Skip to main content

सफरचंद हलवा by Namrata's CookBook :१२

लेखक Namokar यांनी गुरुवार, 25/07/2019 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
लागणारा वेळ: ३० मिनिटे(*सफरचंदाचे प्रमाण किती आहे यावर पाककृतीसाठी लागणारा वेळ कमी जास्त होईल) लागणारे जिन्नस: सफरचंद तुप साखर वेलची पुड साय काजू , बदाम क्रमवार पाककृती: १. सफरचंद धुवून ,त्याचे २ काप करुन त्यामधल्या बी काढून किस करुन घ्या २. कढई मध्ये तुप घ्या ३. तुप गरम होत आलेकी , काजू बदाम तुपावर २ मि. परतून घ्या ४. आता मध्यम आचेवर सफरचंदाचा किस घालून ,सफरचंदातील पाणी कमी होइपर्यंत छान परतून घ्या(मध्ये मध्ये हलवत राहायच आहे ) ५. १५ मिनीट झाल्यावर त्यमध्ये साखर ,वेलची पुड घालून ते एकत्र करुन घ्या ७. एकसारख मध्यम आचेवर हलवत राहायच आहे ८. २ मिनीटानी साय घालून एकत्र करुन घ्या ९. मिश्रण जाडसर होईपर्यंत आणि कढईपासून वेगळे झालेकी आपला सफरचंदाचा हलवा तयार आहे वाढणी/प्रमाण: २-३ अधिक टिपा: *खायचा केशरी रंग घातला तरी चालेल (गाजर हलव्या सारखा रंग येईल) *सफरचंद लवकर काळे पडतात त्यामुळे जेवढे पटकन होईल तेवढे पटकन किसून घ्यावे आणि पाककृती चालू करावी

वाचने 5951
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

सफरचंदाची साले काढुन किसायचे की साला सकट? काही प्रकारची सफरचंद ठिसुळ / पिठुळ असतात अशी सफरचंद किसताना फ्रीजर मधे ठेउन किसावी का? पैजारबुवा,

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

-सफरचंद सालासकट किसावे ,मी कधीही साल काढत नाही.(आपल्या आवडी प्रमणे साल काढली तरी चालेल_) -तसेच किसले तरी चालेल धन्यवाद

http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/smiley-face-is-hungry.png

गणपतीसाठी हटके नैवेद्य!!