आणि भारत एका चंद्रावर जाणाऱ्या अंतराळवीराला मुकला.....
लेखनविषय (Tags)
डिस्क्लेमर : हा लेख तद्दन फालतू आहे. आम्ही आमच्या बायकोवर, इथे हवे तितके लिहू शकतो. त्यामुळे स्त्रीमुक्ती वाल्यांनी खालील लेख नाही वाचला तरी चालेल
तर अशाच एका शनिवारची गोष्ट आहे. आम्ही आमच्या बाबा महाराजांचे साप्ताहिक दर्शनासाठी गेलो होतो. अर्थात तीर्थ प्राशन करून मग घरी गेलो. तसे नौकानयन न करता, पंख लावूनच घरी गेलो आणि बघतो तर काय. ..घरी बरीच मंडळी जमलेली. आई-वडील तर होतेच, पण शिवाय बायकोची भावंडे पण होतीच. चपला काढून, जेमतेम बसतोय न बसतोय, तोच बायकोचा हुंदका कानावर आला. आता हिला काय झालं, म्हणून नजर वरती केली, तर मातोश्रींनी हातात एक कागद ठेवला. कसाबसा कागद वाचला. तर त्यात लिहिले होतं की...
चंद्र-मोहीमे साठी तुमची अंतराळ वीर म्हणून निवड झाली आहे. तुमच्या मागील अनुभवावरून, तुम्हीच भारतीय जनतेतील पहिला चंद्रवीर होऊ शकता. लवकरात लवकर आपला होकार अपेक्षित आहे. खाली मोबाईल क्रमांक दिला आहे. त्वरित संपर्क साधावा. ही विनंती.
तसे ह्या आधी पण मी चंद्रावर गेलो होतो. पण ती मिपाकरांसोबत सामुदायिक मोहीम होती. त्यामुळे मी तसा बिंधास होतो. पण ही मोहीम मात्र एकट्यानेच पार पाडायची होती. मी होकार देणारच होतो आणि मी मोबाईल फोन घेतला आणि बायकोने हंबरडा फोडला. हे एक असे शस्त्र आहे की, ते वापरले की, सासू आणि सून एकत्र येतातच पण पिताश्री पण त्यात विरघळून जातात.
मी : आता काय झालं? रोज रोज लोकल मध्ये प्रवास करण्यापेक्षा, चंद्रावर गेलो तर काय वाईट?
बायको : कोण कोण येणार आहे?
मी : माहीत नाही. पण बहुतेक एकटाच असेन.
बायको : पण तुम्हालाच का निवडले?
मी : मला काय माहीत? मी मागे मिपाकरांसोबत गेलो होतो. ते वाचून निर्णय घेतला असेल. तसेही आजकाल मिपावरील चर्चा वाचून सरकारी धोरणे राबविली जात आहेत, असे आमचे बाबा महाराज, म्हणत होते.
बायको : तिथे खाणार काय?
मी : तिथे दगड आणि माती आहे. मला ते पचवायचा अनुभव आहे. मागच्या वेळी मी 3-13-1760 ह्या ग्रहावर गेलो होतो. तो पण लेख मी मिपावर लिहिला होता.
बायको : (सगळ्यांकडे बघत) : बघीतलंत, हे नेहमी असंच करतात. सतत इकडून तिकडे नाना ग्रहांवर फिरत असतात. पण मला मात्र कुठेही नेत नाहीत. मला पण न्या.
मी : अगं, हा निर्णय मी कसा घेऊ?
बायको : समजा, तुमच्या सूटला भोक पडले तर कोण शिवणार? मी बरोबर असेन तर , तुम्हाला चिंता नाही. तुम्हाला धड बटण पण लावता येत नाही.
मी : अगं, ते स्पेशल सूट असतात.
बायको : समजा वाटेत इंधन संपले तर?
आता हा सवाल जवाब ऐकता ऐकता इतरांना पण एक एक प्रश्न सुचायला लागले.
आई : तुला काही झालं तर हिने काय करायचे?
पिताश्री : मुलांना कोण सांभाळणार?
बायकोची भावंडे (नक्की कोण काय म्हणाले? ते आठवत नाही) : डिप्लोमा करतांना इतक्या गंटागळ्या खाल्या, तरी पण सिलेक्शन? नशीब एकेकाचे. नक्की चंद्रावरच जातील, ह्याचा काय भरवसा? परत येताना कुठे जातील ह्याचा काही भरवसा नाही. हे कधी चंद्रावर गेले होते? आतल्या गाठीची माणसे नुसती. हा 3-13-1760 ग्रह नक्की आहे का? नुसत्याच बाता मारतात.
आता तुम्हीच सांगा, ह्या अशा प्रश्नांची उत्तरे देण्या पेक्षा मी, मौनव्रत धारण केले आणि समाधी अवस्थेत गेलो. अर्थात, आमच्या कडून प्रतिसाद न गेल्याने, आमच्या ऐवजी दुसर्याची निवड झाली.....
प्रतिक्रिया
ह ह पु वा...
घरगुती जेवणाचा डबा, भाजणीचे
कशाला कशाला
=))
बर झालं तुम्ही इथे लिहीलं ते...
न कळवता कट्टा करणा-यांचा
"चंद्रा"वर
ओ..
लिखाण वाचून बरेच दिवसांनी आज आकुंची आठवण आली
अकुसेठ लिहते व्हा
हिलते व्हा हा जुना
आंनद वाटला
;-) भारी लिवलयं. लिहीते झालात
कहर!!
भाई
भाई
खूप छान जमले आहे प्रवास वर्णन
अंमळ
तुमची संधी हुकल्याचा खेद आहे,
वा झकास लिवलय
आता तुम्हीच सांगा, ह्या अशा
आता तुम्हीच सांगा, ह्या अशा प्रश्नांची उत्तरे देण्या पेक्षा मी, मौनव्रत धारण केले आणि समाधी अवस्थेत गेलो. अर्थात, आमच्या कडून प्रतिसाद न गेल्याने, आमच्या ऐवजी दुसर्याची निवड झाली.....अरेरे, मिपाकर एका मस्तं सचित्र प्रवासवर्णनाला मुकले ! =)) =)) =)):D
हा हा