मनोरुग्नाचा विषय
मनोरुग्न होतांनां येणारी शारीरीक व मानसीक दुर्बलता नमस्कार,
मी, शिवाजी पाटील सद्या मनोविकार/डिप्रेशन/मानसीक पिडा या विषयावर माझे स्वत:हाचेच अनुभव व्यक्त करीत आहे कारण हे मला अतिआवश्यक वाटतात माझे वय27 आहे मी जिल्हा जळगाव,महाराष्ट्र येथील रहीवासी गेल्या 1 वर्षा पासुन मी मनोरुग्नच होतो.मी पदविचे शिक्षण घेत स्पर्धापरिक्षा देत होतो पदवीनंतरही अभ्यास चालु होता वारंवार होणार्या परिक्षा खर्च,अपयश खंबीर मनाने सामना करीत होतो.4ते5 वर्ष त्याच परिरीस्थीतीत कारण मी शेती ही करतो आर्थीक अडचन नेेहमीच भासत होती,मुंबईत रु12,000महीन्याची एक कंत्रीटी नौकरी भेटली 1वर्ष काम केले दुसर्या वर्षी सेवा समाप्त केली गेली पुन्हा घरी परतलो खेड्याचा असल्यामुळे मित्र,सभोवतालीन लोक नेहमीच माझ्या संदर्भात विचारत प्रत्येकास नेहमीच त्याच विषयावर उत्तर देणे कठीण स्वभाव शांत असतल्याने कुणाशी जास्त न बोलणे आपल्याच कामात व्यस्त राहने टिका,टिंगलटवाळी तर होतच होती तेही कारण नसतांना मनात खुप वाईट वाटे कारण या अगोदर ईतक्या मोठ्या प्रमाणात वाटेल तसे वागणारे टोचुन बोलणारे माझ्या आयुष्यात तरी नव्हते कारण मी लहानपणापासुन प्रेमाणेच वागत कुणाचे भांडण,टिंगल,फसवणुक जमत नसे परंतु माझ्या सोबत असे घडायला लागले मग मी एकांतात राहनेच पसंत केले न बोलता माझ्याच कामात अभ्यासात व्यस्त 4ते 6तास अभ्यास रात्री12पर्यंत मोबाईल वर अभ्यास मात्र काही 2त4महीने खुप डिप्रेशन मध्ये आलो सकाळपासुनच कमी पाणी पिने जेवन करुनही अल्प प्रमाणात पाणी पिणे जेवण तर वेळेवर होत याचाच डिप्रेशन सोबत कमी पाणी पिने मग भुक मंद झाली ,विसरभोळा होण्यास सुरवात झाली ती तर खुप मोठ्या प्रमाणावर उद्याचे,आजचे नाही तर चालु सांगीतलेली गोष्ट ही लक्षात राहत नसे मग मी हळुहळु पुर्णतहा गोंधळायला लागलो,समोरचा व्यक्ती आपल्याशी काय बोलत आहे हे सुद्धा कळायला उशीर होत किंवा समज नसे,मग लोकांचे बोलणे व स्वत:हाची होत असलेल्या शारीरीक परिस्थीती बिघडत गेली योग्य पचन न होणे,रात्री झोपच उडायला लागली,मग डोके दुखायला सुरुवात झाली,कधी कुठे तर कधी कुठे डोके खुपच मोठ्या प्रमाणात दुखायला लागले व विस्मरण ही खुप स्वत:हाच्याच विचारात मग्न न विचार करताही मनात दिवसरात्र विचारांचे मोठे वादळ मनाचा पुस्तक वाचल्यास पुस्तकातील लिहीलेल्या ओळीही चुकीच्या तर कधी बरोबर लीहील्या वाटे वाचल्यावरही शब्दही लक्षात न राहने ,मगील माझा झालेला अभ्यासही मी पुर्ण विसरलो तो ही लक्षात येत नसे डोके दुखीच्या बाबतीत असे वाटे जणु ब्रेनट्युमर किवा गाठी वाटे काहीही विचीत्र वाटे,मनात वाईट चांगले असंख्य विचार चाले आपण नेमके काय करतो आहे हे ही कळत नव्हते मग उपाय मनोचीकस्सक कडे गेलो 1 महीना गोळ्या घेतल्यावर बुद्धी शुद्धीवर तसेच या गोळ्या बरे वाटत असल्यास माझ्या मते वारंवार घेऊ नयेत कारण या गोळ्या वर्षानुवर्षे घेतांना व्यक्ती मी पाहीले आहेत व बघतोय मि मग दुधात काजु व बदाम रात्री भिजऊन सकाळी व्यायाम केल्यावर सेवन केले,विचारांनपासुन दुरहोण्मायासाठी माझ्या आवडीच्या ठिकाणी काही दिवस स्थलांतरीत झालो,मेंदुतील काही निवडक रसायनांनवर आपल्या राहनीमानाचा,विचारांचा,खानपानाचा व अनेक चांगल्सया वाईट वयींचा खुप जवळचा संबंध असतो ते वेळेवर दुरुस्त केलेले कधीही चांगले माझ्या आयुष्यात हे क्षण मी कधीही विसरु शकत नाही आपल्याला जे सांगीतले ते तंतोतंत सत्य आहे
प्रतिक्रिया
तुम्ही गांजा किंवा तत्सम कुठले व्यसन करत होतात का?
अहो होतकरू माणूस गांजा कशाला
सर्व काही हाताळणे सोपं(तुलनेने) असते
माझ्या आयुष्यात हे क्षण मी
खूप छान मोकळं लिहलंत बरं
खरे पाहता मानसिक त्रास यावर
+१ असेच म्हणतो
माफ करा
लक्षण- चांगले वाईट विचार येत न कराताही पुर्ण गोंधळतो,स्मरण शक्त