वरची चर्चा वाचून मी स्वतःचा व माझ्या परिचयातील वेगवेगळ्या माध्यमातील शिकलेल्या मित्रांचा मनोमन केस स्टडी केला. <):) या सॅम्पल सर्व्हेची काही निरिक्षणे/फायदे/तोटे ..
पूर्ण मराठी माध्यम : :
यातील फार थोडे पुढे शिकले. जे शिकले त्यांची बुद्धीमत्ता चांगली असली तरी इंग्रजीतून व्यक्त होताना (Expression) समस्या येई. शिवाय ही मंडळी ईश्वरचंद्र विद्यासागर नसल्याने करियरमध्ये देशी माध्यमाचा नाही म्हटला तरी तोटा; किमानपक्षी अडथळा नक्कीच झाला. वर भेंडीबाजार यांनी म्हटल्याप्रमाणे तुमची बुद्धीमत्ता,कष्ट,आवड हे महत्वाचे असतातच पण भाषा कळायला वेळ लागत असेल निराश होण्याची शक्यता असते; हे खरे आहे.
त्याचवेळी मराठीतून शिकून पोल्ट्रीसारखे उद्योग सुरू करून चिक्कार पैसा कमावणरी मंडळी माहिती आहेत. आता पोल्ट्रीत विग्रजीपेक्षा मराठी 'भ'कार जास्त कामाला आला असेल ही बाब मान्य :)
सेमी-इंग्रजी
मी स्वत: या वर्गाचा प्रतिनिधी. प्रार्थमिक शिक्षण मराठीतून झाले व मराठी माध्यमाच्या तुलनेत इंग्रजीचे Exposure चांगले झाल्याने तुलनेने समस्या कमी आल्या. माझ्या पाहण्यातील बहुतेक सर्व सेमीइंग्रजीवाली मंडळींचे करियर उत्तम निभावले आहे. अर्थात स्पोकन इंग्लिशचा प्रॉब्लेम असतोच. फक्त जरा लौकर सुटतो इतकेच.
इंग्रजी - नॉन कॉन्व्हेण्ट
यांचे दोन उपप्रकार पाहिले आहेत -
१ घर का न घाटका टाईप -
घरचे मराठी वातावरण किंवा पालकांना शंकासमाधान करण्याइतपत इंग्रजी न येणे यामुळे भरडलेली मंडळी आहेत. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांची वाट लागलेली असते.
२ कॉण्वेण्ट तोडीस तोड -
संस्काराने हिंदू पण इंग्रजी प्रभुत्वाच्या बाबतीत कॉण्वेण्टवाल्यांना तोडिस तोड असणारी मंदळी. करियरमध्ये बहुतेकांनी चांगली प्रगती केली हे सांगणे न लगे.
कॉन्व्हेण्ट :
आम्ही आमच्या संस्कृती/संस्कारांचा वगैरे कितीही डंका पिटला तरी या मंडळींबद्दल थोडासा मत्सर पूर्वीही होता आणि आजही थोडा वाटतोच. या मंदळींचे व्यक्तीमत्व काही वेगळेच घडते किमानपक्षी पांढरपेश्या जॉबमध्ये थोडी Edge मिळते हे नक्कीच.
"वट" शब्दाला चांगला प्रतिशब्द कोणता हे सेमीइंग्रजीवाला झटकन सांगेल हे आमचे मत.
एकूण जर आईबापास इंग्रजी येत नसेल तर पोराने सेमी-इंग्रजीतच जावे नाहीतर इंग्रजी उत्तम.
मराठीच्या अभिमानाकरिता मुलांनी मराठी माध्यमात जावे याला माझी सहमती नाही.
पालकांनी आवड लावली तर इंग्रजी माध्यमातील मुलांना देखिल परंपरेचा अभिमान वाटतो हे मी पाहिले आहे. ही मुले इंग्रजी उत्तम बोलू शकत असल्यामुळे त्यांना आयुष्यात भाषिक अडथळे येत नाहीत आणि स्वभाषेच्या परिचयामुळे मुळाशी बांधलेलीही असतात. (हेच का ते Best of both world ?) म्हणून वर चतुरंग, प्राजू आदी मंडळी करत असलेल्या प्रय्त्नांचे कौतुक वाटते.
त्याचवेळी मराठीतून शिकलेली पण इंग्रजी येत नसल्यामुआळे जिथेतिथे हिंदी झाडणारी (हरामखोर म्हणाय्ची इच्छा होते आहे) अनेक उदाहरणेही आहेत.
मराठीतून शिकल्याने कमीपणा येत नाही पण सर्व जण जयंत नारळीकर किंवा विद्यासागर नसतात हे ही खरे.
संस्कार वगैरेंचा माध्यमाशी काहीही संबंध नाही हे आणखी निरिक्षण. ( वाया गेलेली आणि न गेलेली अशी दोन्ही प्रकार सर्व माध्यमात पाहिलेत. )
वरील गोष्टी म्हणजे सार्वित्रीकरण नाही. केवळ मनोमन केलेल्या Sample Survey चे निष्कर्ष आहेत.
ईंग्रजी माध्यमातुन शिक्षण घेतल्यास कदाचीत करीअर मधे फायदा होईल हे गृहीत धरले तरी खालील गोष्टींचे काय
* ट्रेन मधे मराठी पेपर न वाचणे
* दोन मराठी माणसानी कार्यालयात आपसात मराठी न बोलणे
* हॉटेल मधे पंजाबी कींवा दाक्षिणात्य पदार्थ खाणे (मराठी मिळत असले तरी शक्यतो टाळणे)
* वेटर, दुकानदार , रीक्षावाले ह्यांच्याशी हींदीत बोलणे
* मराठी चीत्रपट न पहाणे , मराठी गाणी न ऐकणे
* मराठी साहित्य न वाचणे
मराठी असण्याचा न्युनगंड गळुन पडणे आवश्यक आहे, भाषेचे माध्यम ही समस्या त्या मानाने लहान आहे.
* ट्रेन मधे मराठी पेपर न वाचणे
तो घरीच चटकन वाचून होतो, वेळ लागतो तो इंग्लीश वाचायला!
* दोन मराठी माणसानी कार्यालयात आपसात मराठी न बोलणे
उपस्थित असणारा तिसरा, चौथा, पाचवी पुरूष/स्त्री अनुक्रमे बंगाली, आसामी आणि पोलिश असते.
* हॉटेल मधे पंजाबी कींवा दाक्षिणात्य पदार्थ खाणे (मराठी मिळत असले तरी शक्यतो टाळणे)
घरी जे खाते तेच बाहेर काय खायचं? घरीच बनवून खाल्लं असतं ना!
* वेटर, दुकानदार , रीक्षावाले ह्यांच्याशी हींदीत बोलणे
कारण त्यांना आपण काय बोलतो ते समजत नाही. मागायचं साधं पाणी आणि वेटर आणायचा बर्फवालं पाणी, असं होण्यापेक्षा माझं भयानक हिंदी वापरलं की मला इच्छित पदार्थ मिळतो, मी इप्सित स्थळी पोहोचते.
* मराठी चीत्रपट न पहाणे , मराठी गाणी न ऐकणे
"सालीनं केला घोटाळा"सारखे चित्रपट आणि "डोकं फिरलया"सारखी गाणी ऐकण्यापेक्षा मला "शॉशॅंक रिडंप्शन" आणि "भला हुआ मेरी मटकी टूटी रे" सारख्या सुंदर कलाकृतींचा आस्वाद घ्यायला आवडतो.
* मराठी साहित्य न वाचणे
व्यक्तीगत आवड आणि साहित्यामधला बुद्ध्यांक कमी. सगळी आवड बोजड विषयांत आणि त्यांबद्दलची पुस्तकं फक्त आंग्लभाषेतच असणं.
ही माझी व्यक्तीगत (आणि/किंवा विक्षिप्त) उत्तरं. प्रत्येकाच्या बाबतीत हे आणि असंच खरं असतं असा माझा गैरसमज नाही.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
प्रतीसाद वाचुन धन्य झालो आणि मिपा च्या पहील्या पानावारचे खालील वाक्याशी ताळमेळ जुळवण्याचा प्रयत्न करत आहे.
अस्सल मराठीतून अभिव्यक्तीसाठी, सहज सोपं आणि मराठमोळं असं हे संकेतस्थळ. येथे तुम्हा सर्व मराठीप्रेमींचं मनापासून स्वागत आहे.
मला माहित नसलेल्या, माझ्यात असलेल्या न्यूनगंडाची मला ओळख करून दिल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद करते.
अदिती
आमच्यात डेडलाईन गळ्याशी येईपर्यंत फक्त स्वतःच्या आवडीचीच कामं केली जातात.
मराठी माध्यमातुन शिकताना ईंग्रजीचे संभाषण आणि श्रवण कौशल्य विकसित होत नाही, त्यामुळे मराठी माध्यमातुन शिकलेल्या मुलांना न्युनगंड येतो. मराठी शाळांमध्ये ईंग्रजी संभाषण आणि श्रवण कौशल्य विकसित करता आले तर हा प्रश्न सुटेल. वर संजय अभ्यंकर आणि चतुरंग यांनी मांडलेला लहाणपणी कानावर पडाणार्या भाषेचा मुद्दा महत्वाचा आहे.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
कायदा आणि निगडीत क्शेत्रामध्ये आन्ग्ल् भाषा चान्गली अवगत असणे फार महत्वाचे आहे. माझे शालेय शिक्शण पूर्ण मराठीतून झाले. त्यामुळे वाणिज्य, कायदा आणि चिटणीस व्यवसायाचे शिक्शण घेताना थोडा (नाही बराच) त्रास झाला. अर्थशास्त्रातील, पिनल कोड मधिल शब्दान्चे अर्थ, त्यान्ची स्पेलीन्ग्स जमत नसत. व्यवसायाच्या ठीकाणी पण आन्ग्ल भाषाच वापरावी लागत असल्याने तिथे सुध्दा सुरुवातीला न्यूनगन्ड येतोच. आणि एखादा मुद्दा पटवून देताना पण आधि मराठीत विचार करून नन्तर त्याचे भाषान्तर करून मान्डावा लागतो. त्यामुळे असे वाटते की इन्ग्रजी माध्यमातून शिक्शण घेतले तर थोडा फायदा नक्कीच झाला असता.
कदाचित अभियान्त्रिकी शाखेचे शिक्शण घेताना हा त्रास कमी जाणवत असावा.
शिक्षणविषयक [बाल व प्रौढ- कोणाचेही असले तरी ] चर्चेत चाईल्ड सायकॉलजीचा उल्लेख अत्यावश्यक ठरतो. काही प्रतिसादकांनी उल्लेखलेल्या शाळांमधे हॉवर्ड गार्ड्नर ह्या चाईल्ड सायकॉलजीस्टच्या मल्टीपल इंटेलिजन्स्च्या सिद्धांतांचा वापर करुन नवी शिक्षणपद्धती विकसत करण्याचा स्तुत्य प्रयत्न चालला आहे.
हॉवर्ड गार्ड्नरच्या मते,
■प्रत्येक माणसात इंटेलिजन्सच्या ८ छटा असतात
■प्रत्येक माणसात ह्या ८ इंटेलिजन्सची सरमिसळ झालेली असते व त्याचे एक सर्वस्वी स्वतंत्र असे एक प्रोफ़ाईल असते
■शिक्षण देताना ह्या ८ इंटेलिजन्सची चेतना व्हावी म्हणून त्याप्रमाणे अध्यापन करणे अपेक्षित असते
■प्रत्येक इंटेलिजन्स मेंदूचा एक स्वतंत्र भाग व्यापतो
■८ इंटेलिजन्स एकत्रितपणे अथवा स्वतंत्रपणे कार्यरत राहतात
८ इंटेलिजन्स व मानवाला त्यांची कार्यक्षमता: [मराठीत सगळे भाषांतर करु शकलो नाही त्याबद्दल क्षमस्व]
१. भाषिक व शाब्दिक: वाचणे, लिहिणे, तारखा पाठे होणे, शब्दांची योग्य निवड व वापर, गोष्टी सांगता येणे
२. गणित व तत्वज्ञान: गणितात प्रगती असणे, तत्वज्ञान उत्तम असणे, अडचणींवर उपाय शोधता येण्याची क्षमता (problem-solving) संरचना मांडता येणे, कार्य-कारण
३. Visual / Spatial: Maps, reading charts, drawing, mazes, puzzles, imagining things, visualization
४. Bodily / Kinesthetic: Athletics, dancing, crafts, using tools, acting
५. Musical: Picking up sounds, remembering melodies, rhythms, singing
६. Interpersonal: Leading, organizing, understanding people, communicating, resolving conflicts, selling
७. Intrapersonal: Recognizing strengths and weaknesses, setting goals, understanding self
८. Nauralistic: Understanding nature, making distinctions, identifying flora and fauna
मला जेव्हढे चाईल्ड सायकॉलजी कळते त्या त्रोटक माहितीच्या आधाराने मी खालील मते मांडत आहे. ही मते मांडतांना, शिक्षणतज्ञांना/शिक्षकांना येणाऱ्या अडचणींचा पुर्ण आदर आहे. ही सगळी मंडळी आपापल्या क्षेत्रात चांगले कार्य करत असल्यामुळेच आपण आज अनेक देशातील शिक्षणपध्दतीपेक्षा अनेक पटींनी पुढारलेले आहोत.
१. सेकंडरी व प्रायमरी शाळांत ह्या सर्व ८ इंटेलिजन्सचा विकास होण्यासाठी बऱ्यापैकी प्रयत्न केलेला आढळतो. पण वैयक्तिकपणे एखाद्या मुलांत काय प्रोफाईल आहे त्याप्रमाणे शिक्षण देण्यात अर्थातच अनेक अडचणी असतात.
२. तरीही, जर आपण जे विषय शाळेत शिकतो ते पाहिले असता, [२ ते ३ भाषा, इतिहास] असे विषय पाहता ज्यांचा इंटेलिजन्स प्रोफाईल कल भाषिक व शाब्दिक कडे जास्त झुकला आहे त्यांना त्याचा फायदा होतो. [मग त्यांना माध्यम कोणतेही असले तरी झटकन स्वतःला त्याप्रमाणे बदलता येते]. त्यामुळे मराठी माध्यमात शिकुनही शैक्षणिक प्रगती न झालेली मुले किंवा ईंग्लिश माध्यमात शिकुनही प्रगती न झालेली मुले पहावयास मिळतात.
३. गणित हा विषय तर पहिली पासुनच शिकवतात. इंजिनीअरींग, अकौटन्सी, सायन्स ह्या क्षेत्रात गणित, लॉजिकल रिझनिंग हा इंटेलिजन्स नसला की प्रगती होत नाही. मग माध्यम कोणतेही असो.
नोकरदार वर्ग प्रामुख्याने वरील इंटेलिजन्स वर अवलंबुन असतो
४. ज्याच्याकडे Interpersonal इंटेलिजन्सही आहे व वरील दोन्ही इंटेलिजन्स आहेत अशी व्यक्ति कोणत्याही माध्यमातून शिक्षण घेतले तरी, व्यावसायिक, इंजिनीअरींग मॅनेजरही यशस्वीपणे होते. पण Interpersonal इंटेलिजन्स आहे पण तो विकसित झाला नाही तर ती क्षमता असली तरी एखादा मागे पडतो
५. Intrapersonal इंटेलिजन्स असलेली मंडळी स्वतःच्या क्षमता ओळखू शकतात व असे लोक कष्टाने काहीही साध्य करु शकतात. अर्थातच तो इंटेलिजन्स लवकरात लवकर विकसित झाला पाहिजे. आपल्याकडे असा इंटेलिजन्स आहे ते त्या व्यक्तिला कळले पाहिजे.
वरील उदाहरणांवरुन मला इतकेच म्हणायचे आहे की, जेव्हा आपण म्हणतो की, मराठीत शिक्षण घेतल्यामुळे माझे काहीच अडले नाही तेव्हा त्याची कारणीमिमांसा अधिक खोलवर जाउन केली पाहिजे. असे झाले की, माझा पाल्यही असेच करु शकेल हे म्हणणे योग्य नाही.
येणाऱ्या काळात नॉलेज ईंग्लिशमधे जास्तीत जास्त निर्माण होणार असेल तर मुलांना ईंग्लिशवर प्रभुत्व मिळवणे आवश्यक आहे की नाही ते त्याच्या/तिच्या भविश्यातील कार्य्क्षेत्रावर अवलंबुन असेल. हे आधिच कसे कळणार?- हिच गोची आहे व त्यामुळेच आपण गोंधळतो.
जर अशा काही टेस्ट असतील की, ज्याने एखाद्यात काय इंटेलिजन्स प्रोफाईल आहे हे समजु शकेल असे असेल तर, ज्यांना भाषिक/शाब्दिक इंटेलिजन्स कमी आहे अशांनी मातृभाषेत शिकावे असे म्हणता येईल का?
[वेळे अभावी मला अपेक्षित असलेले लिखाण मी करु शकलो नाही]
अहो कुठे मराठी माध्यमात घालता. मराठी लुप्त होत चाल्लेली भाषा आहे. पुढच्या काही वर्षात मराठी ही पाली किंवा अर्धमागधी सारखी केवळ विद्यापिठात शिकवायची भाषा म्हणून तरी शिल्लक राहील किंवा हिंदीची एक बोलीभाषा म्हणून शिल्लक राहील.
त्या पेक्षा इंग्रजी माध्यमातून शिकवा, कसे?
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
ही ओरड गेले अनेक वर्षे आपण ऐकत आहोत्.महाराष्ट्राची लोक्सन्ख्या साडे दहा कोटी, म्हणजे उत्तर प्रदेश्च्या खालोखाल लोकसन्ख्येत महाराश्ट्रचा नम्बर.! आता ह्यातले 'बाहेरचे',भैय्या,मद्रासी,गुज्जु,मारवाडी बाजुला काढले तरी मराठी बोलणारे खुप होतात.तेव्हा मराठी रहाणारच्. चिन्ता नसावी.
अवान्तर्-मराठी साहित्य सम्मेलन,कोकण सहित्य सम्मेलन्,विदर्भ साहित्य सम्मेलन्,अखिल भारतिय मराठी साहित्य सम्मेलन.... अशी असन्ख्य साहित्य सम्मेलने. त्यातराजकारण न करता रसभरीत साहित्याची चर्चा करणारे,भाषेला एक वेगळाच दर्जा प्राप्त करुन देणारे आपले साहित्यिक.कोण म्हणतो मराठी भाषा लुप्त होत चालली आहे?
पेशव्यांच्या लिखाणातील उपरोध समजू शकतो. पण मराठी भाषा आणि मराठी माणूस यांचे हितसंबंध जर परस्परविरोधी होत असतील तर दुसरे महत्वाचे ठरावे.
थोडे इतिहासात डोकावले असता १९६० दशकात मुंबईतील अनेक पांढरपेशा नोकर्या दाक्षिणात्यांनी पटकावल्या होत्या.
असे होण्यामागे तत्कालिन मराठी मंडळींपेक्षा दाक्षिणात्यांचे इंग्रजी प्रभुत्व हे एक कारण होते.
मराठीच्या नावाखाली इतिहासाची पुनरावृत्ती टाळलेलीच बरी!
केवळ माध्यम मराठी असले म्हणजे पुढच्या पिढीत मराठी भाषा टिकेल असा (गैर)समज आपल्यापैकी बर्याच जणांमध्ये दिसतो.
"बाहेरच्यांनाही" बघावी/ ऐकावीशी वाटतील असे चित्रपट/गाणी निघाली आणि चांगले साहित्य निघाले तर मराठीची फिकिर करण्याचे कारण नाही.
(अवांतर :) माझा एक इंग्रजी माध्यमातील मित्र पुल माझ्यापेक्षा जास्त वाचतो.
अभिरत
प्रतिक्रिया
केसस्टडी
ईंग्रजी
माझी उत्तरं
प्रतीसाद
न्युनगंडा
मला माहित
तो काढुन
ईंग्रजी संभाषण आणि श्रवण कौशल्य
मराठी माध्यम
चाईल्ड सायकॉलजी, हॉवर्ड गार्ड्नर व माध्यम
मराठी
वाघिणीचे दूध.
मराठी भाषा
उपरोध