विसरून जाण्याजोग्या आठवणी
आंतरजालावर हल्लीच शाळा कॉलेजातील अविस्मरणीय आठवणींबद्दल चर्चा वाचली होती. त्यावर लिहिण्यासारख्या बर्याच आठवणी आहेत, पण माझ्यापाशी शाळेतल्या दिवसांमधल्या कायमच्या विसरून जाण्याजोग्याही बर्याच आठवणी आहेत. आज त्याच लिहाव्या असं वाटलं. माझ्या शाळा होती मुंबईत. म्हणजे अगदी शिवाजी पार्क, गिरगांव अशी खुद्द मुंबईतल्या भागांमध्ये नाही तर एका उपनगरामध्ये. शाळा चांगली होती, उत्तम शिक्षक होते. अभ्यास, परिक्षा, इतर उपक्रम सगळ्याची योग्य सांगड घातली जाई. शाळेतली मुलंही सुसंस्कृत, मध्यमवर्गीय घरांमधली होती. कोणी अगदी गडगंज श्रीमंत नव्हतं पण अगदी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास करावा लागतो आहे अश्या अवस्थेतलीही नव्हती. असो.
प्राथमिक शाळेतली वर्ष बरी होती. हजेरी पुस्तकातल्या क्रमांकानुसार जी मुलं आसपास होती (कारण बसायची व्यवस्थाही तशीच असायची) त्यांच्याशी अगदी घट्ट गाढ मैत्रीही झाली. अर्थात ती सगळी जणं घराजवळ रहाणारी नव्हती. घराच्या आसपास दोन तीन ओळखीची कुटूंब होती. त्यातली मुलं माझ्याच शाळेत होती पण एकाच तुकडीत नव्हती. तरीही त्यांच्याबरोबर एकत्र शाळेत जाणं (कधी सायकलवरून, कधी बसने, कधी रिक्षाने) येणं चालायचं. कधी संध्याकाळी बाहेर खेळणं वगैरेही व्हायचं. आमच्या बिल्डींगमध्येही एकाच वयाची बरीच पोरं पोरी होती.
पाचवीच्या आसपास कुठेतरी काहीतरी बिनसायला लागलं. बरोबरच्या (शाळेतल्या तसचं शाळेत जाता येता बरोबर असणार्या) मुलांना मी बायकी वाटायला लागलो. त्यांच्यामते मला मित्रांपेक्शा मैत्रिणीच जास्त होत्या आणि शाळेत जातायेता बरोबर असणारी मुलं म्हणे मी नेहमी मुलींच्याच घोळक्यात दिसायचो. मला जेन्युईनली असं कधी व्हायचं असं वाटायचं नाही. म्हणजे मुलींशी बोलणं व्हायचं पण फत्क मैत्रिणीच होत्या किंवा फक्त मुलींमध्येच खेळणं व्हायचं असं नक्की नव्हतं. आजुबाजूला रहाणार्या किंवा वर्गातल्या मुली ह्या शिशुवर्गापासून ओळखीच्या होत्या. त्यामुळे त्यांच्याशी मी काही आत्ता मैत्री केली होती असं नव्हतं. माझे काही मॅनरीझम्स / हावभाव / बोलण्याची पद्धत वगैरे बायकी होतं का? असेलही कदाचित पण मी करत असलेली कुठली अॅक्शन (शारिरीक हालचाल), कुठल्या पद्धतीचं बोलणं (म्हणजे कंटेट नाही तर लकब, बोलायचा हेल / टोन वगैरे) बायकी होतं हे मला अजूनही कळलं नाही किंवा कोणी सांगितलं नाही. घरी वडीलही कधी रागवायचे. कधीकधी रागाच्या भरात अर्वाच्च बोलायचे. त्या शब्दांचा / वाक्यांचा अर्थ तेव्हा नीट समजला नाही पण पुढे जरा मोठं झाल्यावर अगदी नीट समजला आणि कोणी स्वतःच्या मुलाबद्दल असं कसं बोलू शकतं अस वाटलं. पण त्यांनी कधी बसून समजावलं वगैरे नाही. आई समजावून सांगायचा प्रयत्न करायची. आता ती म्हणते की तू त्यांच्या तेव्हाच्या ओरडण्याने सुधारलास पण मला त्यांची ती काही वाक्य कायमची विसरून जायचं आहे पण प्रयत्न करूनही विसरता येत नाही. (मी माझ्या मुलांना रागवतो पण रागवताना काय बोलतो आहे / कोणते शब्द वापरतो आहे ह्याकडे आता कटाक्षाने लक्ष्य ठेवतो)
शाळेमध्ये पुढे पुढे हे चिडवणं वाढायला लागलं. जो कोणी चिडवे, त्याच्यापासून मी लांब रहायला सुरूवात केली. तश्यातच माध्यमिक शाळेत दरवर्षी तुकडी बदलणं सुरू झालं. एकाअर्थी ते पथ्यावर पडलं कारण मग वर्गातली मुलं बदलायची पण अश्या चिडवाचिडवीमध्ये ज्ञानाची देवाण घेवाण ने चुकता केली जातेच आणि ती व्हायची. नव्याचे नऊ दिवस संपले की पुन्हा चिडवाचिडवी व्हायची. अर्थात त्या काळातही काही चांगले मित्र मिळाले. प्राथमिक शाळेतले ते घट्ट मित्र कधी चिडवायचे नाहीत पण चिडवाचिडवी सुरू असताना बाजुने उभेही रहायचे नाहीत. त्यांचा कधीच आधार नसायचा. ह्या सगळ्यात मी अगदी गरीब गाय होू असं काही नाही. जेव्हा मी रिसिविंग एंडला नसायचो, तेव्हा मी पण बुलिंग्मध्ये भाग घेतलाच. मुळात व्हायचं काय की शाळेत प्रत्येकाची एक सुपर पॉवर असते. त्या सुपरपॉवरच्या अधारे मुलं त्या त्या क्षेत्रात शाईन होतात म्हणजे कोणी गातं, कोणी चित्र काढतं, कोणी पहिला नंबर मिळवतं, कोणी खेळतं, कोणी अंगापिंडानं मजबूत असल्याने मॉनिटर वगैरे होतं. मी ह्यात कुठेच बसत नव्हतो. म्हणजे अभ्यासात बरा होतो पण पहिला वगैरे नव्हतो. खेळणं, गाणं, चित्र काढणं वगैरे जमायचं नाही. त्यामुळे चरायला स्वतःचं कुरण नव्हतं आणि सत्ता गाजवता यायची नाही. आमच्या इथे वर्गाचा मॉनिटर होण्यासाठी निवडणूक असायची! त्यात वर्गातले सगळे जणं इच्छुकांपैकी एका मुलाला आणि एका मुलीला मत द्यायचे. गंमत म्हणून बरेच जण उभे रहायचे. एकावर्षी मुलांपैकी मी आणि दोन तीन जणच उभे राहीले. बाकीचे मुलगे शाळेत नवीन असल्याने कोणाला ओळखत नव्हते, त्यामुळे बर्याच मुलींची मतं मला मिळाली आणि मी निवडून आलो ! हे म्हणजे राम नाईकांच्या विरूद्ध गोविंदा निवडून आल्यासारखं झालं आणि विशेषतः माझ्यासाठी आधीच मर्कट त्यात मद्य प्याला असं काहीतरी झालं. तेव्हातर चर्चा इतक्या झाल्या की मला मुलींचा प्रतिनीधी नेमून मुलांसाठी पुन्हा निवडणूक घ्यावी अशी तक्रार करायाअ बेतही घाटत होता! शेवटी मीच जाऊन मला मॉनिटर व्हायचं नाही असं सांगितल पण शिक्षकांनी बरचं समजावलं. त्यानंतर मात्र मी चिडवाचिडवीचा बदला घेण्यासाठी मुद्दाम फळ्यावर डीफॉल्टर्सची, बोलणार्यांची नावं लिहिणं वगैरे प्रकार करायचो. त्यामुलांना नंतर शिक्षा व्हायची. ह्या सगळ्यामुळे परिस्थिती अजूनच बिघडायची.
नंतर एकावर्षी आमच्या वर्गात बरोब्बर तीस मुलं आणि तीस मुली होत्या. तेव्हा कोणाच्यातरी डोक्यातून "आपल्या वर्गातली ३१वी मुलगी!" अशी एक कल्पना आली आणि मी कुठेही दिसलो (शाळा, क्लास, ग्राऊंड वगैरे) की मला ह्या नावाने हाक मारणं सुरू झालं. ह्यावेळी मात्र जरा जास्त झालं आणि मी पोट दुखतय, डोकं दुखतय वगैरे कारणं काढून शाळा, क्लासला जाणं टाळायला लागलो. आता मात्र आईला संशय आला आणि तीने माझ्या अपरोक्ष माहिती काढून काही जणांच्या आयांना फोन वगैरे करून तो प्रकार बंद केला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमच्या वर्गातली दोन अतिशय हुषार, समंजस, सुसंस्कृत वगैरे मुलं (ह्यातला एक सध्या मुंबईला सिए आहे, तर दुसरा बंगलोरला प्रशितयश डॉक्टर आहे!) ह्या प्रकारात आघाडीवर होती. त्यांनी मला आधी किंवा नंतर कधी त्रास दिला नाही. अजूनही कधीतरी ह्यांच्याशी बोलणं होतं पण तेव्हा ते इतक्या थराला जाऊन का वागले हे समजत नाही.
दरम्यान आम्ही घर बदलून दुसर्या परीसरात रहायला गेलो. नंतर शाळेतल्या मित्रांशी संबंध संपला आणि नंतर फेसबूक, व्हॉट्सअॅप येईपर्यंत कधी आलाही नाही. एका अर्थाने पाटी कोरी झाली. दरम्यान मी बराच "सुधारलो" होतो म्हणे. त्यामुळे कॉलेजमध्ये चिडवण्याचे काही प्रसंग आले नाहीत. अनेक अतिशय चांगले, जवळचे मित्र मैत्रिणी भेटले. मला शाळेत असताना जेव्हड्या मैत्रिणी होत्या तेव्हड्याच आजही आहेत पण आता घरच्यांना आणि महत्त्वाचं म्हणजे बायकोलाही त्याचं काही वाटत नाही. तिला कधीच काही वाटलं नव्हतं.
पण टीनेजमध्ये झालेल्या ह्या प्रकारांचा मला इतका धसका बसला होता की पुढे गोष्टी समजायला लागल्यावर मी खरोखरच गे आहे की काय अश्या शंका यायच्या. "गर्ल्डफ्रेंड" म्हणवता येईल अश्या एका मैत्रिणीबरोबर लग्न ठरेल असं वाटत असताना काही कारणांनी ते फिसकटलं, मात्र नंतर अॅरेंज मॅरेजसाठी ठरवत असताना मला प्रचंड भिती आणि अपराधी वाटायचं की खरच आपल्यात काही प्रॉब्लेम असेल तर एका मुलीचं नुकसान होईल आणि शिवाय नाचक्की होईल ती वेगळीच असे काही विचार मनात यायचे.
पुढे लग्न होऊन सगळं नीट मार्गी लागल्यावर आणि पहिला मुलगा झाल्यावर अतिशय आनंद तर झालाच पण अगदी खरं सांगायचं तर "एका मोठा दडपणातून सुटलो" ही भावनाही मनात आली. त्यावेळी मी आवेगात "३१वी मुलगी" एपिसोडमधल्या मुलांना फेसबूकवर शोधून काढून इक इमेलही टाईप केली होती. पण मुलगा झाल्याच्या चांगल्या प्रसंगी अश्या कटू आठवणी नको म्हणून ती डिलीट करून टाकली होती.
आज हे लिहायचं कारण काय ? आजोबांच्या आजारपणात ते खूप जुनं काहीतरी सांगत बसायचे. त्यातल्या काही गोष्टी कोणालाही माहित नसायच्या. संदर्भ कळायचे नाहीत, ते काय सांगायचा प्रयत्न करत आहेत ते ही कळायचं नाही. शिवाय हेकेखोरपणा करायचे, ऐकायचे नाहीत. डॉक्टरांचं म्हणणं पडलं की आयुष्यभर त्यांनी काही गोष्टींबद्द्ल कधी मन मोकळं केलं नाही, गोष्टी स्वतःपाशी ठेवल्या आणि त्यामुळे आता त्या बाहेर येत आहेत. आम्ही बरेचदा येणार्या वृद्धापकाळाबद्दल बोलतो. काय होणार हे आपल्या हातात नसतच पण आत्ता करण्याजोगं काही आपण करू शकतो का (जसं की व्यायाम, डाएट, हेल्थ चेकअप इत्यादी) ह्याचा विचार करताना जाणवलं की काही गोष्टी कुठेतरी बोलून टाकाव्या जेणेकरून ते मनात साठून रहाणार नाही. हे सगळं इथे लिहिल्यावर लोकं दोन्ही बाजूंनी बोलतील, ट्रोलींग करतील, टाईमपास करतील, काही जणं सिरीयसलीही घेतील. बरं वाटेल. मी सुरूवातीला लिहिलं तसं हे सगळं खरतर पूर्णपणे विसरून जाता आलं तर ते सगळ्यात चांगलं होईल !!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
.
ट्रोलींग, टाईमपास तर होणार
+1
+१
प्रांजळ अनुभव कथन भावले...
Tumachya dhaadasaala salaam.
लिहिलंत हे उत्तम केलंत.
+१
प्रांजळ लिखाण
+१
+१
अतीशय प्रामाणिक लेखन आहे.
मिपावर अशा लिखाणाची कोणीही टर उडवणार नाही, हे नक्की!
अतिशय
अतिशय वेगळे आणि मनमोकळे लिखाण
+१
चला, तुमच्या मनातला कटू आठवणींचा बोळा निघाला...पाणी वाहते झाले
मनमोकळे लिखाण आवडले. लिहित
प्रांजळ लेखन.आवडले.
मिपावर स्वागत आणि या सुंदर
सुरेख...
लहानपणी टोकाच्या चिडवण्याच्या
Lord of the Flies
अगदी बरोबर.. हॉरिबल आणि
Brother, Things that do not kill you makes you more stronger :)
पण चिडवाचिडवी सुरू असताना बाजुने उभेही रहायचे नाहीत. त्यांचा कधीच आधार नसायचा.:) जग असेच आहे, जो आपल्या बाजूने उभा राहून शष्प फरक पडत नाही असे वाटते त्याच्याबाजूने उभं रहायला कोणीच तयार नसते. अथवा ज्याच्या विरोधी सगळेच आहेत त्यालाही जवळ करणारे कमी असतात. लहानपणी आणि आभासी जगात हे जास्त प्रकर्षाने होते. यावर उपाय म्हणजे मुखवटा पांघरून जगणे, जे आपण नाही तसे वागणे, अथवा स्वतःच्या टॅलेंटच्या आउटपुटवर खात्री असेल तर बिनधास्त नडणे पण स्वतःच्या चांगुलपणावर सर्व परिस्थिती आपोआप बदलेल या भ्रमातून सर्वप्रथम बाहेर पडणे फार आवश्यक.शाळेत जातायेता बरोबर असणारी मुलं म्हणे मी नेहमी मुलींच्याच घोळक्यात दिसायचो. मला जेन्युईनली असं कधी व्हायचं असं वाटायचं नाही.यामध्ये नेहमी हा शब्द सोडला तर ते नक्कीच तथ्य सांगत होते. आणि तुम्ही मुलींच्या घोळक्यात असणे यात नेहमी असणे हे त्यांचे घुसडलेले तथ्य होते, बहुतेक त्यांना तुम्ही मुलींसोबतही तितकीच मैत्री ठेवता हे रुचले नसावे.घरी वडीलही कधी रागवायचे. कधीकधी रागाच्या भरात अर्वाच्च बोलायचेहे महत्वाचे आहे, वडीलसुद्धा असे म्हणत असतील तर त्यात 100% तथ्य आहेच. भलेही त्यांची पध्दत चुकली असेल. तसेच बरेचदा लहान वयात लिंगभिन्नता प्रकर्षाने वेगळे ठरवणारी जाणीव असू शकते याचेही भान नसते त्यामुळे असे वागले जाणे तुमच्या आकलनातून अनैसर्गिक ठरुच शकत नाही पण ते घडत असावे, ज्याचे प्रतिबिंब इतरांच्या वागण्यातून आपणास अनुभवाला आले. मी हे मुद्दाम म्हणून लिहणे टाळत नाहीए जेणेकरून आपण दोन्ही बाजू समजून घ्याल आणि मनात उरलेली अनावश्यक कटुता विरघळण्यास मदत होईल. इतरांसोबत जेंव्हा आपण स्वतःच्या चुकाही स्वीकारतो तिथेच त्यापासून विचलीत न व्हायची प्रक्रिया सूरु होते.इतरांसोबत जेंव्हा आपण
इतरांसोबत जेंव्हा आपण स्वतःच्या चुकाही स्वीकारतो तिथेच त्यापासून विचलीत न व्हायची प्रक्रिया सूरु होते.वरील प्रतिसादातून मला तुम्ही चुकलात आणि इतरांना तुम्हाला त्रास देण्याची संधी निर्माण केली असे अजिबात अधोरेखित करायचे नाही तर फक्त इतकेच म्हणायचे आहे की इतर लोकं विचित्र वागले कारण ते तुम्हाला समजायला चुकले. आणि ते नेमकं काय चुकीचे समजत आहेत हे जाणून घ्यायला आपण कसूर केलीत. आपण मोठे होत असताना आपले जे काही वागणे नैसर्गिकपणे झाले त्यामधे कोणताही दोष नाही त्यामुळे कोणाचा दोष हा मुद्दाही उपस्थित होत नाही आणि त्याबाबत फार विचारही करू नये(च)छान...
मनमोकळे
लोकं दोन्ही बाजूंनी बोलतील, ट्रोलींग करतील, टाईमपास करतील
ओघवत्या मराठीत
प्रतिसाद लिहिणार्या
खंत कसली?
ओघवती भाषा, प्रांजळ लेखन आणि
ओघवती भाषा, प्रांजळ लेखन आणि
सरल लिखाण छान आहे.
प्रांजळ लेख आणि प्रतिसाद
मिपावर स्वागत
प्रांजळ आणि परखड लेखन.