( २ ) चांदेला आणि बुंदेला प्रांत भटकंती
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातील काही ठिकाणांची भटकंती झाली त्याची माहिती अगोदरच्या ( १ ) चांदेला आणि बुंदेला प्रांत भटकंती या लेखात दिली आहे. फोटो बरेच असल्याने काही फोटो या लेखात देत आहे. ( शिल्प ओळख श्रेय - प्रचेतस. ) खजुराहो
फोटो १
लक्ष्मण मंदिर,(खजुराहो) समोरून असे दिसते. सर्वात अधिक गर्दी इथे असते.
फोटो २
खजुराहो गावात हे 'घंटाई मंदिर' आहे. याचा थोडाच खांबांचा भाग शिल्लक आहे किंवा अर्धवट सोडलेले वाटते. उंची पाहता खूप मोठे झाले असते. १
फोटो ३
खांबांवरच्या घंटा आणि साखळ्या शिल्पामुळे 'घंटाई' मंदिर नाव पडले. २
फोटो ४
दुल्हादेव मंदिराची मागची बाजू. छोटेसे आहे, काही शिल्पे तुटलेली आहेत.
फोटो ५
चतुर्भुजा मंदिर ( खजुराहो), विष्णूची मोठी मूर्ती.
फोटो ६
शंकर
फोटो ७
ब्रम्हा आणि पद्मावति
फोटो ८
अर्धनारी नटेश्वर, (चतुर्भुजा, खजुराहो. )
फोटो ९
रुम
फोटो १०
रुममधून दिसणारे दृष्य.
ओर्छा / ओरछा (झाशीपासून १८ किमि)
फोटो ११
हेरिटेज वॉक नकाशा.
फोटो १२
राजामहल, समोरच्या चतुर्भुजा मंदिरातून
फोटो १३
रामराजा मंदिर, बाजुच्या चतुर्भुजा मंदिरातून . इथे सर्वात अधिक गर्दी असते. भाविक अधिक पर्यटक.
फोटो १४
लक्ष्मी नारायण मंदिरातून दिसणारे ओरछा. १
फोटो १५
लक्ष्मी नारायण मंदिरातून दिसणारे ओरछा. २
लक्ष्मी नारायण मंदिरातल्या चित्रांत दिसणारे इंग्रज .
दतिया (झाशीच्या उत्तरेस २८ किमि) शहर बुंदेला राजांकडे होते.
फोटो १७
दतियाच्या महालातले वरचे ५,६,७ मजले.
फोटो १८
दतिया महालातील आतील भाग
झाशी शहरात राणी लक्ष्मीबाईचे नाव खूप आदराने घेतले जाते. किल्ला मोठा आणि सुस्थितीत आहे.
राणीचा महाल जवळच आहे. किल्ल्याबाहेर बाजारात. त्याचे म्युझिअम केलय.
फोटो १९
फलक, रानी महल
फोटो २०
राणीमहल बाहेरून असा दिसतो.
फोटो २१
वरच्या मजल्यावरचा शयनकक्ष
फोटो २२
महालाच्या जिन्यातली छतचित्रे
फोटो २३
तळ मजल्यावर बरीच शिल्पे ठेवली आहेत. ही देवता कोण?
फोटो २४
मुख्य कारंजा
फोटो २५
आदरणीय राणी लक्ष्मीबाईचा पुतळा
फोटो २६
गणपती, लक्ष्मण मंदिर, खजुराहो.
फोटो २७
भैरव, पार्श्वनिथ मंदिर, खजुराहो.
फोटो २८
कंदिरिया महादेव मंदिर, खजुराहो. प्रसिद्ध झालेला शिल्पपट
चौसठ योगिनी मंदिर, शिवसागर तलावाच्या मागे, खजुराहो. इतर मंदिरांपेक्षा वेगळे कारण येथे तांत्रीक पूजा होत. एक झपाटलेला बुवा.
फोटो ३०
मकर तोरण, जवारी मंदिर, खजुराहो गाव. प्रवेशद्वाराचे हे तोरण आणि मागच्या छतावरचे शिल्प 'जव' धान्याची आठवण करून देते. हे धान्य इथे पिकत असे. यावरून जवारी मंदिर नाव पडले, पण विष्णू मंदिर आहे.
फोटो ३१
गाइड फी, राजा महल, ओरछा.
फोटो ३२
Sound and light show, timings, राजा महल, ओरछा.
फोटो ३३
दतिया महालांत वेगवेगळ्या जाळ्या आहेत.
फोटो ३४
झाशीचा किल्ला, दक्षिण भाग. याचा पनोरमा फोटो काढण्याचा प्रयत्न केला पण तो इथे उमटत नाही. किल्ल्याची तटबंदी खूप रुंद आहे. आतमध्ये मध्ये दालनं, कोठारं, कारागृह आहे. महाल नाही. एप्रल २०१९ पासून प्रवेशशुल्क ५०रु केलं आहे. मागे एकदा किल्ला पाहिला होता.
हा भागही अतिशय नेटका.
वा, सुरेख!
फारच सुंदर ......
सहलप्रवर्तक खरा लेख.
उत्तम