पेठकरांनी दिलेल्या कातील करंज्या पाहून मला खाजाच्या करंज्यांची आठवण झाली.
साहित्य-
आवरणासाठी:
१ वाटी रवा, १वाटी मैदा, दूध, ५,६ मोठे चमचे साजूक तूप, २ ,३ चमचे तांदळाची पिठी/कॉर्नफ्लोअर
सारणासाठी:
१ नारळ,२ वाट्या साखर, वेलचीपूड,२ चमचे बदाम/काजू पावडर,मूठभर बदाम,पिस्ते इ.चे तुकडे,बेदाणे
( ४,५ चमचे गुलकंद वेलचीऐवजी घातला तरी वेगळा,सुंदर स्वाद येतो.)
खवा हवा असल्यास अर्धी वाटी खवा घेऊन भाजून घ्यावा आणि अर्धी वाटी साखर जास्त घ्यावी.
तळणीसाठी :
तूप अथवा रिफाइंड तेल
कृती-
सारण :
नारळ खवून,साखर व खोबरे एकत्र करुन शिजवून घ्यावे. शिजत आल्यावर बदामपावडर , बदाम,पिस्ते, इ. चे तुकडे व बेदाणे घालावेत. वेलचीपूड घालावी अथवा गुलकंद घालावा.
खवा घालायचा असल्यास भाजलेला खवा सारण शिजत आल्यावर घालावा.
आवरण :
एका ताटात तूप फेसावे व ते हलके झाले की तांदळाची पिठी/कॉर्नफ्लोअर घालून अजून फेसावे व गोळा तयार करुन वाडग्यात काढून ठेवावा.
रवा व मैदा एकत्र करुन दुधात भिजवून तासभर ठेवावा ,नंतर तुपाचा हात लावून चांगले कुटून हलका करावा. नेहमीच्या पोळीपेक्षा थोडी जाड पोळी लाटून काट्याने किवा सुरीने तिला टोचे मारावेत. पोळीवर तांदळाची तुपात फेसलेली पिठी लावून घट्ट गुंडाळी करावी. त्याचे साधारण इंचभराचे तुकडे करावेत. तुकडा दोन्ही बाजूनी पिरगाळून त्याची लाटी करावी .ती पुरीप्रमाणे लाटून सारण भरावे आणि करंजी कातावी. अशा सर्व करंज्या कराव्यात. झालेल्या करंज्या ओलसर फडक्याखाली झाकून ठेवाव्यात म्हणजे वाळणार नाहीत.
मंद आचेवर करंज्या तळाव्यात.

वाचने
9717
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
क्या बात है
अहाहा
एकदम सहमत !
In reply to अहाहा by श्रावण मोडक
+१
In reply to एकदम सहमत ! by लिखाळ
+२
In reply to +१ by दशानन
तूप फेसणे..
In reply to एकदम सहमत ! by लिखाळ
समजले..
In reply to तूप फेसणे.. by स्वाती दिनेश
+१
In reply to अहाहा by श्रावण मोडक
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
दिवाळीची
काय बोलू?
क्या बात है
छान पाकृ
स्वाती,
खाजाच्या
मस्तच
अगं, आपलं
In reply to मस्तच by प्राजु
वा !
हिचं आणि काहीतरी नविनच..
In reply to वा ! by शितल
>>नवर्याचं
In reply to हिचं आणि काहीतरी नविनच.. by प्राजु
स्वातीताई,
ओहोहो! करंज्या!! खल्लास!!!
मस्तच ग
मस्त!!
छान
पाठारे
धन्यवाद,
स्वातीताई,
मस्त झाल्या होत्या.
In reply to स्वातीताई, by रेवती
अरे वा..
In reply to स्वातीताई, by रेवती