मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मक्याच्या दाण्यांची भाजी

गौरीबाई गोवेकर नवीन · · पाककृती
साहित्य : सोपी पण चविष्ठ अशी होते ही भाजी. मी आजच केलीये. म्हणून शेअर करते आहे. पटकन आणि छान होणारी. मक्याचे काढलेले दाणे, नेहमीचे फोडणीचे साहित्य, चणाडाळीचे पीठ, एक मध्यम चिरलेला कांदा, वाटलेले ओले खोबरे, मीठ. काढलेले मक्याचे दाणे मिक्सरला जर्रा फिरवून घ्यायचे. जास्त फिरवले तर लगदा होतो. नुसतं एकदोनदा फुर्र फुर्र केलं तरी पुरे. एका दाण्याचे चार तुकडे होतील इतपत भरड करायचे. जर जास्त पीठ झाले तर भाजीचा बेत कॅन्सल करून उपमा करावा. फिरवताना पाणी घालायचं नाही. थोडं पाणी वाटताना सुटतं. तेवढं पुरे. फिरवून घेतलेले दाणे कुकरला लावायचे. मी वरण भातावरोबरच लावते तिसर्‍या पुडात. वाफवून झाले की मोहरी, हिंग, किंचित हळद घालून फोडणी करायची. त्यात कांदा गुलाबी होईपर्यंत परतायचा त्यावर दाण्यांची भरड घालून परतायचे. ओले खोबरे , लाल तिखट. मीठ घालायचे. मग त्यावर चणाडाळीचे पीठ हळूहळू भुरभुरवत परतत रहायचे. भाजी सुकी झाली आणि पीठ शिजले की उतरायची. वरून कोथिंबीर आवडत असेल तर घालावी. भाजी तयार. फार वेळ लागत नाही. लागतेही छान. गौरीबाई गोवेकर

वाचने 9592 वाचनखूण प्रतिक्रिया 7

इरामयी 01/09/2019 - 13:25
टचक टचक शब्दप्रयोग आवडला. कृती वाचून तोंडाला पाणी सुटलं. भाजीच्या बाजूला हिरव्या मिरचीचा खर्डा छान लागेल असं वाटतं.

In reply to by इरामयी

गौरीबाई गोवेकर नवीन 03/09/2019 - 12:38
नक्कीच छान लागेल. मका गोडसर असतोच मुळचा. म्हणून यात चवीला सुद्धा साखर नाही घालायची. खर्डा मस्तच लागेल.