आमची मलेशिया भ्रमंती - क्वालालंपूर (भाग - ३)
झोप येईना, क्वालालंपूर येईना!!दे दणादण टेक ऑफ झाल्यानंतर, आता टार्गेट होते, कधी एकदा क्वालालंपूर येते आणि आम्ही मलेशियात उतरतो. दिवसभराची धावपळ, ते कुतूहल, ते मलेशिया, मन अगदी विचारांनी भारावलेले आणि सोबतच धास्तावलेले! सलग ५ तासांचा मुंबईहून प्रवास, सकाळी ५.३० आणि शेवटी तो क्षण! वेलकम टू मलेशिया, एअरलाइं कडून ऑफिषियल अन्नौंस्मेंट! वुहू... आले रे आले आपले मलेशिया आले... कधी येतय कधी येतय चे नादात झोप विसरून गेली, व आता विमानात काय काय सुरू आहे बघतच सकाळची वाट पाहत राहिलो.. पटपट उतरण्याची बिलकुल घाई केली नाही, म्हणलं, हे विमान आहे, बस किंवा ट्रेन नाही, आणि आपल्यालाही पुढची घाई नाही, म्हणून सगळ्यात शेवटी जाऊ म्हणलं. याचाही एक फायद्याचा विचार केला होता, तो म्हणजे, उशिरा उत्रून आरामात जाऊन, मग इमिग्रशन करू, म्हणजे हे आधी निघालेले लटांबळ त्यांचे इमिग्रेश्र्न करून निघून जाईल व गर्दी कमी होईल! मग काय, निघालो आरामात, हॉटेलात चेक इन टाईम होता दुपारी २ वाजता (आपल्याकडे भारतात नॉर्मली ११-१२ वाजता असतो). इमिग्रेश्ण ला म्हणलं २ तास जाईल, तरी अजून ४-५ तास बाकी होते, आणि ते एअरपोर्ट वरच घालवायचे होते. आधी एअरपोर्ट चे वॉश रूम वापरले, मस्त ब्रश चेहरा धुवून फ्रेश झालो, अगदी राजेशाही थाटात! नो पब्लिक अँड वेरी क्लीन. एअरपोर्ट ला नॉर्मली सगळी दुकाने, रेसटॉरंट उघडीच असतात, त्यामुळे आता तिथेच भ्रमंती करण्याचा विचार घेतला. ईमिग्रेश्र्न केले, इथेही काही किचकट विचारणा नाही, रिटर्न तिकीट, हॉटेल बुकिंग व वापस कधी जाणार एवढेच प्रश्न! पटकन इमिग्रेष्ण केले, व सिक्युरीटी चेक करून बाहेर पडलो! वेलकम टू मलेशिया!! सेलामत दतांग!! (ऑफिशीयल वेलकम) सर्वात आधी काम केले ते लोकल मोबाईल सिम कार्ड घ्यायचे. ७ दिवसांचे ट्रॅव्हल सिम घेऊन, तिकड मोबाईल वापरायचा श्री गणेशा केला! भूक जबरदस्त लागली होती, काही मिळत का खायला एवढ्या सकाळी बघितलं, सबवे, चहा कॉफी, बरेच ऑप्शन्स दिस होते, शेवटी एक ऑरगॅनिक फूड म्हणून नावाचे रेसटॉरंट फायनल केले ऑप्शन बरे होते, आता इकडचेच खायचे म्हणून तिथली फेमस डिश नासी लेमक आणि सोबतीला सँडविच घेतले! जास्त गोड होते, बहुदा मलेशियन पबलिक गोड खात असावी, असो! न्याहारी झाली, २-३ तास उगाचच इकडून तिकडून फिरून अख्खा एअरपोर्ट हिंडून काढला, आता जायचे होते, तिथल्या मेन एरियात. टॅक्सी च्या ऐवजी, पलबिक ट्रांस्पो ट युज करू म्हणलं. (मेन एरिया, के एल सेंट्रल, जसा मुंबई चां दादर, पुण्याचा स्वारगेट/शिवाजीनगर). एअरपोर्ट ते के एल सेंट्रल तिकीट घेतले, आणि मलेशियन जर्नी चां पहिला टप्पा सुरू केला! बस अगदी टाप टीप, स्वच्छ. एअरपोर्ट ते के एल सेंट्रल १-१.३० तास प्रवास भन्नाट! हे मोठे हायवे, हाय स्पीड वाहने वेगात, निर निराळ्या कार, बस मॉडेल्स! वावा! अगदी दुसऱ्या दुनियेत आलेलो. आजू बाजूला बघून मज्जा येत होती. स्वतः सगळे आयोजन करून अनुभव घेत होतो, त्यामुळे, मज्जा कितीतरी पटीने वर्णन करता न येणारी होत होती! अबब, काय ते टॉवर्स आणि काय ती लखलखीत दुनिया! सिटी जवळ आली की, सगळे भव्य, फॉरेन दिसू लागले. क्वालालंपूर ची भव्यता, ट्विन टॉवर, अगदी कितीतरी लांबून दिसत होते, हेच ते वैभव ज्यास बघण्यासाठी इतका लांब प्रवास केला! शिस्त मय ट्रॅफिक, नो पोलीस, ओन्ली सिग्नल! बघून आता एका क्षणी वाटले की, आत्ता इथेच स्थायिक व्हावे! बस के एल सेंट्रल ला आली, आणि एअरपोर्ट ते के एल प्रवास संपन्न झाला! आता टारगेट होते, हॉटेल चेक इन करायचे आणि रिलॅक्स व्हायचे! आता तिथून बसणे जाणे सोयीचे नव्हते, म्हणून टॅक्सी ने जाणे ठरवले. मलेशियात उबर, चालते, पण नेमके ज्या दिवशी उतरलो, त्या दिवशीपासून, UBER कंपनी ग्रेब (Grab) सोबत मर्ज झाली कळले. पटकन अॅप डाऊनलोड केले व हॉटेल चां पत्ता टाकून आगे कुच केले! दुसऱ्या देशातील कार मध्ये पहिल्यांदा बसण्याचा तो योग! नाऊ, फिलिंग वाज वु हू. . . . . हॉटेलात चेकिन झाले, हाय राईज टॉवर, मस्त आजूबाजूचा खिडकीतून दिसणारे नजारे पाहून, रिलॅक्स झालो, व थोडी विश्रांती केली... टू बी कंतिण्यु इन भाग - ४....
याद्या
12329
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
छान! फोटो पाहिजेतच. त्याशिवाय
भाग -४ पासून फोटो सहित सहल
In reply to छान! फोटो पाहिजेतच. त्याशिवाय by तमराज किल्विष
सलामत दतांग !
भाग - ४ पासून फोटोसहित
In reply to सलामत दतांग ! by अनिंद्य
फोटो फोटो फोटो।
फोटो येत आहेत.
In reply to फोटो फोटो फोटो। by कंजूस
एअरपोर्ट ते के एल सेंट्रल
:-) लोकल बनून शहर अनुभवायचे
In reply to एअरपोर्ट ते के एल सेंट्रल by सोत्रि
फोटो नाही? सं मं ना नम्र सूचना की .......
भाग - ४ पासून फोटोसहित
In reply to फोटो नाही? सं मं ना नम्र सूचना की ....... by सुधीर कांदळकर
सध्या धकवून घ्या, उगाच दंड
In reply to फोटो नाही? सं मं ना नम्र सूचना की ....... by सुधीर कांदळकर
उत्सुकता वाढलीय
कुआला सेलंगूर
नमस्कार, एप्रिल मध्ये जाऊन
In reply to कुआला सेलंगूर by चौकस२१२
सुरेख लेखन
पुर्व
In reply to सुरेख लेखन by Nitin Palkar
पुर्व २
In reply to पुर्व by चौकस२१२
.....थायलंड ते सिंगापोर
In reply to पुर्व २ by चौकस२१२
पुढचा भाग लवकर टाका.
फोटो पाहिजेत म्हणजे पाहिजेत.
अरेच्चा पुढच्या भागाची