या कवितेपलिकडील कवितेची प्रेरणा वेगळी होती - पण आज मी खरेच अश्या काही कविता, मला भावलेल्या आणणार आहे. काही अवांतर विषय पण येतील, पण ते कृपया सहन करून घ्या.
=========================================================================================
मे महिन्यात कार ने फिरणे बरेच होते, त्यामुळे अर्थात रेडीओ पण खुप ऐकला जातो. गेल्या वर्षी का आदल्या वर्षी याच सुमारास हेट स्टोरी मधले "आज फिर तुमपे प्यार आया है" हे गाणी ऐकलं होतं. मला व्यक्तिशः जुन्या गाण्यापेक्षा हे नवीन गाणं आवडलं जास्त, म्हणून यावर्षी मे महिन्यात यूट्युब म्युझिक वरती हे गाणं लावून फिरत होतो.
जुन्या गाण्यापेक्शा हे गाणं मला अधिक का आवडलं याचा विचार करता करता अचानक ट्युब पेटली की खर्जाचा वापर या गाण्यात अधिक झाला आहे. पूर्वीच्या काळी माहीत नाही, पण अरिजित सिंगला रोमान्स चा बादशहा करण्यामध्ये या खर्जामधल्या गाण्यांचा खुप वाटा आहे. कदाचित माणुस जेव्हा शांत असतो, किंवा आपल्या प्रिय व्यक्तीबरोबर असतो तेव्हा त्याचा बोलण्याचा सूर खाली असतो. तारस्वरात कोणी रोमान्स करतं का? पण तारस्वरात देखील रोमँटिक गाणी येतात आणि आपण ती सहन पण करतो. पण हे गाणं ऐकताना मला साक्षात्कार झाला त्या खर्जातल्या सुराचा आणि मग अचानक खजिनाच उघडल्यासारखे झाले. मग मी अशी खर्जातली गाणी शोधायला सुरुवात केली, आणि असे लक्षात आले की जी गाणी ऐकताना मन शांत होते, किंवा अचानक डोळे मिटले जाऊन तंद्री लागते तिथे बर्याच वेळेस खर्ज किंवा षड्ज अतिशय परिणामकारक वापरला असतो.
असो, नमनाला घडाभर तेल. हे गाणं माझ्या लक्षात राहण्याचे मुख्य कारण म्हणजे त्यातील कविता.
यापुर्वी मी तो समिरा कोप्पिकरच्या आवजातला अंतरा केवळ तिच्या आवाजासाठी ऐकायचो, पण एकदा त्यातले शब्द ऐकले
टूटे तो टूटे तेरी बाहों मे ऐसे के शाखों से पत्ते बेहया बिखरे तुझीसे और सिमटे तुझीमें, तुही मेरा सब ले गयाहीच ती कवितेपलिकडील कविता. आता बाकीच्या गाण्याशी मला काही कर्तव्य नाही. समर्पण म्हणजे काय असावे याची पूर्ण व्याख्या एका ओळीत कवीने करून टाकली. (आज संक्षी असते तर त्यांनी याचे किती सुंदर रसग्रहण केले असते याची आठवण होउन उगीचच नोस्टॅल्जिक पण झालो). जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा ते ओळ मला नव्याने उलगडते. त्यानंतर जाता जाता एकदा मी एक मराठी गाणे ऐकले - तुला पाहते रे. हे गाणे देखील मी कित्येक वर्षे ऐकत आलोय, पण शब्दांना मी सुरांपेक्षा नेहमीच कमी भाव देत आलो. त्यातही गाण्याच्या ओघात कवी लिहून जतो -
किती भाग्य या घोर अंधेपणीही दिसे स्वप्न ते थोर जागेपणीहीम्हटले तर ही ओळ अगदीच फालतु आहे, पण म्हटले तर सगळे आयुष्याचे सार या दोन ओळीत आहे. या ओळी त्या गाण्यापेक्षा खूप वरच्या स्तरावर जातात आणि मनाला भावतात. आता छंदच लागलाय या कवितांवर विचार करायचा आणि अश्या कविता शोधायचा. बघा तुम्हाला पण कुठे मिळते का अशी कविता?
वाचने
4914
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान
म्हटले तर सगळे आयुष्याचे सार या दोन ओळीत आहे.>>>> सहमत.अजून लिहायचं होतं
छान लिहिलंय. पण या ओळींच आजून
छान लिहिलंय. पण या ओळींच आजून
मस्त!
नजरिया.. आपला, आपल्यापुरता..
गदिमा यांचे प्रत्येक काव्य
गदिमा लोकोत्तर होते.
In reply to गदिमा यांचे प्रत्येक काव्य by सुबोध खरे
खरे आहे, लेख घाईघाईत आवरला
किती भाग्य या घोर अंधेपणीही
फालतू म्हणजे तुम्हाला वाटतय
In reply to किती भाग्य या घोर अंधेपणीही by यशोधरा
नाही नाही
In reply to फालतू म्हणजे तुम्हाला वाटतय by आनन्दा
तिरकस टोमणे मारायचे कारण
In reply to नाही नाही by अभ्या..
अरेरे
In reply to तिरकस टोमणे मारायचे कारण by यशोधरा
अच्छा, ओके. तरीही माझा प्रश्न
In reply to फालतू म्हणजे तुम्हाला वाटतय by आनन्दा
मला फालतू वाटले नाही, म्हणूनच
In reply to अच्छा, ओके. तरीही माझा प्रश्न by यशोधरा
ओके. धन्यवाद.
In reply to मला फालतू वाटले नाही, म्हणूनच by आनन्दा
आता ही बघा
कितीक हळवे, कितीक सुंदर, किती शहाणे अपुले अंतर त्याच जागी त्या येऊन जाशी माझ्यासाठी माझ्यानंतर ........ अशी सुरवात होऊन पुढच्या ४ कडव्यांत ती रंगत जाते आणि वाचकाला असे वाटते की हे २ प्रेमिकांच्या लपाछपीचे व आत्मीयतेचे वर्णन दिसतेय ! ..आणि मग शेवटच्या कडव्यात एकदम काय आहे बघा:मेघ कधी हे भरून येता अबोल आतून घुसमट होता झरते तिकडे पाणी टपटप आणि इकडे शाई झरझर..... तेव्हा साक्षात्कार होतो की ‘ती’ ही कवीची प्रेमिका नसून ....... आहे ! ....ओळखताय का ? सोप्पंय !