Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by खिलजि on Mon, 07/08/2019 - 18:39
पूर्वी आपण जिथे भेटायचो तिथे आता एक टपरी झालीय एक तपानंतर पुन्हा कप घेतला हाति पण कटिंग इथली जर्रा बरी झालीय वळणे घेत घेत तू तिथून , तर मी कुठून कुठून यायचो कधी तू तर कधी मी , या इथेच झाडामागे तोन्ड लपवायचो मी घाबरून तुलाच म्हणायचो , हळहळू तुझि डेरिंग बरी झालीय त्या झाडामागे बराच इतिहास घडला तो काळ सुवर्णाक्षरात लिहावा असा पण नंतर तुटलो ते कायमचेच , जणू भेटलोच नव्हतो आज इथे आलो तेव्हा " साठी " माझी पुरी झालीय असेल तीही स्वतःच्या नातवंडांबरोबर खेळत मीही आहे व्यग्र माझ्या जीवनात तिच्या कपाळावर मळवट भरायची इच्छा होती ती मात्र कायम अधुरीच ऱ्हायलीय {{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}

Submitted by चाणक्य on Mon, 07/08/2019 - 18:53

Permalink

अकुंच्या

कथेवरून प्रेरीत की काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on Mon, 07/08/2019 - 19:08

Permalink

==)) ==)) ==))

अगदी बर्रोब्बर ओळखलंत .. जब्राट तुफ्फान आकलनशक्ती हाय राव तुमची .. आमचे गुरुदेव आमचे प्रेरणास्रोत ऱ्हायले आहेत आणि पुढेही राहतील ...
  • Log in or register to post comments
Profile picture for user जॉनविक्क

Submitted by जॉनविक्क on Mon, 07/08/2019 - 22:05

In reply to ==)) ==)) ==)) by खिलजि

Permalink

चुंबनांचा वर्षाव नसल्याने

आकुंच्या कथेवरून हे काय पटलं नाही. ;)
  • Log in or register to post comments

Submitted by तुषार काळभोर on Tue, 07/09/2019 - 08:24

In reply to चुंबनांचा वर्षाव नसल्याने by जॉनविक्क

Permalink

आहे की

त्या झाडामागे बराच इतिहास घडला
  • Log in or register to post comments

Submitted by नाखु on Mon, 07/08/2019 - 19:59

Permalink

चांगली सुरूवात झाली आहे

शेवट सूचक असावा. मीही आहे व्यग्र माझ्या जीवनात तिच्या कपाळावर मळवट भरायची इच्छा होती ती मात्र कायम अधुरीच ऱ्हायलीय ऐवजी मीही आहे चालीरीतीने माझ्या संसारात फक्त तिच्या भाळी लावायला आणलेला कुंकु करंडा अजूनही तसाच उरलाय उरातल्या आठवणींसकट. आग्रह नाही सुचवणी पण शेवट दोन तीनदा वाचा. पुलेशु नित वाचक वाचकांची पत्रेवाला नाखु
  • Log in or register to post comments

Submitted by जालिम लोशन on Tue, 07/09/2019 - 07:38

Permalink

+1

:—)
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानोबाचे पैजार on Tue, 07/09/2019 - 12:27

Permalink

टपरी नाही कचरा पेटी झाली आहे...

लगे हाथ आता प्रियाभाभी आणि दुर्गाआत्यांवरही एखादे महाकाव्य लिहून टाका तेवढेच मेंदुवरच्या पुरळाने होणार्‍या तळमळी कडे दुर्लक्ष होते. पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on Tue, 07/09/2019 - 13:32

Permalink

==)) ==)) ==))

आता कुठे लिंक लागली .. तरी बोललो पै बु काका असे का बोलत आहेत ? गुरुदेवांची कृपा , अजून दुसरे काही नाही .. पुनश्च धन्यवाद सर्व वाचक मंडळींना आणि मार्गदर्शकांना आणि हो गुरुवर्यांनासुद्धा
  • Log in or register to post comments

Submitted by मारवा on Tue, 07/09/2019 - 20:37

Permalink

वाह किती सुंदर कविता

गुढ प्रेरणांनी भरलेल्या काव्यपंक्ती उदा. त्या झाडामागे बराच इतिहास घडला या दोन ओळीच अनेक पदरी अर्थाच्या आहेत काय बरे झाले असेल झाडामागे ? अर्थात चावट मनांना जरी श्रुंगारच आठवला असेल तरीही मला खात्री आहे की कवी काहीतरी अजुन खोलवरचे सुचवत असावा एका आशयघन हिन्दी चित्रपट गीताचा मी स्वतः केलेला मराठी अनुवाद मला इथे मांडायचा मोह आवरत नाही सळसळ होती पानांची बागेत पिंपळाच्या असे भेटलो आम्ही दोघे छायेत पिंपळाच्या
  • Log in or register to post comments

Submitted by डॉ सुहास म्हात्रे on Tue, 07/09/2019 - 20:59

Permalink

तुमच्या टपरीवरचीच च्या पिवूनच

तुमच्या टपरीवरचीच च्या पिवूनच गुरुवर्यांची प्रतिभा खवळली आहे (आता ही प्रतिभा कोण असे विचारू नका. उत्तरदायीत्वास नकार लागू आहे !). आता तुमच्या टपरीवर अन्न व औषध प्रशासनाची धाड पडली तर आम्हाला सांगू नका. :)
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on Wed, 07/10/2019 - 14:44

Permalink

==)) ==)) ==))

म्हात्रे सर आणि मारवा साहेब .. आपभी ना बडे वो हो .. इश्श ,, आम्ही नाही जा .. आता तुम्हाला एक मुखडा ऐकावाच लागणार ..
  • Log in or register to post comments

Submitted by खिलजि on Wed, 07/10/2019 - 14:46

Permalink

हि घ्या भेट

चांदणे ओढून मी तुझ्यासाठी रात केली तू मिश्किल हसून , दाबून ठेवल्या भावना अन प्रेमाची बरसात केली तू लाजत लडिवाळपणे आलीस खरी नजर रोखलीस जेव्हा इथे थेट ती काळजात गेली सात पाऊले घेण्याआधी , कैकदा तू भेटली मधुमीठीने आयुष्याला खरीखुरी सुरुवात झाली
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 5174 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com