नमस्कार मिपाकर !
आजकाल आंतरजालावर विविध प्रकारची चित्रविचित्र आव्हाने येत असतात आणि ती काही प्रसिद्ध व्यक्तींनी स्वीकारल्यामुळे अजून प्रसिद्ध होत असतात. मलादेखील मिपावर असाच काहीतरी उपक्रम व्हावा असे वाटते म्हणून हा प्रपंच.
आव्हान आपल्या सोयीच्या वेळेनुसार, दिवसानुसार पार पाडायचे आहे.
आव्हान स्वीकारणे आणी पार पाडणे यास अंतिम मुदत नाही पण तरी सोयीखातर ३१ ऑक्टोबर २०१९ ही तारीख ठरवुया.
आव्हान स्वीकारण्यासाठी काही अटी आहेत. त्या खालीलप्रमाणे.
१. कोणते आव्हान स्वीकारले आहे याची नोंद प्रतिसादात करायची आहे.
२. आव्हान स्वीकारल्यानंतर ते पुर्ण केले काय ? केल्यास ते पुर्ण करताना काय अनुभव आला ? त्रास झाला, आनंद झाला, विशेषकरुन मनात काय काय विचार आले हे थोडक्यात लिहायचे आहे.
३. आव्हान स्वीकारले, ते पार पाडण्याचा प्रयत्न केला पण ते काही कारणास्तव शक्य झाले नाही तर त्याची कारणी मिमांसा लिहावी. (वेळ मिळाला नाही हे कारण ग्राह्य धरले जाणार नाही.
४. आव्हान स्वीकारताना एखादे आव्हान हे आपल्या रोजच्या दिनक्रमाचाच एक भाग आहे तर ते स्वीकारु नये. (उदा. उपवास करा हे आव्हान असेल आणि तुम्हाला उपवास करायचा अनुभव आहे तर ते आव्हान स्वीकारु नये.
५. कोणतेही आव्हान आपल्या शरीरास अपायकारक वाटत असेल ते स्वीकारु नये. ही आव्हाने केवळ मानसिक कणखरपणा तपासण्यासाठी आहेत.
आता आव्हाने काय आहेत ?
१. आपण चहा, कॉफी, शीतपेये दररोज पित असाल तर किमान दोन दिवस त्याचा त्याग करणे. दररोज हा शब्द महत्वाचा. उदा. मी दररोज २ वेळा चहा पित असेन, मात्र शीतपेय कधीतरीच पित असेल तर शीतपेय आव्हानातून वगळा. जे पेय दररोज घेता ते वगळायचे आहे. तिन्ही पेये रोज घेत असाल तर तिन्ही वगळायचे आहेत.
२. कोणताही एक दिवस ३० मिनिटे मांडी घालून डोळे मिटून काहीही न बोलता (स्वत:शी देखील न पुटपुटता) बसून राहायचे आहे.
३. कोणताही एक दिवस कमीत कमी ३ तास एक शब्द देखील बोलायचा नाही.
४. कोणताही एक दिवस आंतरजाल, मोबाईल, टिव्ही, लॅपटॉप किंवा कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणावर काहीही वाचायचे नाही, बघायचे नाही, संगीत ऐकायचे नाही, फोनवर बोलायचे नाही (अगदीच जीवनमरणाचा प्रश्न असेल तर बोलायला हरकत नाही.)
५. कोणत्याही एका शनिवारी रात्री १० वाजता अंथरुणात जायचे, घरातल्यांशी गप्पा मारायला हरकत नाही, झोपी गेले तरी हरकत नाही. दुसर्या दिवशी सकाळी ६ वाजता उठायचे, ७ वाजेपर्यंत सगळे आवरायचे, केवळ उठून लोळत पडायचे नाही. रविवारचा दिनक्रम तुमच्या मर्जीप्रमाणे घालवायचा मात्र दिवसभरात झोपायचे नाही.रात्री कधीही तुमच्या सोयीनुसार झोपायला जाऊ शकता.
६. ज्या व्यक्ती उपवास करत नाहीत त्यांनी केवळ आव्हान म्हणून कोणताही एक दिवस निवडून उपवास करायचा आहे. उपवासाच्या दिवशी फळे, फळांचा रस, पाणी घेण्याची मुभा असेल. उपवास दुसर्या दिवशी सुर्योदयानंतर सोडायचा आहे.
७. आपणास कोणतेही व्यसन असेल, उदा. तंबाखू, सिगारेट, दारु, मावा, गुटखा तर कमीतकमी ३ दिवस त्या व्यसनापासून दूर राहायचे आहे.
आपण जीवनात अनेक आव्हानांचा यशस्वीपणे मुकाबला करत असतो मात्र ती आव्हाने आपल्यावर लादलेली असतात. वरील आव्हानांचा उद्देश आपल्या मनाचा कणखरपणा तपासण्याचा आहे आणि आपले अनुभव शब्दबद्ध करुन इथे लिहा. त्याचा मला उपयोग होईल. आपण एकापेक्षा अधिक आव्हाने स्वीकारणार असाल तर आपले स्वागत आहे.
यातील कोणतेही आव्हान आपल्या दिनक्रमाचा भाग आहे किंवा ते सहजसाध्य आहे ते निवडू नये. या धाग्याच्या फलश्रुतीनंतर आपण अजुन आव्हानांचा विचार करु शकतो. त्यासाठी याच धाग्याचा पुढला भाग दुसरा कोणीही प्रकाशित करु शकतो.
मग आहे काय हिंमत ? स्वीकारता काय आव्हान ?
वर्गीकरण
वाचने
17189
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
नक्की स्वीकारले असते
आधीच पूर्ण केलेली आहेत त्यामुळे सॉरी.
In reply to नक्की स्वीकारले असते by जॉनविक्क
आपण एखादे आव्हान सुचवू शकता.
धन्यवाद सर
In reply to आपण एखादे आव्हान सुचवू शकता. by जॉनविक्क
अवघड गोष्टी मला जमत नाहीत. अन्यथा केसाने विमान ओढा म्हटले असते
In reply to धन्यवाद सर by धर्मराजमुटके
हे काय आव्हान है का राव ..
In reply to आपण एखादे आव्हान सुचवू शकता. by जॉनविक्क
साक्षीदार कशाला, विश्वास आहे की
In reply to हे काय आव्हान है का राव .. by खिलजि
वरील सर्व गोष्टी पूर्वी
५) वर्षात २-३ वेळेस उपवास
In reply to वरील सर्व गोष्टी पूर्वी by सुबोध खरे
क्र १- पेय, आवडते पेय सोडणे.
हे करण्यामागचा उद्देश (काय
सलग 52 तास संपूर्ण निर्वस्त्र राहिल्यास
In reply to हे करण्यामागचा उद्देश (काय by गवि
विपश्यना?
गवि आणि स्वधर्म
मला शिवीगाळ ना करता हे ५२ तास
;-)))))
In reply to मला शिवीगाळ ना करता हे ५२ तास by खिलजि
हूस्स्स आणि फुस्सस हे शब्द ५२
आव्हान स्विकाराव अस म्हणतोय आम्ही!
आव्हान स्विकाराव अस म्हणतोय आम्ही!
एकदोन आव्हाने आणखी...
मला सकाळी उठल्यावर चहा पिताना
सन्यासश्रम
दिवाळी अंक दिवाळीत वाचायचे
.
दिनांक २८ मार्च पासून
In reply to . by वकील साहेब
अजून एक आव्हान
==)) ==)) ==))
In reply to अजून एक आव्हान by जॉनविक्क
जो पर्यंत या जगात सिहिणी असतील
In reply to ==)) ==)) ==)) by खिलजि
==)) ==)) ==))
In reply to जो पर्यंत या जगात सिहिणी असतील by जॉनविक्क
आयष्यातील एका आव्हान
पुढे काय झाले? व्यक्ती बरी
In reply to आयष्यातील एका आव्हान by चौकस२१२
हो झाली.. डॉक्तरांच्या आणि
In reply to पुढे काय झाले? व्यक्ती बरी by कानडाऊ योगेशु
घाईत लिहिले
जगन्नाथ दीक्षित डाएट करण्याचा
आव्हान
धन्यवाद !
In reply to आव्हान by ओम शतानन्द
४ नंबर करणे अतिशय अवघड आहे
एक वर्ष दारु बंद
आवडला धागा..