Skip to main content

दुसरा कुणीच नाही....

लेखक जयवी यांनी रविवार, 22/03/2009 या दिवशी प्रकाशित केले.
पैशापरी जवळचा दुसरा कुणीच नाही माणूस माणसाचा झाला कधीच नाही गणगोत आप्त सारे जमले उगाच नाही टाळूवरील लोणी उरले(पुरले) मुळीच नाही शमले तसेच सारे देहातले निखारे वणव्यास पावसाची नड भासलीच नाही काळोख तुंबलेला दाही दिशात सारा सूर्यात आग पुरती का पेटलीच नाही डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले पाऊस का सखा मग झाला कधीच नाही सरणावरी कळाले उपभोग फार झाला उपयोग जीवनाचा केला कधीच नाही जयश्री अंबासकर
Taxonomy upgrade extras
लेखनविषय:

वाचने 3854
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

शमले तसेच सारे देहातले निखारे वणव्यास पावसाची नड भासलीच नाही वा. डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले पाऊस का सखा मग झाला कधीच नाही छानच. सरणावरी कळाले उपभोग फार झाला उपयोग जीवनाचा केला कधीच नाही उपभोग, उपयोग... सुंदर.

वा! --अवलिया

In reply to by अवलिया

असेच म्हणतो.

वा जयू, सुंदर काव्य..! जियो..! आपला, (जयूचा फ्यॅन) तात्या.

फारच सुरेख... :) मदनबाण..... "If debugging is the process of removing software bugs, then programming must be the process of putting them in." --- Unknown.

In reply to by मदनबाण

सुरेख !! :-) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

खूप खूप छान मीनल.

कवितेतली ओळ अन ओळ सुंदर. खुप आवडली! -अनामिक

जयूताई, जबरदस्त गझल. नवीन आणि वेगळ्या आहेत सगळ्या कल्पना. मस्तच शेवटचे तीन शेर तर सगळ्यात खास!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

In reply to by प्राजु

सहमत आहे. सुंदर गजल. -- लिखाळ.

In reply to by प्राजु

सहमत >>सरणावरी कळाले उपभोग फार झाला उपयोग जीवनाचा केला कधीच नाही सुंदर लिहिले आहे...

जयवी ताई, सलाम तुझ्या प्रतिभेला. :) प्रत्येक शेर सुंदर. :)

कविता मस्त, आवडली....:) डोळ्यात दाटलेले आभाळ मित्र झाले पाऊस का सखा मग झाला कधीच नाही खासच!

कविता !

शेवटचे कडवे खासच!

दोस्तांनो.....इतके सुरेख अभिप्राय........ खूप खूप सुखावले.......असंच प्रेम असू द्या :)

क्ला सि क बिपिन कार्यकर्ते

वास्तववादी. खुपच छान!

गझल खुप आवड्ली.....

सगळेच शेर आवडले शेवटचा तर खासच् चेतन

काय बोलू? शब्द मुके झाले जयुताई! अप्रतिम! क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

लिखाण जरी आत्मानंदासाठी असलं तरी.... कुणाला आपण लिहिलेलं आवडलं ही जाणीव फार सु़ख देते आणि तुम्ही लोकांनी ते मल भरभरुन दिलंत. मनापासून आभार लोक्स :)