पावसाळ्यात प्रवास आणि तुमची कार
मिलिंद भिड़े, भिलाई नगर, छत्तीसगढ़
फक्त कार ओनर्स ने वाचावे आणि व्यवहारात गरजे प्रमाणे आणावे:
पुष्कळ दा असे होते कि आपण कुठे तरी महत्वाच्या कामाने जात असतो, पाऊस येईल असे वाटत असते आणि आपण कार घेऊन बाहेर निघतो ।
आपल्या अपेक्षे प्रमाणे आपल्याला रस्त्यात पाऊस लागतो आणि आपण सहज पणे कार वाईपर चालू करतो, आणि अचानक तो वाईपर चालण बन्द होत । आता वाढत्या पावसात आपल्याला ड्राइव करायला त्रास होत असतो कारण समोर चा रस्ता स्पष्ट दिसत नाही आणि आपण गांगरतो ।
काय करावे हे माहित नसते, आणि जवळपास गैरेज ही नसते । अश्या वेळेस काय करावे हे माहित असले तर आपण हळूहळू पण सुखरूप आपल्या गंतव्या वर किंवा गैरेज पर्यन्त पोहोचु शकतो ।
कार वाईपर बन्द व्हायला सामान्यतया 2 कारण असतात ।
1. वाईपर फ्यूज उडलेला असतो ।
2. वाईपर आर्म, वाईपर मोटर च्या शाफ़्ट वर लागलेल्या ड्राइव पासून वेगळे झालेले असतात.
पहिल्या प्रॉब्लम चा उपाय सोपा आहे । कार मेन रोड पासून साइड लेन ला घ्यायची, फ्यूज बॉक्स शोधायचा, फ्यूज चेक करायचे आणि गेलेला फ्यूज रिप्लेस करायचा । फ्यूज बॉक्स च्या झाकणा च्या #आतल्या बाजूला स्पेयर #फ्यूज, फ्यूज #पुलर, आणि सर्किट #डायग्राम असते । सर्किट डायग्राम वर फ्यूज कशा साठी, कोणता, त्याची रेटिंग लिहिलेली आणि ग्राफिकली प्रिंटेड असते । फ्यूज रेटिंग फ्यूज वर अंकात: 7.5,10,15 20 अशी लिहिलेली असते ।
#टीप: नॉर्मली फ्यूज बॉक्स, कार बोनेट खाली, कार बैटरी जवळ असतो । त्याचा बॉक्स मोठा, किंवा लाम्बुळका आणि काळा असतो ।फ्यूज कवर उघडायला साइड लॉक दाबून उचलायचे असते ।
प्रॉब्लम नम्बर 2 असल्यास
कार चे वाईपर स्विच बन्द करायचे. कार च्या काचेवर मळलेला तम्बाखू वर्तमान पत्रा ने चांगला घासून लावायचा, आणि दुसऱ्या पेपर ने पुसून, #वाईपर #न #चालवता, पुढे मदत मिळेल तेथ पर्यन्त बिनधास्त पोहोचयचे. तम्बाखू घासल्या नंतर पुन्हा वाईपर चालू करायचा #नाही. घासलेल्या तम्बाखू मुळे अगदी धो धो पाऊस पड़त असला तरी काचे वर पाणी थांबत नाही आणि आपली ड्राइविंग सुखरूप होते ।
सुज्ञास हे साँगायची गरज़ नाही कि #पावसाळ्यात आपल्या कार मध्ये तम्बाखू आणि जुनि वर्तमान पत्रे ठेवावित ।
मी एकदा अश्याच परिस्थितीत सहकुटुम्ब असताना महाड़ ते भुसावळ तम्बाखू घासून पोहोचलो आणि भुसावल ला येऊन वाईपर आर्म नवे टाकले आणि पुढे छत्तीसगढ़ ला वन पीस पोहोचलो ।
पुष्कळ दा असे होते कि पावसाळ्यात कार च्या विंडस्क्रीन वर #आतून वाफ जमते । एका हाताने आतून विंडस्क्रीन सतत पुसत, सिंगल हैंड ड्राइविंग जमत नाही । अश्या परिस्थितीत कार मध्ये असलेला ए सी हीटर मोड़ वर चालू करायचा आणि "सगळे ए सी वेंट" वरती विंड स्क्रीन च्या दिशे ला वाकवायाचे आणि मस्त क्लियर विंड स्क्रीन मध्ये कार चालवून घरी किंवा गंतव्या वर शांत पणे पोहोचयचे ।
आपण वेळ देऊन पोस्ट वाचली त्या करिता धन्यवाद आणि आभार ।
आपले अनुभव ज़रूर लिहा, म्हणजे इतर लोकांना मदत होईल ।
पुनश्च आभार ।
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान अनुभव आणि तात्पुरता उपाय
मिपावर स्वागत.
छान
एक साधी पण महत्त्वाची गोष्ट.
सुंदर माहितीपूर्ण लेखमालिका
पुष्कळ दा असे होते कि
पुष्कळ दा असे होते कि पावसाळ्यात कार च्या विंडस्क्रीन वर #आतून वाफ जमते । एका हाताने आतून विंडस्क्रीन सतत पुसत, सिंगल हैंड ड्राइविंग जमत नाही । अश्या परिस्थितीत कार मध्ये असलेला ए सी हीटर मोड़ वर चालू करायचा आणि "सगळे ए सी वेंट" वरती विंड स्क्रीन च्या दिशे ला वाकवायाचे आणि मस्त क्लियर विंड स्क्रीन मध्ये कार चालवून घरी किंवा गंतव्या वर शांत पणे पोहोचयचे ।हि युक्ती छोट्या (हॅचबॅक) गाड्यात उपयुक्त आहे. मोठ्या (SUV) गाड्यात उपयोग होत नाही. मोठ्या (SUV) गाड्यात AC लावायचा. आमचा मारुती एस्टिलो (हॅचबॅक) आणि निसान टेरॅनो (SUV) मधला अनुभव.मोठ्या (SUV) गाड्यात उपयोग
पुष्कळ दा असे होते कि
मला हेच सांगायचं होतं.
डिफॉगर?
प्रसंग कधी तरी येतो
मुंबईत पावसात कारने प्रवास
पावसात रस्त्यावर पाणी साठलेले असत
उपयुक्त चर्चा!
वर राजेश यांनी
चारचाकीच्या काचा, सुरक्षित
उपयुक्त माहिती!!