ड्रोनातिरेक आणि इराण सौदी संघर्ष तापण्याची शक्यता

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
15 Sep 2019 - 4:53 pm
गाभा: 

सौदीतील सर्वात मोठ्या तेल सुविधेवर ड्रोनच्या सहाय्याने हल्ला केला गेला आणि आमेरीकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी इराणला जबाबदार धरल्याची बातमी वाचली तर ड्रोन म्हणजे चालक विरहीत विमान नव्हे तर ड्रोन नावाने वापरल्या जाणार्‍या फिरत्या तबकड्यां वापरल्या गेल्या याची खात्री करणेही अवघड गेले एवढा ड्रोन शब्द दोन्ही बाबींसाथी एकसारखा वापरला जातो.

इराणचा इराक व्यतरीक्त इतर देशांसोबत कोणताही मोठा सिमा विवाद नाही -इराक स्वतःही तसे शिया बहुल राष्ट्र आहे आणि सध्या कमकुवत सुद्धा त्यामुळे सध्या तोही इराणसाठी मोठा प्रश्न नाही.. एकमेव शिया राष्ट्र असल्यामुळे सुन्नी बहुमतापुढे थोडे फार एकटे पडले तरी बाकी जगाशी संघर्ष टाळून गुण्या गोविंदाने जगू शकले असते. पण ते न करता - शांतता धर्मीय धर्मांधता -सत्तेवर आल्यापासून गेली चाळीस वर्षे सातत्याने सौदींना पाण्यात पहाणे, इज्राएल विरोधी दहशतवादी संघटनेस साहाय्य पुरवणे ते गेली काही वर्षे येमेन मधील हाऊथी दहशतवादी संघटनेस सहाय्य पुरवणे इत्यादी उपद्व्याप करत आले आहे. तसे एकटे पडलेल्या इराणला अगदी अलिकडे कतार आणि तुर्कस्थानातून सहानुभूती मिळते, आमेरीकेच्या स्पर्धक म्हणून रशिया आणि चिनही जराशी सहानुभूती दाखवत असणार. पण तरीही इराणची अण्वस्त्र बाळगण्याची गरज आनि इच्छा सुद्धा अनाकलनीय आहे. एखादे नवे युद्ध ओढावून घेण्यास सध्या आमेरीकी जनमत अनुकूल नाही गल्फ मधील देशांकडे युरोमेरीकेने पुरवलेली युद्ध विमाने आणि शस्त्र सामग्री असली तरी जमिनी सैन्याचा अभाव आहे. सौदी स्वसंरक्षणासाठी पाकिस्तानचे जमिनी सैन्य वापरते पण पाकीस्तान ते सैन्य सौदी सिमांच्या पलिकडे वापरु देत नाही तसेच शिया इराण सोबत पाकीस्तान पंगा घेण्याची हिम्मत करु शकत नाही.

सौदीतील तेल सुविधेवर तबकडी ड्रोनांच्या साहाय्याने हल्ला केल्याचा येमेन मधील इराण समर्थित हाउथी दहशतवाद्यांनी दावा केला आहे. आताशा दहशत वाद्यांकडेही आधुनिक तंत्रज्ञानाधारीत उपकरणे आणि शस्त्रास्त्रांचा पुरवठा वाढताना दिसतो आहे. तरीही येमेन सारख्या दूर ठिकाणी बसून सौदी तेल विहरींवर तबकडी ड्रोण कसे चालवले जाऊ शकतात हे कोडे तुर्तास तरी औघड वाटते तबकडी ड्रोनांना मर्यादीत उर्जेवर एवढी अंतरे कशी कापता येऊ शकतात ? आणि हे खरे असेल तर जगभरासाठी हि चिंतेची बाब आहे. एकतर कमी उंचीवरून या तबकड्या जाऊ शकत असल्यामुळे विमानाम्ना ओळखणार्‍या रडारच्या कक्षेस चुकवून पुढे जाऊ शकत असाव्यात हवेतून पोह्चवून कसा आणि कुठे हल्ला चालवला जाइल हे सांगणे कठीण आणि त्यांच्या साहाय्याने केवढे नुकसान पोहोचवले जाऊ शकते हे सौदी तेल विहिरींवरील हल्ल्याने दाखवून दिले आहे. या तबकड्या ड्रोनांच्या धोक्यांपासून स्वतःस सुरक्षित कसे ठेवावे याचा भारतीयांनीही अ‍ॅडव्हान्स मध्येच विचार करावयास हवा.

दहशतवाद्यांचा असा हल्ला झाल्यास पुलवामा बाबत भारताने पाकीस्तानला जसे जबाबदार धरुन बालाकोटवर हल्ला केला तसे करण्यावाचून सौदी पुढे दुसरा कोणता पर्याय शिल्लक असू शकतो . ड्रोनातिरेकाच्या सरळ इराणविरुद्धच्या बदल्याची सौदीने अद्याप भाषा केली नाही हे खरे असले तरी असे तेल विहिरींवर असे हल्ले सौदी खूपकाळ प्चवू शकणार नाही जमिनी सैन्याच्या अभावी इराणवर मोठा विजय सौदीम्ना मिळवणे शक्य नसले तरी आमेरीकेने पुरवलेली युद्ध विमाने इराणला भारी पडतील आणि आमेरीकी आर्थिक नाकेबंदीने आधीच जेरीस आलेल्या इराणची स्थिती सौदी हवाई हल्ल्यापुढे आणखीच वाईट होईल . आमेरीकी अध्यक्षांना स्वतःच्या जनता आणि संसदेची इराण सोबत युद्धास परवानगी मिळण्याची अपेक्षा नसताना सौदींनी इराण सोबत हवाई युद्ध केल्यास आमेरीकी अध्यक्षांची आयती सोय होईल . इराणने स्वतःची स्थिती मजबूत नसताना येमेनी दहशतवाद्यांना एवढे हाता बाहेर का जाऊ दिले हे समजणे अवघड आहे. पण सौदी यावेळी इराणला मोठी किंमत मोजण्याचा सहज आग्रह धरु शकतील, ती काय आणि कशी असेल ते नजिकच्या काळात कळेलच .

अर्थात दहशत वादाने एवढे परेशान असुनही युरोमेरीका शस्त्रास्त्राम्च्या व्यापारावरच का नियंत्रण आणून दहशतवाद्यांच्या हातात आधूनिक शस्त्रे आणि तंत्रज्ञान पडणार नाही हे का पाहू इच्छित नाही हे समजत नाही. सॅटेलाईट्मधून टाचणीपण दिसते म्हणतात आणि इथे अतिरेक्यांच्या हातात रॉकेटसारखी अत्याधुनिक शस्त्रसामुग्रीही आढळते .. हे थांबवले का जात नाही ह्याबाबत युरोमेरीकन नागरीक दबाव का बनवत नाहीत हा प्रश्न फिरुन फिरुन पडत रहातो.

भारताच्या दृष्तीने कोणत्याही दहशतवादी संघटनांच्या हात मजबूत होणे श्रेयस्कर नाही. इराणसोबतचे भारतिय संबंध म्हणजे तोंड दाबून सहन करणे प्रकारात आहे. अफगाणीस्तानला मदत पोहोचवण्यासाठी इराणमधला रस्ताही जिवंत ठेवणे भाग आहे. दुसरीकडे आमेरीका इराणसोबत भारतीय सरकारी संबंधाने खट्टू होते. सरकारात राहून इराणच्या धर्मांध आंतरराष्ट्रीय खेळांबाबत काही बोलता येत नाही पण भारतीय विरोधी पक्षांनी आणि माध्यमांनी इराणी सरकार समोर प्रष्न उपस्थित करण्याची गरज असावी असे वाटते. असो.

* अनुषंगिकाव्यतरीक्त आवांतरे, व्यक्तीगत टिका, शुद्धलेखन सुचवण्या टाळण्यासाठी चर्चा सहभागासाठी अनेक आभार

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Sep 2019 - 8:20 pm | डॉ सुहास म्हात्रे

हे प्रकरण वर दिसते इतके साधे-सोपे-सरळ नाही.

असे का ते समजून घ्यायला, खालील नकाशाची मदत होईल...

१. ज्या जागी हल्ला झाला आहे ते अबकेक हे ठिकाण सौदी अरेबियाच्या पूर्व प्रांतात (इस्टर्न प्रॉव्हिन्स) आहे. सौदीचे सर्वात मोठे तेलसाठे आणि तेलावर अवलंबून असलेले इंडस्ट्रियल झोन्स पूर्व प्रांतातील या जागेच्या जवळपास आहेत.

२. या हल्ल्यांमुळे सौदीची सुमारे ५०% (एकूण दर दिवशी १ कोटी बॅरल्सपैकी ५० लाख बॅरल्स) तेल उत्पादक प्रणाली आणि बरीचशी तेलप्रक्रिया प्रणाली बंद पाडली आहे. सद्या सौदी आराम्को या तिच्या तेलत्पादक कंपनीच्या जागतिक स्तरावरच्या IPO ची तयारी करत आहे. या हल्ल्यामुळे, सुरक्षिततेचे प्रश्न उभे राहून, कंपनीच्या शेअरचा सर्वोत्तम भाव मिळण्यामध्ये अडचणी येतील.

३. हल्ल्याची जागा येमेनमधील कोणत्याही ठिकाणापासून ५०० किमी किंवा जास्त दूर आहे. ड्रोन किंवा इतर कोणत्याही उडणार्‍या मानवरहित वस्तूने (अनमॅन्ड एरियल व्हेईकल), ते सर्व अंतर सौदीच्या भूभागावर रेड अ‍ॅलर्टवर असलेल्या संरक्षणयंत्रणांना चुकवत, पार करणे शक्य नाही.

४. हल्ल्याची जागा इराणमधील कोणत्याही ठिकाणापासून २०० किमी किंवा जास्त दूर आहे. यातील ९०% अंतर अरबी खाडीवरून जाते. खाडीच्या संवेदनाशील भागात अमेरिकन नौदल व सैन्यतळांचा कडक बंदोबस्त आहे. या भागातून, ड्रोन किंवा तत्सम वस्तू अरबी खाडी पार करून गेली आणि अमेरिकन नौदलाला पत्ता लागला नाही, असे होणे शक्य नाही.

५. सौदीत १०-१५% टक्के जनता शिया आहे. ते मुख्यतः सौदीच्या पूर्व प्रांतात आहेत व तेथे त्याचे प्रमाण ३३% टक्के आहे. सौदी सुन्नी सत्तेच्या मते येथिल शिया इराणधार्जिणे आहेत आणि शिया समाजाच्या मते त्यांच्याशी आपपरभावाने व्यवहार केला जातो. हे ताणलेले संबंध अनेकदा उफाळून वर आलेले आहेत व त्यामुळे हिंसक घटनाही घडलेल्या आहेत.

६. सौदीला लागून असलेल्या आणि येथून १०० किंवा कमी किमी अंतरावर असलेल्या बाहरेनची ६०% लोकसंख्या शिया आहे आणि तेथे सुन्नी राजसत्ता आहे. २०१०मध्ये झालेल्या अरबस्प्रिंगमध्ये येथे शिया समुदायाने मोठा प्रमाणावर निदर्शने केली होती आणि ती कडक लष्करी कारवाईने मोडून काढली गेली (त्यासाठी सौदीने बाहरेनमध्ये सैन्य पाठवले होते), असा इतिहास आहे. येथिल शियांचे इराणशी जास्त घनिष्ट संबंध आहेत (किंबहुना, बाहरेन हा पर्शियन साम्राज्याचा भाग होता या कारणाने इराणने तो त्याचा प्रांत असल्याचा दावा केला १९७१ पर्यंत केला आहे).

वरची वस्तूस्थिती पाहता,

अ) इराणप्रणित येमेनच्या भूमीवरून किंवा तडक इराणच्या भूमीवरून, यापैकी कोणत्याही ठिकाणावरून हल्ला होणे शक्य नाही. पण, सौदीत घुसलेले इराणप्रणित हस्तक किंवा इराणच्या मदतीने/मदतीशिवाय स्थानिकांपैकी कोणी हल्ला केला असेल, हा तर्क वास्तविकतेच्या जास्त जवळ असेल.

आ) सद्या इराण-अमेरिका+* संघर्ष बराच चिघळला आहे. त्यातील हा एक कावा/चाल असण्याची शक्यता अगदीच डोळ्याआड करता येणार नाही**.

तेव्हा, आताच काही तर्क मांडण्याऐवजी, जरासे थांबून अधिक तथ्यांची वाट पाहणे जास्त योग्य होईल.

===============

* : अमेरिका+ = अमेरिका आणि इराणशी वैर असणारी इतर खाडीराष्ट्रे.

** : इथे इराकयुद्धाची पार्श्वभूमी आठवा.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Sep 2019 - 6:28 pm | डॉ सुहास म्हात्रे

यात एक मुद्दा राहिला, तो असा...

आतापर्यंतचे, येमेनमधल्या हौती गटाने सौदीवर केलेले ड्रोन हल्ले, सौदी-येमेन हद्दीला लागून असलेल्या सौदीच्या दक्षिण विभागात झालेले आहेत. येमेनी सीमेपासून १५०-२०० किमी पेक्षा दूर असलेला हा पहिलाच हल्ला असावा.

याशिवाय, याच्या जवळपास येईल किंवा काहिशी तुलना करता येईल इतके नुकसान या अगोदरच्या ड्रोन हल्ल्यांत झालेले नाही.

हा हल्ला वेगळा आहे आणि हे प्रकरण वेगळे आहे, असे म्हणायला खूप जागा आहे... अगदी येमेनी हौती गटाने त्याची जबाबदारी घेतली असली तरीसुद्धा. त्यांनी काही पुरावे दिले (जे फार कठीण आहे) तर जरा तरी विचार करता येईल.

गामा पैलवान's picture

15 Sep 2019 - 9:44 pm | गामा पैलवान

माहितगार,

तुमचं हे विधान वाचलं :

इराणची अण्वस्त्र बाळगण्याची गरज आनि इच्छा सुद्धा अनाकलनीय आहे.

इराणने २००५ मध्ये आपली आण्विक सुविधा बघू द्यायची संयुक्त राष्ट्रासंचाच्या निरीक्षकांना परवानगी दिली होती. त्यामुळे अमेरिकेच्या आरोपांत फारसं तथ्य नाही.

इराणने आंतरराष्ट्रीय आण्विक आयोगाच्या मर्यादेत राहून आपला आण्विक कार्यक्रम राबवला आहे ( संदर्भ : https://uk.reuters.com/article/uk-iran-nuclear/iran-is-complying-with-nu... ). पण अमेरिकेस इराणशी युद्ध करण्यात जास्त रस आहे. म्हणून बहुधा पुढे सौहार्दाने बोलणी होऊ शकली नाहीत.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

16 Sep 2019 - 9:28 am | माहितगार

यात अनवधानाने अंशतः दिशाभूल होत असण्याची शक्यता वाटते.

आपण दिलेला वृत्त संदर्भ इराण - आमेरीका दरम्यान झालेल्या करारात इराणने मर्यादा स्विकारल्या नंतरचा आहे . त्याचा अर्थ एवढाच होतो की करारानंतर आपल्या बाजूने इराणने -किमान उघडपणे- करार मोडला नाही. पण करार होण्याच्या आधी इराणची अण्वस्त्र क्षमतेची इच्छा होती तसे नसते तर पाकीस्तानी अणूवैज्ञानिकांकडून छुपी मदत मिळवण्याचे त्यांना काही कारण नव्हते.

दुसरे असे की युरोमेरीका करारापुर्वी पासून सांगत होती तसे आण्विक उर्जेची निर्मिती IAEA च्या नियमांच्या मर्यादेत राहून करारा आधीही शक्य होती आंतरराष्ट्रीय निरीक्षकांना नकार इराणकडून येत होता तो करारा नंतर इराणने IAEA ची निरीक्षणे मान्य केली आसावित. आपण दिलेल्या वृत्तातही खालील वाक्ये नोंद घेण्या जोगी आहेत.

In its last report in May, the IAEA had said Iran could do more to cooperate with inspectors and thereby “enhance confidence”

Iran has ruled out negotiations on its ballistic missiles and broader Middle Eastern role.

इराण इज्राएल आणि सौदी विरुद्ध दहशतवादी गटांना रॉकेट्सचा मोठा सप्लाय करत आला आहे आणि आमेरीकेचे इराण विरुद्ध असण्याचे हे कारण आहे.

सुबोध खरे's picture

16 Sep 2019 - 9:52 am | सुबोध खरे

इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमास खीळ घालण्याचे काम सी आय ए आणि मोसाद यांनी मिळून केले आहे यात त्यांनी सिमेन्स या जर्मन कंपनीच्या संगणकात स्टक्सनेट नावाचा व्हायरस घुसवून त्यांच्या अणुकेंद्राची युरेनियम समृद्ध करण्याची केंद्रोत्सारी प्रणाली निकामी केली.

https://www.timesofisrael.com/dutch-mole-planted-infamous-stuxnet-virus-...

https://www.wired.com/2014/11/countdown-to-zero-day-stuxnet/

तेंव्हा हा ड्रोनचा हल्ला करण्याचे काम यांनीच केले असण्याची दाट शक्यता आहे.

कारण असे हवेतून उडून येणारे ड्रोन सौदी वायुदलाच्या ७ ऍवॅक्सची ( भारताकडे फक्त ५ एवॅक्स आहेत) आणि त्यांच्या पेट्रियट आणि हॉक या क्षेपणास्त्र प्रणाली आणि FPS ११७ आणि TPS ४३ या रडारची नजर चुकवून येणे अशक्य आहे.

भारतीय सुखोई ३० ने पाकिस्तानचे ड्रोन काही मिनिटातच पाडले असे असताना https://www.news18.com/news/india/iaf-jet-shoots-down-pakistani-military...

अब्जावधी डॉलर्सचे तेल क्षेत्र असे असंरक्षित राहील हि शक्यता ० टक्के आहे.

हा प्रकार सरळ सरळ आपण शेण खायचं आणि दुसऱ्याचं तोंड हुंगायचं असा आहे

ड्रोन gps follow करून जगाच्या कोणत्याही भागात उड़त जाउ शकते हे जरी खरे असले तरी त्याच्या अन्तराच्या व स्टेल्थ मोड़ मधे राहायाच्या मर्यादा अतिशय कमी आहेत.

लेट्स सी..!

गामा पैलवान's picture

16 Sep 2019 - 1:52 am | गामा पैलवान

जॉनविक्क,

तुमचा व म्हात्रे डॉक्टरांचा प्रतिसाद वाचून हे बनावट आक्रमण ( = false flag) असावा असा मला ज्याम संशय येतोय.

आ.न.,
-गा.पै.

माहितगार's picture

16 Sep 2019 - 9:01 am | माहितगार

तुमचा व म्हात्रे डॉक्टरांचा प्रतिसाद वाचून हे बनावट आक्रमण ( = false flag) असावा असा मला ज्याम संशय येतोय.

बनावट आक्रमण असते तर इराण समर्थित सौदी विरोधक दहशतवादी गट हाऊथींनी हल्ल्याची जबाबदारी कशाला घेतली असती? दुसरे असे की सौदी तेल कंपनीची किंमत कमी होईल असे फाल्स फॅग सौदी कशाला करुन घेतील. हवाई युद्धात -झालेतर -सौदी इराणला भारी पडेल यात शंका नाही पण आजही कोणतीही हवाई वरचढता अभेद्य नाही त्यामुळे इराणी हवाईदलही सौदी तेल विहिरींचे अंशिक का होईना नुकसान करु शकतेच आणि अशी कोणतीही शक्यता सौदी स्वतःवर स्वतःहून का ऑढवून घेईल.

दुसरा एक मुद्दा असा की हल्ला यशस्वी झाल्या नंतर जगाचे घटनेकडे लक्ष गेले तरी काही वृत्तांनुसार तबकडी ड्रोनाच्या साहाय्याने गेले काही महीन्यात काही अयशस्वी प्रयत्न झाले दहशतवाद्यांना त्यांच्या हल्ल्याची अ‍ॅक्युअरसी वाढवण्यात या वेळी यश आले. हे खरे असेल तर अनेक प्रश्न उपस्थित होतात.

* सौदीत ड्रोनांची मोठी संख्या आयात करता येणे * एक्स्प्लोजीव्हची बेकायदा आयात * अ‍ॅटॅकसाठी अ‍ॅक्युरसी मिळावी म्हणून रिहर्सल हे सगळे सौदी सुरक्षा व्यवस्थेचा डोळा चुकवून * खरे म्हणजे या सर्व प्रकारात आमेरीका आणि पाकीस्तानचेही वाभाडे निघते कारण सुरक्ष विषयक मार्गदर्शन आमेरीका पडद्या आडून पुरवत असणार त्यात कच्चे दुवे राहीले का ? *सौदीच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पाकीस्तानची आहे आणि सुरक्षा देण्यात पाकीस्तानी कमी पडले असेही सिद्ध होते. * शिवाय गुप्तचर संस्थांच्या अपयशही दिसते .

गामा पैलवान's picture

16 Sep 2019 - 4:35 pm | गामा पैलवान

माहितगार,

तुमचे एकेक प्रश्न बघूया.

१.

बनावट आक्रमण असते तर इराण समर्थित सौदी विरोधक दहशतवादी गट हाऊथींनी हल्ल्याची जबाबदारी कशाला घेतली असती?

श्रेय उपटण्याची घाई असू शकते. किंवा मग त्यंचा एखादा फुटीर गट अमेरिकेच्या आश्रयास गेलेला असू शकतो.

२.

दुसरे असे की सौदी तेल कंपनीची किंमत कमी होईल असे फाल्स फॅग सौदी कशाला करुन घेतील.

अमेरिका नुकसान भरून देईल.

३.

.... इराणी हवाईदलही सौदी तेल विहिरींचे अंशिक का होईना नुकसान करु शकतेच आणि अशी कोणतीही शक्यता सौदी स्वतःवर स्वतःहून का ऑढवून घेईल.

अमेरिका मागे लागली असेल तर सौदीला हा सौदा करावाच लागेल.

४.

* सौदीत ड्रोनांची मोठी संख्या आयात करता येणे * एक्स्प्लोजीव्हची बेकायदा आयात * अ‍ॅटॅकसाठी अ‍ॅक्युरसी मिळावी म्हणून रिहर्सल हे सगळे सौदी सुरक्षा व्यवस्थेचा डोळा चुकवून * खरे म्हणजे या सर्व प्रकारात आमेरीका आणि पाकीस्तानचेही वाभाडे निघते कारण सुरक्ष विषयक मार्गदर्शन आमेरीका पडद्या आडून पुरवत असणार त्यात कच्चे दुवे राहीले का ?

कच्चे दुवे मुद्दाम सोडलेले असण्याचीही शक्यता आहे. जसे ९११ च्या वेळेस सोडले होते.

५.

*सौदीच्या अंतर्गत सुरक्षेची जबाबदारी पाकीस्तानची आहे आणि सुरक्षा देण्यात पाकीस्तानी कमी पडले असेही सिद्ध होते. * शिवाय गुप्तचर संस्थांच्या अपयशही दिसते.

हा मुद्दाम घडवून आणलेला घातपात असू शकतो.

आ.न.,
-गा.पै.

'प्रत्येक जण प्रत्येकवेळी स्वत;चे स्वतःवर आक्रमण करुन घेत असते' या साठी कॉन्स्पिरसी थेअरी बरोबर ठरण्यासाठी बुद्धीला बरेच अधिक ताणावे लागत नाही ना अशी शंका वाटते . जिथ पर्यंत हाऊथी- सौदीचा विषय आहे ह्या हल्ल्याचा सक्सेस मोठा होता पण या आधी हाउथींनी सातत्याने हल्ल्याचे प्रयत्न केल्याचे दिसून येते, एखादे असेल तर फाल्स फ्लॅग ऑपरेशनची शंका ही घेता येईल सातत्याने कोण स्वतःवर हल्ले करुन घेइल?

सुबोध खरे's picture

17 Sep 2019 - 10:14 am | सुबोध खरे

आंतर राष्ट्रीय राजकारण हा एक गहन विषय आहे.

आपला मुद्दा सिद्ध करण्यासाठी राज्यकर्ते काय करतील हे सांगता येत नाही.

१९८१ मध्ये आपण किती साधे सरळ आहोत आणि अमेरिका कशी रक्त पिपासूं आणि हल्लेखोर आहे हे दाखवण्यासाठी लिबियाच्या कर्नल मुअम्मर गडाफी यांनी आपली दोन मिग २३ विमाने अमेरिकेच्या विमानवाहून नौकेजवळ नेली आणि त्यांच्या F १४ विमानांनी ती पाडली म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणात फार मोठा गहजब केला होता.
हि मिग २३ विमाने केवळ १३ नॉटिकल मैल जवळ आली असूनही त्यांनी आपले क्षेपणास्त्र Vympel R-23 (NATO reporting name AA-7 Apex) (टप्पा ३५ नॉटिकल मैल) डागले नाही आणि आपली विमाने क्षेपणास्त्र हल्ला झाल्यावर दोन्ही विमानांच्या वैमानिकांनी पॅराशूट मधून खाली उतरून आपला जीव वाचवला. कर्नल मुअम्मर गडाफी यांनी याचे फार मोठा गाजावाजा केला होता.

https://www.washingtonpost.com/archive/politics/1989/03/26/despite-new-d...

तेलाचे पडते भाव सावरण्यासाठी सौदी आणि त्यांचे पाश्चात्य पित्ते( तेल कंपन्या) यांनी हा बनाव केला नसेलच असे खात्रीने सांगता येत नाही

.कारण कालच्या एका दिवसात कच्चे तेल ५७ वरून ७० डॉलर्स वर गेले आहे.

माहितगार's picture

17 Sep 2019 - 11:20 am | माहितगार

इराक सोबतच्या दुसर्‍या युद्धातला आमेरीकी हस्तक्षेप खरेच शंकास्पद आणि अनावश्यक होता, तशाच इतरही अनावश्यक हस्तक्षेपांमूळे आमेरीकेची विश्वासार्हता कमी झालेली आहे हे समजता येते. पण म्हणून प्रत्येक वेळी कॉन्स्पिरसीची शंका घेण्यास जागा असतेच असेही असते का ?

आमेरीकी अथवा सौदी संत आहेत असे म्हणावयाचे नाही पण इराण कोणत्या अर्थाने संत आहे? इराणने काहीच काड्या केल्या शिवाय आमेरीकेला त्यात रस का असेल ? तेलच हवे असेल तर इराणी तेलाच्या व्यापारावर आमेरीका निर्बंध लावण्याबाबत आग्रही का राहील ? तेलाची उपलब्धता वाढली की भाव पडतात अनुपलब्धता वाढवली की भाव वाढतात. सौदी भाव वाढवायचे तर तेल पुरवठ्यात सरळ कपात करू शकते त्यासाठी स्वतःवर हल्ल्याचे नाटक करण्याची सौदीला गरज का भासेल ? तेलाचे भाव वाढले तर सौदीला लाभ होईल सौदी तेलाच्या भाववाढीत आमेरीकेचा सरळ काही फायदा दिसत नाही. ट्रम्प विरोधक आमेरीकी डाव्या मंडळींना ट्रम्प बद्दल विरोधी बोलण्यास काही साधन हवे म्हणून अशा कॉन्स्पीरसी थेअरींना बढावा दिला जात नाही ना अशी शंका वाटते.

इराण संत आहे हिसबोला संत आहेत हाऊथी संत आहेत हे मला पाकिस्तान संत आहे अतिरेकी संत आहेत पुलवामा मोदीं सरकारने स्वतः घडवले अशा स्वरुपाच्या बिनबुडाच्या कॉन्स्पिरसी थेअरीसारखे वाटते आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2019 - 11:49 am | डॉ सुहास म्हात्रे

बुद्धीला बरेच अधिक ताणावे लागत नाही ना अशी शंका वाटते

आंतरराष्ट्रिय राजकारणात "बुद्धीला बरेच अधिक ताणावे लागेल" असेच डावपेच आखले जातात... तेथे, आपली सगळी पाने उघडी करून खेळणे, बुळेपणा/निर्बुद्धपणा समजला जातो व खात्रीशीरपणे ठरतोसुद्धा.

आंतरराष्ट्रिय राजकारण केवळ सत्य, नितीमत्तेच्या गप्पांवर आणि सरळ तर्कांवर खेळले जात नाही. पाकिस्तानचा गेल्या ६० वर्षांचा व्यवहार डोळ्यासमोर असूनही अनेक भारतियांना हे उमगत नाही, हीच या कौटिल्य आणि (गनिमी काव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या) शिवाजी महाराजांच्या भूमीची सर्वात मोठी शोकांतिका आहे. :(

माहितगार's picture

17 Sep 2019 - 2:51 pm | माहितगार

एक विचारु का ?

इराण बद्दल एवढे प्रेम का येत आहे ?

ह.घ्या. हेवेसानल.

माहितगार's picture

17 Sep 2019 - 2:58 pm | माहितगार

नाही म्हणजे;

सौदी कडून पुरस्कार मिळतो, ट्रम्प मेळाव्याला उपस्थित रहातात तरी इराणचे पारडे जड याचे रहस्य काय ?

;)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2019 - 5:17 pm | डॉ सुहास म्हात्रे

@ माहितगार :

इराण बद्दल एवढे प्रेम का येत आहे ?

हा प्रश्न माझ्यासाठी असला तर, तो अत्यंत बिनबुडाचा आहे हे नक्की. =)) कारण, इराणबद्दल मी कधी व कसे प्रेम दर्शविले आहे हे दाखवता येईल का ?

"आंतरराष्ट्रिय राजकारणात कायमचे मित्र/शत्रू नसतात, केवळ स्वराष्ट्राचे हितसंबधच ते काय कायमचे असतात. हे तत्व ज्यांना समजते ते देश/नेते यशस्वी ठरतात आणि ज्यांना समजत नाही ते बुळे/मुर्ख समजले जाऊन अयशस्वी होतात." ही सार्वकालीक-सार्वस्थलिक वस्तूस्थिती वारंवार सांगूनही काही लोकांना जर ते समजत नसेल तर त्याला मी जबाबदार नाही.

१. जर इराणच्या भूमीवरून ड्रोन सोडले गेले असा तुमचा दावा असेल (किंवा त्या दाव्याला तुमचा पाठींबा असला) तर तो का व कसा फोल आहे याची सविस्तर मिमांसा मी माझ्या पहिल्या प्रतिसादांत केली आहे... हे तुमच्या नजरेतून सुटले आहे की ते तुमच्या दाव्यांना सोईचे नाही म्हणून तिकडे दुर्लक्ष केले आहे ?

२. तसेच, त्याच प्रतिसादाचे सार लिहिताना अ) इराणप्रणित येमेनच्या भूमीवरून किंवा तडक इराणच्या भूमीवरून, यापैकी कोणत्याही ठिकाणावरून हल्ला होणे शक्य नाही. पण, सौदीत घुसलेले इराणप्रणित हस्तक किंवा इराणच्या मदतीने/मदतीशिवाय स्थानिकांपैकी कोणी हल्ला केला असेल, हा तर्क वास्तविकतेच्या जास्त जवळ असेल. मी असे लिहिले आहे... हे सुद्धा तुमच्या नजरेतून सुटले आहे की ते तुमच्या दाव्यांना सोईचे नाही म्हणून तिकडे दुर्लक्ष केले आहे ? त्यातला महत्वाचा भाग, परत नजरेतून सुटू नये यासाठी, इथे ठळक केला आहे, जो "इराण प्रेमाचा तुमचा दावा" किती पोकळ आहे, हे स्पष्ट करतो आहे. =))

साप साप म्हणून आपल्या मनानेच सोईचा निष्कर्ष काढून एकाच ठिकाणची भुई धोपटत राहिल्याने, साप सापडत नाही... प्रथम त्याचे लपण्याचे सर्व पर्याय तपासून शोध घ्यावा लागतो... कारण, साप तुमच्या "खाजगी तर्कावर (प्रायव्हेट लॉजिकवर)" अवलंबून लपायचे ठिकाण ठरवत नाही ! ;) :)

***************

तुमची एकेरी शेरेबाजी पाहता, तुम्ही भारत-इराण संबंधांचा अभ्यास वाढविण्याची जरूरी आहे, असे वाटते.

त्यासाठी सुरुवात करायला बीजस्वरूपी थोडे काही इथे देत आहे...

१. भारत इराणकडून तेल घेतो ते, इराण स्वस्त आणि जवळचा पर्याय आहे यासाठीच, याबाबत तुमच्या मनात शंका असली तरी माझ्या मनात अजिबात नाही.

२. भारत इराणमधील छाबाहार बंदर विकसित करत आहे ते केवळ पुढील कारणांसाठी आहे :
(अ) चीनच्या ग्वादार बंदर विकसित करून भारतिय महासागरात वर्चस्व प्रस्थापित करण्यास आडकाठी करण्यासाठी,
(आ) तेलावाहतुकीसाठी महत्वाच्या असलेल्या अरबी खाडीच्या प्रवेशद्वाराजवळ चीनचे वर्चस्व कमी करण्यासाठी, आणि
(इ) पाकिस्तानला टाळून अफगाणिस्तानबरोबर, खुष्किचा सुरक्षित आणि कमी खर्चाच्या मार्गाचा दूरगामी पर्याय अनिवार्य आहे, यासाठी.

बाकी सर्व "शेकडो वर्षांचे जुने मैत्रीचे आणि सांस्कृतिक संबंध" वगैरे 'बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात' आहेत. ते माध्यमांत आणि वेळप्रसंगी संयुक्त विधानांत बोलायला-लिहायला-वाचायला फार छान असतात... त्यापेक्षा त्यांचा जास्त अर्थ लावणे येडबंबू (नाईव्ह) प्रकार होईल. :)

३. हे सर्व नीट समजण्यासाठी खालील किमान दोन विषयांच्या इतिहासाचा अभ्यास जरूरी आहे...

अ) अमेरिकेशी संबंध बिघडले की, इराणचे भारताबद्दलचे उधाणाला येणारे प्रेम (पक्षी : तेल स्वस्तात आणि भारतिय चलनात देणे, तेलसाठ्यांचे विकसन करण्याचा आग्रह, छाबाहार प्रकल्पात अधिक सवलती देणे, इ)
आणि
आ) अमेरिकेशी संबंध जरा बरे झाले की, इराण भारताशी करत असलेला तिरसट व्यवहार (पक्षी : तेलाचे भाव वाढवणे, भारतिय कंपन्यांशी बोलणी चालू असलेल्या तेलसाठ्यांचे विकसन अधिकार रशियन तेलकंपन्यांना देणे, छाबाहार प्रकल्पात अधिक अटी घालणे, इ)

वरील अभ्यास केलात तर...
(अ) 'अमेरिका+खाडी राष्ट्र' आणि इराणबरोबरचे संबंध ताणलेले राहणे,
(आ) 'पाकिस्तान-इराण' संबंध ताणलेले राहणे, आणि
(इ) अमेरिकेने इराणला (कोणत्या कारणाने का होईना) सतत धाकात ठेवणे, इ
भारताच्या का व किती फायद्याचे आहे, हे समजायला मदत होईल.

अर्थातच यासाठी भारताला स्वतंत्रपणे काहीच करायची गरज नाही... संबंधीत राष्ट्रांचे परस्परविरोधी हितसंबंध त्यांना ते करायला भाग पाडत आहे. भारताने अमेरिकेचा विरोध पत्करून (किंवा पत्करत आहोत असे दाखवत) इराणशी "तथाकथित प्रेमसंबंध" चालू ठेवणे पुरेसे आहे... कारण काही का असेना, अमेरिकेचा इराणवर जेवढा जास्त दबाव असेल, तेवढे इराणचे भारतावरचे प्रेम उतू जाईल. ;) :)

मात्र, "आंतरराष्ट्रिय राजकारणात कायमचे मित्र/शत्रू नसतात, केवळ स्वराष्ट्राचे हितसंबधच ते काय कायमचे असतात. हे तत्व ज्यांना समजते ते देश/नेते यशस्वी ठरतात आणि ज्यांना समजत नाही ते बुळे/मुर्ख समजले जाऊन अयशस्वी होतात." हे तत्व विसरण्याचा मूर्खपणा भारताने टाळाणे अत्यंत आवश्यक आहे, बस्स !

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2019 - 5:23 pm | डॉ सुहास म्हात्रे

वरचा अभ्यास जरासा जरी रुळावर आला की मग,

सौदी कडून पुरस्कार मिळतो, ट्रम्प मेळाव्याला उपस्थित रहातात तरी इराणचे पारडे जड याचे रहस्य काय ?

असे विनोदी प्रश्न विचारायला स्वतःलाच संकोच वाटू लागेल, इतके मात्र नक्की ! =))

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2019 - 6:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

तुम्ही नेहमी मेगॅबायटी लेख व प्रतिसाद लिहित असता.

माध्यमातली एक बातमी धरून, पुढची मागची वस्तूस्थिती विचारात न घेता, केवळ खाजगी तर्काच्या (प्रायव्हेट लॉजिक) बळावर केलेल्या लेखनाने काहीच साधत नाही, हे तुम्हाला सांगायला नकोच.

तेव्हा...
(अ) तुमचे लेखन विचारी असावे,
(आ) निदान सद्य विषयाचा अभ्यास करून केलेले असावे आणि मुख्य म्हणजे...
(इ) ज्यावर टीका करत आहोत तो मजकूर वाचून केलेले असावे, व
(ई) लेबले लावण्याचा अविचारी मोह टाळणारे असावे,
अशा किमान तार्किक अपेक्षा ठेवणे गैर होणार नाही.

परंतू, आजकाल तुम्ही याबाबत अपेक्षाभंग करू लागला आहात असेच दिसत आहे. मात्र, ते तुम्हाला आवडत असेल तर, तुमची मर्जी !

माहितगार's picture

17 Sep 2019 - 7:24 pm | माहितगार

आपण माझ्या ज्या प्रतिसादावर मेगाबाईटी प्रतिसाद दिला तो मेगा बाईटी नव्हता , रिस्पॉन्स इन्स्टिगेट करण्यासाठीच दिला होता अर्थात आपला मेगाबाईटी प्रतिसाद आवडला हे मोकळेपणाने सांगण्यास हरकत नसावी.

बाकी मीच केवळ वाचतो इतर वाचत नाहीत असे काही नाही आमच्या सारख्यांकडून राहीलेल्या माहितीस पूर्ण करण्यासाठी आपल्यासारखे धुरंधर आहेत म्हटल्यावर काळजी कशाची ?

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2019 - 10:49 pm | डॉ सुहास म्हात्रे

आपण माझ्या ज्या प्रतिसादावर मेगाबाईटी प्रतिसाद दिला तो मेगा बाईटी नव्हता

मेगॅबाईटी प्रतिसादावर केवळ तुमचाच प्रताधिकार नाही, हे सिद्ध करण्यासाठी तसे केले आहे. ;) :) (हघ्याहेवेसांन)

यक्षणी फक्त ड्रोन तबकड़यांच्या तांत्रिक मर्यादांचा विचार केला कारण ते मला थोडेफार जमु शकते.

मला वाटते ड्रोन हे जवळच्या प्रदेशातुन प्रत्यक्ष सोडले गेले. पण त्याने टारगेट कोऑर्डिनेटस हे सौदी बाहेरिल प्रदेशातुन रिसीव केले. ज्यामुळे प्रत्यक्ष हल्ला होईपर्यंत कोणाला याचा अंदाज येउ शकला नसावा. अर्थात असे तंत्रज्ञान अतिरेकी वापरू लागले तर खरेच कठिण काळ आला आहे हे नक्की.

इस्त्रायल विरुध्दच्या युध्दात पहिल्यांदाच अरबांनी ते आधुनिक शास्त्रास्त्रेही वापरून ते भयंकर मोठा लढा देउ शकतात याची प्रचिती जगाला दिली होती. तत्पूर्वी कोणाला ते स्वबळावर तलवार व तोफा सोडून आणखी काही यशस्वीपणे वापरू शकतील असा विश्वासच न्हवता.

आणी आता जर मध्यपूर्वेत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर दहशतवादासाठी सुरू झाला असे सत्य मानले तर भस्मासुर उभा राहिला आहे हे नक्की, आणि तो नष्ट होण्यापूर्वी कोणाकोणाचे बळी घेईल सांगता येणार नाही.

रच्याकने अमेझॉनला अमेरिकेप्रमाणे भारतातही ड्रोनने प्रॉडक्ट डिलिव्हरी सुरू करायची इच्छा होती , अर्थातच सुरक्षेच्या कारणास्तव त्याला परवानगी नाकारण्यात आली.

माहितगार's picture

16 Sep 2019 - 1:12 pm | माहितगार

जॉन विक्क आणि डॉ खरे

साधारणतः हि तीन वृत्ते यातील २ मे महिन्यातील आहेत आणि एक आताचे आहे. बिझनेस इनसायडरचे वृत्त बरोबर असेल तर हि तबकडी ड्रोन्स नसून लो फ्लायींग reconnaissance ड्रोन्स असण्याची शक्यता आहे. मे महिन्यातील वृत्तानुसार हाऊथींनी मे महिन्यात असे प्रयत्न केलेले दिसतात . मूळ तंत्रज्ञान कदाचित चिनी त्याचे रि इंजिनीयरींग इराणने केले असण्याची आणि हि वृत्ते बरोबर असतील तर हाऊथींनी उपयोगात पारंगतता साध्य केल्याची शक्यता असू शकते असे दिसते. दहशतवाद्यांना अशी पारंगतता लाभणे चिंतेची गोष्ट वाटते.

यातील एक निरीक्षण असे की मे महिन्यातील हल्ल्यांची दखल युनो सुरक्षा परिषद तज्ञांनी प्रयत्न केला पण सौदींनी स्वतः वर हल्ला होऊनही सुरक्षा परिषद अभ्यासकांना हल्ल्यातील उपयोगिलेले ड्रोन अभ्यासू दिले नाही. या वेळी सुद्धा हल्ल्याचे स्वरुप पहाता आमेरीकी प्रतिक्रीया जशी राग व्यक्त करणारी आहे त्या मानाने सौदी प्रतिसाद संयमीत आणि सौम्य जाणवतोय असे का ? हाही प्रश्न आहेच.

जॉनविक्क's picture

16 Sep 2019 - 1:55 pm | जॉनविक्क

UAV-X drones तर फुल्ल फ्लेज ड्रॉन वाटत आहे. तसेही ते सुसाईड ड्रॉन असल्याने पल्ला वाढतोच. हे सौदी आणी मित्रांची सुरक्षा भेदून नियोजीत स्थळावर पोचले म्हणजे अतिशय चिंताजनक नाचक्की आहे :(

हे तयार केले कोणी? आणी दहशतवाद्यांच्या हाती लागलेच कसे? आणी सर्वात महत्वाचे म्हणजे हल्ला होई पर्यंत सुगावा लागलाच नाही हे कसे ?

महासंग्राम's picture

16 Sep 2019 - 3:01 pm | महासंग्राम

हौथी गटाकडे असलेल्या UAV-X ड्रोन्सची रेंज १५०० किमी आहे त्यामुळे येमेन मधून हल्ला करणे शक्य होते.
प्रश्न फक्त हा उरतो कि इतकी स्टेल्थ पॉवर त्यांच्या कडे कशी आली त्यासाठी काय तंत्रज्ञान वापरले ते पाहणे महत्वाचे ठरते.

भंकस बाबा's picture

16 Sep 2019 - 10:30 am | भंकस बाबा

तीसरा कोन देखील आहे.
खनिज तेलाच्या वाढत्या किमतीचा फायदा रशियाला होउ शकतो. जे आज 10% वर आहे.
भारताच्या दृष्टीने घातक बाब म्हणजे तेलाची वाढती किंमत, तसेच अतिरेक्याकडे आलेली घातक टेक्नोलॉजी!
तरीही हा हल्ला पूर्वनियोजित व हितसंबध जपण्यासाठी केलेला वाटतो.

माहितगार's picture

16 Sep 2019 - 12:22 pm | माहितगार

भारताच्या दृष्टीने घातक बाब म्हणजे तेलाची वाढती किंमत, तसेच अतिरेक्याकडे आलेली घातक टेक्नोलॉजी!

सहमत

सिरियात कोण कोणा विरुद्ध लढते आहे हे कळेनासे झाले आहे! असे सर्व ठिकाणी बोटे बुचकळून बसलेल्या अमेरिकन विचारकाने म्हटले होते!
तीच गोष्ट इथे होत असावी! सौदीच्या सलमान यांचा शिया विरोध, अमेरिकेची इराणला धडा शिकवावा म्हणून भीम गर्जना, ओमान, येमेन, कतार, बहरिन वगैरे कबीलेवाले अरबी सुलतान यांच्या आपापसातील मतभेद, तेल निर्यातीवरील संबंध...!
आपली युद्ध शस्त्रे खपावीत म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्टेल करून भरीला घालणारे अनेक व्यावसायिक दलाल...!
सब गोल माल है भाई...

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2019 - 5:25 pm | डॉ सुहास म्हात्रे

एक-दोन वाक्यांत गुंडाळलेले असले तरी, तुमचे विधान वस्तूस्थितीच्या जवळपास आहे !

या गोंधळाचा एकेरी तर्कटाने अर्थ लावायला जाणे योग्य होणार नाही.

महासंग्राम's picture

16 Sep 2019 - 12:22 pm | महासंग्राम

कॉलिंग असंतांचे संत फेम गिरीश अण्णा कुबेर

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 Sep 2019 - 11:46 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चालू ठेवा. आपल्या तेलाचं कसं ? आपलं कसं होईल.

-दिलीप बिरुटे

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Sep 2019 - 12:07 pm | डॉ सुहास म्हात्रे

सौदीकडे महिनाभरापेक्षा जास्त तेलाचे वायदे पुरे करण्याइतके राखीव साठे आहेत. त्यामुळे, सौदीने त्याचा तेल पुरवठा पुर्वीसारखाच चालू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.

तसेही, तेलावर जागतिक नियंत्रण ठेवण्यासाठी, जमिनीतून तेल काढण्यासाठी त्याला दिलेल्या हिश्श्याला आवश्यक असलेया प्रणालीपेक्षा जास्त ताकदीची प्रणाली, सौदी अरेबिया फार पूर्वीपासून बाळगून आहे. तीही कार्यान्वित केली गेली असेलच. हल्ल्यामुळे झालेली मोडतोड युद्धपातळीवर दुरुस्त होईल आणि महिन्याभरात पुर्ववत काम सुरु होईल.

सुबोध खरे's picture

17 Sep 2019 - 12:23 pm | सुबोध खरे

आपल्या कडे मुळात १३ दिवस पुरेल इतका साठा केलेला आहेच हा साठा ९० दिवस पुरेल इतका वाढवण्याची योजना कार्यान्वित आहे.

https://www.jagranjosh.com/general-knowledge/strategic-petroleum-reserve...
https://en.wikipedia.org/wiki/Strategic_Petroleum_Reserve_(India)

शिवाय आपल्याला काही फक्त सौदी कडून तेल येत नाही. त्यामुळे आपला तेलाचा पुरवठा काही संपूर्ण बंद होत नाही.

प्रश्न आज तेल भडकले तर उद्या आपल्या पेट्रोल डिझेल मध्ये भाववाढ करावी लागेल.

मग आपले यशस्वी कलाकार गळा फाडून बोंब ठोकायला मोकळे आहेतच.

ट्रम्प तात्या भयंकर चिडले आहेत ह्या हल्ल्या मुळे .
हा हल्ला कोण्ही केला हे आम्हाला माहीत असून कारवाई केल्यावरच जगाला समजेल असे त्यांचे म्हणणे आहे .
फक्त १० drone नी एवढया मोठया प्रदेशावर हल्ला करणे शक्य नाही असे काही महितिगरांचे म्हणणे आहे .
बंडखोर असा हल्ला करू शकत नाहीत हे कोणत्या तरी देशाचे काम आहे ही शंका सुद्धा घेतली जात आहे .
म्हणजे हल्ल्या chya आडून इराण ला निशाणा बनवला जाईल

माहितगार's picture

17 Sep 2019 - 7:37 pm | माहितगार

शस्त्र सामग्री, तंत्रज्ञान आणि सुसूत्रता या दहशतवादी गटांकडे अशक्य नसल्या तरी एकाद्या देशाच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पाठींब्या शिवाय अवघड गोष्टी आहेत.

वर बरेच प्रतिसादांचा रोख सौदी किंवा आमेरीकेने स्वतःच मुद्दाम घडवून आणलेले बनावट षडयंत्र असल्याचे म्हणणारे दिसतात याचे कारण पब्लिकचा ट्रंप आणि सौदी राजपूत्रावरील विश्वासाचा अभाव पण तरीही या दोघांच्या मर्यादा लक्षात घेतल्या तरी इराणचे दहशतवादी आणि गुप्तचर इराणी पाकीस्तान प्रमाणे सिव्हील गव्हर्नमेंट च्या हाता बाहेर गेल्याची लक्षणे वाटतात.

सुबोध खरे's picture

17 Sep 2019 - 7:36 pm | सुबोध खरे

पाश्चात्य राष्ट्रांनी सध्या आखाती देशांमध्ये आपापसात इतके वैर आणि संशय निर्माण केला आहे कि कोणाचाही एकमेकांवर काडीमात्र विश्वास राहिलेला नाही.

सतत एकमेकांशी झुंजवत ठेवून त्यांच्या कडचे तेल स्वस्तात कसे पदरी पाडता येईल यासाठी हे सगळे राजकारण आहे.

कतार या देशाचे इतर कोणत्याही अरब/ मुस्लिम देशाशी पटत नाही.
Saudi Arabia, the United Arab Emirates, Bahrain, Egypt, the Maldives, Mauritania, Senegal, Djibouti, the Comoros, Jordan, the Tobruk-based Libyan government, and the Hadi-led Yemeni government severed diplomatic relations with Qatar and banned Qatari airplanes and ships from utilising their airspace and sea routes along with Saudi Arabia blocking the only land crossing

https://en.wikipedia.org/wiki/2017%E2%80%932019_Qatar_diplomatic_crisis

पण ओमान ने कतार ला आवश्यक गोष्टींचा पुरवठा आपल्या बंदरातून केल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीचा पापड मोडला आहे
https://www.economist.com/middle-east-and-africa/2017/09/02/oman-is-bene...

सौदी आणि इराणच्या मधून विस्तव जात नाही.
https://www.bbc.com/news/world-middle-east-42008809

इराणचे अमेरिकेशी तर सदा युद्धच चालू आहे.

सध्या इराणने संयुक्त अरब अमिरातीच्या तेलाचा टँकर जप्त केला आहे.
https://www.haaretz.com/middle-east-news/iran-seizes-uae-vessel-in-strai...

येमेन मध्ये (HOUTHI) हौथी बंडखोर हे शिया आहेत आणि त्यांना इराणचा पाठिम्बा आहे तर येमेनचे सरकार सुन्नी आहे त्यांना सौदी अरेबियाचा पाठिंबा आहे. मुळात सुन्नी सरकारमध्ये मूळ अध्यक्ष अली अब्दुल्ला सालेह आणि उपाध्यक्ष हादी यांच्यात साठमारी चालू आहे. त्यात उत्तर येमेनवर हौथी बंडखोरानी कब्जा केला आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Yemeni_Crisis_(2011%E2%80%93present)#Houthi_rebellion_(2014–15)

त्यात दक्षिणेकडील बंडखोरांना संयुक्त अरब अमिरातीचा पाठिंबा आहे तर हादी सरकारला सौदी अरेबियाचा पाठिंबा आहे आणि त्यामुळे त्या दोघांत तेढ निर्माण झाली आहे. https://www.reuters.com/article/us-yemen-security/saudi-arabia-defends-y...

आता सांगा कोणाचा पाय कोणाच्या पायात आहे? आणि हे कडबोळं कसं सोडवायचं?

गामा पैलवान's picture

23 Sep 2019 - 12:23 am | गामा पैलवान

आरामको च्या तेलशुद्धीकरण स्वीधेवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून सौदी अरेबियाने येमेनमधल्या अल हुदायदा नावाच्या ठिकाणी हल्ले केले आहेत. त्यामुळे इराणवर केलेले दोषारोप व्यर्थ आहेत.

बातमी : https://www.upi.com/Top_News/World-News/2019/09/20/Saudi-forces-retaliat...

निष्कर्ष : https://twitter.com/JZarif/status/1175217863059222528?ref_src=twsrc%5Etfw

-गा.पै.

गामा पैलवान's picture

23 Sep 2019 - 12:24 am | गामा पैलवान

स्वीधेवर = सुविधेवर
-गा.पै.

माहितगार's picture

24 Sep 2019 - 2:58 pm | माहितगार

गा.पै. आपण दिलेल्या वृत्तातील शेवटचा परिच्छेद खालील प्रमाणे आहे.

...The Saudi and U.S. governments have blamed Iran for the Saudi oil attacks. Saudi officials displayed the charred remains of drones and missiles at a news conference this week, which they said prove Tehran's culpability. Iran has denied involvement, and has threatened to respond militarily if it's attacked in retaliation....

सौदी आणि आमेरीकेची इराणशी सरळ पंगा घेण्याची इच्छा नसण्याचे कारण हाऊथींवर केवळ हवाई हल्ल्याने भागू शकते - इराणशी पंगा घेणे म्हणजे मोठे पायदळ आणि भूदल हवे त्यात सौदी सैनिकी मनुष्यबळाच्या अभावाने कमी पडतात आणि आमेरीकी जनतेचे मानस जमिनीवर भूदलांची गुंतावे अशी नवी युद्धे सध्या ओढावून घेण्याचे नाही. म्हणून इराणवर सरळ हल्ला करण्याचे सौदींनी अद्याप टाळलेले आहे एवढाच मतितार्थ निघावा असे वाटते.

पाकीस्ताननेही ड्रोन वापरुन पंजाबात अतिरेक्यांना शस्त्रास्त्रे पुरवण्याचा प्रयास केल्याचे निष्पन्न होत आहे ते ही एखाद वेळेस नव्हे तर त्या ड्रोनाच्या एका पेक्षा अधिक फेर्‍या झाल्या असाव्यात असे वृत्तांवरुन दिसते.

सिमेवर एवढी गस्त असताना एका पेक्षा अधिक ड्रोन फेर्‍या लक्षात येत नाही हे स्पृहणीय नाही. पुलवामा घटनेत अतीरेक्यांना स्फोटके कशी उपलब्ध झाली हा प्रश्न शिल्लक रहात होता पाकीस्तानने स्फोटके ड्रोनच्या साहाय्याने पाठवली असण्याची शक्यता नाकरता येत नाही.

हा ड्रोण प्रकार गंभिर आहे या वर काही ना काही उपाय तातडीने व्हावयास हवा असे वाटते.

बातमी : https://www.bbc.com/marathi/international-49868394

ही बातमी खरी असेल तर सौदीच्या गोळ्या कपाटांत आहेत.

गा.पै.

माहितगार's picture

30 Sep 2019 - 11:43 am | माहितगार

नक्की काय प्रकार आहे कळण्यास वेळ लागेल. हि विशीष्ट बातमी येमेन सिमे लगतच्या नाजरान येथिल आहे. विसाव्या शतकाच्या कम्युनीस्ट पुर्व पुर्वार्धात येमेन नाजरानवर अधिकारही सांगत असे आणि इस्माईली शियांची बहुसंख्या हे नाजरानचे वैशिष्ट्य. स्थानिक ईस्माईलींनी हाऊथींशी हातमिळवणी केली असेल का हे सांगणे तुर्तास कठीण आहे.

१) हाऊथींनी जारी केलेल्या व्हिडीओतील पकडलेले युद्धकैदी युनिफॉर्मात दिसत नाहित असे वृत्ते म्हणतात याचा अर्थ हाऊथींना एखादा सर्जीकल स्ट्राईक करण्यात यश आले असू शकते

हाउथींनी पकडलेले युद्धकैदी सौदींनी उभे केलेले अधिकृत नसलेले एखादे सशस्त्र दल / अतिरेकी दल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सौदी अजून अधिकृत प्रतिक्रीया देत नसावेत. सौदीचे अधिकृत सेनादल असते तर युनिफॉर्म मध्ये निश्चित राहीले असते दुसरे सौदी अधिकृत आर्टीलरीचा मुकाबला हाउथींच्या बसची बात नक्कीच नाही. अगदीच इराणने स्वतःचे प्रशिक्षीत सैन्यदल हाउथी वेषभूषेत वापरले तर वेगळी गोष्ट आहे , किंबहूना तीच शक्यता अधिक वाटते.

त्या शिवाय बातमी खरी असेल तर मुख्य प्रश्न सौदीच्या रक्षणाची जबाबदारी असलेल्या पाकिस्तानी सैन्याबाबत प्रश्न निर्माण होतो,

अजून एक शक्यता अशी कि आता हल्ला झालाच आहे तर होऊन जाऊद्या अशीही सौदीची भूमिका असू शकते कारण पाकीस्तानी सैन्य सौदीच्या सिमा ओलांडण्यास तयार नाही, पण सौदी सिमेच्या आत लढण्यास तयार आहे सौदी असा नक्कीच हिशेब करु शकतात की हाउथींना जरासे सिमेच्या आत येऊ द्या आणि पाकीस्तानी सैन्याशी झुंजवा .

एकुण बातमी खरी असेल तर मानवी संहाराची दुख्खद झालर असूनही युद्धस्य कथा रम्या मध्ये इतिहासात नोंद करुन जाईल.

गामा पैलवान's picture

30 Sep 2019 - 7:36 pm | गामा पैलवान

माहितगार,

या युद्धास सुरुवात केली ती सौदींनी. निमित्त असं की येमेनी राष्ट्रप्रमुख हादी हा सौदीचा माणूस होता. त्याला हौथींनी २०१५ साली उठाव व निदर्शनं करून हाकलून लावला.

घटना असा घडल्या की २०११ साली तत्कालीन राष्ट्रप्रमुख सालेह यांच्या भ्रष्ट धोरणांविरुद्ध येमेनी जनतेने उठाव करून त्यांना पदच्युत केलं. त्यांच्या बदल्यात मन्सूर हादी यांना तात्पुरती सत्ता दिली. त्यानुसार नोव्हेंबर २०११ मध्ये हादींवर ९० दिवसांत राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुका घ्यायची जबाबदारी सोपवली होती. त्यांनी दोनतीन वेळा मुदतवाढ मागून घेतली पण खुल्या निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुकीत केवळ तेच उमेदवार होते, साहजिकंच ते निवडून आले.

याविरुद्ध सालेह समर्थक व हौथींनी एकत्र येऊन परत उठाव केला. जरी हौथी चळवळ सालेह यांना विरोध करीत असली तरी प्रस्तुत परिस्थितीत सालेह यांचे समर्थक व हौथी येमेंच्या हिताकरता एकत्र आले. मन्सूर हादी पळाले व एडनमार्गे रियाधला पोहोचले. तिथे सौदी सरकारने त्यांना समर्थन म्हणून हौथींवर बॉम्बफेक सुरू केली. अशा रीतीने हा संघर्ष सुरु झाला.

वरील घटनाक्रमावरनं स्पष्ट दिसतं की हा येमेनचा अंतर्गत प्रश्न आहे. सौदीस येमेनवर बॉम्ब फेकायचा काहीच अधिकार नाही. मग घाई कशाला, असा प्रश्न पडतो.

मला वाटतं की येमेनमधल्या घडामोडींचा सौदी अरेबियात प्रचंड प्रभाव पडेल. यांतून आपणांस पदच्युत केले जाईल अशी साधार भीती सौदी राजघराण्यास वाटतेय.

आ.न.,
-गा.पै.

भंकस बाबा's picture

30 Sep 2019 - 8:48 pm | भंकस बाबा

सहमत,
आखातात हल्लीच घेण्यात आलेल्या एका सर्वेत लोंकाचा कल ईश्वरावरुन श्रद्धा उठण्याचा आहे. मधे मक्केमधे झालेल्या चेंगराचेंगरीत पुष्कळसे इराणी श्रद्धाळू मारले गेल्यावर इराणनेदेखिल मक्केच्या हजयात्रेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली होती.
तात्पर्य : इस्लाम अंतर्गत बंडाळीने संपणार बहुतेक!
इस्रायल, चायना, अमेरिका आणि हो राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आपल्याकडे शेकुलर नेहमी बोंबा मारतात हो) याना काही करायला नको !