*इ.स.२०३० मधल्या इयत्ता दुसरीतल्या दोन मुलांचे फोनवरचं संभाषण!*
चिन्मय: अरे अन्वय तुला माहिताय का? या मोठ्या लोक्सची लँग्वेज काही वेगळीच असते.
अन्वय: म्हणजे?
चिन्मय: अरे आपल्याला तो कम्पल्सरी सब्जेक्ट नै का? मराठी? त्यात आपण नंबर्स कसे प्रोनन्स करतो? म्हणजे २०१ ला आपण वीस आणि एक म्हणतो किंवा ४९ ला चाळीस नऊ म्हणतो ना?
अन्वय: हो बरोबर!
चिन्मय: अरे पण हे मोठे लोक्स तसं नै म्हणत.ते २०१ ला दोनशे एक म्हणतात. ४९ ला चाळीस नऊ न म्हणता एकोणपन्नास असं काहीतरी म्हणतात.
अन्वय: हो.मी पण पाहिलंय.परवा मम्मा,पप्पा इव्हन ग्रॅनी अँड ग्रँपा पण याच लँग्वेज मधे बोलत होते.काहीतरी कॅलक्युलेशन्स चालू होते.मला तर त्यांची लँग्वेज कळेचना यार!
चिन्मय: पण ही कोणती लँग्वेज आहे?आपल्याला का नै शिकवली?
अन्वय: जाऊ दे यार! तू नको एवढं टेन्शन घेऊ.अरे आपण अॅडव्हान्स आहोत ना? हे मोठे लोक्स आपल्याएवढे शार्प नसणार;म्हणून त्यांना असं शिकवलं असणार.
चिन्मय: राईट! असंच असणार! ह्ये! वी आर ब्रिलियंट!वी आर जिनिअस!
अन्वय: राईट ब्रो!
वाचने
2460
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
:)
NSRCL बंगलोर येथे माझ्या स्टार्टअप साठी पिचिंग चालू होतं
In reply to :) by जॉनविक्क
ऊत्तम
कदाचित होईलही असं
जॉनविक्क