कथालेखन माझा प्रांत नाही. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सर्व समाजांना आदरपुर्वक वागणूक हे माझ्या चर्चांचे प्रांत असू शकतात.
एका बाजूला साहित्यिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे समर्थन करतानाच दुसर्या बाजूला त्याच्या सहित्यातून उभ्या रहाणार्या नरेटीव्हजचे स्वरूप काय आहे तसेच या चर्चा लेखाचा विषय एखाद्या समुहाचे कळत न कळत स्टिरीओटाईपींग म्हणजे एखाद्या मानवी समुहाबद्दलच्या रुढीबद्ध धारणांना खतपाणी घातले जात नाहीएना
स्टिरीओटाईपची शब्दकोशीय व्याख्या
stereotype. A stereotype is a preconceived notion, especially about a group of people. ... Those are stereotypes: commonly held ideas about specific groups. You most often hear about negative stereotypes, but some are positive. For example, there's a stereotype that Asian people do better in school.
'आशियायी मुले शालेय शिक्षणात चांगले यश संपादन करतात' अशा स्वरुपाची सहज बोलण्यात येणारी वाक्ये सामाजिक धारणेच्या स्वरूपात परावर्तीत होत जातात. सुरवातीला न खुपणार्या सामाजिक धारणा व्यक्ती आणि समाजांच्या अहंगंड अथवा न्युनगंडात रूपांतरीत होताना दिसतात.
'आशियायी मुले शालेय शिक्षणात चांगले यश संपादन करतात' हे वाक्य खुपसे खुपणार नाही. 'ब्राह्मण मुले अभ्यासात पुढे असतात' ह्या वाक्याने भुवया वर होतील तर त्याच वाक्याला अहंगंडाचा प्रादुर्भाव झाला सामाजिक दुष्परीणाम समोर येऊ लागतात. तरी हे जरासे सकारात्म्क स्टिरीओटाईप झाले . नकारात्मक स्टिरीओटाईपही समाजधारणेत आकारात घेत असतात. अमुक एक समुह देशप्रेमात मागे रहातो हे नकारात्मक सरसकटीकरण आहे.
१) एखाद्या सामाजिक वस्तुस्थितीचा निर्देश आणि सरकटीकरण करणारा कायम स्वरूपी बिरुद अथवा शिक्क्यात नेमका काय फरक असतो ? या बाबत मला इतर मिपाकरांकडून त्यांची मते जाणून घेणे आवडेल.
आपल्या स्वतःच्या समुदायाशी संबंधीत नसलेली स्टिरीओटाईप्स तेवढी खुपत नाहीत. पण स्वतःच्या समुदायाशी संबंधीत असलेली स्टिरिओटाईप्स चटकन खुपतात हिंदी चित्रपटातून मराठी महिलांचे मुख्यत्वे कामवाली बाई स्वरूपाचे चित्रीकरण कदाचित उर्वरीत भारतीयांना तेवढे खुपणार नाही पण अशा स्वरुपाचे नकळत बांधले जाणारे स्टिरीओटाईप मराठी माणसांना खुपणारे असू शकते.
पण कथा - कादंबरी - नाटक लेखन करणार्या ललित साहित्यिकांच्य लेखनात व्यक्तीपात्रांचे सकारात्मक, नकारात्मक विनोदी अशा विवीध पद्धतीने चित्रण होत असते. कथेतील पात्रांची नावे कथा लेखक कशी स्विकारतात याची कल्पना नाही पण हि प्रक्रीया खूप जाणीव पुर्वक होत असेल असे वाटत नाही. स्वतःच्या अनुभवात आलेल्या व्यक्तींची नावे काही अंशी वापरून बदलणे असे काही तरी कथा लेखक करत असावेत असा माझा समज आहे तो कितपत बरोबर आहे ते कथा लेखकच सांगू शकतील.
कथेतील पात्राची सकारात्मक प्रतिमा रेखाटताना पात्राचे नाव काय आहे याने खुपसा फरक पडत नाही. कथा लेखकाला सहसा स्वतःस आणि वाचकास झेपू शकतील अशी पात्र नावे वापरावी लागतात त्याच वेळी जेव्हा एखादे पात्र नकारात्मक रंगवले जाते तेव्हा त्या पात्रनाव आणि सोबत त्या पात्रनावाचे जर समुदायाशी नाव जोडले जात असेल तर जाणीवपूर्वक नसेल तरीही नकळत सामाजिक अवधारणा तयार होण्याचा धोका असतो का ?? या धोक्याचे स्वरूप काय असते? पात्र नावे परिचित वाटणारी ठेवतानाच स्टिरीओटाईप्स ना कारणीभूत होणार नाहीत यासाठी लेखक काय करू शकतात ??
* व्यक्तिगत टिका अनुषंगिका पलिकडची अवांतरे आणि शुद्धलेखन चर्चा टाळण्यासाठी अनेक आभार
याद्या
5779
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
कोन म्हनत ट्क्का दिला हे नाटक
घाटपांडे साहेब , मी नाटक
In reply to कोन म्हनत ट्क्का दिला हे नाटक by प्रकाश घाटपांडे
यासाठीच आकुज स्वीट्स,
सध्या अकुंच्या कथांची मालिका
In reply to यासाठीच आकुज स्वीट्स, by जॉनविक्क
मला वाटत... जाऊदे
मनमोकळ्या प्रतिसादासाठी धन्यवाद
In reply to मला वाटत... जाऊदे by अथांग आकाश
१) आशियायी मुले शालेय
चर्चेचामुख्य विषय खालील
In reply to १) आशियायी मुले शालेय by कंजूस
८०—२० % नियम याला लागु आहे.