Skip to main content

लिहून काय साधले

लेखक केशवसुमार यांनी शुक्रवार, 20/03/2009 15:44 या दिवशी प्रकाशित केले.

आमची प्रेरणा वैभव जोशी यांची अप्रतिम गझल  जगून काय साधले

लिहून काय साधले विचारतोस केशवा
(निदान तू तरी असे म्हणू नकोस "केशवा")

जरा कुठे लिहायला तजेलदार लागले
धुण्यापरी तरी  कशास बडवतोस केशवा

अरे मला विचार ना, तिनेच बोंब मारली
पुन्हा पुन्हा तिला म्हणे सतावतोस केशवा

अजून वाटते नवल कशी असेल ती बया
स्मरून जीस तू असा थरारतोस केशवा

नको अम्हास हे तुझे लिखाण रोज कोडगे
अता हवा तुझ्यावरी उपाय ठोस केशवा

सुमार लेखकाहुनी सुमार वाटतोस तू
नवी उमेद ही कुठून आणतोस केशवा

कटेल का खरेच ह्या स्थळावरील ब्याद ही
किती अजून द्यायचे कळे न  ढोस केशवा

लेखनविषय:

वाचने 1785
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

नवी उमेद ही कुठून आणतोस केशवा सुंदर... उत्कृष्ठ झालय.... लगे रहो. कवटी

अरे मला विचार ना, तिनेच बोंब मारली पुन्हा पुन्हा तिला म्हणे सतावतोस केशवा अजून वाटते नवल कशी असेल ती बया स्मरून जीस तू असा थरारतोस केशवा मस्तच! :) चतुरंग

लिहून काही साधले नाही हे सांगणार्‍याचे आणि प्रतिसाद देणारांचे मनापासून आभार.. (आभारी)केशवसुमार.

मस्त आहे. मजा आली... ______________________________ पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.... ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

आवडले विडंबन. मूळ गझल ही अतिशय सुरेख आहे.