एका 'डोळस' प्रेमाची गोष्ट
लग्न ही आपल्या आयुष्यातील एक महत्वाची घटना असते. त्यासाठी सुयोग्य जोडीदार निवडणे हा वाटतो तितका सोपा प्रश्न नसतो. ‘बघून’ करावयाच्या लग्नांमध्ये जोडीदार-निवडीचे अनेक निकष (फूटपट्ट्या) लावले जातात. असे निकष कोणते असावेत आणि कशाला किती महत्व द्यायचे हे ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून आहे. त्यात काही गैर नाही.
या लेखाच्या अनुषंगाने मला फक्त एका निकषाकडे लक्ष वेधायचे आहे. तो म्हणजे एखाद्या व्यक्तीतील शारीरिक व्यंग. विवाहेच्छू तरुण-तरुणींकडे जर आपण एक नजर टाकली तर काय दिसते? जी व्यक्ती शरीराने धडधाकट आहे ती आपला जोडीदार निवडताना त्याच्यात कुठलेही ठळक व्यंग नको हे जरूर पाहते. ते अगदी नैसर्गिक आहे. एखाद्या धडधाकट व्यक्तीने जाणीवपूर्वक दिव्यांग जोडीदार निवडल्याची उदाहरणे अपवाद असतात. असेच एका मुलीचे उदाहरण माझ्या पाहण्यात आहे.
ती मुलगी उच्चशिक्षित असून तिला चांगल्या पगाराची सुरक्षित नोकरी होती. लग्न करताना तिने तिच्यापेक्षा अधिक कमावणारा मुलगा बघावा अशी तिच्या पालकांची पारंपरिक अपेक्षा. पण घडायचे होते वेगळेच. ती छंद म्हणून संगीत शिकण्यासाठी एका अंध तरुणाकडे जात असे. त्या सहवासात त्यांच्या मैत्रीचे धागे जुळले. ती त्याच्या कलेवर बेहद्द खूश होती तर तो तिच्या सहृदय अंतःकरणावर. कळत नकळत मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जन्मांध असलेल्या त्या तरुणाला स्वतःच्या आई-वडिलांबद्दल काही माहिती नव्हती. तो अनाथालयात वाढलेला होता. पण जिद्दीने त्याने संगीतात प्रावीण्य मिळवले होते. स्वतःच्या हिमतीवर धडपड करीत तो कनिष्ठ मध्यमवर्गीय परीस्थितीत पोचला होता.
एके दिवशी तो तिला म्हणाला, “तू मला खूप प्रेम दिलेस. पण आता लवकरच तुझे पालक तुझे लग्न ठरवतील व आपली ताटातूट होईल. मग माझ्यापाशी उरतील त्या फक्त आपल्या निखळ प्रेमाच्या आठवणी. त्यांच्या आधारावर मी माझे आयुष्य काढेन”. हे ऐकल्यावर तिला गलबलून आले. पूर्ण २४ तास तिने खूप विचार केला. तिच्या मनाची खूप चलबिचल झाली. तिने जर सर्वसामान्य मुलींप्रमाणेच ठराविक निकष लावून लग्न जुळवले असते तर तिला चाकोरीबद्ध सुखासीन जीवन मिळाले असते. ते नाकारून या तरुणाशी लग्न करण्याचा विचार हा खूपच धाडशी होता. पण अखेर तिने त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला . प्रथम त्यानेही तिला वेड्यात काढले. “आपली भेट हा एक अपघात होता असे समजू, पण माझ्याशी लग्न करून तू तुझ्या सुंदर आयुष्याची माती करू नकोस,” त्याने तिला विनविले.
परंतु, आपल्या निर्णयामुळे तो मनोमन सुखावला आहे आहे हे तिने ताडले. जेव्हा तिने हा निर्णय घरी सांगितला तेव्हा अर्थातच तिला तीव्र विरोध झाला. कुटुंबीयांनी विनवणीपासून ते धमकावणीपर्यंत सर्व प्रकारांनी तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण या मुलीने विरोधाला न जुमानता तिचा निर्णय अमलात आणला. पांढऱ्या काठीच्या आधाराने धडपडणाऱ्या जिद्दी तरुणाला तिने आपलाच भक्कम आधार कायमचा दिला.
आंतरिक प्रेमाचे याहून चांगले उदाहरण माझ्यातरी पाहण्यात नाही. धडधाकट, निरोगी, उच्चशिक्षित व कमावत्या या तरुणीने एका अंधाला आपला जीवनसाथी केल्याची घटना माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. सदर जोडपे हे आमचे कुटुंबं-मित्र आहे. त्याना एक छानशी मुलगी असून ती एक उत्तम गायिका झालेली आहे. नुकताच तिच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला. त्यानिमित्ताने या गतस्मृतींना उजाळा मिळाला.
*************************************
वर्गीकरण
प्रतिक्रिया
विरळा पण अत्यंत सकारात्मक
+१
मला हे जमले नसते :(
वा!
माझ्या माहितीत
वरील सर्वांना
दुर्मिळ उदाहरण आहे
दुर्मिळ म्हणजे अतिशय दुर्मिळ
आयुष्याचे चार टप्पे ढोबळ मानाने
प्रेम हा सगळ्यात गैरवापर झालेला शब्द आहे
प्रेम म्हणजे फक्त तेच नाही ओ
खिलजी तुम्ही
सर्व नवीन प्रतिसादकांचे
व्याहवारिक निकष बाजूला सारुन
१ ) ऐहिकसुखे पायाशी लोळन घेत
सहमत सहमत ट्रम्पबुवा.
धन्यवाद !
हा हा हा. अध्यात्मात हे व्यंग कामी येऊ शकते कारण
डोळेच फक्त
सध्याही बऱ्याचदा कान नसते तर
खर्या प्रेमाची हृद्य कथा.
सर्व नवीन प्रतिसादकांचे
निभावून नेले हे महत्वाचे!
अत्यंत हृदयस्पर्शी. पण यात
वास्तव ..
जन्मजात आंधळेपणा असेल तर?
खुप हृदयस्पर्शी !
त्या मुलीने घेतलेला निर्णय खरंच कौतुकास्पद आहे.
छान .......
मार्केट यार्ड ,पुण्यातील
...
आणि अंध व्यक्तींंमध्ये
चौ को
प्रेरणादायी...
...
सुंदर उदाहरण आहे. त्या
...
मनाच्या स्तराचे नाते खूप वेगळे असते
भावनेच्या भरात असे निर्णय घेऊन
राजेश व टर्मि. ,
हिंमतीची बाई
...
प्रेम म्हणजे
+११
प्रेम म्हणजे pheromones चा खेळ
Pheromones are substances
रिक & मॉर्टी
...
लव इज अटेंशन, हे मला जे. क्रुष्णमुर्तींमुळे समजले
चित्रपट