीत. २०१४ साली मात्र मोदींच्या कृपेने उध्दव ठाकरे राज ठाकरेंवर मात करू शकले. २००९ साली शिवसेना व भाजप युती होती तर राष्ट्रवादी व काँग्रेसची आघाडी होती. तरीही मनसेला मिळालेली मते पाहिली तर राज ठाकरे हा केवढा मोठा प्रश्न शिवसेनेपुढे होता ते लक्षात येईल. मनसे व शिवसेना
पक्ष २००९ २०१४ २०१९
मनसे ४२.८७ १८.९८ १२.५४
शिवसेना २२.७० ३८.२४ ४९.०८
एकूण ६५.५७ ५७.२२ ६१.६२
आघाडी
पक्ष २००९ २०१४ २०१९
राष्ट्रवादी २६.४० १५.३८ २७.३२
काँग्रेस १३.७२
एकूण २६.४० १५.३८ २७.३२
इतर पक्ष २००९ २०१४ २०१९ एलबी ३.१२ ००.०० ००.०० बसपा २.०८ ००.०० ००.०० आरपीआय(ए) ००.०० ५.०३ ००.०० वंचित ००.०० ००.०० ७.१५ भाजपाने इथे कधीच उमेदवार उभा केला नाही. त्यामुळे भाजपाची मते इकडे गेली, तिकडे गेली असं कोणी म्हणत असेल तर माझा पास. मी विरोधही करणार नाही. कारण विरोधी मत मांडायला माझ्याकडे भाजपाचे आकडेच नाहीयेत. Happy मात्र एक नक्की. राज ठाकरेंना काबूत आणायला शिवसेनेला मोदींचा खूप उपयोग झालेला आहे. २०१९ साली तर राज ठाकरेंनी मोदींविरूध्द मोठी आघाडी उघडली होती. परिणाम एवढाच झाला की, राज ठाकरेंची आणखी ६ टक्के मते कमी झाली व शिवसेनेची ११ टक्के मते वाढली. त्यामुळे भाजपाची ५ टक्के मते शिवसेनेला मिळाली असावीत असे मानायला आधार आहे. काँग्रेसची मते राष्ट्रवादीकडे गेलेली दिसत आहेत. काँग्रेसने आघाडीधर्म पाळल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेही भाजपाची मते शिवसेनेकडे गेल्याला पुष्टी मिळत आहे. अन्यथा शिवसेना व राष्ट्रवादींच्या मतातील झालेल्या वाढीचे दुसरे कोणतेच कारण मला मिळू शकले नाही. या मतदार संघात एलबी व बसपा संपल्यातच जमा आहे असे वाटते. थोडक्यात अबनॉर्मल असे फारसे काही या मतदारसंघात घडलेले नाही असे मला वाटते.

मतदानाच्या टक्केवरीबद्दल कोणीच काही बोलत नाही का ? ५५% मतदान ही चिन्तनीय बाब आहे. सुमारे अर्ध्या मतदारांनी मतदान केलेले नाही. महाराष्ट्राची जवळपास २०% लोकसंख्या पुण्यामुंबईत आहे.. तिथे फक्त ४८% !! मात्र पूरग्रस्त कोल्हापूर ७३% !! मतदारांच्या उदासीनतेची परिणती या गलिच्छ राजकारणात होतेय असे वाटत नाही का ?

In reply to by सचिन

नक्कीच , माझ्या ओळखतील्या कित्येक जणांनी निकाल माहितीये ह्या सबबीखाली ट्रीप प्लॅन केल्या आणि सपशेल मतदान टाळलं

भा ज प व शिवसेना बलाबल पक्ष लढविल्या जिंकल्या यशाचे प्रमाण साल शिवसेना ० ० १९८० सेनेला वेगळे चिन्ह नाही भाजपा ? १४ पक्ष लढविल्या जिंकल्या यशाचे प्रमाण साल शिवसेना ० १९८५ सेनेला वेगळे चिन्ह नाही भाजपा ? १६ पक्ष लढविल्या जिंकल्या यशाचे प्रमाण साल शिवसेना १८३ ५२ २८.४ १९९० भाजपा १०४ ४२ ४०.३ पक्ष लढविल्या जिंकल्या यशाचे प्रमाण साल शिवसेना १६९ ७३ ४३.१९ १९९५ भाजपा ११६ ६५ ५६.०३ पक्ष लढविल्या जिंकल्या यशाचे प्रमाण साल शिवसेना १६३ ६९ ४२.३ १९९९ भाजपा ११७ ५६ ४७.८ पक्ष लढविल्या जिंकल्या यशाचे प्रमाण साल शिवसेना १६३ ६२ ३८.०३ २००४ भाजपा १११ ५४ ४८.६ पक्ष लढविल्या जिंकल्या यशाचे प्रमाण साल शिवसेना १६० ४५ २८.१२ २००९ भाज पा ११९ ४६ ३८.६ पक्ष लढविल्या जिंकल्या यशाचे प्रमाण साल युती नाही शिवसेना २८२ ६३ २८.१ २०१४ भाजपा २६० १२२ ४६.९ पक्ष लढविल्या जिंकल्या यशाचे प्रमाण साल शिवसेना १२४ ६३ ५०.८ २०१४ भाजपा १६२ १०५ ६४.८ तात्पर्य -- असे दिसते की भा जपा ला अतिरिक्त यशाचा इतिहास दिसत असला तरी सेनेला जास्त जागा लढायला मिळाल्या आहेत. कदाचित भा जा पा ला त्या त्या जागी उमेदवाराचं मिळाला नसावा ! किंवा सेनेचा हट्टी पणा असावा. आता जरी सेनेचे सरकार आले तरी ठाकरे यांच्याकडे काही जादूची छडी नाही त्यामुळे .. शेतकयांच्या जोरावर शेती क्रान्ती आणून महाराष्ट्राला अग्रेसर नेणे शक्य होईल का हे काळ च ठरवील !

येथले सगळे अंदाज चुकले. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री झालेत. अजित पवार उपमुख्यमंत्री झालेत.

In reply to by पाषाणभेद

अर्थात हे सर्व राजकारणी माझ्यापेक्षा नक्कीच हुशार असणार म्हणा
. ओ, माझा हा अंदाज १०० टक्के बरोबर आला की हो. :) :) :) फडणवीस संपले संपले म्हणता परत येतात. हा निम्मा तरी बरोबर आला की हो.




सत्ता राबवणेसुध्दा त्यांना जमते. त्यांच्या महत्वाकांक्षा लपून राहिलेल्या नाहीत, फक्त हे टायमिंग योग्य होते काय याचा अंदाज येणे अवघड आहे, घोडे बाजार झालाय ती करायची क्षमता भाजपाची होती वगैरे मुद्दे आता गैरलागू आहेत, सत्ता स्थापन होणार असताना आपल्याच पक्षाशी प्रतारणा करून त्यांनी नेमक्या कोणत्या नाराजीला वाट करून दिली आहे हे जाणून घ्यायला आवडेल. बाकी उद्धव ठाकरे बेरकी आहे पण त्यांची सत्ता राबविण्याची क्षमता काय हे जाणून घ्यायची उत्सुकता होती ज्यावर सेनेचे संपूर्ण भवितव्यही पणाला लागले होते, बघुयात काय घडतय ते. फडणवीसांनी धक्का देऊन ते ज्योतिषी आहेत हे सिद्ध केलं ;)

मी अजित पवारांच्या संदर्भात बोलत नसून एक सर्वसाधारण निरीक्षण नोंदवतोय. सर्जिकल स्ट्राईक, ३७० हटवणे, काश्मिरचे विभाजन या मुद्यांवर मोदी विरोधक सर्वच पक्षात वैचारिक मतभेद निर्माण झाले आहेत. स्वातंत्र्यानंतर १५-२० वर्षात जन्म झालेल्या सर्वांचा याबाबतीत मोदींना पाठिंबा दिसून आलाय. एका मोठ्या ध्रुविकरणाचा बीजारोपण झालंय असं तेव्हापासूनच वाटतंय. विशेषकरून ज्यातिरादित्य शिंदेंची व केजरीवालांची याबाबतची भूमिका ऐकल्यावर जास्त जाणवायला लागलंय.

छान विश्लेषण केलेले आहे .. आवडले .. इथेच प्रतिसादाला असतो तर बरे झाले असते .. उगाच चर्चेला धागा काढला .. असो .. मला तरी पवारांच्या हाती एव्हढे आमदार असणे हे धोकादायक वाटते आहे .. ते कधीही करू शकतात .. त्यांचा काहीच नेम नाही ..

जुने नाटक नव्या संचात? या लेखावर आलेली जागता पहारामधली एक काॅमेंट. नितीनNovember 21, 2019 at 9:04 PM मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी २०१७ मध्ये वर्तवलेलं भाकीत खरं ठरण्याची शक्यता आहे. दोन वर्षांपूर्वी नाशिकमधील एका सभेत राज ठाकरेंनी शिवसेनेच्या राजकीय भविष्यावर काही 'विश्वसनीय सूत्रांच्या' आधारे भाष्य केलं होतं की 'भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणुका एकत्र लढवणार आणि निवडणुका झाल्या की शिवसेना राष्ट्रवादी पक्षासोबत जाणार आणि भाजप विरोधी पक्षात बसणार..... हा काय पत्त्यांचा क्लब आहे का? माझे पिसून झाले, आता तुझे पिस म्हणायला’, असं राज ठाकरे म्हणाले होते. ज्यावेळी शिवसेनेचे मंत्री आम्ही राजीनामे खिशात घेऊन फिरत आहोत, असं जाहीरपणे सांगत होते, त्यावेळी राज यांनी हे विधान केलं होतं. म्हणजे उद्धव ठाकरे जे बोलत होते की 'आमचं ठरलंय' ते हे होतं का? जर हे सर्व २ वर्षांपूर्वीच ठरलेले असेल तर निवडणुका कशाला घेण्यात आल्या? असं काही झालंय?

In reply to by शाम भागवत

चला कोणीतरी उद्धव ठाकरे या क्षमतेचेही असू शकतात हे मानत आहे , अन्यथा सगळेच वाचाळसेना पलीकडे सेनेचे अस्तित्वच मानत नाही की काय अशी शँका येणारे प्रतिसाद देत होते.

आपण सगळयांनी ऐकावे असे आज 26/11 हल्ला होउन अकरा वर्ष झाली त्या निमित्ताने शिव अरुर ह्या पत्रकाराने तत्कालिन वायुसेना प्रमुख फली होमी मेजर यांना ज्यांनी यूपीए सरकार ला पाकिस्तानातल्या दहशतवादी अड्डयांवर हवाई हल्ल्यांचा सल्ला दिला होता एक प्रश्न केला कि तेव्हाच्या आणि आताच्या काळात काय बदल झाले आहेत. त्याचे उत्तर आपण अवश्य ऐकावे असे आहे. दुर्दैवाने मि ईथे व्हिडीओ नाही चिकटवु शकत पण आपण तो व्हिडीओ त्यांच्या व्टिटर वर बघु शकता. Shiv:-- What has changed between 26/11 & now ? Fali Homi Major:- Political will to undertake air strikes & intelligence gathering to use air power with sure shot targets has improved. Intelligence gathering बद्दल आपल्या दोन बिंडोक पंतप्रधानांनी (मोरारजी, गुजराल) जेव्हढे नुकसान भारताचे केलेय तेव्हढे नुकसान तर आज पर्यंत पाकिस्तान हि नाही करु शकला आणि त्यांच्या अक्षम्य चुकीने एक्सपोज होउन कित्येक फिल्ड ऐजंट प्राणास मुकले. कठिण परीश्रमाने ती कोव्हर्ट कॅपॅबिलिटि आपण परत मिळवलिय. 26/11 हा दिवस जेव्हा जेव्हा येतो मला धारातिर्थि पडलेले विर आठवतात आणि मनोमन श्रध्दांजलि देतो पण त्याचवेळेस मला आणखी काहि तरी आठवत... कॉंग्रेस पक्षाचे थोर नेते "टंचमाल" ह्या शब्दाचे उध्दारक दिग्विजय सिंह ऐका पुस्तकाचे विमोचन करत आहेत सोबत व्यासपीठावर किरपाशंकर सिंग, थोर दिग्दर्शक महेश भट ज्याच्या मुलाने अप्रत्यक्ष पणे ह्या हल्लयासाठि दाउद हेडलि ला रेकी करायला मदत केलि होति.. असे पुस्तक ज्यात म्हटलय की 26/11 हल्लयामागे पाकिस्तान नसुन हे भारतीय लोकांचेच षडयंत्र आहे. कसाब जिवंत पकडल्या गेला हे आपले नशिब.

जबरदस्त ध्रुविकरण झालय. महाराष्ट्रात आता भाजप व भाजप विरोधी असे दोनच पक्ष शिल्लक राहिले आहेत. हे झाल्याशिवाय भाजप वाढूच शकत नव्हता. मला स्वत:साठी पैसे न खाणारा मुख्यमंत्री हवा होता. सगेसोयऱ्यांची संपत्ती न वाढवणारा मुख्यमंत्री हवा होता. त्यासाठी फडणवीस पाहिजे होते. दुसरा नंबर होता पृथ्विराज चव्हाणांचा. ते पण सुसंस्कृत व स्वच्छ होते. उध्दव ठाकरेही तसेच असतील तर मग माझा त्यांनाही पाठिंबा असेल. कोणही येवो. त्याने महाराष्ट्राचे भले केले पाहिजे. आता मात्र पुढच्या निवडणुकीपर्यंत शांत बसून राहणे. _/\_

In reply to by शाम भागवत

मला 1) रोजगार निर्मिती 2) मूलभूत सोयीसुविधा वेगाने उभ्या करणारे 3) दहशतवादा विरोधात कणखर लढा देणारे सरकार हवे होते भाजपा यातील 2, 3 या मुद्यावर 100% खरे ठरले. मुद्दा क्रमांक 1 वर ते 200% अपयशी ठरले. पण मूलभूत रोजगाराचा प्रश्न न सोडवता आल्याने उरलेले मुद्दे पिरॅमिडच्या वरील स्तरातील असल्याने भाजपला सपशेल बहुमत मिळावे असे मला वाटतं न्हवते, दुर्दैवाने त्यांना विरोधात बसावे लागते आहे असो, जनादेशाचा अनादर योग्य नाही म्हणून येणाऱ्या सरकार ला शुभेच्छा आणी अपेक्षा मिपाच्या माध्यमातून पोचत्या करतो.

In reply to by जॉनविक्क

रोजगार निर्मिती ही म्हटलं तर सरकारच्या अखत्यारीतील, आणि म्हटलं तर बाहेरील गोष्ट आहे. सरकार उद्योगासाठी पूरक वातावरण निरमण करू शकते. उद्योग चालवणे बाहेरील लोकच करतात. कालच माझी या विषयावर चर्चा झाली एकासोबत. कॅश इकॉनॉमी आता परत वाढायला लागली आहे, काळा पैसा देखील वाढायला लागला आहे, पण या सगळ्याचा फायदा म्हणून नोटांबंदी आणि जीएसटी चे परिणाम कमी होऊ लागले आहेत, त्यामुळे रोजगार वाढतोय. सरकारला सगळे माहीत असूनदेखील ते काहीही कारवाई करू शकत नाहीत, कारण त्यामुळे हळूहळू का असेना अर्थव्यवस्था रुळावर येतेय. नोटांबंदी हे खूप मोठं पाऊल होत. यातले दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. उचचपदस्थ लोकांच्या हातात जी माहिती असते ती आपल्या हातात नसते, त्यामुळे आपण फक्त अंदाज बांधू शकतो. मध्यंतरी एक अशी पण चर्चा होती की बंद केलेल्या नोटांपेक्षा कितीतरी जास्त रकमेच्या नोटा RBI कडे आल्यात, त्यामुळे ते लोक हे जाहीर करायला पण तयार नाहीयेत, कारण ते कायदा सुव्यवस्था राखण्यात आलेले दीर्घकालीन अपयश दाखवते, ज्याचा वाईट संदेश आंतरराष्ट्रीय पातळीवर जाऊ शकतो. असो, हल्ली सोशल मीडियामुळे कॉन्स्पिरसी पण जास्त आणि विश्लेषण पण.. खरं खोटं शोधणं खूप कठीण झालंय. त्यामुळे शेवटी कोणावर तरी विश्वास ठेवावाच लागतो.

In reply to by जॉनविक्क

जानराव आपण म्हणतात की मला 1) रोजगार निर्मिती 2) मूलभूत सोयीसुविधा वेगाने उभ्या करणारे 3) दहशतवादा विरोधात कणखर लढा देणारे सरकार हवे होते भाजपा यातील 2, 3 या मुद्यावर 100% खरे ठरले. मुद्दा क्रमांक 1 वर ते 200% अपयशी ठरले. जर आपल्या मते मूलभूत सोयीसुविधा वेगाने उभ्या करण्यात सध्याचे सरकार 1००% यशस्वी ठरलेयत आणि तरीही तेच सरकार रोजगार निर्मितीत सपशेल म्हणजे २00% अपयशी आहे तर मग मूलभूत सोयीसुविधा उभ्या कोण करतायत? कुठल्याही सरकारने "रोजगार निर्मिती" करणे म्हणजे नेमके आपल्याला काय अपेक्षित आहे? सरकारी? निमसरकारी? खाजगी (कुशल) ? खाजगी (अकुशल) ? गेल्या वर्षभरात आपल्या आसपास आपणास असे किती बेरोजगार तरुण आढळलेत की जे आपल्या मते कार्यकुशल, शिक्षित असुनहि चपला झिजेपर्यंत फिरलेयत पण अजुनहि "रोजगार" मिळालेला नाही? अंदाजे आकडा? तुम्हि कधी Employment Exchange Card काढलेय किंवा Employment Exchange च्या चकरा मारल्यात का? SBI किंवा तत्सम राष्ट्रीयकृत बॅंका, BSNL, महावितरण, रेल्वे ईत्यादि मध्ये अतिकुशल किंवा कुशल ह्या खाली मोडणार्या विनम्र लोकांचा आपण कधी अनुभव घेतलाय का? 1991 ला आपण Economy ला ओपन करुन हि आजही आपण Capitalism आणि Socialism ह्याच्यामध्येच का घोटाळत आहोत? बाय द वे आपणाला टिव्हि वर जाहिराती चे दर माहित असतिल... आमचे येवले ह्यांच्या अमृततुल्य चि जाहिरात बघितलिय का? खुप प्रश्न विचारलेत तुम्हाला साथ होईल तसे उत्तर द्या. हां आणि गैरसमज नका करुन घेवु.

In reply to by जॉनविक्क

रोजगार निर्मिती यावर उत्तर द्यायचेय, पण आज नेमके कोथरूड भागातील विजपुरवठा बंद आहे.

In reply to by शाम भागवत

म्हणजे आज रोजच्यासारखं दुपारी गार नाही? अवांतर : आघाडी आल्याआल्या विजेचा खेळखंडोबा सुरू झाला असे नमूद करू इच्छितो!! (ही तद्दन फालतू कमेंट आहे याची मला पूर्ण कल्पना आहे)

In reply to by शाम भागवत

मि सुध्दा ह्या प्रकाराला वैतागलो असुन आम्ही मजल दर मजल करीत पार मुख्यमंत्र्या पर्यंत धडक मारलिय पण कसले काय ;) आमच दिया सण अंधारात गेला तब्बल चोविस तास विज नव्हति तेंव्हा आम्ही मुख्यमंत्री ह्यांना देखिल साद देवुन पाहिली. @MAHADISCOM and @Dev_Fadnavis मा. मुख्यमंत्री साहेब नमस्कार महोदय पुणे शहर स्मार्ट शहर व्हावे ही आपलि कल्पना छान होती आणि ति एक कल्पना म्हणुनच रहावि ह्याची दक्षता XXX XXX पुणे क्षेत्रातिल आळशी, कामचुकार, अकुशल आणि निगरगट्ट विज कर्मचारी घेतायत त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आपण करावे ही सदिच्छा.

In reply to by शाम भागवत

उद्धव ठाकरे मला पाहिजे होते तसे निघाले नाहीत. पृथ्विराज बाबांचा पत्ता कापला गेलाय. फडणवीस आले आहेत. वीज व पाण्यावर ते काम करायचं म्हणताहेत. त्यासाठी नदीजोड व सौर उर्जा वर भर देणार आहेत. त्यातून शेतकऱ्यांना पाणी व २४ तास वीज द्यायचं म्हणताहेत. तसे झाले तर शेतीचे बरेच प्रश्न सुटू शकतील. आज शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवढ्यामुळे उद्योगांना महाग दरात वीज द्यावी लागते आहे. ते थांबेल. सौर उर्जची वीज ३ रुपयांनी उपलब्ध झाल्याने कारखान्यांना स्वस्तात वीज उपलब्ध होईल. वीज, पाणी व महाराष्ट्राच्या मध्यातून जाणारा समृध्दी महामार्ग व वाढवण येथील जास्त क्षमतेचे नवीन बंदर यांमुळे अविकसीत भागात कारखाने उभे राहण्यास मदत होईल असे वाटते आहे. या सर्व अनुकूलतेमुळे एफडीआय खूप मोढ्या प्रमाणांत येईल असे वाटते आहे. शिंदेंनी सुरू केलेल्या लाडकी बहीण वगैरे योजना खर्चिक आहेत. तरीही अजून आपले कर्ज महाराष्ट्राच्या जीडीपीच्या २१-२२ टक्के इतके असल्याने धोका रेषेच्या (25 टक्के) खाली आहे असे म्हणता येईल. जर जीडीपी वाढला तर ही टक्केवारी घसरू शकेल. आता ५ वर्षे बघायचे काय होतंय ते. शुभं भवतु 🙏

In reply to by शाम भागवत

मागच्या ७.५ वर्षे सत्ता होती. गुजरातला प्रकल्प पाठवण्या व्यतिरिक्त काहीही दिवे लावले नाहीत, पुढेही काही लागणार नाहियेत. रच्याकने लॉसच्या धक्क्यातून बाहेर आल्याबद्दल अभिनंदन.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

फडणवीसांच्या निवडणूक निकालांच्या आधीच्या मुलाखतींप्रमाणे मागील वर्षी देशातील एकूण FDI पैकी ५२% महाराष्ट्रात आली आणि त्याच्या आधीच्या वर्षी ४८%. आणि महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. माविआ सरकारच्या काळात हा क्रमानं ६ वा होता पण त्या आधी पहिला होता. हा डेटा सार्वजनिकरित्या उपलब्ध असला पाहिजे , तो बघितला तर दूध का दूध आणि पानी का पानी होऊन जाईल. या दुव्यानुसार हा दावा बराचसा योग्य दिसतोय . किंबहुना या वर्षी गुजराथच्या ८ पट जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात दिसत आहे. परंतु मी नीट वाचले नसेल किंवा हा दुवा विश्वाहार्य नसेल तर अधिक माहिती जाणून घेण्यास हरकत नसावी.

In reply to by टीपीके

माहिती बद्दल धन्यवाद... तुमची माहिती खरी असेल तर, काही लोकांना ती रुचेल असे वाटत नाही, विशेषतः शाकाहारी अंडे पण असते, ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणाऱ्या मंडळीना..

In reply to by मुक्त विहारि

असू दे हो. मला व चंसूकु यांना बऱ्याच वेळेस अनेक गोष्टी टेबलावर आणण्यास त्यांची मदत झाली आहे. सुबोध खरे पण बऱ्याच वेळेस महत्वाची माहिती पुढे आणत असतात. गुरूजीपण बऱ्याच वेळेस खूप संदर्भ देत असतात. जर काही लोकांनी विरोधाची भूमिका घेतली नसती तर बऱ्याच गोष्टी पुढे आल्या नसत्या. असो.

In reply to by टीपीके

@टीपीके, मी अभ्यासासाठी RBI ने 2000 सालापासून प्रकाशित केलेली माहीती घेतली होती. त्यामुळे अगोदरचे कॉंग्रेस + राष्ट्रवादीचे सरकारची कामगिरी पण तुलनेसाठी उपलब्ध होणार होती. तसेच मला सगळे आकडे डॉलरमधे पाहिजे होते. अन्यथा रुपया घसरल्याने कामगिरी सुधारलेली वाटली असती. तो संदेश तुम्हाला इथे पाहता येईल. मविआच्या काळात एफडीआय मधे महाराष्ट्र मागे पडला. याचाच अर्थ जगातील उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणूक करायला तयार नव्हते कारण त्यांना महाराष्ट्रातले वातावरण उद्योगपूरक वाटत नव्हते. गंमत म्हणजे विरोधक सुध्दा महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजराथेत पळवले असा आरोप करून याला पुष्टीच देत असतात. पण त्या विरोधकांनाही हे कळत नाही की असे बोलून आपणच मविआ सरकारच्या काळात उद्योगपूरक वातावरण नव्हते हे सांगत असतो. असो. ज्यांना कळायचा त्यांना मुद्दा नीट कळेल. मला तेवढेच पाहिजे आहे.

In reply to by शाम भागवत

म्हणजे एकूणच
गुजरातला प्रकल्प पाठवण्या व्यतिरिक्त काहीही दिवे लावले नाहीत
हा फक्त खोटारडेपणा आणि प्रपोगंडा आहे का? खरी परिस्थिती अगदी उलट आहे का?

In reply to by टीपीके

२-४ उद्योग नक्कीच गेले. कारण मविआ सरकारने काही हालचालच केली नाही. किंवा विरोध केला. परदेशी उद्योजकाला भेटच नाकारली. कोणते सरकार जास्त सवलती देते त्यावर उद्योजक निर्णय घेतात. इथे व्यावसायिक पघ्दतीनेच उद्योजकांना हाताळायचे असते. उद्धव ठाकरे तिथे कमी पडले. मला बजेटमधलं काही एक कळत नाही हे एका उद्योजकांच्याच बैठकीत उद्धवजी बोलले होते. अंबानीही हसले होते. हे पळवणे वगैरे म्हणणे चुकीचे आहे. पण सर्वसामान्याला सांगायला सोपे जाते म्हणून त्या आधारे केलेले राजकारण आहे.

In reply to by शाम भागवत

अच्छा, म्हणजे हे गुजराथला उद्योग जाणे हे मविआ च्याच काळात झाले तर, म्हणजे या तर चोराच्या उलट्या बोंबा. खरंच फार हिम्मत लागते अशा बोंबा मारायला. ठीक आहे, शेवटी राजकारण म्हंटले की अशी हिम्मत दुर्दैवाने (आपल्या) असायलाच पाहिजे.

In reply to by टीपीके

हे सगळे मुद्दे मविआच्या गळ्यात बांधता येतील. पण एवढं सविस्तर ऐकायला सामान्यांना वेळ नसतो किंवा कुवत नसते. सोमीवर मांडायला सोपं सोपं लागतं. उदा. आंतराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र (IFSC) म्हणे गुजराथला पळवलं. ही खूप जूनी गोष्ट आहे. मोदींनी मुमं असताना ह्याची योजना गुजराथेत आणली. महाराष्ट्रालाही हे पाहिजे होते. मग मुंबईत उभारणी करायला महाराष्ट्रात परवांगी मिळाली. पण नंतरच्या १५ वर्षात कॉंग्रेस+ राष्ट्रवादीने काही केलंच नाही. मोदींनी मात्र सोडलंनाही. इतकी जुनी गोष्ट आहे ही, जाऊ दे. खणायचं म्हटलं तर बरच खणता येईल. पण त्याचा फारसा उपयोग सर्वसामान्यांना पटवण्यासाठी होणार नाही. शेवटी कष्ट व त्याचा उपयोग हे गणीतही पहायला लागतं. :)

In reply to by शाम भागवत

कारण मविआ सरकारने काही हालचालच केली नाही. सहमत, वेदांता फॉक्सकॉन पळवल्यावर मविआ चे मामू एकनाथ शिंदेनी सांगितले होते ना? मोदीजी ह्याहून मोठा देणार आहेत म्हणे प्रकल्प?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

हे जर समजत असेल तर, प्रकल्प एका राज्यातून दुसऱ्या राज्यात का जातात? किंवा आधीच दुसरे राज्य का निवडतात? हे नक्की समजेल. बाय द वे, तुम्हाला प्रतिसाद देताना, वेळ कसा निघून जातो? तेच कळत नाही. बेड रीडनचे दुःख कमी होते. तुमच्या इतके मनोरंजन तर परमपूज्य राहुल गांधी पण करत नाहीत...

In reply to by मुक्त विहारि

टाटा चा एवढा मोठा उद्योग प्रकल्प सिंगूर हुन गुजरात मध्ये का गेला याचे साधे विश्लेषण केले तर लक्षात येते कि सत्तेत असलेल्या माणसाला आपल्या राज्याच्या भविष्याची चिंता असली तरच राज्याचा विकास होतो. जय भवानी टाक खंडणी अशी घोषणा असलेल्या मुखमंत्र्यांकडून उद्योग काय अपेक्षा करणार?

In reply to by शाम भागवत

महाराष्ट्रात मोठे उद्योग यावे म्हणून यांनी नक्की काय केले? उलट अंबानीसारख्या मोठ्या उद्योजकाच्या घरासमोर स्फोटके ठेवायचा कट त्यांच्या काळात मुंबई पोलिस आयुक्तालयातच शिजला. कोणताही महत्वाचा प्रकल्प येणार असेल तर त्याला हे विरोध करणार- मग तो नाणार प्रकल्प असो, बारसू असो की जैतापूर असो. फडणवीसांनी पहिल्या टर्ममध्ये ज्या महत्वाकांक्षी समृध्दी महामार्गाचे काम सुरू केले त्याला त्यावेळेस यांनी विरोध केला होता. हे सत्तेत आल्यावर (खरं तर अनैतिक मार्गाने सत्ता ढापल्यानंतर) त्यांनी त्या समृध्दी महामार्गाचे नाव हिंहृसम्राट बाठा महामार्ग असे ठेवायचा हलकटपणाही करून दाखवला. मुंबईत मेट्रोलाही विरोधच केला. म्हणजे जिथेतिथे काही चांगले होणार असेल त्याला हे विरोध करणार असतील तरी मग प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले तर उलटी बोंब मारण्यातही पुढे असतात. उबाठासेना नावाचा घाणेरडा प्रकार लवकरात लवकर महाराष्ट्राच्या राजकारणातून पूर्णपणे अस्तंगत व्हायला हवा.

@जॉनविक्क रोजगार निर्मिती वरील तुम्ही माडलेल्या मुद्यांबाबत. १. भांडवलाचा पुरवठा जेव्हा होतो तेव्हा उद्योगधंदे वाढतात. आपोआप रोजगार वाढतो. भांडवल आकर्षीत करण्यासाठी उद्योगपूरक परिस्थिती असणे आवश्यक असते. ती एका रात्रीत निर्माण करता येत नाही. तसेच उद्योगाला प्रोत्साहित करण्याची दिशा एखाद्या वर्षीच दिसून चालत नाही तर त्यात सातत्य आहे की नाही हेही आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दृष्टीने महत्वाचे असते. त्यामुळे भांडवल आकर्षीत करण्यासाठी सरकारने काय केले हे तपासायला लागते. ह्यासाठी Ease of doing business index चा विचार केला जातो. भारताचे या इन्डेक्स मधले स्थान खालच्या तक्त्यात दिले आहे. तसेच तुलना करण्यासाठी चीनचेही दिले आहे. चीन मधील वाढती गुंतवणूक, वाढता व्यापार, वाढता रोजगार व वाढता जीडीपी व त्यांचा या इंन्डेक्समधील नंबर याचा संबंध पाहिला तरी भारत सरकार कुठे कमी पडत होता ते लक्षात येईल. तसेच वरील तक्त्यावरून २०१४ ते २०१९ पर्यंत सरकारने काय केले ते तपासता येईल. तसेच अगोदरचे सरकार कुठे कमी पडत होते, तेही लक्षात येईल.
देश २००९ २०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८ २०१९
भारत १३३ १३४ १३२ १३२ १३४ १४२ १३० १३० १०० ७७ ६३
चीन ८९ ८७ ९१ ९९ ९६ ८३ ८० ७८ ७८ ४६ ३१
यावर्षी कामगार कायद्यात बरीच सुधारणा सरकार करत आहे. त्यामुळे पुढच्या वर्षी हा क्रमांक आणखी सुधारणार आहे. माझे मतः रोजगार वाढावा, भारतात भांडवल आकर्षीत व्ह्यावे यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असे मला वाटते. त्यामुळे रोजगार वाढतच जाईल असे वाटते. . २. रोजगार वाढवण्यासाठी गृहबांधणी, रस्ते बांधणी व वाहन उद्योग हे तीन अत्यंत महत्वाचे उद्योग समजले जातात. यातील रस्ते बांधणीमधे सरकार प्रयत्नात कमी पडते आहे असे मला वाटत नाही. गृहबांधणी मधे काळा पैशाचा खूप मोठा उपयोग केला जात होता. नोटबंदीनंतर तो वापर थांबल्यामुळे या क्षेत्रावर खूप मोठा परिणाम झाला आहे. तसेच रेरा कायद्यामुळे पूर्वी सारखे हम करे सो कायदा ही प्रवृती असलेल्या लोकांना धंदा करणे अवघड झालेले आहे. आपण बर्‍याच वेळेस असे वाचत असतो की, अनेक फ्लॅटस रिकामे पडून आहेत. विकले जात नाही आहेत. असे का घडते? ज्या घरांची मागणी आहे, त्याचाच पुरवठा केला जात नाहीये, अशी माझी समजून आहे. मी याबाबत काही प्रश्न स्वत:लाच विचारले. त्या प्रश्नाच्या उत्तरातून माझी अशी समजूत झालेली आहे. अ) एक १५०-२०० चौ.फूटाची खोली व संडास बाथरूम अशा पध्दतीची घरे बांधली तर ती पडून राहतील का? ब) भारत स्वतंत्र झाल्यावर जर मुंबई पुण्यात अशा प्रकारची लाखो घरे उभी राहीली असती किंवा भाड्याने मिळू शकली असती तर झोपडपट्टी वाढली असती का? क) भाडे नियंत्रण कायद्यामुळे अशा प्रकारची घरे भाड्याने मिळत होती तो पर्यायही बंद झाला. परवडणारी घरे बांधणे व भाडयाने देणे हा उद्योग पूर्णपणे बंद झाला. चाळी बांधणे बंद झाले. ज्या जागेत १००-२०० जण राहात असत, तेवढ्याच जागेत ५०-६० माणसे राहू लागली. परवडणारी घरे बांधणे हाच यावर उपाय आहे. भारतीय जनतेची क्रयशक्ती विचारात घेता, ७० टक्के लोकसंख्येला ह्याचीच जरूरी आहे. ड) आजही पुढारलेल्या जगात घरे भाड्याने देणे हा व्यवसाय आहे. पण भारतात गृहनिर्माण क्षेत्रावर कायम राजकारण्यांचा, गुंठामंत्र्यांचा प्रभाव राहिलेला आहे. आलिशान गृहनिर्मितीमधे जास्त नफा असेल, तर सर्वसामांन्यासाठी घरे कोण कशाला बांधेल? आणि राजकारणी तरी त्यासाठी नियम का बनवतील? माझे मत: ही परिस्थीती योग्य प्रकारे बदलत आहे. स्वस्त घरबांधणी उद्योग जसा वाढेल तसा त्याचा परिणाम रोजगारावर नक्कीच होईल. वाहन क्षेत्रः अ) यातील मंदी ही बीएस६ या नियमांमुळे आलेली आहे. तसेच इलेक्ट्रीक दुचाकी धोरणांमुळे आलेली आहे. जर नवीन पध्दतीची वाहने येणार असतील तर ग्राहक थांबायची शक्यता वाढते. त्यामुळेच तात्पुरती मंदी आल्यासारखे वाटत आहे. ब) जर नवीन प्रकारची वाहने निर्माण करायची असतील तर जुन्या प्रकारच्या वाहनांची निर्मीती कमी करायलाच लागते. अन्यथा ती पडून राहतील. थोडक्यात उत्पादन कमी होणार हे कोणालाही कळेल. त्या सर्वांचा परिणाम रोजगार, जीडीपी वगैरे सगळ्यावरच होणार. पण हा सर्व प्रकार काही काळासाठीच असेल असे मला वाटते. क) २०१९ सरकारला मोदी सरकार येणार नाही व ही धोरणे बदलतील असा अनेकांचा अंदाज होता. मात्र मोदी परत आल्याने व धोरणे राबवण्यात कठोर असल्याने सर्वांची धावपळ उडालेली आहे. त्यामुळे परिस्थिती वेगाने बिघडली असावी अशी मला शंका आहे. मात्र २०२० साली ही परिस्थिती पूर्णपणे बदलेल असे वाटते. आपोआप रोजगाराला चालना मिळेल असे वाटते. एक निरिक्षण: वाहन उद्योग मंदीचे डांगोरा पिटून वाहन उद्योग सवलती मागत होता. जीएसटी कमी करा. रोड टॅक्समधे सवलत द्या. वगैरे वगैरे. राहूल बजाज यांच्या प्रतिक्रियेवरून माझे हे मत बनले. थोडक्यात सवलतींच्या आधारे उद्योग टिकवण्याची नफा वाढवण्याची जुनी पध्दत, याच्या बरोबर उलट जे स्वातंत्र्यानंतरच्या काही वर्षांनी जन्माला आले आहेत ते म्हणतात. नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे मागणी निर्माण करायच्या ऐवजी सवलती मागून मागणी वाढवणे गैर आहे. राहूल बजाज यांच्याच सुपुत्रांच्या प्रतिक्रियेवरून. अर्थमंत्र्यांच्या कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या संबंधात ते म्हणतात. नवीन इलेक्ट्रीक स्कूटर निर्मीतीसाठी नवीन लाईन तयार करणे खर्चिक होते. अंदाजे ५०० कोटींचा खर्च येणार होता. त्यामुळे आहे त्या लाइनवरच काहीतरी थातूरमातूर सुधारणा करून ही निर्मीती करणे भाग होते. पण हा सगळाच प्रकार धेडगुजरी होता. अर्थमंत्र्यांनी जी करसवलत दिली आहे त्यामुळे यावर्षी आमचा ५०० कोटींचा टॅक्स वाचणार आहे. त्यामुळे आम्ही नवीन लाइन उभी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आम्ही आता आणखी चांगले प्रॉडक्ट बाजारात आणू शकू व तेही खूपच कमी वेळेत. मला वाटते वाहन उद्योगाबाबत मते बनवण्यासाठी वरील प्रतिक्रिया उपयोगी पडू शकेल. माझे मतः मी तरी वाहन उद्योगबाबत आशावादी आहे. ३. सरकारने आरसीइपी वर सही न करण्याचे धोरण स्विकारले. मेक इन इंडियावर खूप मोठा सकारात्मक परिणाम होणार आहे असे माझे मत आहे. चीन कडून होणार्‍या आयातीमुळे आपल्या इथले उद्योगधंदे बंद पडत होते. चीन त्याचा माल डंपिंग करत आहे हे लक्षात येऊनही आपण काही करू शकत नव्हतो. कारण हे सिध्द करणे सोपे नसते. भारतात लोकशाही असल्याने सरकारने उद्योगांना सवलती दिल्यातर त्याचा शोध घेता येतो. याउलट चीनने त्यांच्या उद्योगांना मदत केली तर मात्र आपण ते पुराव्या निशी मांडू शकत नाही. कारण एकच चीनची अर्थव्यवस्था बंदिस्त आहे. विनिमयाचा दरही चीन एकतर्फी ठरवते. हे म्हणजे एकाने (लोकशाही देशाने) सर्व नियम पाळावयाचे व त्याचे पुरावेही ठेवायचे. तर दुसर्‍याने (बंदिस्थ अर्थव्यवस्था) मात्र आम्ही सर्व नियम पाळतो असे घोषीत करून त्यावर इतरांनी विश्वास ठेवलाच पाहिजे असे सांगायचे. अशा प्रकारची स्पर्धा काय उपयोगाची? यात भारताची रोजगाराची वाट लागणार हे नक्कीच. तो प्रकार आता बंद होऊ शकेल. चीनच्या आयातीमुळे किती उद्योगधंदे बंद पडले याबाबत कोणी बोलत नाही. मात्र कांदा आयातीमुळे इथला शेतकरी मरतो त्याला मात्र मिडिया खूप प्रसिध्दी देते. मला वाटते मिडियाने असा सापत्न भाव दाखवू नये. एक उदाहरण देतो. इन्डोसोलर नावाची एक कंपनी आहे. २०१० साली सरकारने जाहीर केले की, सोलर एनर्जीमधे जो १००० कोटीची गुंतवणूक करेल त्याला २५ टक्के सरकार सबसिडी देईल. या कंपनीने तशी गुंतवणूक केली. पण सरकार २५० कोटी कंपनीला देऊ शकली नाही. मुक्त व्यापाराच्या करारावर सह्या केल्याने सरकार ती मदत देऊ शकली नाही. कंपनी कोर्टात गेली. हायकोर्टाने कंपनीच्या बाजूने निकाल दिला. तरीही सरकारने ती मदत आजतागायत दिलेली नाही. सुप्रिम कोर्टात काही अडलेय का ते माहीत नाही. परिणाम असा झाला की, कंपनीचे कर्ज २५० कोटींनी कमी न झाल्याने त्यावरचे व्याज कंपनीच्या बोकांडी बसले. यातच चिनचे सोलर पॅनेल आयात होऊ लागले. कंपनीच्या रॉ मटेरियलच्या खर्चात चीन फिनीश प्रॉडक्ट पुरवू लागली. कंपनीन अँन्टी डंपिंगची प्रक्रिया सुरू करण्याची विनंती सरकारला केली, पण उपयोग झाला नाही. कंपनी तोट्यात व नंतर दिवाळखोर बनली भारतातील अनेक कंपन्या अशाच पध्दतीने दिवाळखोर बनल्या आहेत. तर त्यामुळे भारतीय बँकिंग उद्योगाची वाट लागली आहे.

शाम सर उत्तम _/\_ तुर्तास ऐवढेच लिहु शकतोय.

व्यवसाय सुलभतेचा निर्देशांक आणि पायाभूत सुविधांचा संबंध थोडाफार असू शकतो परंतु सरकारी परवानग्या, किचकट कार्यप्रणाली, राजकीय स्थैर्य वगैरे गोष्टी यावर प्रभाव टाकतात. हा निर्देशांक चांगला आहे म्हणून उद्योग सुरु होतीलच असे नाही. उदा. फडणवीस सरकारने काम करायला सुरवात केल्या केल्या आयफोनची अमेरिकेबाहेरची सर्वात मोठी फ्याक्टरी महाराष्ट्रात उभारण्याचा करार केला. त्याची अजून कुदळ देखील पडल्याचे कोणी ऐकले नाही. बी एस ६ ला अनुकूल असलेली वाहने घेण्यासाठी कोणी थांबून राहणार असले असते तर असा प्रकार प्रत्येक नवीन मानांकन लागू होण्यापूर्वी झाला असता. अशा नवीन मानांकनासाठी प्रवासी वाहने घेणारे थांबून आहेत हे एकवेळ तुमच्या समजुतीसाठी गृहीत धरू. परंतु व्यावसायिक त्यासाठी थांबून राहतील अशी शक्यता नाही. तेच गृहनिर्माणाच्या बाबतीत. उच्च राहणीमानाची घरे काही नव्याने बांधली गेली नाहीत. जाता जाता: आजच अर्थमंत्र्यांनी विकासाचा वेग कमी झाल्याचे मान्य केले आहे परंतु मंदी आहे हे त्या मान्य करायला तयार नाहीत. चला अर्थव्यवस्थेचा पोपट मेला आहे हे सरकारी पातळीवर मान्य करण्याची सुरुवात झालेली आहे.

सर टोबी, तुम्ही मांडलेल्या मुद्यांच्या अभ्यासासाठी काही आकडेवारी दिली असती तर तुमचे म्हणणे समजून घ्यायला मला मदत झाली असती. पण तुम्ही फक्त निकर्ष मांडले आहेत. काही हरकत नाही. आपण तुमचे म्हणणे आकडेवारीनुसार तपासून बघू. १) व्यवसाय सुलभता निर्देशांक चांगला आहे म्हणून उद्योग सुरु होतीलच असे नाही. हे तुमचे म्हणणे मान्य. आयफोनचे दिलेले उदाहरण ही मान्य. पण या एका उदाहरणावरून भारतात भांडवल आलेच नाही. गुंतवणूक आलीच नाही. उद्योग सुरू झालेच नाही हा तुमचा निष्कर्षाला आकडेवारी साथ देत नाहीये. मी गुंतवणूक करण्याच्या घोषणांबद्दल बोलतच नाहीये. तर प्रत्यक्षात आलेल्या गुंतवणूकीबद्दल बोलतोय.
सगळे आकडे अब्ज डॉलरमधे आहेत. हे आकडे प्रत्यक्षात आलेल्या भांडवलाचे आहेत. परदेशातील भारतीयांकडून आलेले पैसे यात समाविष्ट नाहीत. कारण त्याचा व्यवसाय सुलभतेशी संबंध नसतो.
२००० ते २०१२ पर्यंतच्या १२ वर्षात, भागभांडवल म्हणून आलेली एकूण एकत्रीत गुंतवणूक १७०.२९
आर्थीक वर्षप्रत्यक्षात आलेले भांडवल
२०१२-२०१३२३.००
२०१३-२०१४२४.३०
२०१४-२०१५३०.९३
२०१५-२०१६४०.००
२०१६-२०१७४३.४८
२०१७-२०१८४४.८६
२०१८-२०१९४४.३५
२०१९-२०२०१६.३३ फक्त पहिल्या ३ महिन्यांचा आकडा आहे. आत्तापर्यंतच्या तिमाहीतील हा सर्वात मोठा आकडा आहे. अजून ९ महिन्यांचे आकडे यात मिळवल्यावर हा आकडा आणखीन मोठा होऊ शकतो.
२००० ते जून २०१९ पर्यंतच्या १९ वर्षात, भागभांडवल म्हणून आलेली एकूण एकत्रीत गुंतवणूक ४३६.३५
थोडक्यात गेल्या ५ वर्षात अंदाजे २०३.६२ अब्ज डॉलर इतकी रक्कम भांडवल म्हणून भारतात गुंतवली गेलेली आहे. २. व्यावसायीक वाहनांबद्दल थोडेसे. भारतातील वाहन उद्योग वाढत असताना व्यावसायीक वाहनांच्या मागणीत आलेली घट ही फक्त बीएस६ मुळे आलेली नाहीत. त्याव्यतिरिक्त आणखी कारणे नमूद करत आहे. अ) हायवेंचे प्रमाण वाढल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचला. म्हणजेच ट्रीप जास्त होऊ लागल्या. ब) जीएसटी मुळे राज्यांच्या सिमांवरील जाणारा वेळ वाचला. तसेच ऑक्ट्रायमुळे होणारा वेळ वाचला. म्हणजेच म्हणजेच ट्रीप जास्त होऊ लागल्या. क) महामार्ग रस्त्यांची अवस्था सुधारल्याने दुरूस्तीसाठी वाहने अडकून पडण्याचा वेळ वाढला. म्हणजेच ट्रीप जास्त होऊ लागल्या. ड) सर्वात महत्वाचे म्हणजे अ‍ॅक्सल लोड ५०% टक्यांनी वाढवले. त्यामुळे एकाच ट्रीप मधे दीड ट्रीपचे सामान जाऊ लागले. खरे तर हा निर्णय वाहन व्यावासायीकांसाठी फायद्याचा असूनही, हा निर्णय गेली अनेक वर्षे कोणतेही सरकार घेत नव्हते. कोणाचे धाडसच होत नव्हते. कारण एकच. त्यामुळे वाहन क्षेत्रात मंदी आली तर? असो. पोपट मेला वगैरेला मी उत्तरे देणार नाहीये. :) :) तुमच्यामुळे मी माझे मुद्दे आणखीन सविस्तर मांडू शकलो याबद्दल तुम्हाला धन्यवाद. _/\_

In reply to by शाम भागवत

हा धागा महाराष्ट्राच्या संदर्भात असल्याने हा परिच्छेद वाढवत आहे. परदेशातून भांडवल खेचण्यात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला आहे. २०१४ पर्यंत एकूण परदेशी गुंतवणूकीच्या ३०% एकटा महाराष्ट्र पटकावत असे. हे प्रमाण २०१४ नंतर वाढत जाऊन आता ते ५०% पर्यंत गेले आहे. जय महाराष्ट्र.

In reply to by शाम भागवत

मस्तय परीक्षण आणि मांडणी .. आवडली आहे .. सुंदर