आमची प्रेरणा आमचे परम मैतर चंद्रशेखर महामुनी ह्यांची तु नसताना.... !
हा लेंगा घालु न वाटतो.. लुज भासतो..नाडी.. तु नसताना....
विमनस्क घरभर हिंड्तो... खुळा हासतो.. नाडी.. तु नसताना...
हरपला पोटाचा सूर.. धडधडे उर.. उदरी काहुर....
डोळ्यात दाटला पूर.. रंग बेनूर... कायमचुर्णा.. तु नसताना.... [१]
हा गंधीत वाहे वारा.. त्यास आवरा.. कुणी सावरा...
शोधितो स्प्रे बावरा... होई कचरा.. डिओ.. तु नसताना... [२]
नाकात कोंडला श्वास.. दीर्घ निश्वास.. स्तब्ध अवकाश...
चालला धुर अस्तास... ओठी आभास... सिगारेटी.. तु नसताना... [३]
सशक्त ओल्या अंगानी.. बघ ओलेती शुक्र चांदणी ....
व्याकुळ तन मीलनी... कशी विरहिणी ... साबु.. तु नसताना... [४]
का भांड्यास लावि तुसे... सखे तु असे... होई ग हसे...
जन सर्वच तुजला हसे.. तुच तु दिसे...पितांबरी.. तु नसताना.... [५]
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
5726
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
हरपला
+१
In reply to हरपला by दशानन
छान छान छान छान
खतरनाक ... _/\_
मस्तच!
तु नसताना..
हा लेंगा
हा लेंगा
अगायायाया !!
+१
In reply to अगायायाया !! by आनंदयात्री
मस्त!
का
खतरनाक !
जबराट !
आयला...
धन्य आहेस..
प्रतिसाद
का
महान
हा हा हा!
झकास...
भारी .
_/\_
__/\__ महान आहात कविवर!!!!
हिहिहि ..आज परत वाचली ..
:)
जबर्हाट !!!