काण्याला सुंदरी मिळाली देवाघरी

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
27 Aug 2019 - 7:01 pm

त्याच्याबद्दल फक्त ऐकून होतो

वाटलं एकदा परखून पाहावं

म्हणूनच गेलो त्याच्या दारी

तो शांत उभा होता पाषाणात

मागितली एक सुंदरी , कुणालाही न पटणारी

थेट सांगितलं त्याला निक्षून

खरा असशील तर हीच गळ्यात दे बांधून

पूर्ण दिवस मंदिरात, उभा राहीन मी काणा बनून

लगेच तिथे घंटा वाजली

अर्थात , धोक्याची होती ते नंतर समजली

दुसऱ्याच दिवशी निकाल लागला

सुंदर धोंडा आपोआप गळ्यात पडला

सुतासारखी सरळ वाटत होती

गळ्यात पडल्यावर मात्र सारखी गरळ ओकत होती

माझ्या प्रत्येक सवयीत उभीआडवी ठोकत होती

काय करू नि काय नको ? असे होऊन गेले

इचार मनात येऊन येऊन डोके *ऊन गेले

जास्तच लागायला लागल्यावर

ते मंदिर पुन्हा आठवले

पायरी चढताचक्षणी तयाची

वाटलं जणू त्या देवासकट माझ्यावर हसले

नाक रगडले , क्षमा मागितली

तरी माझी लागायची नाही थांबली

कशीबशी मग मलाच माझी

ती नवसयाचना आठवली

सुरु झाले यत्न पुन्हा ते

डोळे ठेवले नजरेत स्थिर

नजर रोखता दुखु लागली मध्यभागाची शीर

काणा बनण्यापायी अर्धा दिवस उडून गेला

झक मारली नि कुठे घातली , कुठला विचित्र नवस केला ?

प्रयत्नांती यश मिळते हे जाणून पुरता होतो

रोज वेळ काढुनी , थोडा काणा बनत होतो

सवय इतकी लागली कि हळूहळू

डोळे कायमचे झाले तिरळे

जो तो येता जाता मजला

काणा काणा चिडवे

तुझ्यासंग मी अशक्य राहणे

बोलून पळाली ती खविस सुंदरी

या काण्यासंगे आता कोण राहणार ?

काणा निघाला डोळे सरळ कराया पुन्हा त्याच मंदिरी

{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

विनोद

प्रतिक्रिया

जॉनविक्क's picture

27 Aug 2019 - 8:28 pm | जॉनविक्क

काव्य कमी आणि वास्तवता जास्त लिहतोस तू

होय खरंय तुझं म्हणणं .. काव्य कमीच आहे किंबहुना नाहीच असे म्हणूया .. पण बऱ्याचदा असे घडलेले पहिले आहे .. कुणाचा अपघात म्हण किंवा अजून दुसरे काही अघटित .. सोडून गेलेले आहेत , स्वप्न दाखवणारे किंवा पाहणारे ..