उन्हाळ्यात सह्याद्री न पाहणे अक्षम्य अपराध आहे. एरवी पावसात धबधबे, हिरवे डोंगर असतात. थंडीत भटकणे सुसह्य होते. पण रानमेवा मे महिन्यातच उधळला जातो. करवंदं, जांभळं, आंबे. आता आणखी एक कारण वाढले ते म्हणजे काजवे पाहणे. हे काय नवीन आहे का? नाही. काजवे होतेच, पण आताच्या camera तून फोटो काढण्याचा छंद वाढलाय. हे फक्त DSLR नाही तर नव्या लो लाईट मोबाईल cameraनेही शक्य होत आहे. पर्यटकांची झुंबड उडते आहे. आगामी ८-९,१५-१६ जूनचे विकांत बुक झाले आहेत. या पर्वणीसाठी राजमाची हे ठिकाण क्रमांक १ वर आहे. इथल्या उधेवाडी गावातील पाचसहा गाववाले हॉटेलींग करतात. दीड दोन हजार रुपयांत गुंडाळता येणारे तंबू मिळू लागल्याने जागा मिळेल तिथे तंबू ठोकतात आणि राहण्याची सोय होते. खंडाळ्याकडच्या डेला रिझॉटजवळून १६किमिटरसचा दगडाळ रस्ता पायी अथवा वाहनांनी पार करत दिवसा-रात्री कोणत्याही वेळेस पर्यटकांची गर्दी राजमाचीला येत आहे.
काजवे पाहायचे तर शेवटची अमावस्या उत्तम. किंवा पहिला पाऊस पडायच्या ढगाळ हवेत. मला कर्जत - कोंदिवडे मार्गे चढून जाणे सोयीचं वाटतं. ज्येष्ठ प्रतिपदा, मंगळवार, ४ जून. कर्जत ला सकाळी ट्रेनने येऊन शेअर ट्याक्सीने पावणे अकराला कोंदिवडे गावात उतरलो. इथे चहा-वडा टपऱ्या नाहीत, पोटोबा कर्जतलाच करावा. शिवाय आता या वाटेने पावसाळ्याशिवाय कुणी जात नाही.
फोटो १
अजून पावसाळी हवा नाही.
खरवंडी या पायथ्याच्या गावी जाण्याच्या एक किमी. डांबरी रस्त्यावर साताठ जांभळांची झाडे सडा घालून वाटच पाहात होती. ऊन वाढतय. खरवंडी गावातली विहिर गाठली.
फोटो २
खरवंडी गावचा आड।
पंचवीस फुटी मोठा आडच तो. पाणी खाली तीस फुट पण खूप, एक झरा अजूनही ठिबकठिबक सुरूच होता. पोहऱ्याने पाणी काढलं,बाटल्या भरून घेतल्या.
आता चार तास वाटेत पाणी मिळणार नव्हतं. चढणीला सुरुवातीलाच आमराई आहे. पन्नासेक झाडांपैकी एक दोघांचे आंबे असतातच. पाच दहा पिशवीत घ्यायचे वाटेत खाण्यासाठी.
फोटो ३
सावलीत बसा अन खा.
उन्हामुळे वर पोहोचायला चार वाजले.
फोटो ४
रूट
छत्री असूनही आग जाणवत होती. माथा ओलांडून गावात आलो तर सुखद वारा वाहत होता. आता उद्या दुपारपर्यंत उन्हाळा जाणवणार नव्हता. नेहमीच्या 'शिरिष' ( डुंबरे यांचे) हॉटेलकडे वळलो तर घर बंद, बाजूला मांडव घालत होते. दुसऱ्या एकाकडे गेलो - निलेश. चहा पोहेची सोय झाली. एक ग्रुप भजी खात होता. तिकडून वरच्या भैरोबा देवळात जाऊन ओसरीत पथारी पसरली.
फोटो ५
भैरोबा देऊळ, ओसरी.
अधुनमधून पर्यटक गडावर जात होते. सहा वाजता गावकरी देवळात आले.
"आज तीनचार वर्षांनी गावातल्या डुंबरे कुटुंबियांनी गोंधळ मांडलाय. दूरवर गेलेले भावबंदकीतले डुंबरे आलेत. इथे गावदेव भैरोबाला बोलावणं मग खाली मांडवापाशी 'पाच पावली' पुजा होईल. नऊपर्यंत जेवणं आटपली की गोंधळ पहाटेपर्यंत चालेल. खाली या जेवायला."
त्यांच्यापैकी एकजण पुढे झाला. उदबत्त्या कापूर लावून भैरोबाला मागणं केलं.
"तीनचार वर्षांनी भावबंदकी आली आहे. चुकलंमाकलं असेल मान्य कर." पुजा आटपून खाली गेले.
आठ वाजता आंधार झाला, काजवे जागे झाले. रात्री दोनचार पर्यटक आले आणि गडावर गेले. काजव्यांनी झगझगाट सुरूच ठेवला तो आडवा पडून पाहात होतो. गार वाऱ्याने छान झोप झाली. सकाळी सहाला गडावर पर्यटक येऊ लागले. त्यातल्या एकाशी ओळख होऊन दोघे गड फेरीला निघालो.
रात्रीच खंडाळ्याकडून चालत येऊन खाली गावात तो राहिला होता. मनरंजन गड ढगाच्या पडद्यात होता.
फोटो ६
मनरंजन किल्ला.
देवळामागच्या टाक्यातलं पाणी भरून घेतलं.
फोटो ७
देवळामागचं टाकं
फोटो ८
आडातले स्वच्छ पाणी. टाक्यातलंही स्वच्छ पिण्याचं आहे.
गड फेरी आटपून, खाली निलेशकडे चहापोहे करून परतीच्या वाटेला लागलो. साडेदहाचे ऊनसुद्धा कडक होते. करवंदं, आंबे,जांभळांचा आस्वाद घेत कर्जत स्टेशन गाठायला अडीच वाजले. पाऊस नसल्याने फोटोग्राफी सहज जमली.
वाचने
19348
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त.
श्रीवर्धन आणी मनरंजन मस्तच आहेत.
सुंदर आटोपशिर वृतांत ! मस्त,
एक प्रश्न आहे, गडकिल्ल्यावर
काहीतरीच बुवा तुमचं
In reply to एक प्रश्न आहे, गडकिल्ल्यावर by उगा काहितरीच
किल्ल्यावरच का ?
In reply to काहीतरीच बुवा तुमचं by राजेंद्र मेहेंदळे
मुख्य किल्ल्यावर नसते.
In reply to किल्ल्यावरच का ? by उगा काहितरीच
धन्यवाद !
In reply to मुख्य किल्ल्यावर नसते. by कंजूस
भारीच
गडकिल्ले, डोंगरावरचे विधीनियम
छान लिहिले आहे. हल्ली या
काजवा महोत्सव टाळावा
In reply to छान लिहिले आहे. हल्ली या by दुर्गविहारी
सहमत
In reply to काजवा महोत्सव टाळावा by सर टोबी
काजवा महोत्सवावर बोंब ठोकणारे
In reply to काजवा महोत्सव टाळावा by सर टोबी
व्यवसाय - संधी!
In reply to काजवा महोत्सवावर बोंब ठोकणारे by महासंग्राम
प्रतिसाद भडकाऊ आहे
In reply to काजवा महोत्सवावर बोंब ठोकणारे by महासंग्राम
प्रतिसाद भडकाऊ वाटला असल्यास
In reply to प्रतिसाद भडकाऊ आहे by सर टोबी
अगदी बरोबर. आम्हीसुद्धा मन
In reply to छान लिहिले आहे. हल्ली या by दुर्गविहारी
काजवा महोत्सव या विषयाला
In reply to छान लिहिले आहे. हल्ली या by दुर्गविहारी
मस्त भडकंती वृत्तांत
भटकंती
छान लिहिलंय.. अनेकदा सर्व
काजवा महोत्सव
हायला
In reply to काजवा महोत्सव by कंजूस
+1
मस्तं भटकंती !
भटकंती आवडली.
राजमाची सर्वच ऋतूंत तितकाच