लहान मुले प्रश्न विचारून भंडावून सोडतात हे आपल्यापैकी बहुतेकांना माहीत असेलच.
आपण चकित होतो की हा विचार ते कसा करतात - जो साधा, सोपा, थेट आणि जिज्ञासेने भरलेला असतो - आपली असा विचार करायची शक्ती कुठे आणि केव्हां बरं हरवली? असा प्रश्न पडतो.
माझ्या मुलाच्या बाबतीत घडलेले काही चुटके देतोय, आपल्या अवतीभवती घडलेले असेच अनुभव इथे येवोत.
------------------------------------------------------------------------
माझ्या मुलाचा (वय वर्षे ६) आणि माझा कालच झालेला संवाद -
तो - शेतकर्याच्या शेतात गाय बैल कुठून येतात.
मी - त्या गाय बैलांचे आई-वडील त्यांना जन्म देतात.
तो - पण ते आई-वडील कुठून येतात?
मी - शेतकरी त्यांना जंगलातून घेऊन येतो.
तो - त्याला कसं कळतं की ते जंगलात आहेत आणि तो त्यांना कसा आणतो?
मी - सगळे प्राणी आधी जंगलात होते त्यामुळे तो जंगलातून त्यांना घेऊन येतो आणि ट्रकमधे घालून आणतो.
तो - (फारसं पटलेलं नसावं पण माझा एकूण चेहरा पाहून त्याला दया आली असावी!) त्याला कसं कळतं की कोणत्या आकाराचा ट्रक घेऊन जायचा?
मी - अरे, तो मोठाच ट्रक, एटीन व्हिलर, नेतो म्हणजे प्राणी छोटे असले तरी बिघडत नाही आणि मोठे असले तरी बसतीलच.
तो - पण ते डायनासॉर सारखे मोठे असले तर??
मी - ?? (विषय बदलला!)
------------------------------------------------------------------------
त्याला एकदा कोणती तरी पौराणिक कथा सांगत होतो तेव्हा 'विष्णू' चा संदर्भ आला - त्याने लगेच विष्णूचे पूर्ण नाव विचारले.
मी त्याला सांगितले की मला त्याच्या वडिलांचे नाव माहीत नाही पण त्याचे लास्ट नेम 'शेषशायीवाले' असं होतं!
------------------------------------------------------------------------
परवा मी गाडीतून त्याला घेऊन एकेठिकाणी निघालो होतो एकदम मला नवीन रस्त्याने जाण्याची हुक्की आली, लगेच गाडी तिकडे हाकली -
त्याने लगेच विचारले - बाबा इकडून कुठून चाललाय?
मी - अरे हा रस्ता आपल्याला जायचंय तिकडेच जाणार असा माझा अंदाज आहे.
तो - कशावरून?
मी - अरे आपण नेहेमी जातो ना त्या रस्त्याची दिशा आणि आत्ता जातोय त्याची दिशा ह्यांच्यावरुन.
तो - आर यू शुअर?
मी - अगदी १००% नाही पण बर्यापैकी..जवळपास तरी पोचूच, चुकणार नक्की नाही!
तो - तुम्ही पुढे काय घडणार हे कसं सांगू शकता?
मी - अनुभवाने.
तो - पण प्रत्येकवेळी ते बरोबर असेलच हे कशावरून? जगात ते कोणीच सांगू शकेल असे मला वाटत नाही! (लोकहो, वय वर्षे ६ चे बालक हे बोलत होते - मी बघतच राहिलो!)
नंतर मी योग्य ठिकाणी पोचलो पण अंतर्मुख होऊनच!
--------------------------------------------------------------------------
वाचने
15064
प्रतिक्रिया
31
मिसळपाव
प्रतिक्रिया
आश्चर्य!
तात्यामामा,
In reply to आश्चर्य! by विसोबा खेचर
माझ्या
बाहेर लॉन
In reply to माझ्या by प्राजु
बैलगाडी .....
In reply to माझ्या by प्राजु
अगदी
एक लेटेस्ट...
:-))))))
In reply to एक लेटेस्ट... by एकलव्य
:)
In reply to एक लेटेस्ट... by एकलव्य
१ नंबर........
In reply to एक लेटेस्ट... by एकलव्य
हाहाहा...
हिलरी आणि
निरागस प्रश्न...
छान...
अप्रतिम
In reply to छान... by धमाल मुलगा
हिलरी आणि ओबामा यांचे सी एन एन वरील रोज झडणारे वादविवाद पाहून आमच्या ३ वर्षाच्या कन्येचा (निरागस!@!@?!प्रश्न:
हे दोघे एव्हढे भांडतात तर मग लग्न का नाही करत?
वा! काय सवाल है? कोई जवाबही नही.
हात दाखवून अवलक्षण : मग, तू कोणाबरोबर भांडतोस?????????
लहानमुलांचे "क्रिकेट-प्रेम" आणि 'संबंधित घडामोडी '
एका पाचवी
प्रश्न?
माझ्या ५
ये दुनिया.....
In reply to माझ्या ५ by माझी दुनिया
दुनिया ये महफिल मेरे कामकी नही कामकी नही|...
In reply to माझ्या ५ by माझी दुनिया
वा वा....
बर्याच दिवसा॑नी असा मी असामी मधल॑ काहीतरी वाचायला मिळाल॑.
अगदी घरच॑ कोणितरी कित्येक वर्षा॑नी कडकडून भेटाव॑ तस॑ वाटल॑.
थ्या॑कू ग॑ !!!!
अवा॑तरः आमच्या तिर्थरुपा॑ना उचकवण्यासाठी आम्ही त्या॑ना "फादर" अशी हाक मारायचो, ते भडकले की आम्ही "माग॑ पाय लाऊन" पसार, हे वेगळेसा॑गणे न लगे.
असो, तर ही अशी हाक मारण्याची आमची प्रेरणा चि.कु.श॑कर्या धो॑डोप॑त (बे॑बट्या) जोशी (पोष्ट्याचा).
- आमच्या आबा॑चा "श॑कर्या"
ध मा ल.
माझा भाचा...
हम्म,
माझे भाचे
Adult
हा हा हा!
In reply to Adult by एकलव्य
बॉय आणि गर्ल...
आंघोळ
फ्लिन इफेक्ट
उत्तर