सैराट सेमीफायनल

Primary tabs

झपाटलेला फिलॉसॉफर's picture
झपाटलेला फिलॉसॉफर in काथ्याकूट
12 Jul 2019 - 8:07 pm
गाभा: 

गोष्टं थोडीशी जुनी आहे.

जनार्दन गुप्ताची पोरगी आणी खंडू पाटलाच्या पोराचे अफेयर सुरू होते.
दोघांना लग्न करायची फ़ार इच्छा होती. परंतु त्या काळी प्रेमविवाह वरुन आंतर जातीय विवाह शक्य नव्हता....

परंतु खंडू पाटिल लग्न करायचचं म्हणून अड़ून बसला . शेवटी जनार्दन गुप्तानी खंडू पाटलाची पोलिसात तक्रार दिली....

आणी त्यावेळी ताम्हनमळा पोलिस स्टेशनचा इन्स्पेक्टर महेंद्र सिंग धोनीचा आजा गजेंद्र सिंग धोनी होता. त्याने खंडू पाटलाला चांगला चोप दिला आणी गुप्ताच्या पोरी पासुन अलग रहायची सक़्त ताक़ीद दिली.....

परंतु पाटिल गप्प बसणाऱ्यातला नव्हता.दोघानी गावातल्या शिकल्या सवरलेल्या कवि शास्त्रीला हाताशी धरून पासपोर्ट काढला आणि सर्वांच्या नाकावर टिच्चून खंडू पाटलानी जनार्दन गुप्ताच्या पोरीला पळवली..

नंतर मजल दर मजल करत..लपत छपत ते शेवटी न्यूझीलंड या देशात स्थायिक झाले.....

कालांतराने गुप्ता आणि पाटिल नावाचा अपभ्रंश होऊन ते गुप्तिल झाले. त्याच नावाला तिकडचे गावकरी गप्टिल बोलू लागले ...

आणी या दोघांच्या प्रेमसंबंधातुन जन्माला आलेला मुलगा म्हणजेचं मार्टिन गप्टिल !!!

गजेंद्र सिंग धोनीने आई बापाच्या लग्नात अडथळा निर्माण केला होता ... त्याचा बदला घ्यायचा गप्टिल ने चंग बांधला ...

आणि ती संधी १० जुलै २०१९ ला आली ... वर्ल्डकप सेमीफायनलला गजेंद्रसिंघ चा नातू महेंद्रसिंग धोनीला रनआउट करुन बदला घेतलाच ...

Moral of the story-

या पराभवाला महेंद्र सिंग धोनीचा आजा गजेंद्र सिंग धोनी जबाबदार आहे.

;)

प्रतिक्रिया

डॉ सुहास म्हात्रे's picture

12 Jul 2019 - 8:18 pm | डॉ सुहास म्हात्रे

जनार्दन गुप्ताची पोरगी आणी खंडू पाटलाच्या पोराचे अफेयर सुरू होते.

आणि

सर्वांच्या नाकावर टिच्चून खंडू पाटलानी जनार्दन गुप्ताच्या पोरीला पळवली..

म्हणजे एकंदरीत स्वतःच्या पोराला टेंपोत बसवून खंडू पाटलाने गुप्ताच्या पोरीला पळवली तर ! असूद्या, असूद्या !! =)) =)) =))

यशोधरा's picture

12 Jul 2019 - 8:42 pm | यशोधरा

=))))

ढब्ब्या's picture

12 Jul 2019 - 11:03 pm | ढब्ब्या

व्हाट्साप कॉपी ?

जालिम लोशन's picture

12 Jul 2019 - 11:43 pm | जालिम लोशन

ख्खि ख्खि.