Skip to main content

आकाशवाणी ऑनलाइन

लेखक मंदार कात्रे यांनी बुधवार, 14/08/2019 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
९० वर्षाहून अधिक काळ सेवेत असलेली आणि भारतात सर्वदूर पसरलेली व सर्वप्रकारच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाची गंगोत्री असलेली जगातील सर्वात मोठी प्रसारण सेवा असलेली तुमची आमची आवडती आकाशवाणी आता कात टाकतेय . प्रमुख शहरातील आकाशवाणी केन्द्रे सात-आठ वर्षापासूनच ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस वर उपलब्ध होती परन्तु आता काश्मीर ते कन्याकुमारी आणि गुजरात ते अरुणाचल प्रदेश यत्र तत्र सर्वत्र असणारी आकाशवाणीची प्रादेशिक केन्द्रेही ऑनलाइन स्ट्रीमिंग सर्व्हिस वर उपलब्ध होत आहेत . यात महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई अ , ब , विविधभारती , एफ एम रेन्बो , एफ एम गोल्ड , न्यूज सर्व्हिस यासह रत्नागिरी ,कोल्झापूर , पुणे , सांगली , सोलापूर , नागपूर ,गोवा व इतर अनेक प्रादेशिक केन्द्रे आता ऑनलाइन उपलब्ध आहेत . जगभरात कुठेही प्रसारभारती अ‍ॅप अथवा वेबसाईटच्या माध्यमातून ही सेवा ऐकता येइल ... http://prasarbharati.gov.in/playersource.php?channel=165 https://play.google.com/store/apps/details?id=com.ionicframework.air152… https://apps.apple.com/in/app/all-india-radio-live/id1289849764 https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews https://apps.apple.com/in/app/newsonair/id1450030867

वाचने 16331
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

चांगली माहिती. सर्वांना स्वातंत्र्य वर्धापन दिन शुभेच्छा !

आकाशवाणी पुणे केंद्र अ‍ॅपवर लागत नाही. मराठी वर मुंबई केंद्राचा समावेश दिसतो. प्रसार भारतीच्या साईटवर मात्र पुणे लागते.

सुंदर माहिती ! यामुळे जगात कोठेही आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता येतील, ही फार सोयीची गोष्ट आहे.

प्रसारभारती साइटवर पुणे ,नागपूर, रत्नागिरी वगैरे लागत आहेत ती एफेम/एएम आहेत? मुंबई अ,ब एएम लागतं का?

लाख लाख धन्यवाद मंदार भावू. रेडिओ garden तर जबरी आहे . तुम्ही दिलेल्या पहिली लिंक पण चांगली आहे. फक्त रत्नागिरी रेडिओ लागतं नाहीये.

App भारी आहे! खालील आपली केंद्रे appवर आहेत- विविध भारती AIR मराठी AIR पुणे FM GOLD मुंबई FM RAINBOW मुंबई आकाशवाणी संवादीता मुंबई Air सांगली Air नागपूर Air म्हदेइ, पणजी Air सोलापूर Air कोल्हापूर Air औरंगाबाद Air रत्नागिरी

In reply to by प्रकाश घाटपांडे

१. लेखात उल्लेख केलेल्या all india radio app मध्ये आणि २. प्रसारभारतीच्या app मध्ये. https://play.google.com/store/apps/details?id=com.parsarbharti.airnews

In reply to by तुषार काळभोर

मला दोन्ही ऎप मधे एआयआर पुणे मिळाले नाही. एआयाआर मराठी आहे. मला मराठी पुणे केंद्र ए एम हवे होते.

In reply to by तुषार काळभोर

माझ्याकडे हे अ‍ॅप होते. अ‍ॅन्ड्रॉईड वर मी अनइन्स्टॉल करुन परत इन्स्टॉल केले तरी फक्त ए आय आर मराठी असेच दिसते. त्यात मराठी हे मुंबई केंद्र असावे.

In reply to by प्रकाश घाटपांडे

प्रसारभारती साईटवरील एआईआर पुणे, आणि एआईआर म्हादेई पणजी म्हणजेच जुन्या मिडिअम वेव रेडिओवर लागणारी पुणे आणि पणजी केंद्रे आहेत हे दोन्ही ठिकाणचे कार्यक्रम लावून ऐकले. रेडिओवर खरखर येते पण साईटवर स्पष्ट. फक्त फरक एवढाच की साईट अथवा ऎप दीड मिनीट मागे राहते.

माझ्या कडे खूप पूर्वी नोकिया चा e 11 असा कोणता तरी मोबाईल होता (मॉडेल नक्की आठवत नाही ) त्यात सर्व जगातील रेडिओ स्टेशन ऐंकण्याची सुविधा होती ऑनलाईन . जगातील च नाही तर देशातील प्रत्येक राज्यातील रेडिओ स्टेशन सुद्धा लागायची

उपयुक्त माहिती !

ही एकदम भारी उपयुक्त माहिती दिल्याबद्दल खूप आभार! आत्ता मी त्यातील उर्दू सर्व्हिस ऐकतोय. मस्त!

इंटरनेट रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओ काय फरक आहे . इंटरनेट रेडिओ खूप वर्षा पासून चालू आहे

In reply to by Rajesh188

इंटरनेट रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओ काय फरक आहे .
साधा रेडिओ (IOT एनेबल नसेल तर त्या)वर इंटरनेट रेडिओ ऐकता येत नाही. पण इंटरनेट रेडिओवर साधा रेडिओ ऐकता येणे अशक्य नाही.

जिथे रेडिओ ऐकले जातात तिथे रेडिओ आहेत. जिथे नेट आहे तिथे याचा आजच्या काळात काय उपयोग ? अर्थात कोणी ना कोणी ऐकत असेलच म्हणा

स्थानिक लोक आपापल्या राज्याचे कार्यक्रम स्वस्तात रेडिओ किंवा मोबाईलवर नेट न वापरता ऐकू शकतात. परगावच्या लोकांना आपला माहेरचा रेडिओ इंटरनेट रेडिओतून ऐकायला मिळतो. आणि आता नेट स्वस्तच झाले आहे.

गोव्याच्या केंद्राचे कार्यक्रम ऐकले. मस्त गोड गोड कोकणी गाणी. कानाला एकदम गुदगुल्या केल्यासारखं वाटलं!! बातम्या सगळीकडे एकावेळी लागतात. ते सोडलं तर air मराठी, पुणे, रत्नागिरी, नागपूर यांच्यावर वेगवेगळे कार्यक्रम असतात.

खाजगी एफ एम वाहिन्या उपलब्ध आहेत का ? आमच्या ग्रामीण भागात रेडिओ वर कोणतेही एफ एम केंद्र लागत नाही .