सँडविच ढोकळा
Taxonomy upgrade extras
नमस्कार.
खूप दिवसात पाककृती टाकायला वेळ मिळाला नाही. त्यामुळे आज माझी एक अत्यंत आवडती पाककृती इथे सादर करायचीच हे ठरविले होते. आज तुम्हाला मी सँडविच ढोकळ्याची पाककृती सांगणार आहे.
साहित्य -
तयार इडलीचे पीठ ३ वाटी
बेसन पीठ २ वाटी
सायट्रिक अॅसिड १/२ चमचा+१चमचा मीठ+२ चमचे साखर+१वाटी पाणी हे सर्व विरघळून
१ वाटी साधे पाणी
२ चमचे खायचा सोडा
हिरवी खोबर्याची चटणी (जरा तिखट)
कडीपत्ता, सुक्या मिरच्या,फोडणी चे साहित्य
कोथिंबीर सजावटी करीता
तेल ५-६ चमचे
कृती-
या ढोकळ्याचे तीन भाग असतात. पांढरा ढोकळा, चटणी व पिवळा ढोकळा. प्रथम कुकरमधे भात लावतो त्या भांड्याला तेलाचा हात लावून घ्यावा. इडलीपात्रात त्या भांड्यात इडली पीठ वाफवत ठेवावे.
तोपर्यंत ढोकळ्याचे पीठ बनवून घ्यावे. बेसनात साखर, मीठ व सायट्रिक अॅसिड चे १ वाटी पाणी व अर्धा वाटी साधे पाणी घालून गुठळी होऊ न देता एकसारखे करावे. त्याचा पातळपणा भजीच्या पीठापेक्षा थोडा जास्त हवा.
५ मि. नी इडलीचा डबा बाहेर काढून त्यावर चटणी लावावी.
लगेचच डाळीच्या पीठात २ चमचे खायचा सोडा घालावा व एका दिशेने हलवावे. पीठ फसफसून वर येईल. ते लगेच चटणी च्या थरावर ओतावे.
हलके जमिनीवर आपटून एकसमान करावे.
हे सर्व आता मोठ्या आचेवर १५ मिनट वाफवावे. १५ मि.नी गॅस बंद करुन त्यातील ढोकळ्याचे पातेले गार करत ठेवावे.
ढोकळा पूर्ण थंड होऊ द्यावा. १/२वाटी पाण्यात चिमुटभर सायट्रिक अॅसिड+ पाव चमचा मीठ व ३चमचे साखर मिक्स करुन ठेवावे. आता ४ चमचे तेलात २ चमचे मोहरी, थोडे जिरे, हिंग, कडीपत्ता, लाल मिरच्या यांची चरचरीत फोडणी करावी. हळद घालू नये अथवा लाल रंग येईल. फोडणी गार झाल्यावर त्यात मीठ साखरेचे पाणी मिसळावे. आता हे मिश्रण गार झालेल्या ढोकळ्यावर पसरावे.
वड्या पाड्याव्यात. सजावटी करीता वरुन कोथिंबीर पेरावी व खाण्यास द्यावे.

वाचने
28957
वाचनखूण
प्रतिक्रिया
34
मस्त!!
वा
वरुणजी व पैलवानजी
फारच मस्तंय हे.
सुरेख रंगीबेरंगी दिसतोय
पद्मावती व स्नेहांकीता
मस्त दिसतोय इडली ढोकळा.
धन्यवाद यशोताई
बाकी स्नेहा ताई
In reply to बाकी स्नेहा ताई by श्वेता२४
:)
छान दिसतोय ढोकळा.
मस्त. शेवटचा फोटो खास.
यम्मी
भारीच आहे पाककृती.. आवडली हं.
उ.का, चंद्रशेखर, जालीम लोशन
धन्यवाद पिंगू
हा आहे झटपट (इन्सटन्ट ) ढोकळा
बरोबर कंजूसजी
करुन बघायला हरकत नाही
धन्यवाद नाखुजी
In reply to धन्यवाद नाखुजी by श्वेता२४
बेसन पीठात फक्त सोडा घालायचा का ? मीठ नाही?
In reply to बेसन पीठात फक्त सोडा घालायचा का ? मीठ नाही? by गीतांजली टिळक
घालायचे ना
बेसनात साखर, मीठ व सायट्रिक अॅसिड चे १ वाटी पाणी व अर्धा वाटी साधे पाणी घालून गुठळी होऊ न देता एकसारखे करावे.असे लिहीले आहे. इडलीच्या पीठात आपण चवीपुरते मीठ घालतोच. त्यामुऴे वेगळ्याने लिहीले नाही. पण यापुढे बारीकसारीकही लिहीण्याची काळजी घेईन. जर कुणी अगदीच नव्याने करणार असेल तर त्या व्यक्तिला या बारीकसारीक माहितीनेही फरक पडतो, याची कल्पना आहे.वरील प्रतिसादात 'छान' ऐवजी
एकदम भारी ..फोटो बघून तोंडाला
फर्स्टक्लास.
नम्रता व जॉनविक्क
पाकृ
प्रतिसादाबद्दल धन्यवाद जुई
हायला एकदम सोप्पा आहे करून
उपेक्षित
छान!
धन्यवाद स्वातीताई
मस्त !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लफ्जों में कह ना सकू बिन कहे भी रह ना सकू... :- Abhijeet Sawantधन्यवाद मदनबाण