साक्षर, सुशिक्षित कि फक्त उदासीन!
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
साक्षर, सुशिक्षित कि फक्त उदासीन
आपल्या भारत देशात तरुणांची संख्या खूप आहे . त्यातही मतदान करणारा टक्का तर अधिकच . मतदार हा निवडणुकीपुरता का होईना राजा असतो . पण सध्या माझ्या पाहण्यात काही असे राजे/ राण्या आल्यात जे फक्त साक्षर आहेत, सुशिक्षित नाहीत . दुर्दैवाने हे खरे आहे . तिकडे मोदी ओरडून सांगतायत कि आजच्या युवा पिढीमध्ये भारत बदलायची ताकद आहे. पण मोदी, फडणवीस यांच्यासारखे नेतृत्व देशाला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करीत असताना आपण त्यातला मतदानाचा खारीचा वाटसुद्धा उचलू शकत नाही हि मोठी खंत आहे. दुर्दैवाने त्यांना हे कळत असूनही त्या दृष्टीने पावलं उचलणं त्यांना जमत नाही . जमत नाही म्हणण्यापेक्षा इच्छा नाही. अन्यथा इच्छा तेथे मार्ग असतोच. आणि सध्या हे मार्ग बऱ्यापैकी सोपे केलेले आहेत. तरीही हि अशी माणसे या बाबतीत उदासीनच. फार वाईट वाटत हे बघून.
माझ्या जवळच्या पाहण्यातली काही उदाहरणं -
एक जण आहे ज्याचं गावाला घर बांधून १३/१४ वर्ष झाली, लग्न होऊन १२ वर्ष झाली ,२ पोर झाली पण अजून बायकोच्या नावाचं वोटिंग कार्ड आलेलं नाही. का याला उत्तर नाही. मागच्या लोकसभेला देखील तिने मतदान केलं नाही, याही वेळी नाही. आणि हि लोकं फेसबुकवर प्रचाराच्या पोस्ट टाकत असतात. अर्थात माझ्या दृष्टीने मी समजावण्याचा प्रयत्न केला. पण याआधी आणि याही वेळी तीच एक मत फुकट जाणारच.
दुसरे एक गृहस्थ. मतदारयादीत आजीचं नाव मूळ गावाला, हे गृहस्थ पुण्यात नोकरीला असल्याने यांचं नाव पुण्यात तर बायकोच नाव माहेरी. आता तीन ठिकाणी कोण कस फिरणार? म्हणून यांच्या घरातली किमान दोन मतं फुकट. खरं तर आता नाव बदला, पत्ता बदला या बर्याचश्या गोष्टी ऑनलाईन होतात. पण एरवी स्मार्टफोन मधल्या लेटेस्ट ऍप् मधलं सगळं माहित असलेली हि लोक हे साधं काम करायला निरुत्साही दिसतात. कदाचित यातून काही निष्पन्न होत नाही असा त्यांचा समाज असावा.
आणखी एक आजी. वय वर्ष ७३. मतदान करायची इच्छा. घरातल्या घरात चालतात, आपली काम आपण करतात. याना फक्त मतदान केंद्रापर्यंत नेण्याची गरज आहे. पण घरातल्याना त्यांचं एक मत फुकट गेल्याने काहीच फरक पडत नाही. त्यामुळे त्यांचही एक मत फुकट. आमच्या शेजारी आलेले एक काका. गावाला घर बांधलय म्हणून अधूनमधून खेप घालतात. आताही तसेच आलेत. मतदान कुठे आहे तुमचं विचारल्यावर मुंबई हे उत्तर आलं. पण मग जाणार का परत मतदानाला तर नाही, गेलं यावेळी मतदान म्हणून शांत बसले. किती चुकीचं आहे हे यांना कळत का नाही?
लोकसभा निवडणुकीला बंगलोर सारख्या शहरात जिथे जास्तीत जास्त आयटी इंडस्ट्री आहे , म्हणजेच साक्षर लोक खूप मोठ्या प्रमाणावर आहेत पण ते सुशिक्षित नसल्याने फार कमी मतदान झालं . कारण उदासीनता एवढंच .
नोटाच बटन दाबणारे पण माझ्यासाठी याच प्रकारातले. नोटा दाबून काय मिळतं याना? काहीच नाही. यांनी नोटा दाबलं तरी कोणता ना कोणता पक्ष निवडून येणारच. मग निदान त्यातल्या त्यात बऱ्या पक्षाला तरी निवडून द्या ना. नाहीतर आगीतून फुफाट्यात पडल्यासारखं होईल. आपण काही करू शकत नाही तर निदान जो चांगलं करतोय त्याला तरी पाठिंबा द्या ना. हे नारो वा कुंजरो वा कशाला? म्हणजे मत न देणारे जेव्हढे दोषी तेव्हढेच हे नोटा दाबून सुद्धा दोषी. कारण काही उपयोगाचं नाही. माझ्या लेखी हे देखील सुशिक्षित नसून केवळ साक्षर याच प्रकारात मोडतात.
कधी कधी वाटतं मतदान हा अधिकार म्हणजे फुकट मिळत त्याची किंमत नाही अश्यासारखं आहे. कोण विचारत नाही, कुठे दंड लागत नाही त्यामुळे जाऊ दे. सरकारने सगळ्या सुविधा द्यायला हव्यात, नाही काम झाली तर शिव्या देणार, मतदानाची सुट्टी घेणार, या देशाचं कस काहीच होऊ शकत नाही यावर चर्चा करणार, कुठे कोणी भारतीय जागतिक स्तरावर झळकला तर तेव्हढ्यापुर्ती कॉलर ताठ करणार पण साधं मतदान नाही करणार. माझ्या एका मताने काय फरक पडणार हाच कदाचित त्यामागचा विचार असावा. आतातर काय रविवार सोमवार लागून सुट्टी आलेय. मग मज्जाच. कितीतरी लोकांचं प्लांनिंग होऊन ते फिरयाला बाहेर पडलेही असतील पण मतदानाला मात्र बाहेर पडणं, लाईनमध्ये उभं राहणं जीवावर येत.
पेज ३ पिक्चर मध्ये एक वाक्य आहे, you have to be in the system, to change the system. राजकारण हा बऱ्याच जणांना न आवडणारा किंवा अगदी न कळणारा देखील विषय आहे. मीही त्यातलीच एक आहे. सिस्टिम चेंज करण्यासाठी राजकारणात जा असं माझं म्हणणं नाही पण त्यात बदल घडवायला निदान मतदान करा एवढंच माझं म्हणणं आहे.
आता तुम्हीच ठरवा तुम्ही साक्षर कि सुशिक्षित ते.
प्रतिक्रिया
भारताची लोकशाही
खरंय
यावर सखोल आणि अभ्यासू लेख
वरीलपैकी कोणीही नाही
+1
कधी कधी वाटतं मतदान हा अधिकार
मुळात मानवी प्रवृत्ती ही फार मजेशीर प्रकरण आहे
मतदानाची सक्ती
लोक आजारी असतात,
15 august चे झेंडा वंदन
शिक्षित लोकांना हि सुशिक्षित
फक्त एक तास सार्वजनिक ठिकाणी
त्या पेक्षा जसी परिस्थिती आहे
मत न देणारे जेव्हढे दोषी तेव्हढेच हे नोटा दाबून सुद्धा दोषी.
सहमत !
मतदान करावे>>> + १
जसा मतदान करण्याचा अधिकार आहे
नोटा हा सशक्त पर्याय केंव्हा
एवढा द्राविडी प्राणायाम करण्या पेक्षा
आजी माजी भ्रष्ट नेत्यांना घरी
आजी माजी भ्रष्ट नेत्यांना घरी
तोंड पाटीलकी ठीक आहे>>>>>>>>
प्रस्थापित नेत्यांना
अजूनही सुशिक्षित मसाज तो मतदान फिरवू शकतो या भ्रमात आहेच का ?
मी आजपर्यंत