सेक्रेड गेम्स-२. वेळेचा अपव्यय !

अथांग आकाश's picture
अथांग आकाश in काथ्याकूट
16 Aug 2019 - 9:00 pm
गाभा: 

सेक्रेड गेम्स-२. वेळेचा अपव्यय !
पहिला सिझन बघून अपेक्षा खूप उंचावल्या मुळे बहुप्रतीक्षित दुसरा सिझन सेक्रेड गेम्स-२ काल नेटफ्लिक्स वर प्रदाशित झाला.
पहिले तीन भाग आवडले, पण पुढच्या तीन भागांनी पूर्ण निराशा केली!
भरपूर कलाकारांचा भरणा करून कुठल्याच व्यक्तिरेखेला न्याय न देता आल्याने वेळेचा अपव्यय झाल्यासारखे वाटले.
रणवीर शौरी सारख्या कलाकाराला तर अगदी थोडासा रोल देऊन वाया घालवला आहे.
मिपाकरांनी हा दुसरा सिझन बघितला असल्यास त्यांच्या प्रतिक्रिया वाचायला आवडतील!

प्रतिक्रिया

अगदीच निराशा झाली बुवा दुसरा सिझन बघून :(

प्रेडिक्टेबल का तर अगदी पाब्लो एस्कोबार पासून ते काल्पनिक(?) स्कारफेस चे कथानक बघा, क्राइम बायोग्राफी स्टोरी नेहमीच राइज आणि कुचम्बणा होऊन फॉल अशाच धाटनीमधे सादर होते.

त्यामुळे आता गायतोंडे फार मोठे काही साध्य करेल अशी अपेक्षाच न्हवती, त्याचा फॉल ही एक औपचारिकता होती कारण सुरुवातीलाच तो मरतो आणि गुन्हेगार कथानायकांच्या कथांचा हाच साचा असतो. त्यामुळे उत्सुकता गुरुजी बद्दल होती...

पण एकूणच त्याला ओशो म्हणून सादर करावे की नाही यात कथा लेखक पूर्ण गोंधळुन त्याची व्यक्तिरेखाच मैस्मराइजिंग होत नाही त्यामुळे ना धड़ ओशोचा खोड़करपणा ना धड़ क्रिमिनल मास्टरमाइंडचा खुनशीपणा व बुध्दिमत्ता ना फाइटक्लब मधील एडवर्ड नॉर्टन व ब्रैड पिटचा विक्षिप्तपणा अथवा आणखी काही वेगळे धक्कादायक ज्याची अपेक्षा आपण अनुराग कश्यप कडून करतो असे काहीच होत नाही परिणामी गायतोंडे त्याच्या नादी लागतो ही गोष्टच गळी उतरत नाही.

पहिल्या सीजनमधे जशी मुंबई जीवन्त केली आहे तसे बाहेरिल देशातिल घटनाचे तत्कालिक संदर्भ वापरून अजिबात चित्रण केले गेले नसल्याने गायतोंडे तिकड़े जे काय दिवे लावतो ते ही प्रभावित करत नाही.

कलाकारांचा अभिनय ही जमेची बाजू सोडली तर एकूणच प्रकरण सपक आहे.

डॉ सुहास म्हात्रे's picture

17 Aug 2019 - 12:11 am | डॉ सुहास म्हात्रे

पहिला सीझन आवडला होता. दुसर्‍या सीझनने खूपच अपेक्षाभंग केला... कथासूत्र इकडे तिकडे भरकटत राहते, विस्कळीत आहे आणि मनावर अजिबात पकड घेत नाही. :(

महासंग्राम's picture

17 Aug 2019 - 9:38 am | महासंग्राम

GOT पेक्षा बरा ए पण

हा सिझन पहिल्यापेक्षा खचितच वेगळा आहे, याचा आपला स्वतःचा पेस आहे, स्वतःच कॅरेक्टर डेव्हलपमेंट आहे. गेल्या २ दशकातल्या महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेत तयार केलेली टाइमलाईन आहे आन मुख्य म्हणजे आरती बजाज च सफाईदार एडिटिंग.

तुम्हाला जर पहिल्या सिझन सारखं कधी पुढचा एपिसोड पाहतो असं वाटत असेल तर सॉरी बॉस ये खेल आपके लिए नही है.

अगदीच गणेश अण्णा गायतोंडेंच्या भाषेत सांगायचं झालं तर

ये खेल आप मै और सब XXX से काफी बडा है

जॉनविक्क's picture

17 Aug 2019 - 12:44 pm | जॉनविक्क

तुम्हाला जर पहिल्या सिझन सारखं कधी पुढचा एपिसोड पाहतो असं वाटत असेल तर सॉरी बॉस ये खेल आपके लिए नही है.

हे बाकी खरे आहे. कदाचित चालू एपिसोडच आपण का पाहतोय असे वाटणाऱ्यासाठी हा खेल असावा.

तिसरा बापच फुसका ठरल्याने सर्वच ठिकाणी माती खाल्ली गेली. गायतोंडेला किती जबरदस्त xत्या बनवले गेले असे वाटण्यापेक्षा गायतोंडे असा xत्या सारखा का वागतोय हाच प्रश्न पड़त होता :( व्हाट अ लेट डाउन.

महासंग्राम's picture

17 Aug 2019 - 1:38 pm | महासंग्राम

गोची खाल्ल्यामुळे :)

जॉनविक्क's picture

17 Aug 2019 - 3:06 pm | जॉनविक्क

खरी गोची तर हीच आहे की एक गैंगस्टर गोची घेऊन सन्यासी बनतो. सामान्य मानव असे वागेलही. पण, पण जो आधीच राडे करतो त्याला गोची सन्यासी बनवेल तरी कशी ?

गुरुजी त्याचा नाइलाज आहे , बेस्ट पॉसिबल एस्केप रूट न्हवे. हे क्षणा क्षणाला ठळक होत असल्याने गण्याचे वागणेच पटत नाही. आणि हे गण्यालाही लक्षात येते तेंव्हा प्रेक्षकाना अजिबात धक्का बसत नाही.

तीच गोष्ट सरताज भाऊ ची... प्रोटोगोनिस्ट ला विक्षिप्त खलनायकाचे आपोआप हत्यार बनताना बघायचे असेल तर ब्रैड पिटचाच सेवन चित्रपट मस्त आहे किंवा गेला बाजार आपल्या जोकराचा डार्क नैटहि थोडाफार तसाच . तो माइंड गेम अंगावर काटा आणतो.

पण इथे सगळे प्रयत्नच फसले असल्याने किमान प्रेक्षकहि दूसरा सीजन उचलून धरतील अशी आपेक्षा नाही :(

विनोदपुनेकर's picture

17 Aug 2019 - 11:57 am | विनोदपुनेकर

नुकतेच सगळेच भाग पाहिले पहिल्या सिझन मुले खूप अपेक्षा होत्या त्याचा अपेक्षाभंग नक्कीचं झाला आहे. कधीच पकड घेतली नाही फक्त शिव्यांचा भडीमार .. अगदी पहिल्या सिझन पेक्षा अतिरेक वाटलं शिव्यांचा

टर्मीनेटर's picture

19 Aug 2019 - 7:59 pm | टर्मीनेटर

निव्वळ वेळेचा अपव्यय!
दुसऱ्या सिझनने साफ निराशा केली.

आदिजोशी's picture

19 Aug 2019 - 8:23 pm | आदिजोशी

पहिला एपिसोड कसाबसा बघितला. दुसरा एपिसोड अर्धाच बघवला. पुढचं बघायची इच्छाही होत नाहीये.

आदिजोशी's picture

19 Aug 2019 - 8:24 pm | आदिजोशी

पहिला एपिसोड कसाबसा बघितला. दुसरा एपिसोड अर्धाच बघवला. पुढचं बघायची इच्छाही होत नाहीये.

४ थ्या नन्तेर वेग पकड्ला जातो

महासंग्राम's picture

20 Aug 2019 - 2:21 pm | महासंग्राम

आपल्या वेबसिरीजची तुलना ब्रेकिंग बॅड , चेर्नोबिल आणि तत्सम इतर अप्रतिम वेबसिरीजशी करण्यात काही पॉईंट नाही .आपली जी content निर्माण करणारी व्यवस्था आहे ,तिची तुलनाच तिकडच्या दुसऱ्या देशातल्या व्यवस्थेशी करण्यात अर्थ नाही .चेर्नोबिल हा माझा सगळ्यात जास्त आवडता शो . त्या शो चा फक्त रिसर्चचं नऊ वर्ष चालू होता . लेखक आणि प्रोडक्शन टीमने आपल्या आयुष्यातली नऊ वर्ष त्या शोला दिली आणि मगच शूटला सुरुवात केली . आणि रिझल्ट पडद्यावर दिसतोच .दुर्दैवाने आपल्या वेब कंटेन्टवर टेलिव्हिजन इंडस्ट्रीचा अजूनही प्रचंड प्रभाव आहे . इथे प्रोडक्शन हाऊसना आणि स्टुडिओजना अशक्य डेडलाईन देऊन त्या फॉलो करण्याच्या एकता कपूर बिझनेस मॉडेलला राबवण्यात जास्त रस आहे . पटकन फायनल प्रोडक्ट तयार करून ते प्रेक्षकांच्या पुढे नेऊन आदळून ठेवण्याची त्यांना घाई असते . लेखक दिग्दर्शकांना एक सर्टन वेळ द्यावा लागेल हे की पोझिशनवर असणाऱ्या लोकांच्या गावी पण नाही . लेखक दिग्दर्शकांना पण एकाच शोला भरपूर वेळ देऊन तो तब्येतीने करण्यात रस आहे का ,हा संशोधनाचा विषय आहे .अशा वातावरणात चेर्नोबिल कसं बनणार ? तरी आपल्याकडे दिल्ली क्राईम , मेड इन हेवनस ,Sacred Games अध्ये मध्ये का होईना बनतात हेच खूप आहे .

© अमोल मंगेश उदगीरकर

जॉनविक्क's picture

20 Aug 2019 - 2:24 pm | जॉनविक्क

ते बघता ब्रेकिंग bad अपेक्षा करणे चूक नाही. नेटफ्लिक्स जर बालाजी बनले तर नेटफ्लिक्स हवेच कशाला ?

महासंग्राम's picture

20 Aug 2019 - 3:05 pm | महासंग्राम

पण कन्टेन्ट ला वेळ देता का ? हा प्रश्न आहेच.
कन्टेन्ट बरोबर नसला तर got पण माती खाते

चूक क्रिएटिव डायरेक्टर ची आहे. सेल्फ प्रेजिंग अथवा आपले मुंडके आपल्याच श्रोणित घुसवने ज्याला म्हणतात ते घडले की असे होते. Got सोडा शरलॉक नेही अशीच माती खाल्ली सीजन एंडिंग एपिसोडला.

महासंग्राम's picture

20 Aug 2019 - 3:20 pm | महासंग्राम

शेरलॉक ने माती खाल्ली ?

जॉनविक्क's picture

20 Aug 2019 - 3:47 pm | जॉनविक्क