✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मिपाचा पहिलावहिला छापील दिवाळी अंक

प
प्रशांत यांनी
Wed, 10/23/2019 - 16:16  ·  लेख
लेख
झैरात झैरात झैरात 1 मंडळी, कळविण्यास अत्यंत आनंद होतोय की आपल्या लाडक्या मिपाचा पहिलावहिला छापील दिवाळी अंक उद्या आपल्या भेटीस हजर होतोय. आपला पहिलाच प्रयत्न असल्याने मर्यादित प्रती छापण्यात आल्या आहेत. अधिक माहितीसाठी आणि आपली प्रत राखून ठेवण्यासाठी मिपावर प्रशांत ला व्यनि करा किंवा prashaant.tayade@gmail.com येथे थेट संपर्क साधा. ऑनलाईन अंकापैकी निवडक लेख, दोन-तीन एक्स्क्लुसिव्ह कंटेंट आणि मिपावरची काही गाजलेली दर्जेदार पूर्वप्रकाशित गाळीव रत्नं असा हा संग्रह आहे. मुख्यतः स्मरणिका म्हणून संग्रही ठेवण्यासाठी. विशेषतः पहिला अंक, आणि कदाचित अग्रणी मराठी संकेतस्थळांपैकी छापील अंकाचा पहिलाच प्रयोग यासाठी या अंकाचं महत्त्व असेल.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
58847 वाचन

💬 प्रतिसाद (88)

प्रतिक्रिया

मस्त बातमी

ज्ञानोबाचे पैजार
Wed, 10/23/2019 - 16:25 नवीन
साधारण कधी उपलब्ध होईल? माझ्या करता प्रत नक्की राखुन ठेवा मिपाची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही सदिच्छा... पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

अगदी

मिसळलेला काव्यप्रेमी
Wed, 10/23/2019 - 18:15 नवीन
अगदी हेचं आणी असच म्हणतो. व्यनि धाडलाय रे प्रशांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अजून एक,

ज्ञानोबाचे पैजार
गुरुवार, 10/24/2019 - 08:20 नवीन
या दिवाळी अंक छापण्याच्या कटात अनेक जण सामिल असतील. त्या टोळीने अंक छापताना आलेल्या अनुभवांचा एक धागा काढावा. या कल्पनेच्या उगमा पासून ते अंकाच्या वितरणापर्यंत झालेला प्रवास नक्की रोचक असेल यात काहीच शंका नाही. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

अप्रतिम!!

तुषार काळभोर
Wed, 10/23/2019 - 16:26 नवीन
अतिशय आनंदाची बातमी...!! व्यनि पाठवलाय..
  • Log in or register to post comments

दुकानात येइल का?

हस्तर
Wed, 10/23/2019 - 16:32 नवीन
दुकानात येइल का?
  • Log in or register to post comments

नाहि

प्रशांत
Wed, 10/23/2019 - 17:03 नवीन
मर्यादित प्रती छापण्यात आल्या आहेत त्यामुळे दुकानात येनार नाहि.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हस्तर

छान !

हेमंतकुमार
Wed, 10/23/2019 - 16:45 नवीन
हा अंक आणि इथला इ अंक हे एकच की वेगळे ?
  • Log in or register to post comments

छापील अंकाचा पहिलाच प्रयोग

प्रशांत
Wed, 10/23/2019 - 17:01 नवीन
ऑनलाईन अंकापैकी निवडक लेख, दोन तीन एक्सकलुसिव्ह कंटेंट आणि मिपावरची काही गाजलेली दर्जेदार गाळीव रत्नं असा हा संग्रह आहे. मुख्यतः स्मरणिका म्हणून संग्रही ठेवण्यासाठी. विशेषतः पहिला अंक, आणि कदाचित अग्रणी मराठी संकेतस्थळांपैकी छापील अंकाचा पहिलाच प्रयोग. यासाठी या अंकाचं महत्व असेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हेमंतकुमार

मिपाचा पहिला वाहिला छापील

पद्मावति
Wed, 10/23/2019 - 16:48 नवीन
मिपाचा पहिला वहिला छापील दिवाळी अंक! खूप खूप अभिनंदन. अत्यंत आनंदाची बातमी. व्यनी पाठवला आहे.
  • Log in or register to post comments

छापील अंक हे एक उत्तम

अनिंद्य
Wed, 10/23/2019 - 16:55 नवीन
छापील अंक हे एक उत्तम सरप्राईझ ठरले. माझ्या साठी प्रत राखून ठेवण्यासाठी व्यनि पाठवला आहे. शुल्क किती ते कळवले तर भरण्याची व्यवस्था करतो.
  • Log in or register to post comments

अरे वा! छान बातमी आहे की!

पाषाणभेद
Wed, 10/23/2019 - 17:23 नवीन
अरे वा! छान बातमी आहे की! माझीही प्रत राखून ठेवावी हि विनंती. व्यनी करतोच आहे. अ‍ॅक्सेस डिनाय म्हणतो आहे. ईमेल करतो आहे मग. पैसे कसे द्यायचे ते सांगणे.
  • Log in or register to post comments

चांगली कल्पना.

mayu4u
Wed, 10/23/2019 - 17:28 नवीन
मात्र, इबुक्स च्या युगात छापील अंक म्हणजे "चुलीवरचं जेवण" वाढणारं हॉटेल असं काहीसं वाटलं.
  • Log in or register to post comments

ऑनलाईन आहेच की अंक. आणि अ‍ॅप

पाषाणभेद
Wed, 10/23/2019 - 18:21 नवीन
ऑनलाईन आहेच की अंक. आणि अ‍ॅप मध्ये जास्त वेगळेपण असू शकत नाही. कंटेट तेच राहणार. प्रेझेंटेशन बदलेल फार तर. अन कागदावरचा दिवाळी अंक घरी आणणे असे बहुदा मराठी समूदायातच होत असावे. त्यामुळे हार्डकॉपी अंक समर्थनीय आहे. रच्याकने, चुलीवरची मिसळ हा हाईप केलेला प्रकार आहे. चव धुरकटलेली असू शकते काय? :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: mayu4u

मला एक प्रत प्लीज. व्यनी करते

यशोधरा
Wed, 10/23/2019 - 17:32 नवीन
मला एक प्रत प्लीज. व्यनी करते.
  • Log in or register to post comments

अभिनव संकल्पना

श्रीरंग_जोशी
Wed, 10/23/2019 - 18:05 नवीन
अरे वाह, मिपाच्या छापील दिवाळी अंकाची संकल्पना अभिनव आहे. छापील प्रति संपल्यानंतर काही कालावधीने किंडल प्रतही उपलब्ध करावी ही सुचवणीवजा विनंती.
  • Log in or register to post comments

तंतोतंत!

नंदन
गुरुवार, 10/24/2019 - 14:41 नवीन
अरे वाह, मिपाच्या छापील दिवाळी अंकाची संकल्पना अभिनव आहे. छापील प्रति संपल्यानंतर काही कालावधीने किंडल प्रतही उपलब्ध करावी ही सुचवणीवजा विनंती.
अगदी असेच! ह्या कल्पनेला कृतीत उतरवणार्‍या मंडळींचे हार्दिक अभिनंदन आणि आभार!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीरंग_जोशी

मिपाचे पहिल्या वहिल्या छापील

प्रचेतस
Wed, 10/23/2019 - 18:13 नवीन
मिपाचे पहिल्या वहिल्या छापील दिवाळी अंकाचे मनःपूर्वक अभिनंदन. कोऱ्या कागदाचा सुवास घेत अंक वाचण्याची मजा औरच. प्रत राखून ठेवतच आहे.
  • Log in or register to post comments

अभिनंदन!

हरिहर
Wed, 10/23/2019 - 18:37 नवीन
माझीही प्रत राखून ठेवावी हि विनंती. व्यनी करतोच आहे. अ‍ॅक्सेस डिनाय म्हणतो आहे.
  • Log in or register to post comments

व्यनि

नाखु
Wed, 10/23/2019 - 18:49 नवीन
केला आहे, स्तुत्य उपक्रम अर्थातच वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments

अरे वा

गुल्लू दादा
Wed, 10/23/2019 - 18:57 नवीन
व्यनि केलाय सर. फारच सुखद धक्का.
  • Log in or register to post comments

सोबत चकली चिवडा वगैरे काही भेट मिळणार

जॉनविक्क
Wed, 10/23/2019 - 19:11 नवीन
की फक्त वाचायला छापील कागद ;) राशी भविष्यकार कोण आहेत ? युयुत्सु जी ? मुखपृष्ठ अत्यन्त सुरेख
  • Log in or register to post comments

चकना

हस्तर
Wed, 10/23/2019 - 19:41 नवीन
चकना
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जॉनविक्क

१. मला पण एक प्रत .....

सुधीर कांदळकर
Wed, 10/23/2019 - 19:44 नवीन
किंमत अकाउंट क्रमांक वगैरे मिपावर वा sudhir.kandalkar@gmail.com वर कळवणे किंवा मुंबईत/पुण्यात उपलब्ध असल्यास स्टॉकिस्टचे नावपत्ता देणे. २. अभिनंदन. मुखपृष्ठ छान दिसते आहे.
  • Log in or register to post comments

कंटेंट

जेम्स वांड
Wed, 10/23/2019 - 20:59 नवीन
काय काय आहे हे सद्यांत देता येईल का? ऑनलाईन अंकापैकी निवडक लेख, दोन तीन एक्सकलुसिव्ह कंटेंट आणि मिपावरची काही गाजलेली दर्जेदार गाळीव रत्नं असा हा संग्रह आहे. ह्यावरून काही कल्पना येत नाही. नाही, मिपावर सगळेच लेखन दर्जेदार असतेच. फक्त काही पर्सनल फेव्हरेट्स असले तर कळावे म्हणून विचारतोय, जर इथे चालणार नसेल तर व्यनित सांगा, जर अगदीच गुपित ठेवायचं असलं तर मात्र बघा कसं काय सोयीचं पडतं ते...
  • Log in or register to post comments

+१ हेच म्हणतो

उपेक्षित
Wed, 10/23/2019 - 21:15 नवीन
+१ हेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: जेम्स वांड

मला एक अंक हवा आहे .

बिपीन सुरेश सांगळे
Wed, 10/23/2019 - 22:03 नवीन
मला एक अंक हवा आहे . कृपया डिटेल्स मिळतील का ?
  • Log in or register to post comments

अभिनंदन आणि शुभेच्छा

गामा पैलवान
Wed, 10/23/2019 - 22:13 नवीन
प्रशांत, या धाडसी प्रयोगाबद्दल अभिनंदन. पुढील वाटचालीस शुभेच्छा. आ.न., -गा.पै.
  • Log in or register to post comments

मलाही हवेत अंक, व्यनि पाठवलाय

मनिष
गुरुवार, 10/24/2019 - 00:04 नवीन
मलाही हवेत अंक, व्यनि पाठवलाय. :)
  • Log in or register to post comments

अभिनव!

जुइ
गुरुवार, 10/24/2019 - 04:27 नवीन
कल्पना अतिशय आवडली.
  • Log in or register to post comments

माझा अंक राखून ठेवा.

Jayant Naik
गुरुवार, 10/24/2019 - 06:37 नवीन
आपल्याला मेल पाठवली आहे. व्यनी जात नाही. कृपा करून माझ्यासाठी एक कॉपी राखून ठेवा.
  • Log in or register to post comments

मिपाच्या ह्या नवीन

सुमो
गुरुवार, 10/24/2019 - 07:41 नवीन
उपक्रमास अनेक शुभेच्छा आणिक अभिनंदन. प्रशांत यांना व्यनि जात नसल्याचे अनेक जणांनी लिहिले आहे. त्यांच्यासाठी... प्रशांत यांना व्यनि करा.
  • Log in or register to post comments

मी विकत घेईन

रणजित चितळे
गुरुवार, 10/24/2019 - 09:00 नवीन
बंगळुरला पाठवावा लागेल फक्त
  • Log in or register to post comments

अरे वा!

नूतन
गुरुवार, 10/24/2019 - 09:42 नवीन
अभिनंदन आणि शुभेच्छा
  • Log in or register to post comments

अरे वा!!!

मार्गी
गुरुवार, 10/24/2019 - 09:56 नवीन
छानच! सर्वांचे अभिनंदन!!!
  • Log in or register to post comments

एक नंबर !!!!

राजाभाउ
गुरुवार, 10/24/2019 - 10:17 नवीन
एक नंबर !!!! मलाही अंक हवा आहे. व्यनी केला आहे. कृपया बाकी माहिती (किंमत, अंक कुठे मिळेल वगैरे) इथे टाकावी हि विनंती
  • Log in or register to post comments

व्यनी जात नाही. आपल्याला मेल

स्वप्निल दलाल
गुरुवार, 10/24/2019 - 10:43 नवीन
व्यनी जात नाही. आपल्याला मेल पाठवली आहे. कृपया माझ्यासाठी एक कॉपी राखून ठेवा. बंगळुरला पाठवाल का?
  • Log in or register to post comments

मिपा दिवाळी अंक

आदेश007
गुरुवार, 10/24/2019 - 12:10 नवीन
प्रशांत जी व्यनी केला आहे. धन्यवाद
  • Log in or register to post comments

व्यनी जात नाही.

नि३सोलपुरकर
गुरुवार, 10/24/2019 - 12:47 नवीन
कृपया माझ्यासाठी एक कॉपी राखून ठेवा.
  • Log in or register to post comments

वाह!

राघव
गुरुवार, 10/24/2019 - 13:42 नवीन
हे तर ब्येष्टच झालंय! व्यनि केलाय सर! कृपया प्रत राखून ठेवावी माझ्यासाठीही. :-) बाकी नंतर किंडल प्रत काढण्याच्या जोशीसरांच्या सुचनेशी त्रिवार सहमत! अंक मिळणार कसा आणि कधी याबद्दल उत्सुकता आहे. जर काही ठरलं नसेल तर एक कट्टा करून त्यात हा अंक वाटता आला असता.. अंकाचं विमोचनही झालं असतं आणि कट्टाही झाला असता. अर्थात् दिवाळीच्या धामधुमीत ते शक्य नाही हे मान्य. पण जर प्रत दिवाळीनंतर मिळाली तरी हरकत नसावी कुणाची. :-)
  • Log in or register to post comments

महत्वाचे

इरसाल
गुरुवार, 10/24/2019 - 15:56 नवीन
एका मनुक्षास जास्तीत जास्त किती अंक मिळु शकतील ?
  • Log in or register to post comments

एकास एकंच ....

गामा पैलवान
Fri, 10/25/2019 - 12:27 नवीन
एका द्विपादास एकंच अंक मिळेल! -हुकुमावरून टीप : दोन अंक मिळणार असतील तर मी स्वत:स इरसालपणे चतुष्पाद म्हणून घोषित करावे का ? ;-) -गा.पै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इरसाल

मला एक प्रत हवी आहे. व्यनी

विजुभाऊ
गुरुवार, 10/24/2019 - 17:53 नवीन
मला एक प्रत हवी आहे. व्यनी केला आहे
  • Log in or register to post comments

अरे मैं लेट हो गया काय?

चांदणे संदीप
Sat, 10/26/2019 - 08:45 नवीन
मालक, माझ्यासाठीही एक अंक राखून ठेवावा ही विनंती. मिपाच्या पहिल्या दिवाळी अंकाचे स्वागत. मिपाचे पाऊल असेच सदैव पुढेच पडत राहो ही सदिच्छा! सं - दी - प
  • Log in or register to post comments

एक करता येवू शकते.

पाषाणभेद
Sat, 10/26/2019 - 11:09 नवीन
एक करता येवू शकते. एक शेवटची तारीख ठरवा. येथेच कळवा. अन त्या तारखेपर्यंत बुकींग घ्या. आधी पैसे घ्या. ( ते महत्वाचे आहे. परमार्थ नंतर.) तेवढ्या प्रती छापा. (आणि खूप विलंबही नको.) अन मुंपुठानानाको ( मुंबई-पुणे-ठाणे-नाशिक-नागपूर) असा हब करा. त्या त्या ठिकाणच्या मिपाकराला तेवढ्या प्रती पाठवा. (नाशकात मी जबाबदारी घेईन अन अंक द्यायला त्यांच्या घरीही जाईन (अन दिवाळीचा फराळ हादडेन!)) तो मिपाकर इतरांशी संपर्क करून एकमेकांत बोलणे होवून अंक हातोहात देतील. आणि मिपाकरांच्या दिवाळी अंकाच्या हार्डकॉपीची पहिली खेप असल्याने मिपाकर तेवढे सहकार्य करतील. बघा. कसं जमतंय ते!
  • Log in or register to post comments

सांगलीत असलेल्या मिपाकरांसाठी

प्रचेतस
Sun, 10/27/2019 - 10:45 नवीन
सांगलीत असलेल्या मिपाकरांसाठी ५ प्रती खालील दुकानात ठेवल्या आहेत. आदर्श न्यूजपेपर एजन्सी, विश्रामबाग चौक, सांगली इथून त्या खरेदी करता येतील.
  • Log in or register to post comments

अरे!

पाषाणभेद
Sun, 10/27/2019 - 11:15 नवीन
अरे! ज्यांनी मागणी केली त्यांना द्या ना! दुकानात तर कुणी इतरही खरेदी करेल अन मग (सांगलीतल का होईना) ज्यांनी मागणी केली त्यांना भेटणार नाही. वर माझ्या प्रतिसादात कसे न्याय्य वाटप करावे ते लिहीले आहे. मिपावरील लोभाने सभासद झळ सोसून एखाद्या सभासदाकडून घेवू शकतील.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

ज्यांनी मागणी त्यांना मिळणारच

प्रचेतस
Sun, 10/27/2019 - 11:37 नवीन
ज्यांनी मागणी त्यांना मिळणारच आहेत. एका मिपाकरांनी सांगलीमार्गे बाहेरगावी जाता जाता तिकडील मिपाकरांच्या सोयीसाठी अंक तिथे ठेवले आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

मग नाशिकचे किती अंक आहेत?

पाषाणभेद
Sun, 10/27/2019 - 11:57 नवीन
मग नाशिकचे किती अंक आहेत? माझ्याकडे द्या पाठवून. मी वितरीत करेन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रचेतस

प्रशांतशी बोलून सांगतो

प्रचेतस
Sun, 10/27/2019 - 12:38 नवीन
प्रशांतशी बोलून सांगतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पाषाणभेद

पिंपरी चिंचवडमध्ये राहणारे

प्रचेतस
Sun, 10/27/2019 - 10:47 नवीन
पिंपरी चिंचवडमध्ये राहणारे मिपाकर माझ्याकडून अंकाच्या प्रति घेऊन जाऊ शकता.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा